पाककृती हवी आहे - भाग ५

Submitted by मेधा on 14 January, 2022 - 12:05

भाग ४ मधे देखील २००० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने हा पाचवा धागा सुरु केला आहे

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

आधीचे धागे

https://www.maayboli.com/node/2549
https://www.maayboli.com/node/24273
https://www.maayboli.com/node/42617
https://www.maayboli.com/node/56005

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाकर कर. तळहाताएवढ्या भाकऱ्या कर. गूळ तुपाबरोबर किंवा चिंगु आमटीत (दालबाटी टाईप) कुस्करून चांगलं लागेल. आमटी (प्रोटीन) जास्त लागते. हाय प्रोटीन डाएट होईल.

उडीद डाळ पीठ मिसळून बघ.
उकड काढून बघ.
धिरडी कशी होतात? त्यात हवे तर रवा, बेसन मिसळायचे.
मोकळ भाजणी, गाकर हेही छान पर्याय वाटताहेत.
शेंगोळे ही व्हावेत.
Happy

, पण अगदी किंचितच (चमच्याने नाही, चिमटीने!) घालावा असं वाचलं आहे.>> मी वाचलंय एक कपाला १/४ टि स्पून. हे ब्रेड साठी असावं. पोळी भाकरीला कमीच लागेल.
पण ग्वार गम अनुभवावरून कोरड्या पीठात कोरडी पूड घालुन एकसारखे नीट मिसळुन मिसळुन मग पाणी घालावे , नाही तर लंप्स होतात.

psyllium husk घालून ग्लुटेन फ्री पिठाच्या पोळ्या करतात असे ऐकून आहे, प्रत्यक्ष अनुभव नाही.
१/३ कप उडीद डाळ, भिजवून वाटून + १ कप ग्लुटन फ्री पीठ सरसरीत भिजवून, ८-१२ तास ठेवून डोसे/उत्तपे करुन बघ.

तुला रोजचा उद्धार करायचा आहे (म्हणजे भाकरी करता करता पीठ आणणार्‍याचा उद्धार करत असशीलच Wink ) तर वर सुचवल्या प्रमाणे उडदाचे पीठ मिसळणे योग्य होईल. कळणाच्या पिठात ज्वारी आणि उडीद असतातच. हे मल्टीग्रेन कळणाचे पीठ होईल.

क्वचितचा उद्धार करायचा असेल तर त्यात बारीक रवा आणि तांदळाचे पीठ मिसळून रवा डोसे करून बघू शकतेस. बाकीचे घटक योग्य आहेत फक्त मक्याचा भरवसा नाही - सर्वात्मका सर्वेश्वरा नको व्हायला.

थॅंक्यू सर्वांना. Happy
गाकर, डोसे, ब्रेड, धिरडे सगळे करून पाहेन. सध्या भेगा पडलेले रोडगे किंवा थालिपीठावर भर आहे. ते झॅंथॅन गम आज येईलच. ते चांगले जमले ( चिमूटभर किंवा एक चतुर्थांश प्रमाण शोधून) की येथे लिहेनच. ब्रेडही शिकायचीच होती. यानिमित्ताने तेही करून बघते.

माधव Rofl
घरी तर मी ललिता पवार आहे. दिवसभर किरकिर करू शकते. प्रयोगशील किराणा ज्वलंत विषय आहे. उडदाचे पीठ कशाला आणू आता Proud , जसं आहे तसं उजवायचं पडलंय. फारच लाडात आले आणि आणलं तर सांगेन. त्यापेक्षा स्वातीताईनी लिहिलेली उडीद भिजवून आयडिया सोपी वाटतेय. पण रवा आणि तांदूळ पिठी आहे ते घालेन नक्की.
थॅंक्यू. Happy

मला 'सर्वात्मका' शब्द फार आवडला. अमेरिका सर्वात्मकाच आहे. मला मका आवडत नाही. उग्र वास येतो किंचित. स्वस्त माल टाकून पदार्थाचे प्रमाण वाढवण्यात मका अग्रेसर आहे. गोड पदार्थांत सुद्धा high fructose corn syrup असते. तेही शरीराला चांगले नाही.

कणीक फूडप्रोसेसरमध्ये चॉपर ब्लेड लावून मळून पाहिली आहेस का? आधी कोरडी फिरवून घेऊन मग थोडं थोडं कोमट पाणी घालून? त्याने कदाचित जरा बरी मिळून येण्याची शक्यता आहे.

