प्रवास

कोकण यात्रा - २: शांत, नयनरम्य कोळिसरे

Submitted by मंदार-जोशी on 30 June, 2010 - 04:00

लक्ष्मीकेशव आदिसनातन, कोळिसरे ग्रामी | शिळागंडकी मूर्ती शोभे, अतिसुंदर नामी ||

पेंच अभयारण्यात एक दिवस

Submitted by नरेंद्र गोळे on 17 June, 2010 - 01:24

२००७ च्या मे महिन्यात आम्ही नागपूरला होतो. तेव्हा एक दिवस कुठे तरी सहलीस जावे असा विचार पक्का झाला. मग परस्पर सहमतीने पेंच प्रकल्पाची निवड झाली. ती मे महिन्याची ८ तारीख होती. उन्हाळा कडाडला होता. ४८ अंशावर पारा चढला होता. तरीही अरण्यास भेट देण्याकरता तो काळ योग्यच होता. कारण उन्हाळ्यात अरण्यातील पाणवठे ओसरत जातात. जिथे अजूनही ते बाकी असतात, त्यांच्या अवती भवतीच निरनिराळे प्राणी-पक्षी आढळण्याची शक्यता दाट असते. म्हणूनच उन्हाळ्यात, नैसर्गिक पाणवठे हुडकत अभयारण्यांतून भटकणे आनंददायी ठरू शकते. त्यातून माझा भाऊ वनाधिकारी असल्याने, सहलीसोबत सुसंगत निरुपणाची उत्तम सोय उपलब्ध होती.

कोहोज गडाची सफर........

Submitted by रोहित ..एक मावळा on 2 June, 2010 - 05:58

उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय.अंगाची लाही-लाही होतेय.म्हणुन हा पाण्याचा शिडकावा...मागच्या वर्षी पावसाळ्यात केलेल्या ट्रेकची सफर......कोहोज गड........

घनगड- तेलबैला- वाघजाई घाट- ठाणाळे लेणी- सुधागड

Submitted by हेम on 20 May, 2010 - 09:28

जलाशयांची रेलचेल असलेल्या लोणावळ्याच्या आसपास मुक्कामी डोंगरयात्रा करणार्‍यांना पर्वणी असलेले किल्ले आहेत, त्यापैकी लोणावळ्याहून ३०-३५ किमी. वर असलेल्या घनगड- तेलबैलाची रांग कित्येक दिवसांपासून चिन्मय व माझ्या डोक्यात होती.

प्रचि १

बुमरँग, डिडरी डु अन इतर इंडिजिनियस आयुधे / हत्यारे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऑस्ट्रेलिया चा शोध लागणे, अन तिथल्या आदिवासी लोकांचा इतिहास, त्यांची कामाची/ शिकारीची हत्यारे, जीवन, मनोरंजन याबद्द्ल जर एखाद्या आदिवासी माणसाकडुन कळले तर कित्ती छान! तो योग आला, मागील एका शनिवारी ट्रीप ला गेलो म्हणुन. कांगारु व्हॅली परिसरातील एका रिसॉर्ट कम वाईल्ड लाईफ पार्क मध्ये, एका इंडिजिनस फॅमिली - इथे आदिवासी/ वनवासी - कुटुंबाकडुन बरीच इंटरेस्टींग Happy माहिती मिळाली. सगळी इथे लिहिणे शक्य नाही! पण थोडे फोटो सोबत देत आहे!
काही महत्वाची माहिती:

चक्रमांकित सह्यांकन २००९.

Submitted by हेम on 1 May, 2010 - 04:47

मुलुंडची चक्रम हायकर्स संस्था १९८३ पासून दर २ वर्षांनी सह्याद्रीरांग परिसरात ५ दिवस मनसोक्त भटकण्यासाठी 'सह्यांकन' मोहिम आयोजीत करते. या वर्षी सह्यांकनचा मार्ग होता, मोरोशीचा भैरवगड-नळीच्या वाटेने हरिश्चन्द्रगड- शिरपुंज्याचा भैरवगड- घनचक्कर- रतनगड. एवढा भन्नाट चान्स कोण सोडेल?..............
सह्यांकनबद्दल अधिक माहितीसाठी...
http://www.chakramhikers.com/activities/major.html
*************

आमच्या ५ व्या बॅचचे लिडर्स- विनय नाफडे व विनय कुलकर्णी

हर हर गंगे !

Submitted by प्रकाश काळेल on 27 April, 2010 - 07:18

"आज्जी ओsss, ते काय आहे? "
तळ्यात पटापट उमटणारी असंख्य वलयं बघून मी आजीला विचारलं
"पवणार. आता चल बघू पटापट... म्हादेवाची आरती चुकंल आपली! "
"पवणार..... म्हणजे काय असते? "
"काय असतं मंजी?... पाण्यात पवणारा किडा असतो, केकरावानी. "
"केकर म्हणजे? "
"केकर मंजी झुर्रळ.. आता चल बघू! "

माझ्या प्रश्नांची मालिका मध्येच सोडून आजीनं तळ्याच्या बांधावरून झपाझप पुढं चालायला सुरुवात केली.

विषय: 

सिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान

Submitted by नरेंद्र गोळे on 26 April, 2010 - 07:15

इथला पसंतीचा दर्शनसमय सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणताही आहे. मोबाईल फोनचित्रकास प्रकाशचित्रण शुल्कही नाही, इतर स्थिर आणि चल-चित्रकांस मात्र ते लागू आहे. जवळचे रेल्वेस्थानक हावरा आहे तर जवळचे मेट्रो स्थानक एस्प्लनेड. इथे श्यामबाजार, राजाबाजार आणि धरमतल पासून ६१, ६१अ, ६२ या सीटीसीच्या बसेसमधून पोहोचता येते. बघायला किमान ४५ मिनिटे वेळ तरी हवाच. वनस्पतीशास्त्रातील अभ्यासकांना मात्र कितीही वेळ असला तरी पुरेसा ठरेल अशी खात्री देता येणार नाही.

Pages

Subscribe to RSS - प्रवास