वॉशर/ ड्रायर बद्दल माहिती

Submitted by मिनी on 30 September, 2010 - 16:04

मला इथे (अमेरिकेत) वॉशर/ ड्रायर विकत घ्यायचं आहे. कुठल्या कंपनीचं घ्यावं. घेतानां नेमक्या काय गोष्टी विचारात घ्यायला हव्यात? मी ऑनलाईन बर्‍याच ठिकाणी पाहिलं, पण त्या माहितीवरुन अजुनच गोंधळ वाढला. मायबोलीकरांकडुन ह्याबाबतीत माहिती मिळाली तर मला वॉशर/ ड्रायर विकत घ्यायला सोप्पं पडेल.
अगाऊ धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंझ्युमर रिपोर्टमधे बघुन लिहिते रात्री; आमच्याकडे फ्रंट लोडर आहे बरीच वर्षे - एकदम मस्त आहे.

आमचा वॉशर फ्रिजिडेअरचा आहे, लोज मधून घेतलेला. ड्रायर केन्मोअर इलिट आहे - अर्थात सीअर्सचा. ड्रायर १० वर्षे जुना आहे- त्याच्याबरोबरच घेतलेला केनमोअरचा वॉशर दोन वर्षात बिघडला. पण नंतर घेतलेला फ्रिजिडेअरचा वॉशर एकदम मस्त आहे. माझे दर आठवड्याला ५- ६ लोड वॉशरचे अन ४-५ लोड ड्रायरचे होतात. टीशर्ट / शर्ट्स व काळे कपडे मी हॅन्गरला लटकवून वाळवते. रंग जरा जास्त टिकतो व कपडे फार चुरगळत नाहीत त्यामुळे इस्त्रीचा वेळ वाचतो.

खाली Trolley असलेला घ्या... मोडला / तुटला तर खाली पाणी साचते आणि ते काढणे कठिण होऊन बसतं...

मी खूप खूप दिवस Washer\Dryer साठी Trolley शोधतोय पण मिळत नाहीय.. Sad

आमचा वॉशर ड्रायर दोन्ही जी ई चे आहेत. वॉशर टॉप लोडर आणि ड्रायर फ्रंट लोडर. ५ वर्ष झाली अजून तरी नीट आहेत (टच वूड :फिदी:)

कंझ्युमर रिपोर्टमधली माहिती अशी
४ प्रकारचे वॉशर
टॉप लोडिंग - स्वस्त, आवाज जास्त करणार, पाणी जास्त वापरणार, लोड चा बॅलन्स रहात नाही . कपॅसिटी कमि असते १२-१६ पाउंड

हाय इफिशियंसि टॉप लोडिंग : कपॅसिटी थोडी जास्त २० पाउंडपर्यंत , पण कपडे चुरगळण्याची/ गुंतण्याची शक्य्ता जास्त. कपडे अगदी कोरडे पिळून निघतात त्यामुळे ड्रायरची वीज वाचते.

फ्र्ंट लोडर - १२-२० पाउंड क्षमता, कपडे स्वच्छ निघतात. काही काही मॉडेल मधेहाय स्पीडवर असताना व्हायब्रेशन घ्ररात इतर ठिकाणीपण जाणवतील. कपडे कोरडे पिळून निघतात त्यामुळे ड्रायरची वीज वाचते.

- छोटे अपार्टमेंट साइझ
- क्षमता एकदम कमी, स्टॅकेबल असतात. जागा कमी असेल तर क्लॉझेटमधे ठेवून वापरायच्या वेळी किचनमधे आणून वापरता येतात.

त्यांनी बरेच फीचर्स दिलेत्,त्यात मला हेल्पफुल वाटलेले हे

High-quality top or lid

Look for a porcelain top or lid. A porcelain top or lid resists scratching better than painted metal.
.
High-quality tub

Look for a stainless-steel or plastic tub. Unlike a porcelain drum, stainless or plastic won't rust if it's chipped. And stainless tubs can withstand higher spin speeds, which extract more water and speed up drying.
.
Steam setting

This feature promises to clean better and to sanitize fabrics. The steam models we tested did clean stains better, but they cleaned well even when we didn't use the steam. And their prices were more than twice that of the Best Buy models in our Ratings.