भाजी/आमटीशी लावून खायचं आहे म्हणून, नाहीतर भाजून, तूपगूळ घालून गूळपापडीसारख्या वड्या/लाडू करता येतील - थंडीसाठी मुद्दाम केल्यात म्हणायचं. Proud
गिल्ट वाटला तर नट्स, ओट्स, डिंकबिंक काहीतरी लोटायचं त्यात.

गाजराचा (साखरेचा) हलवा या ऐवजी "गाजराचा तिखट मिठाचा हलवा" असं कधी कुणी try केलंय का?

म्हणजे, सध्या हिवाळ्याची छान रसरशीत गाजरे येत आहेत पण साखर खाणं टाळायचं आहे.

गाजरांची कोशिंबीर सोडून आठवड्याभरात किलोभर गाजरे पोटात जातील असंही काही सांगितलं तरी चालेल.

… गाजरे पोटात जातील असंही काही सांगितलं तरी चालेल...

१} गाजर का रायता
२} गाजर + ताजे मटार भाजी

दोन्हींचे हवे तेवढे व्हेरियेशन्स करता येतील

सलाद मधे तर वापरत असालच.

मी गाजर किसून त्यात एक चमचा साखर , मीठ घालून मावेत दोन मिनिटं वाफवून घेते . ऐनवेळेला खाताना त्यात फक्त शेंगदाण्याचे कूट . वाट्टेल तितके खाऊ शकतो , चटपटीत लागते.

मी गाजराचे शक्य तेवढे एकसारखे काप करून (फोर्कने खुपसून पकडता येईल एवढे) त्यात चमचाभर पाणी आणि मीठ मिसळुन अडीच तीन मिनिट मावे करतो झाकून. मग त्यात तूप, मिरपूड मिसळुन खातो. कधी साय, कधी ग्रीक योगर्ट पण घालतो.
यावर इटालियन ड्रेसिंग, चाट मसाला आणि दक्षिणा यांच्या आयडियाने दाण्याचे कूट वगैरे घालता येईल. मी पुढल्या वेळेस घालुन पाहीन.
आपापल्या जबाबदारीवर करून पहावे.
(फॅट मुळे गाजरातील बिटाकार्टोनेटची बायो अव्हेलीबिलीटी वाढते असे वाचल्याने आम तो आम गुठलीयोंके भी दाम करायला तूप, साय, दही वगैरे घालतो. )

पण कोशिंबीर का नको? नाहीतर साखर न घालता पचडी करा असं सांगणार होते. नाहीतर लोणचं करा आणि दररोज थोडं खा.

द फिटनेस शेफ म्हणून एक चॅनेल आहे. परवाच त्याने गाजर किसून सोया सॉस, तिळाचे तेल (कापसाची वात नाही हां), पांढरे तीळ, क्रश्ड अक्रोड, कांद्याची पात, व्हाइट वाईन व्हिनेगर आणि फ्राईड चिकन (अब्रह्मण्यम) घालून काहीतरी सलाड केले होते. तुम्ही फ्राईड चिकनच्या ऐवजी फ्राईड पनीर घालून करा. लिंक हवी असेल तर शोधून देते.

गाजराचे दीड दोन इंच लांबीचे तुकडे करून, सोबत मटार घेऊन स्टीम करून घ्या. मग त्यावर ताजे लोणी आणि मीठ आणि वाटलीच तर कुठली तरी herb घालून खा. रोस्ट चिकनसोबत अशी गुळमट चवीची गाजरं बरी लागतात. तुम्ही चिकन खाणार नसाल तर पर्याय म्हणून बटाटे, पनीर किंवा अजून काहीतरी रोस्ट करून घ्या. नुसतीच चांगली लागणार नाहीत.

अक्की रोटी करा. गाजर किसून त्यात पिठी (तांदळाचे पीठ), बारीक चिरलेली हिमी, तीळ, जिरे, कोथिंबीर घालून थालीपाठासारखं पण पातळ थापायचे तेल/तूप/बटर लावून शेकायचे. गाजर,मटर,बिन्स,बटाट स्टरफ्राय ! नुस्त खायलाही छान लागतं.

