चकवा

Submitted by Vishal Kulkarni 005 on 18 January, 2013 - 13:16

चकवा..

लिहिता लिहिता लेखणी थांबते
भूतकाळाच्या आठवणीवर मोहोर उमटते
मनाच्या कप्प्यात दडलेल्या
आठवणी बाहेर येतात
बघता बघता त्यात हरवून जाते...

हिरव्यागच्च झाडीतून
एक पांढरा ठिपका दिसतो
तो एक चकवा असतो
त्यात मला हरवायचं नसतं
नकळत पणे एकाकी चालायचं असतं...

वादळवा-य़ाशी अखंड
तोंड देत जायचं असतं
आठवणींच्या कड्यावरुन
स्वत:ला झोकून द्यायचं असतं...

निसर्गाने शिकवले की
वनवास कपाळी आला
तरी मानाने जगायचं असतं
तोहि एक चकवा असतो
आणि त्यातुनही सहिसलामत सुटायचं असतं...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users