मला हितगुज वर लॉगिन करता येत नाही.

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 19:56

खालील टप्पे वापरून लॉगीन करता येते आहे. कृपया हा प्रयत्न करून पहा.

१. इमेल लिहून हितगुजचा पासवर्ड पुन्हा मागवा, हा त्याचा दुवा
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/board-profile.cgi?action=forgot
२. नवीन पासवर्ड भरा. (तोच पुन्हा दिला तरी चालेल)
३. इमेल मधे आलेली Activation Key लिहा.
४. हितगुजवर लॉगीन करा.

तसेच तुमच्या नावात जर space character असतील तर हितगुजवर तुम्हाला लिहिता येणार नाही. तिथल्या जुन्या softwareला space चालत नाही.

एकदा घेतलेले नाव (ID) बदलता येत नाही. पण नवीन नाव घेणे अगदी सोपे आहे.

नवीन मायबोलीवर लॉगिन करताना फक्त www.maayboli.com हा दुवा वापरावा. जर तुम्ही www.hitguj.com वापरत असाल तर लॉगिन निट होणार नाही.

मी मायबोली ची सभासद झाल्यापासुन.... "मला हितगुज वर लॉगिन करता येत नाही" या अडचणीत आहे.
मी वरिल टप्पे वापरून लॉगीन करता येते आहे की नाही हे तपासुन पाहीले.... पण २ प्रयत्न करुनही जमले नाही.

४. हितगुजवर लॉगीन करा.
हा टप्पा पुर्ण झाला की खालिल सन्देश येतो.

Error: Incorrect username and/or password
Please enter your correct username/password on the form below.

कृपया मदत करा.

जुन्या हितगुज वर लॉगईन असल तरी बहुदा नविन हितगुज मधे जाता येत नाहि. अजुन नक्की कळल नाहिये पण आत्ता तरी तिथे लॉगऑफ केल्यानंतर नविन हितगुज वर माझ लॉगिन झाल.

JUNYA HITGUJ WAR LOGIN HOT NAHI NAVIN MAAYBOLIWAR LOGIN HOTE JUNYA HITGUJWAR USER ID PASWORD WRONG AHE ASA LIHUN AETA KAI KELYWAR MALA JUNYA HITGUJWAR LOGIN KARTA AEIL

@manatlya_unhat
लवकरच जुन्या हितगुजवरचे सगळेच विभाग इथे येतील. नवीन आणि जुन्या हितगुजवर काही मायबोलीकराना नीट लॉगीन करता येत नाही आणि ही अडचण जुने हितगुज बंद झाल्यावर जाईल. त्यामुळे तुम्हाला लवकरच जुन्या हितगुजवर लॉगिन करायची गरज रहाणार नाही.

माझ्या कित्येक वर्षांच्या जुन्या सवयीमुळे मी www.hitguj.com वर लॉगीन करत होते त्यामुळे नविन हितगुज वर माझ लॉगीन होत नव्ह्त. www.maayboli.com वर लॉगीन करायला आता काहिच प्रॉबलेम येत नाहिये. Happy धन्यवाद.

मला हितगुज वर लोगिन करता येत नाहि,खुप प्रयत्न करुन हि जमत नाहि मला कुनितरि मदत करा ना? मि मायबोलिवर आत्ताच सदस्य झाले आहे

मला जुन्या हितगुज वर लिहायचे आहे; पण माझा इथला ID तिथे चालत नाहीये; काय करु?

..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

जुन्या हितगुजमधले एक एक भाग इथे नवीन ठिकाणी आणण्याचे काम चालू आहे आणि लवकरच जुन्या हितगुजवर लिहिण्याची गरजच भासणार नाही.
तुम्हाला जुन्या हितगुजवर कुठल्या पानावर लिहायचे आहे? ते कळाले तर तो भाग, इकडे लवकर आणण्याचा प्रयत्न करू.