गाजरं किसून फोडणीत हिरवी मिरची घालून त्यावर परतून घ्या. त्यात ओलं खोबरं, दाण्याचं कूट, मीठ, लिंबूरस, कोथिंबीर, आणि हवी तर चिमूटभर साखर घाला.
एखादी वाफ आणा, पण फार मऊ नाही शिजवायचा कीस. फार सुंदर लागते अशी पचडी. नुसतीसुद्धा खाते मी!

('कोशिंबीर सोडून' म्हणालात म्हणून तेवढा शब्द काढला. Proud )

गाजर बीट हलवा आणि गाजराचे पराठे. कणकेतच मळून घ्यायचं. गाजर+ बटाटा कटलेट. पावभाजीत थोडं लोटता येईल. गाजर, बटाटा, मटार भाजी. गाजराचे लोणचेही चांगले होते पण टिकत नाही. मी करून खूप वर्षे झाली. पण आठवतेय ते - मेथ्यांची पूड, मोहरीची पूड, लिंबाचा रस व थंड फोडणी. तिखट, मीठ.

मीही अश्शीच पचडी कोलस्लॉचीही करते. सुटसुटीत वाटतं.

३} गाजर ज्यूस करा, गरागरा ज्यूसर फिरवला की झालं.
प्लस बीट किंवा डाळिंब, फॉर द एक्झॉटिक एलिमेंट. वर पुदिन्याचे पान…
सजावट, प्लेटिंग तुम्हांस बहुत काय सांगणे ?

रक्तशर्करा वाढली असेल तर मात्र नक्को नक्को.

वरच्या स्वातीच्या रेसिपीत खोबरं, दाकु, लिंबू वगळून कोथिंबीर, पुदिना आणि दही एकत्र करुन ही भन्नाट चवीचे तोंडी लावणे (घ्या! मी पण कोशिंबीर शब्द वगळला) बनते.
पापामम्मी किचनच्या काकूंची रेसिपी आहे.

थोड्या गाजराचं लोणचं करा. फ्रीजमधे टीकेल आठवडाभर, मी केप्र मसाला वापरते जास्त करुन. घरी मसाला केला तर मेथी भाजून पुड, मोहरी पुड, हिंग, लाल तिखट मिक्स करते. बाकी बरंच लिहीलंय काय करायचं ते वरती मा बो करांनी. अशीच गाजरंही खातो आम्ही. अर्थात मी दर आठवड्याला पाव किलो आणते, फार नाही. लोणचं, हलवा करते तेव्हा जास्त आणते. लोणचं बरेचदा फ्लॉवर, गाजर मिक्स करते पण नुसत्या गाजराचंही मस्त होतं. सोबत आंबेहळद, साधी ओली हळद, आलं घालते, लिंबू रस घालते.

अन्जू, का फ्लावर-गाजराच्या लोणच्याची आठवण काढलीत हो!!! मला प्रचंड आवडतं, पण करत कधीच नाही. तुमची पोस्ट वाचुनच जीव कासाविस झाला. Happy आता करेन नक्की.

गाजर बर्फी सुद्धा अप्रतिम होते. माझी आई करायची, मला येत नाही. पाकाची बर्फी, खव्याची नाही.

मला हे पुदिना घातलेलं प्रकरण आवडलं करून पाहेन.

हो - मलाही गाजर-फ्लॉवर लोणचं करावंसं वाटायला लागलं आता! Happy

(वामनरावांची गाजरं बाजूलाच राहिली - आमचं तिसरंच! Proud )

हाहाहा. मधे केलेलं, थंडीत गाजर फ्लॉवर छान मिळतात इथे. आई सोबत मटार घालायची पण मटार घातले की कमी टीकतं.

मी फार गरीब आणि भयंकर आळशी आहे . ना हलवा खात ना बर्फी .
गाजर कापून किंवा किसून सरळ कोशिंबीर सरळ

बरोबर. गाजरांचे बाईट साईझ तुकडे, फ्लॉवरचे तुकडे, मटार (कोबी ही घालत असे अस वाटतं, पण नक्की आठवत नाही) असं सगळं मिठाच्या पाण्यात चार-पाच तास बुडवुन मग निथळून वरुन लोणच्याचा मसाला आणि गार झालेली फोडणी आणि लिंबूरस असे करत असे. आम्ही भाज्यांचं लोणचं म्हणत असू. भाज्यांचं म्हटलं की भाजीच्या ऐवजाने खायला मिळतं, लोणच्याच्या नाही. Lol मटार ने कमी टिकतं का. मला वाटायचं तोंडापुढे टिकत नाही. Proud

ससा पाळा व करमचंद पाहा! मग तुम्हाला कळेल की वरची कुठलीही कृती न करता सुद्धा गाजर खाता येते, ते पाहून तुम्हीही आरोग्याकडे वाटचाल कराल. Lol

अनिंद्य यांनी नामकरण केलेल्या गुलाबोत, अर्ध बीट आणि अर्ध गाजर वापरा. पटकन संपतं असे केल्याने. बटाटे, ब्रेडक्रम्स, तांपि असे प्रकार बाइंडींग पुरतेच वापरायचे, मसाले तुमच्या आवडीचे. अप्रतिम कटलेट्स बनतात.

