प्रवास

उनाड माबोकरांचा उन्हाळी वर्षाविहार !!

Submitted by Yo.Rocks on 7 April, 2010 - 02:59

एप्रिल उजाडला नि सुर्य अधिक प्रसन्नतेने तळपु लागला.. घामाच्या धारा वाहु लागल्या.. अशा गरमीचा वैताग कोणाला नाही येणार.. नि अशा नकोश्या उकाड्यात जर कोणी विचारले "चल ट्रेकला येतोस का ? " तर नक्कीच नकारार्थी उत्तर मिळेल.. त्यातच 'अरे चल ना, मस्त धबधब्याखाली डुंबून येवु ' म्हटले तर वेड्यातच काढतील.. कोण्या पाणीटंचाईग्रस्त मुंबईकराला विचारले तर तो आपल्याकडच्या बादल्या पाठवुन देईल.. Proud पण ह्या उकाड्यात अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला नक्कीच गारवा मिळतो.. धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद मनमुराद लुटता येतो.. त्या जागेचे नाव.. उल्हास व्हॅली ! ज्यालाच कॅनियॉन व्हॅली असेही म्हणतात.

दक्षिण फ्रान्स (Côte d'Azur - French Riviera)

Submitted by सॅम on 6 April, 2010 - 16:44

या वेळी पुन्हा नाताळची आठवडाभर सुट्टी होती. काही कारणांनी विमानप्रवास टाळायचा होता. त्यामुळे आठवडाभराच्या सुट्टीत काय करायचं हा प्रश्न होता. फ्रान्समध्ये पॅरिस सोडून आम्ही फक्त शमोनी (Chamonix) बघितले होते. यावेळी अगदी ऐनवेळी दक्षिण फ्रांस (इंग्रजीत, French Riviera, फ्रेंचमधे Côte d'Azur) बघायचं ठरलं. 'फ्रेंच रिविएरा' या नावानं ओळखला जाणारा हा भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश (तुलनेने) गरम हवामान आणि बीच यासाठी प्रसिद्ध आहे...

शब्दखुणा: 

भटकंती -- कर्नाटक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गेल्या खूप दिवसापासून "कुठेतरी फिरायला जाऊ या ना!!" अशी भुण भुण कधीपासून आमची चालू होती. त्यात पप्पाना एकुलत्या एका जावयाला कर्नाटकातून तेही स्वतःच्या गावी घेऊन जायचे होतेच होते. आमचा देसायांचा वाडा, गावातले धरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक प्रांत एकदा फिरवून आणायचा होता. अर्थात सतिशला पण फिरायची फारच आवड असल्याने तो तर कधीचाच तयार होता. पण त्याला कर्नाटकामधे सर्वात जास्त उत्सुकता ही तिथल्या वडापची होती. लोकं बसच्या टपावरून प्रवास करतात असे त्याला कुणीतरी सांगितले होते. आईला मंत्रालयमला जाऊन जावयाकडून सुवर्ण रथोत्सव करायचा होता.

प्रेमदिन, सेलिब्रेशन नि कुलंग !!

Submitted by Yo.Rocks on 14 March, 2010 - 13:22

जानेवरी महिन्यात जेव्हा अलंग-मदन करुन पायथ्याशी पोहोचलो तेव्हा कुलंग रुसलेला दिसत होता ! त्याच्या अंगावर खेळायचे राहुन गेले होते.. म्हटले इथे पुन्हा यायचे झाले तर फक्त कुलंगलाच भेटुन जायचे ! उंची सुमारे ४८०० फुटच्या आसपास.. अलंग्-मदन जोडीला खेटुनच उभा.. या त्रिकुटांमध्ये कुलंगवरुनच भोवतालचा परिसर जास्त चांगला दिसतो.. नि कळसुबाईच्या खालोखाल याची उंची ! वाटले होते पुढच्या वर्षी योग येइल.. पण लवकरच ह्या दुर्गांचे त्रिकुट पुर्ण करण्याची संधी माझ्या नेहमीच्या ''ट्रेकमेटस" या ग्रुपच्या कृपेने चालुन आली..

When in Rome... (इटली प्रवास: भाग २/२)

Submitted by सॅम on 14 March, 2010 - 10:44

रोमहून सकाळी निघून (पहा इटली प्रवास : भाग १/२) दुपारी फ्लोरेन्सला आलो. लगेच हॉटेलात चेक-इन करून पिसाला निघालो.

पिसा

विषय: 

धो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला...

