खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालवणी मेवा छान दिसतोय!

सगळीकडे फणसाची भाजी होत असलेली दिसते आहे! मज्जा आहे सर्वांची!

इकडे तेलंगणात मागच्या काही वर्षांपासून कार्यप्रसंगी शाकाहारी मेनूत फणस बिर्याणी (केटरिंग वाल्यांचे व खाणाऱ्यांचे उच्चार - पणस बिर्याणी / पाणस बिर्याणी / पणसा बिर्याणी / पाणसा बिर्याणी!) लोकप्रिय होत आहे असे दिसते.
स्वयंपाकी चांगला असेल तर अतिशय चविष्ट होते. घरी कधी करून पाहिली नाही .

खायचा फणस वेगळा असतो आणि भाजीचा फणस कच्चा असतो हे मला पहिल्यांदा तेव्हा समजले जेव्हा मी लहानपणी फणसाची चोरी केली होती. त्यामुळे नंतर आपल्याला त्याचा काही फायदा नाही हे समजल्यावर पोपट झाला होता.

आजही फणसाची भाजी म्हटले की पहिला तोच किस्सा आठवतो Happy
मायबोलीवर सुद्धा लिहिला होता.
https://www.maayboli.com/node/56756

मालवणी घेवर असतो हेच माझ्यासाठी नवीन आहे.

सावंतवाडी की कुठचेसे बटर सुद्धा भारी असायचे असं आठवतंय. आणि तो कॉकटेल नामक मिल्कशेकसदृश प्रकार...... सावंतवाडीचेच बटर. खूप छान असायचे. नंतर ती टेस्ट तशीच राहिली नाही की टेस्टबड आगाऊ झाल्या माहित नाही.
सावंतवाडीमधील बाळकृष्ण नेवगी यांच्या हॉटेलमधील कॉकटेल छान असते.

सावंतवाडीमधील बाळकृष्ण नेवगी यांच्या हॉटेलमधील कॉकटेल छान असते.>>>
आइसक्रीम पण छानच असते ( आमच्या ऑफिसमधील एक जण वाढदिवसानिमित्त ऑर्डर देवून बनवून घ्यायचे जे छानच असायचे)

धन्यवाद मानव..
फणसाची रस्सा भाजी कधी बघितली नाही मी रेसिपि असेल तर टाका... आमच्याकडे ओलं खोबरं घालून सुकी भाजीचं असते..
आज बनवलेली brownie
IMG_20260226_212313.jpg

जुई, ब्राऊनी मस्त!
आमच्याकडे फणसाची भाजी दोन प्रकारे करतात - खोबरे, हिरवी मिरची घालून आणि दुसरा प्रकार सुकट्/सोडे घालून.
कॉलेजात होस्टेलला असताना आमच्या इस्त्रीवाल्या ताईंच्या घरची फणसाची मसालेदार रस्सा भाजी खाल्ली होती. ती भन्नाट चव परत कधी मिळाली नाही.
वामनराव, फणसाची बिर्याणी वरुन आठवले - माझा लेक पार्टीला मिक्स क्राउड असला की वेज ऑप्शन म्हणून पुल्ड जॅकफ्रुट (पुल्ड पोर्कला पर्याय) करतो. त्याचे नुसतेच कौतुक ऐकून आहे अजून खायचा योग यायचाय.

जुई ब्राउनी मस्त दिसतेय.

मी ना फणसाची सुकी भाजी खाल्ली आहे ,ना रस्सा भाजी पण फणसाच्या भाजीचं कौतुक अनेकांकडून ऐकलंय की व्हेज लोकांचं नॉनव्हेज असतं ही फणसाची भाजी ,इतकी टेस्टी लागते की बस...
त्यामुळे येउद्या दोन्ही पद्धतीच्या भाज्यांच्या रेसिपीज
सिनेमातही कठहल की सबजी फेमस आहे.

पुल्ड जॅकफ्रुट

>>> हा प्रकार इंटरेस्टिंग वाटतोय, रेसिपी मिळाली तर करून पाहीन.

आज आप्पे विथ रेड थाई करी, दुसर्‍या ग्रुपवर एका मैत्रीणीने लग्नात के कॉम्बो खाल्ल्याच मेन्शन केल होत तेव्हापासुन करुन बघायच होत.
सध्या आमच्याकडे खुपच वॉर्म आहे त्यामुळे सकाळी छान विनासायास पिठ फुलुन आल होत..
रेड करी पेस्ट , नारळ दुध होतच..भाज्यामधे झुकिनी, ग्रिन बिन,पातिचा कान्दा आणी बेबी कॉर्न होते तेवढेच टाकले.
मस्त कम्फर्ट फुड झाल यात मिनि इडल्या पण छान लागतिल अस वाटतय..पुढच्या वेळेस ते करुन बघेल.
(सालाची उडदाची डाळ वापरल्याने आप्पे रन्गाला ठिकठाकच दिसतायत)
0bd815e8-eb41-44e2-904e-13be95e093c5.jpeg

छान दिसतेय डिश. हे सांबार इडली सारखेच कायखायचे ना?
(सांबारात बुडवून सर्व्ह केलेल्या इडली/बटन इडली)

की भाजी सारखे वापरायचे?