सगळ्यांच्या पाकृ भारीच आहेत. नोशिंबीर, ससा, करमचंद हाहाहा

गाजर स्टिक कोणतंही लोणचं, डाळीचा चटका, ओलसर चटणी किंवा हमस ह्या बरोबर पण छान लागतात.

पण आठवडाभरात किलोभर एका माणसाला हा अतिरेक नाही का वाटत ? डॉ नी एवढी खायला सांगितली असतील तर ठीक पण आपल्याच मनाने खायचं म्हणत असाल तर विचार करा.

अमितव हाहाहा. मस्त पोस्ट. आम्हीही भाजीचं लोणचं म्हणतो. इथे मी एकटीच लोणचं जास्त खाते, नवरा कमी खातो. मटार घातले की जरा दोन दिवस कमी टीकतं फ्रीजमधेच ठेऊनही, असं लक्षात आलं माझ्या. माहेरी सगळेच लोणचं खाऊ असल्याने लक्षात आलं नव्हतं कधी, संपून जायचं. अर्थात केलं की मी भावा बहीणीकडे पाठवतेच. तरी नाही घालत मटार हल्ली.

मधे मी गाजर मुळा चटका (मुटका) ही केलेला. हेमाताईंनी वर उल्लेख केल्यावर आठवलं. खीरही केलेली फक्त गाजराची. नारळ गाजर वड्या छान होतात, आटवून आटवून हात दुखतो म्हणून करत नाही.

घ्या माबोकरांमुळे संपली तुमची एक किलो गाजरे, किती सहजपणे.

Happy माझ्या प्रश्नाचे अपडेट देऊन टाकते. झॅंथॅन गम आणून, दोन अडीच वाटी पिठाला एक चतुर्थांश चमचा टाकले. थोडं वळायला सोपं गेलं बहुतेक ( स्टॅण्ड मिक्सरला) पण पुन्हा पाऊण वाटी कणीक घालावीच लागली, पण निदान लाटता आल्या. आज झॅंथॅन गम एक चमचा टाकले, तर अर्धी वाटी कणीक घालून जमले पण शेवटी भेगा पडल्या कुठे कुठे. प्रयोग थोडा फार जमला आहे असे म्हणायला हरकत नाही. तरीही कणीक घातल्याशिवाय लाटणेबल काही होत नाहीत. पातळ आणि मऊ मात्र झाले आहे. तेही खूपच आहे.

स्वाती, फूड प्रोसेसर मी डिंक टाकून पातेच मोडून टाकले खूप वर्षांपूर्वी. नंतर आणले नाही. Happy पण किचन एड, निंजा, देशी मिक्सर वगैरे आहेत.

मायबोलीचा असाही फायदा, आपले प्रयोग दुसऱ्यांकरवी करून घेता येतात. Wink

अपडेट बद्दल धन्यवाद अस्मिता. माझे Xanthan gum सुद्धा आलेले आहे पण मी नाशिकला आलोय. परत गेल्यावर प्रयोग सुरू होतील.

सर्व प्रतिसादकांचे अबोली-गुलाबी आभार! 🥕

सलादमध्ये गाजरे असतातच. गाजर कोशिंबीर, गाजर हलवा, गाजर रायता इ. प्रकार होत असतातच: याशिवाय अजून वेगळं काहीतरी हवं होतं म्हणून येथे लिहिलं.‌

सध्या घरून काम सुरू आहे. दुपारच्या वेळी वाफवलेल्या भाज्या खाणं सुरू आहे. त्यात ही गाजराचा समावेश आहेच.

आठवड्याला चार-पाच जणात एक-दीड किलो गाजरे (त्याशिवाय किमान दीड-दोन किलो मटार शेंगा) आमच्याकडे सहज खाल्ली जातात.