Submitted by विमुक्त on 25 February, 2010 - 06:15

(आज सहजच मागच्या काही भटकंतीचे फोटो बघत होतो... तर गेल्या पावसाळ्यातल्या एका भटकंतीचा अनुभव खूप खूप आठवला... हा अनुभव तेव्हा मी इतर काही ठीकाणी सांगीतला होता, पण मायबोलीवर प्रथमच सांगत आहे...)
------------------------------------------------------------------------------------------
"हँलो आई, मी पालीला आलोय... आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भटकायला जाणार आहे" मी.
"अरे, पण तू तर साताऱ्याला जाणार होतास ना आज?" आई.
"हो, पण अजित आणि सरांचा आज भटकायला जायचा बेत होता... मग मला राहवलं नाही... उद्या जातो साताऱ्याला" मी.
"बर..." आई.

When in Rome... (इटली प्रवास: भाग १/२)

Submitted by सॅम on 21 February, 2010 - 13:29

मागच्या वर्षी (इ.स.२००९) ऑगस्टमध्ये आम्ही इटली प्रवास केला. युरोपात आल्यावर इटली प्रवास कधी होतो याची वाटच बघत होतो. आठवडाभर सुट्टी काढून दहा दिवसात मिळून आम्ही रोम, फ्लोरेन्स आणि व्हेनिसमध्ये राहिलो आणि रोमहुन नेपल्स व पॉम्पेइ, फ्लोरेनसहुन पिसाला धावती भेट दिली.

विषय: 

फ्रान्सचे दिवस... आणि फ्रान्सच्या रात्री

Submitted by हर्ट on 12 February, 2010 - 02:41

एकदा सिंगापुरातील ग्रंथालयात पायाच्या टाचा वर करुन कपाटातून पुस्तके काढत असताना एक पुस्तकं माझ्या पायापाशी पडले. मी नमस्कार करुन ते पुस्तक सरळ करुन वाचले तर त्यात मला काही फोटो आढळले. ते कृष्णधवल फोटो पाहुण माझे मन आतल्या आत कुठल्या तरी हळव्या स्पर्शानी विरघळले. त्यात काही पत्राचा भाग होता जो कुठल्या तरी अगम्य भाषेत लिहिला होता. मग मी मुखपृष्ठावर नजर टाकली तर नाव दिसले 'The Diary of a Young Girl - Anne Frank'. मी ते पुस्तक तिथल्या तिथेच उभ्यानी वाचायला सुरवात केली आणि पुस्तकाशी समरस होऊन गेलो. जेवढी पाने तिथल्या तिथे वाचली ती वाचून मला अगदी तरल भावनिक आनंद मिळाला. मी ते पुस्तक घरी आणले.

विषय: 

सफर हॉलंडची

Submitted by सॅम on 11 February, 2010 - 19:52

मागच्या वर्षी (इ.स. २००९) मे महिन्यात बऱ्याच सुट्या जोडून आल्या होत्या. महिन्याच्या सुरवातीच्या सुट्या जोडून आम्ही ऑस्ट्रियाला गेलो. महिन्याच्या शेवटीपण चार दिवस सलग सुट्टी मिळत होती. आत्ताच मोठ्या प्रवासावरून आलो असल्याने पुन्हा कुठे जायचं का नाही हे ठरत नव्हतं. मायबोलीवर हॉलंडच्या ट्युलिपच्या बागेचे फोटो पाहिले आणि आमची हॉलंड प्रवासाची तयारी सुरु झाली... ही सिलसिला फेम बाग वर्षातले दोन महिनेच चालू असते. या वर्षी २१ मेला बंद होणार होती.

विषय: 

शुर मायबोलीकर गेले "ढाक-बहिरी"वर.. !!

Submitted by Yo.Rocks on 9 February, 2010 - 15:33

सुन्या: " काय मग कसं वाटतय ?"
सम्या (समीर रानडे) : "बस्स झाला ट्रेक.. इथेच थांबेन म्हणतो "
विन्या (विनय भीडे) : "अरे त्या दरीएवढी फाटलीय "
योगी (योगायोग) : "आयला, मस्तच रे.. मजा येणार"
यो (यो रॉक्स) : "अरे ये तो शुरवात है !"

वरील उद्गार आहेत मायबोलीकरांचे.. शुरवीरांचे.. शुर मायबोलीकर्स ! ज्यास खालील घळीचे दृश्य कारणीभुत होते..
IMG_1568.JPG

Pages

Subscribe to RSS - प्रवास