मला माहिति हवी आहे की , गणपतीच्या मराठि आरत्या कोणत्या आहेत ? आणि त्या कोणी रचल्या आहेत ? कॄपया माहिती द्यावी.

mala pak kruti havi aahe ya sadarat prashna vicharyache ahhet parantu tithe " navin pratisad dya " hi khidki kuthech disat naahi , tya mule mi gondhale aahe . mala malvani masala chi vajane ya parimanat recipe havi aahe parantu pratiasad milat nahi , kadachit mi junya hitguj var login kelya mule asel .

मला खरेदि विभागामधे लोग इन करन्यामधे अडचण येत आहे. मला दिवाळि अंक खरेदि करायचे आहेत.
जुन्या मायबोलिवरिल लोग इन इकडे चालत नसल्यामुळे मी नवीन आयडि बनवला आहे. पण तो वापरत असता एरर मेसेज येत आहे.
<प्ल्स हेल्प>

diptidesai,
टेक्नीकली मायबोली आणि खरेदी या दोन वेगळ्या साइट्स आहेत. त्यासाठी २ वेगवेगळे लॉग इन लागतात. मायबोलीचा आयडी चालणार नाही.
जर नवीन बनवलेला आयडी चालत नसेल तर चुकुन जुनाच पासवर्ड सेव्ह झालाय का आणि तो वापरला जातोय का ते बघा. खरेदीची साईट नवीन विन्डोत उघडुन बघा.
ब्राउजर हिस्ट्री क्लिन करुन बघा काही फरक पडतो का ते.

मनुरुची,
नवीन मायबोलीवर आहारशास्त्र व पाककृती गृप मध्ये "पाककृती हवी आहे" अश्या नावाचा धागा आहे तिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारु शकता. त्यासाठी कदाचित तुम्हाला त्या गृपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
मालवणी मसाल्याची कृती इथे बघा http://www.maayboli.com/node/4210

माझ्या मित्राने स्टेप १ व २ केली, पण त्याला स्टेप ३ मधली activation key मेल मधे आली नाही. काय करता येईल?

माणसा,
इ-मेल चुकुन स्पॅम फोल्डरमध्ये गेलेली नाहीये हे कन्फर्म केलेस का तू?

नाही एक दोन तासाने मिळाले, झाले त्याचे account active, धन्यवाद.

नमस्कार मधु,
http://www.maayboli.com/og या दुव्यावर जाऊन तुम्हाला ज्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यायचे असेल त्यासमोरील "सामील व्हा" हा पर्याय वापरा.

धन्यवाद.

तुमचा ईमेल सगळ्यांना दिसत नाहीच [तुम्ही स्वतः इतरांना संपर्क केल्याशिवाय].
संपर्काची सुविधा काढून टाकायची असेल तर तशी प्रोफाईलमध्ये नोंद करण्याचा ऑप्शन आहे संपादन विभागात.

प्रज्ञा १२३
तुमचा इमेल इतर कोणालाच दिसत नाही. तुमच्या प्रोफाईलमध्ये लिहीलेला मेल आयडी फक्त तुम्हाला दिसतो. तुम्हाला जर मायबोलीवरून "संपर्क" सुविधा वापरून कोणी मेल केली तरीही त्यांना तुमचा इमेल आयडी कळत नाही, तुम्ही त्यांच्या इमेलला उत्तर दिले तरच तुमचा मेल आयडी कळू शकेल अन्यथा नाही.

माझी एक अडचण आहे. या साईट वर मी माझी “एक अनोखी भेट”हि कथा लिहिली व सेव्ह पण केली पण मी ती कथा पाहू शकत नाही.

कृपया शोधण्यास मदत करा.

मुग्धाजोग नमस्कार,

एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल? या मदतपुस्तिकेतल्या दुव्यात लिहील्याप्रमाणे माझे लेखन हा सदस्यत्वामधला दुवा बघितलात का ? तिथे तुमचे प्रकाशित झालेले किंवा सुरू केलेले पण अप्रकाशित असलेले सर्व साहित्य दिसेल.

-मदत_समिती.