<<रेसिपि असेल तर टाका.>> आई करते. ती बाहेरगावी गेलीय आली की विचारून रेसिपी लिहीन .

थॅन्क्स श्रवु !
छान दिसतेय डिश. हे सांबार इडली सारखेच कायखायचे ना?
(सांबारात बुडवून सर्व्ह केलेल्या इडली/बटन इडली)>> धन्यवाद मा न व, हो हो सान्बार इडली सारखच ! आप्पे करी शोषुन घेतात त्यामुळे नेहमी पेक्षा जरा रनी ठेवायची थाइ करी.

>>आप्पे विथ रेड थाई करी>> व्वा! एकदम हटके प्रकार, छान दिसतोय! मी बरेचदा अवियल आणि आप्पे करते. हे त्यापेक्षा सोप्पे आहे आणि थाई करी तर आवडतेच तेव्हा नक्की करणार.

आज संकष्टी चा स्पेशल उपास मेन्यू. फोटो नाही काढला , विसरले.
राजगिरा पीठाच्या पुऱ्या, बटाटा भाजी, चितळे आम्रखंड, चटणी, काकडीचे काप वरीचा भात आणि दही..
राजगिरा पीठाच्या पुऱ्या मी प्रथमच केल्या पण चांच पाहून लागत होत्या, मला आवडल्या. खाताना मनात म्हटलं या आधी का नाही केल्या आपण !

राजगिरा पीठाच्या पुऱ्या मी प्रथमच केल्या >> हे वाचून पटकन आश्चर्य वाटले. कारण आमच्याकडे उपवास असला की राजगिरा पुरी आणि पांढरी बटाटा भाजी लहानपणापासून खात आलोय. त्यामुळे मला तो कोकणी पदार्थच वाटायचा Happy

होममेड अवोकाडो साल्सा (स्टोअर्समध्ये मिळणारा बाटलीतला साल्सा भिकाऽऽर लागतो. आपला हात जगन्नाथ हेच खरे)

मसाला पाव

IMG-20260307-WA0009.jpg

आम्ही दोन दिवसापूर्वी चौघे बाहेर शॉपिंगला गेलेलो तेव्हा मी आणि बायकोने मसाला पाव घेतलेले. पोरांनी आपल्या डिश सोडून ते खाल्ले. म्हणून आज बायकोने घरी केले. तश्याच चवीचे झालेले. आणि त्या दिवशीचाच फील यावा म्हणून सगळ्यांनी एकत्र बसून एकाच ताटात खाल्ले Happy

काजू कतली घरी केलीय. पहिल्यांदाच केली , एवढा कॉन्फिडन्स नव्हता म्हणून वर्ख आणला नव्हता. थोडं केशराच पाणी शिंपडल सजावट म्हणून.
पण छान झाली आणि अगदीच सोपी ही वाटली.
20260321_104844.jpg

पाडव्याचा मेनू
वरण, भात, पालेभाजी, डाळीची भजी, पापड, श्रीखंड पुरी, कोशिंबीर आणि ओल्या काजूची भाजी
IMG_20260321_134130.jpg

sheerkhurma.jpg

रमझान ईद meets गुढीपाडवा .

गुढीपाडव्यासाठी केलेल्या श्रीखंडातलं आज एवढंच उरलं होतं. तेही चक्क्याच्या दुसर्‍या लॉटचं असल्याने(पुरणयंत्राऐवजी ) सूप स्ट्रेनरमधून गाळणं इ. लाड केले नव्हते.

माझ्या याकुल्ट लेडीचं नाव अफसाना आहे. माझ्याकडे याकुल्ट डिलिव्हर करायला दर शनिवारी येते. यावेळी ईद शनिवारीच आल्याने आणि सोमवारी ही न जमल्याने ती आज आली. तिने काल दुसर्‍यांदा शीरखुर्मा केला. त्यातला माझा वाटा घेऊन आली होती. त्यावरून बर्‍याच गप्पा झाल्या.

मी दोन वर्षांपूर्वी शीरखुर्मा केला तो इतका घट्ट झाला की आणखी दूध घालायला लागलं आणि क्वांटिटी वाढली. शेवया कमी प्रमाणात घालायच्या. दूध आटवून घ्यायचं अशा काही टिप्स तिने दिल्या. शीरखुर्म्यावरून गाडी उरूस , संदल, कव्वाली ही स्टेशनं घेत मलिद्याकडे गेली. त्यांच्या खानदानात ती पराठा आणि मलिदा एक्स्पर्ट आहे . त्याची रेसिपी तिने सांगितली. तर मलिद्याला ११ पराठे करायचे. कणीक मळताना आणि शेकताना तूप. एक पराठा शेकून झाला की गरम असतानाच दोन्ही हाताच्या उभ्या तळव्यांनी चुरून घ्यायचा. हे करायला दोन माणसं लागतातच. एकट्याने होत नाही. कारण पराठा गरम असतानाच चुरायचा. असे सगळे पराठे चुरून झाले की वरून साखर किंवा पिठीसाखर आणि सुका मेवा घालायचा.

Pages