Cell Phones

Submitted by चाफा on 22 December, 2008 - 18:14

कोणी Palm Centro, LG Rumor, किंवा Samsung M520 हे फोन वापरले आहेत का? कसा अनुभव आहे? Sprint बरोबरच्या इतर काही मॉडेल्सचा चांगला/वाईट अनुभव दिला तरी उपयोग होईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहिही अनुभव नाही ह्या सेलफोन्सचा. पण तु सात वर्ष सात दिवसांनी (की सात आठवड्यांनी) पहीला बाफ उघडलास म्हणून अभिनंदन करायला आले. तर मनःपूर्वक अभिनंदन. बा. फ. भरभरून वाहो ही सदिच्छा! Happy

चाफ्या, काय गोंडस दिसतोय तुझा पहिला वहिला बाफ! (नवसाचा का रे?) Proud
(आणि कित्ती confused! - अगदी तुझ्यावर गेलेला दिसतोय लब्बाड!) Proud

मी Palm Treo वापरत होते, पण स्प्रिंटबरोबर नाही, Verizon बरोबर. (आता iphone वापरते, त्यामानाने) bulky होता, आणि stylusचा उपयोग मी पाडण्या/हरवण्यासाठी जास्त केला, पण otherwise मला आवडायचा तो फोन वापरायला.

तुमचं बरं आहे हो तुमच्याकडे iPhone आहे Wink

सिंडे Proud

चाफ्या, तुला उपयुक्त सल्ले मिळतील की नाही माहित नाही पण पार्ल्यातल्या काकवांना(वरच्या तीन :फिदी:) चांगला टीपी मिळालाय.
नाही, अनुभव नाही ह्या फोनचा. माझाही iphone झिंदाबाद

मी पण आले. मला पण मज्जा वाटतेय पहिल्या वहिल्या बाफ वर आल्याची Proud

बरं आता मी तिन्ही सेल्फोन्स वापरुन पाहीन आणि तुला अनुभव सांगीन.

चाफा, सर्वप्रथम तुझे हार्दीक अभिनंदन!

तर सेलफोनच्या बाबतीत तुला लोकांचे अनुभव कळले आणि तुझं रीसर्च करुन झालं की ते इकडे मला शेअर कर Proud

मला वाटलं होतं अमरावती आणि इंद्रप्रस्थाची माहिती द्यायला उघडला की काय बाफ! बघते तो सेल फोनची माहिती..

Proud

फ, कोण उभंय? खुर्ची द्या त्यांना! Proud
बरं, हा बाफ आता बंद करायला हरकत नाही. इथे उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. Proud

मी Sprint विकतो. चाफा रुमर फुकट असला तरी घेऊ नये. की- बोर्ड वाला फोन हवा असेल तर सॅमसंगचा रँट, ट्च प्रो हे चांगले आहेत. Dont go for rumor. rant is more sturdy and functionally almost same as Samsung Instinct. HTC Touch-Pro is basically a Smart Phone. I like it. Palm Centro is OK My manager has it and he is happy. But Centro can not do GPS nav. It gives Maps like i-phone. Samsung M520 is little more than Entry level phone Some functions, such as GPS Navigation, etc can be used on M520 and coparing the price (Free) it is a good phone.

if you r looking for the phone which connects with your Office emails, Outlook Calender, etc then Centro, Touch Diamond or Touch pro are the better one. There is new Palm800W too. Otherwise, for gemeral emails(yahoo gmail, etc) Ranking is INstinct (If you are already a sprint customer and having old plan, then you may have to change Plan for Instinct) , Lotus, Rant, M520.

I hope this guves you a little help to decide @phones.

Palm Centro आहे.. ठिक वाटला.. फक्त Back Key कुठेही नसल्यामुळे Navigation चा त्रास वाटला.

बाकी तज्ञ सांगतीलच..

विनय

भूषण खूप धन्यवाद. सध्या M520 घेतलाय. मुख्य म्हणजे Slider phone असला तरी फोन वापरायला तो स्लाईड करावाच लागतो असे नाही. शिवाय त्याचे radiation कमी आहे, वजनाला हलका आहे व मला हवे असलेले बेसिक फीचर्स आहेत. बघूया कसा वाटतो ते. (पण तो फुकट मात्र नाहीये. रीबेटनंतरही ५०$ किंमत आहेच.)

विनय धन्यवाद. Centro, Blackberry आणि I335 मित्रांकडे होते त्यामुळे प्रत्यक्ष बघायला मिळाले मला.

DUAL SIM चा फोन घ्यायचा आहे. क्रुपया जाणकार माहिती द्याल का कोणता चांगला ते ?

1> dual sim
2> if possible touch screen & keypad

आर्च,
तुम्हाला तो अनलॉक करुन घ्यावा लागेल. तसेच भारतातले प्रिपेड कार्ड घ्यावे लागेल.
US चा 3G अटी एन टी तिकडे roaming charges शिवाय चालणार नाही (माझ्या माहीतीप्रमाणे).

US चा 3G अटी एन टी तिकडे roaming charges शिवाय चालणार नाही >> बरोबर. roaming charges अवाच्या सवा आहेत. तसेच हे लक्षात ठेवा कि तुम्हाला voice mail आला (जरी तुम्ही कॉल रिसिव्ह केला नसेल) तरिहि roaming charges लागतात. Airport mode वर टाकणे हा एकमेव उपाय.

आर्च, कुठला सर्व्हिस प्रोव्हाईडर आहे ? टी वाले अनलॉक कोड देतात. तो वापरून फोन आधी अनलॉक करून घेतला तर भारतात सिम घेऊन वापरता येईल. पण युएसमधलाच नंबर तिथे अ‍ॅक्टीव ठेवायचा असेल तर भयंकर महाग पडतं..

