माहिती हवी आहे. )
माहिती हवी आहे.
जसे इंग्लिश चुका दुरुस्ती साठी स्पेल चेक असते तसे मराठीत ह्रस्व दीर्घ ई. व्याकरण विषयक चुका दुरुस्ती साठी काही मार्ग आहे का.(कोम्पुतेर टायपिंग करताना )
माहिती हवी आहे.
जसे इंग्लिश चुका दुरुस्ती साठी स्पेल चेक असते तसे मराठीत ह्रस्व दीर्घ ई. व्याकरण विषयक चुका दुरुस्ती साठी काही मार्ग आहे का.(कोम्पुतेर टायपिंग करताना )
परिवर्तनाची बोंबा-बोंब
ठराविक-ठराविक वेळेला
ठराविक-ठराविक धडे असतात
सांगणारे सगळेच असले तरीही
आत्मसात करणारे थोडे असतात
सामाजिक परिवर्तनाच्या नावाखाली
कुठे बाजारीकरणाचाच जश्न आहे
परिवर्तन तर सर्वांनाच हवं आहे
मात्र करायचं कुणी हा प्रश्न आहे,...!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
गंमत हास्य दिनाची,...
तीला म्हटलं हसून घे
आज हास्य दिन आहे
एक दिवस हसण्याचाही
सांग तुला का शीन आहे
तीनं माझ्याकडं पाहीलं
चेहरा थोडा गंभीर केला
तीच्या या गंभीर वर्तनाला
मी माझाच मला धीर दिला
मी प्रयत्न केला तरीही
ती मात्र हसली नाही
तीच्या स्वभावाशी ती
जराशीही फसली नाही
तीचा चेहरा पाहून मात्र
मी गप-गुमान बसलो होतो
तीला हसवण्याच्या नादात
मीच आज फसलो होतो
मात्र तीला पाहून मीही
आता पुरता गंभीर झालो
आता मीही हसणार नाही
या मतावर खंबीर झालो
माझी झालेली फसगत
आता मला दिसु लागली
मात्र माझा चेहरा पाहून
ती जोरजोरात हसु लागली
नक्की कळेनासं झालं मला
संवाद गायी-बाईचा,...!
एकदा गायी म्हणाली बाईला
माझ्यापोटी ३३ कोटी देव आहेत
जिथं तुला किंमतच नाही तिथेही
आम्हा गायींच्या उठाठेव आहेत
मग बाई पण म्हणाली गायीला
हा माझ्या नशिबाचा दोष नाही
पण माणसांच्याच कुकर्माचा
इथे माणसांनाच होश नाही
आज जे तुला किंमत देतात
त्यांनीही मोठा जुल्म केलाय
विसरले आहेत की त्यांनाही
एका बाईनंच जन्म दिलाय
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
सुट्ट्यांची मजा
शालेय जीवना पासुनच मनाला
सुट्यांची आवड जडलेली असते
कित्तेक कामांची मुहूर्तमेढ सुध्दा
सुट्ट्यांवरतीच अडलेली असते
रोज-रोज सुट्ट्या शोधत मनं
सुट्ट्यांच्या आखणीत गुंग असतात
अन् लहाणा पासुन थोरांसहीत
लोक सुट्ट्यांसाठी उत्तुंग असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
संस्कृती
वेग-वेगळ्या धर्मांचे इथे
वेग-वेगळे नियम आहेत
समतेपासुन अजुनही कुठे
माणसंच दुय्यम आहेत
स्वाभिमान बाळगता येईल
अशी आपली संस्कृती असावी
मात्र कुणाच्याही संस्कृतीमध्ये
कधीच विषमतेची विकृती नसावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३