सर्वांच्याच आयडियाच्या कल्पना आवडल्या आहेत, नक्की करून पाहीन. मायबोलीच्या प्रथेनुसार मारलेल्या कोपरखळ्याही आवडल्या. 😉 , नकळत केलेलं कौतुक अर्थातच लोभसवाणं वाटलं. ❤

बाकी, जुन्या शहरातल्या हैदराबादी भाषेत हिवाळ्यात येणारी मोठी अबोली-गुलाबी रंगाची यांना गाजर तर वर्षभर येणारी भगव्या रंगाची यांना कॅरेट असं म्हणतात!

अस्मिता ग्लूटेन फ्री मिश्र पिठाचं काय करा माहितिये का, त्यात थोडे बटाटे उकडून , मॅश करुन, मग थोडं लाल तिखट , थोडे जिरे आणि मीठ घालून थालीपिठा च्या कंसिस्टन्सीचं पीठ मळा. मग दोन बटर पेपरच्या मध्ये ठेवून हाताने पसरवा किंवा ताटाने वरून दाब द्या. मी पुरीसारखे फार जाड नाही फार पातळ नाही असे बनवते. मग बटर पेपर तव्यावर उलटा करा किंवा हाताने सोडवून तव्यावर घाला. थोडं (जास्त Happy ) तेल घालून सोनेरी रंगावर भाजून घ्या. लाटायची आणि भाजायची स्टेप पटकन होते, ट्रस्ट मी. आणि फ्रीझ पण छान होतात हे. मलाही सध्या ग्लुटेन फ्री खायचं आहे तर मी 'फरारी आटा' आणून हे प्रकरण करते आहे. टेस्टी आणि पचायला अगदी हलके.

व्वा सगळ्यांनी मस्तच रेसिपी दिल्या आहेत.
तुम्ही गोड नको म्हणालात म्हणून पण गाजर की रसमलाई अशी भरत किचन ची एक रेसिपी आहे.

@ वामन राव ,चांगला गाजराचा हलवा करायचा सोडून काय तिखट गाजराचे पदार्थ हवे आहेत तुम्हाला ,असं पहिल्यांदा वाटलं मग स्वतः च वजन आणि किल्लीच्या धाग्यावरचा डायटचे संकल्प आठवले मग आपणही डायट च्या बोटीत आहोत हे लक्षात आलं ,मग रेसिपीज शोधल्या, जास्तकरून कोशिंबिरी आणि लोणचे आणि केक गोड वड्या वगैरे गोडाचेच पदार्थ आहेत .त्यातल्यात्यात दोन रेसिपीज आवडल्या

गाजराच्या तिखट वड्या -https://youtube.com/shorts/6W86r_Xndpo?si=Jtnwkq5Rb_Nd5mqf

गाजराच्या तिखट पुऱ्या -
https://youtu.be/tD9PES2_ips?si=LddMQMZkfF4P0oyv

या दोन्ही रेसिपीज तिखट असल्या तरी तळलेल्या आहेत म्हणजे परत डायटची वाट म्हणून जर का फक्त वड्या उकडून एयर फ्रायर केल्या तरी चालतील आणि त्याच पुर्याच्या पिठाचे थेपले किंवा थोड्या तेलात थालीपीठ सारखे केले तरी छान लागतील असं वाटतं मीही थालीपीठ करून बघणार आहे मग अपडेट देईन.

थालीपीठ पण सापडलं युट्यूब वर -https://youtu.be/9lUa518dUXQ?si=HTT_O6WT8IvXV9hz

गाजर केंद्री मेन्यु तयार झाला.
अ‍ॅपेटायझर गाजर बीट टमाटो ज्यूस. स्तार्टर गाजर बीट कटलेट - गुलाबो. गाजर घालून अक्की रोटी , कोकी. गाजर मूगडाळ घालून खिचडी. हिला काजू बिजू घालून श्रीमंत करता येईल. गाजर व इतर भाज्यांचं अंजू फेम लोणचं , जे भाजीसारखं खायचं. गाजराची कोशिंबीर. आणि शेवटी गाजर हलवा. पाहुण्यांना न्यायला गाजराचे पेढे.

कणकेच्या धिरद्याचं बॅटर बनवा त्यात गाजर बारीक किसून घालायचं आणि बारीक चिरलेल्ली हि मिरची, मीठ, जिरे वगैरे
मस्त होतात धिरडे

Pages