इतरत्र प्रकाशित झालेले साहित्य मायबोलीवर लिहीता येईल का?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:17

तुमचे स्वतःचे लेखन जिथे अगोदर प्रसिद्ध झाले, त्या प्रकाशकांवर हे अवलंबून आहे. सहसा मूळ प्रकाशकांकडे मालकीहक्क (Copyrights) राखीव असतात. त्यांची पूर्व परवानगी घेऊन असे लेखन इथे लिहायला मायबोली प्रकाशकांची हरकत नाही.

याउलट नवीन लेखन मायबोलीवर प्रथम प्रसिद्ध झाले तरी त्याचे सर्व ह्क्क तुमच्याकडेच रहातात. त्यामुळे इथे प्रसिद्ध झालेल्या लिखाणाला इतरत्र पुनःप्रकाशित करण्यासाठी मायबोलीची परवानगी घ्यायची गरज नाही.

>>>> "याउलट नवीन लेखन मायबोलीवर प्रथम प्रसिद्ध झाले तरी त्याचे सर्व ह्क्क तुमच्याकडेच रहातात. त्यामुळे इथे प्रसिद्ध झालेल्या लिखाणाला इतरत्र पुनःप्रकाशित करण्यासाठी मायबोलीची परवानगी घ्यायची गरज नाही."

हे वाक्य असे हवे का? Happy

"याउलट नवीन लेखन मायबोलीवर प्रथम प्रसिद्ध झाले तरी त्याचे सर्व ह्क्क लेखकाकडेच रहातात. त्यामुळे इथे प्रसिद्ध झालेल्या लिखाणाला इतरत्र पुनःप्रकाशित करण्यासाठी मूळ लेखकाने मायबोलीची परवानगी घ्यायची गरज नाही.
लेखकाव्यतिरिक्त अन्य कुणाला येथिल लिखाण इतरत्र पुनःप्रकाशित करायचे असल्यास, त्या त्या लेखकाची पूर्वपरवानगी घ्यावी"

चु. भु. दे. घे.
...;
आपला, लिम्बुटिम्बु

दाद, मायबोलीवर प्रकाशित झालेल्या लेखांची लेखमालिका [जसे की कादंबर्‍यांचे भाग] प्रशासक तयार करतात.

ओह. म्हणजे मी भाग टाकायला सुरूवात करायची आणि प्रशासकांना कळवायचं... मग ते काय करायला हवं ते करतात?
असो... कळेलच दुसर्‍या भागानंतर Happy

maza barach saahitya shivaji fontmadhe save kelela aahe.te mala ithe prasidha karayachya.
te mi kasa lihun kalavu?

हा आख्खा ग्रुपच त्यासाठी आहे बघा प्रीमो : कोकणी फकाणे. एकवार मायबोलीच्या संक्षिप्त आढाव्यावरही नजर टाका.

बहारश्री: मायबोलीवर सध्यातरी शिवाजी फाँटमधून युनिकोडमध्ये रुपांतरीकरणासाठी काही सुविधा उपलब्ध नाहीत. गूगलवर तुम्हाला शोधून काही मिळाले तर ते वापरावे लागेल.

मूळ इंग्रजी मधले अनुवादित केलेले लेखन (गोष्टींच्या स्वरूपातील) मायबोलीवर टाकता येईल का? कधीकधी त्यासाठी परवानगी मागणे फार कठीण असते. उदाहरणार्थ- LANCET मधल्या एका लेखाचा मी केलेला अनुवाद माझ्या कडे आहे पण त्याचे काय करायचे समजत नाही.

सर्वप्रथम मायबोली टीमला नमस्कार आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
माझी विज्ञान बोध कथा मागील आठवड्यात, एका वर्तमानपत्राच्या दिवाळी पुरवणीत प्रकाशित झाली. त्या पुरवणीचा डिजिटल फोटो इथे पोस्ट केला तर चालेल का? कथा पूर्णपणे वेगळी टाईप करून इथे प्रकाशित करायला त्यांची परवानगी नाही मिळणार असे वाटतेय कारण त्यांनी कथा लिहिण्याआधी ती पूर्णतः अप्रकाशित असावी अशी अट ठेवली होती.

Vaibhav Gilankar
जर त्यांची परवानगी मिळणार नसेल तर डिजिटल फोटो काय किंवा टाईप केलेले लेखन काय, सारखेच. तेंव्हा परवानगी न घेता फोटो टाकू नका आणि वाचकानांही टाईप केलेले लेखन वाचायचला अधिक आवडते.
मात्र "कथा लिहिण्याआधी ती पूर्णतः अप्रकाशित असावी" अशी अट आहे म्हणजे आपोआप परवानगी मिळणारच नाही असे समजू नका. सहसा कथा आधी कुठे प्रकाशित झाली होती याचा उल्लेख केल्यावर परवानगी मिळते. मायबोलीवर अशा अनेक कथा रितसर परवानगी घेऊन प्रकाशित झाल्या आहेत.

नमस्कार webmaster,
मला परवानगी मिळाली आहे , फक्त इथे कथा टाकताना पूर्वप्रकाशीत मासिकाचा उल्लेख करावा लागेल.

दैवी कृपा

क्षण होते कितीतरी सुखाचें
अजुनी आठवणीत ताजे तवाने
बिलोरी आरशासमोर असूनही
मी आरशात तुलाच पाहते

रुबाबदार डोळ्यांतील तुझे हसणे
मनामनात सतत तरळत राहते
ऐटीत फिरणे आणि ना कुणासमोर वाकणे
वैशिष्ट तुझ्या जीवनाचे मज भावले

तुझीच होऊन राहणे खूप खूप आवडले
शक्य नव्हते तरीही दैवीकृपेने साध्य झाले
एक एकदा मन विचारते स्वतःलाच
दुसऱ्या कुणी सुख दिले असता का ग एवढे?

नको तो विचार सुद्धा माझ्या मना
तू आणि तूच जीवांसाठी व्हावास पुन्हा पुन्हा
ईश्वर चरणी हीच एक प्रार्थना
देवो आरग्य आणि भरपूर आयुष्य तुला

२२/०५/२०१८
मी संतोषी