आयला, iPhone चा अन्लॉक कोड देतात? ऐकलं होतं कि इकडचा भारतात वापरायला जेलब्रेक करावा लागतो...

सिध्दार्थ, आसामी, आणि पराग धन्यवाद.

AT&T चा आहे. अनलॉक कोड विचारते. मग एअरपोर्टवर सीम कार्ड बदलून मिळेल न? कॉल फॉर्वर्ड सर्व्हीस वापरली आहेत का तुम्ही कोणी? इथल्या सेल फोनवरून इंडियाच्या मिळालेल्या सेल नंबरवर? असलीत तर कुठची? आणि साधारण किती पैसे पडतात आणि तिकडे गेल्यावरच नंबर मिळेल म्हणजे तिकडेच जाऊन घ्यायला लागेल न? ती एअरपोर्टवर मिळेल का?

मी नोव्हेंबर मध्ये आय फोन ३जी इथुन भारतात नेला. इथे मॉल मधल्या अ‍ॅपल स्टोअर मधुन घेतला. त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही अनलॉक करुन द्याल का, ते नाही म्हणाले. तुमचा तुम्हालाच करुन घ्यावा लागतो. तुमच्या गावात (जिथे सध्या राहतेस तिथे) जर कोणी देसी फोन वाले असतील तर ते अनलॉक करुन देऊ शकतील. भारतात अगदी सोपं आहे आहे अनलॉक करणं. सेल फोनचं दुकान वाले करुन देतील जेलब्रेक.
एअरपोर्ट वर गेल्या गेल्या लगेच तिथलं सीम कार्ड मिळेल की नाही ह्यात जरा शंका आहे. मुंबईला जात असशील तर एअरपोर्ट वर मला तरी कुठे नाही दिसलं नाही असं काही दुकान. रोमींग चार्जेस अव्वाच्या सव्वा आहेत हे खरं आहे. डेटा (इमेल) वगैरे सगळे ऑफ करुनच जावे!
माझं मत आहे जास्त तारेवरची कसरत न करता (हमखास लफडं होतं) नुसता फोन चालु ठेवावा. एकदा भारतात आपापल्या शहरात पोहोचलो की सीम कार्ड बदलुन घ्यावं!

राज.. आयफोनचा नाही माहित.. टी वाले आयफोन कुठे विकतात ? मी बाकीच्या फोन्सचं म्हणतोय.
एअरपोर्टवर नाहिये माझ्यामते. पण बाहेर मिळेल कुठेही..

नुसता ३G फोन उपयोगाचा नाही. तो क्वाड बँडही असायला हवा. भारतातील फ्रीक्वेन्सीसाठी सपोर्ट हवा.

तसेच भारतात जाऊन सिमकार्ड घेणे सोपे नाही. हल्ली पॅन कार्ड वगैरे द्यावे लागते. त्यापेक्षा ओळखीच्या कोणालातरी सिमकार्ड घ्यायला लाऊन त्यांचे वापरा.

मी काही दिवसांकरता भारतात आली आहे. मी आय फोन इथे वापर्ण्या पेक्शा एक जुना अमेरिकेतला फोन
आणला. कारण ते unlock vagere karnyachya bhangadeet aapla latest iphone bighadu naye hee
eka ichha hotich va var naatya ne mhanlya pramane halli ithe sim card ghena pan soppa rahila nahiye. Applyala ameriket nahitari dar veles contract kela ki free phones miltatach, tyatlach kuthla tari ek gheoon yava ani jatana ithech sodun jaava hey solution jast bara padta.

Arch tu kai kelas tey ithe share kar mhanje next bharat trip madhe tasa pan karta yeil.

बजेट सांगा . ड्युअल सीम मध्ये जीएसेम्-जीएसेम व सीडीएम ए -गी एस एम असे दोन प्रकार अहेत. कोणता हवा आहे? >>>

सॉरी उशीरा बघितली पोस्ट. बजेट साधारण १५००० आहे.

आर्च, iphone unlock केलास तरीही jail break केल्याशिवाय sim बदलता येणार नाही. jail break करणे सोपे आहे, just risky आहे. You can brick your phone. It voids warranty आणी तसेच काही विशिष्ट फोनबरोबर विशिष्ट itunes वापरता येत नाहित. मी बहुतेक वेळा माझा आयफोनच्या आधीचा फोन unlock करून घेऊन जातो व आईने घेतलेले सिम वापरतो.

unlock व jail break वेगळ्या दोन गोष्टी आहेत. पहिली करून देणे AT&T ला बंधनकारक आहे. दुसरी (बहुधा) इथे illegal आहे.

>>टी वाले आयफोन कुठे विकतात ? <<
टी-मोबाइलच शॉर्ट्फॉर्म टी आहे कां? मला वाटलं टी म्हणजे एटी अँड टी; त्यांचा टीकर तोच आहे. आणि मुळ प्रश्न iPhone विषयी आहे (होता)... असो. Happy

एक कामचलावु उपायः वर कुणितरी म्हटल्याप्रमाणे, अमेरीका सोडल्यावर iPhone एअरप्लेन मोड वर ठेउन, Wi-Fi ऑन करावं. आता बरीच VOIP ची अ‍ॅप्स (Vonage, Fring, Skype, GoogleVoice etc.) अ‍ॅप स्टोअरवर आहेत. अगदीच काहीनाही तर त्याचा उपयोग होउ शकतो; अर्थात जिथे Wi-Fi उपलब्ध असेल तिथेच...

Pages