लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

इतरत्र प्रकाशित झालेले साहित्य मायबोलीवर लिहीता येईल का?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:17

तुमचे स्वतःचे लेखन जिथे अगोदर प्रसिद्ध झाले, त्या प्रकाशकांवर हे अवलंबून आहे. सहसा मूळ प्रकाशकांकडे मालकीहक्क (Copyrights) राखीव असतात. त्यांची पूर्व परवानगी घेऊन असे लेखन इथे लिहायला मायबोली प्रकाशकांची हरकत नाही.

देवनागरीत कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:09

नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

सदस्यत्वाचा कालावधी म्हणजे काय?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:06

सदस्यत्वाचा कालावधी तुम्ही मायबोलीचे सदस्य झाल्यापासून किती काळ उलटला आहे हे दर्शवतो.

प्रकाशचित्र बदलले तरी जुनेच का दिसते?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:05

"माझे सदस्यत्व" किंवा "विचारपूस" मध्ये वापरलेले प्रकाशचित्र बदलले तरी जुनेच प्रकाशचित्र दिसण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे तुमच्या स्वतःच्या Browsers मधे जुन्या प्रकाशचित्राची साठवली गेलेली प्रत.

वैयक्तिक माहिती कशी बदलावी?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:00

मायबोलीवर प्रवेश केल्यावर "माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत "संपादन" मधे असलेल्या "वैयक्तिक" या उपविभागात तुम्हाला स्वतःची वैयक्तिक माहिती बदलता येईल.

मला हितगुज वर लॉगिन करता येत नाही.

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 19:56

खालील टप्पे वापरून लॉगीन करता येते आहे. कृपया हा प्रयत्न करून पहा.

१. इमेल लिहून हितगुजचा पासवर्ड पुन्हा मागवा, हा त्याचा दुवा
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/board-profile.cgi?action=forgot

"चारोळी" हा कविताप्रकार कुठे लिहावा?

Submitted by मदत_समिती on 28 March, 2008 - 21:22

चारोळ्यांना मायबोलीवर "झुळूक" म्हटले जाते. आपल्या चारोळ्या "पुन्हा झुळूक" या दुव्यावर प्रतिसादामध्ये लिहा.

कृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर केवळ स्वत: लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.

एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल?

Submitted by मदत_समिती on 27 March, 2008 - 02:10

तुम्हाला मायबोलीवरच्या ज्या सदस्याचे लिखाण वाचायचे आहे त्या सदस्याच्या नावावर* टिचकी मारा मग जे पान उघडेल तिथे "लेखन" या टॅबवरती त्या सदस्याने केलेले सगळे लिखाण एकत्र दिसेल.

या नियमाला अपवादः लेखकाने एखाद्या ग्रुपमध्ये केलेले लिखाण हे , तुम्ही त्या ग्रुपचे सदस्य असाल तरच दिसेल. अन्यथा दिसणार नाही.

स्वतःचे लेखन बघण्यासाठी "माझे सदस्यत्व" ==> "लेखन" क्रमाने क्लिक करत जावे.

पुर्वी बाफवरती दिलेल्या प्रतिक्रिया पाउलखुणांमध्ये दिसत असत. त्यात बदल केला आहे. याबद्दल माहिती येथे मिळेल.
लेखकाचे/लेखिकेचे जुने लेखन पाहण्याची सोय पुन्हा सुरु

पूर्ण न झालेले लेखन 'अप्रकाशित' कसे ठेवता येईल?

Submitted by मदत_समिती on 27 March, 2008 - 02:04

आपले साहित्य सवडीनुसार पूर्ण करुन एकत्रितपणे प्रकाशित करणे आता नवीन मायबोलीवर शक्य आहे. लेखक वा लेखिकेला आपले साहित्य जोपर्यंत प्रकाशित करायचे नसेल तोपर्यंत ते "अपूर्ण" अवस्थेत ठेवता येईल. असे साहित्य इतर वाचकांना दिसणार नाही. जेव्हा आपले साहित्य प्रकाशित करण्यायोग्य होईल तेव्हा त्याची स्थिती "संपूर्ण" अशी करावी.

"अपूर्ण" साहित्यात काही बदल करायचे असल्यास आपल्या सभासद खात्यात जाऊन "माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "पाऊलखुणां" मध्ये आपला अप्रकाशित लेख दिसेल. तिथे लेखक वा लेखिकेला आपल्या साहित्याचे संपादन करून त्यात आवश्यक ते बदल करता येतील.

Pages

Subscribe to Maayboli RSS