Touchpad controls

Touchpad controls tend to be more versatile, letting you save favorite settings, for instance. Some high-end models have a display with a progression of menus with customized programs, though they can be tough to learn and navigate. Pluses include lights or signals that indicate the cycle, along with an automatic lock that keeps children from opening a top-loader's lid during the spin cycle. (Front-loaders lock at the beginning of a cycle but can usually be opened by interrupting it.)

Extra rinse cycle

Some models offer this. It might help those consumers who are sensitive to detergent residue.
.
Controls

Many high-end washers come with touchpad controls that incorporate menus for customized programs. Some models offer dedicated cycles for fabrics such as silk, as well as four or more water-level settings.

Customized programs can be confusing, especially while you're learning them. The basic cycles and settings can handle most washing needs, and you can replicate most special cycles with buttons or dials. Three settings for water level are plenty.

Kenmore 4027[2]

LG WM2050C[W]

GE WCVH6800J[WW]

हे तीन त्यांनी बेस्ट बाय म्हणून रेकमेंड केलेत. आवाज, व्हायब्रेशन, पाणी अन वीज यांचा वापर, सायकल टाईम इत्यादी विचार करून रेटिंग्ज दिले आहेत.
टॉपमोस्ट रेटिंग ८५ आहे - तो वॉशर साधारण १४०० ला आहे. हे सर्व ८१-८२ पॉइंट वर आहेत अन ६००-८०० रेंजमधे आहेत.

आमच्याकडे एनर्जी स्टार "LG Tromm" front loader वॉशर आणि ड्रायर आहे. किंमत साधारण १७०० डॉलर. दि बेस्ट आहेत दोन्ही. अजिबात आवाज नाही. स्वेटर सारखे कपडे हँडवॉश केले जातात. पाणी अतिशय कमी वापरल जात. इलेक्ट्रिसिटीही अतिशय कमी लागते.
जर लाँग टर्म साठी घेणार असाल तर एनर्जी स्टार फ्रंट लोडर घेणे उत्तम. LG , kenmore दोन्ही चांगलेच आहेत.

सगळ्यांचे खूप खूप आभार!
@ देसाई - पेडेस्टल बघितलं आम्ही, त्याचे २०० + २०० असे ४००$ जास्त लागतात. त्याचा खरचं इतका उपयोग होतो का?
@ शोनुतै - खुप खुप धन्यवाद. खुप चांगली माहिती दिली.
शोनुतै, सिंडी, सीमा तुमच्याकडच्या मॉडेल्सची नावं द्याल का मला प्लीज ?

Trolley / पेडेस्टल मूळे मशिनची उंची सोयिस्कर बनते. अर्थात तुम्हाला त्याच कंपनीचे घ्यायची गरज आहे असे नाही. तुम्ही स्वतः पेडेस्टल बनवू शकता. मी $१०० मधे होम डेपोमधून treated wood and slats आणून बनवले. unfinished basement मधे ठेवणार असाल तर त्याच्या खाली concrete slabs घाला (त्याही अतिशय स्वस्त असतात).

आमच्याकडे GE WCVH6800J with pedestal आहे. कपडे अगदी छान धुतले जातात शिवाय आवज अगदी नाही सारखा. यातले वेगवेगळे settings खरच फार उपयोगी आहेत.
मला with pedestal look फार आवडला आणि त्याचा उपयोगपण होतोय. पण हे install करताना leveling नीट करून घ्यावे नाहितर washer अक्षरशः हादरते.

फायनली LG चं WM2501HVA हे वॉशर आणि DLEX2501V हे ड्रायर घेतलं. चांगलं डील मिळालं थँक्स गिव्हिंगचं. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.

.