महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.
उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!
फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.
- वामन राव
काजूची फेणी म्हणतात तीच का ही
काजूची फेणी म्हणतात तीच का ही?
बाँड म्हणजे बहुतेक प्रमाणभाषेतलं बोंड असावं.
गायरी <<< आमच्याकडे याला गार
गायरी <<< आमच्याकडे याला गार (स्त्रीलिंगी) म्हणतात. यात मुख्यतः गुरांचे शेण आणि त्यांच्या पुढ्यातला खाऊन उरलेला रोजचा गवताचा चारा टाकतात. गवाण म्हणजे गोठ्यातल्या किंवा कुडाच्या मांडवात बांधलेल्या गुरांच्या पुढ्यात जिथे त्यांना खायला चारा/वैरण/भरडा/पेंढ ठेवली जाते ती जागा. गुरांना खायला निरुपयोगी झालेल्या गवताच्या चार्याला चगाळा म्हणतात. पेंड/पेंढ = तेलबियांतून तेल काढून उरलेला लगदा.
शेणाच्या गोवर्या वाळल्यावर त्यांना खास पद्धतीने गोलाकार रचून ठेवतात. त्याप्रकारे रचून ठेवलेल्या शेण्यांच्या ढिगाला हुडवा म्हणतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हुडव्याच्या गोवर्या घरातल्या माळ्यावर हलवतात.
अतिशय निगरगट्ट व्यक्तीला “ए हुडव्या!” अशी प्रेमळ उपाधी दिली जाते.
छबिना शब्द ऐकला आहे.
छबिना शब्द ऐकला आहे. बोटीबद्दल होता हे माहीत नव्हते.
जाम/जाम्ब खंडाळा घाटात (रेल्वे) गाडी थांबली की विकायला यायचे. मस्त असत. जांबरूंग गावाच्या नावाचाही जाम्बशीच संबंध आहे की काय कोणास ठाउक. घाटातले स्टेशन आहे.
पाटळण - पटलून चा अपभ्रंश (किंवा उलटे). पॅण्टॅलून ब्रॅण्डही त्यातूनच आला असेल असे वाटते. झिल शब्द ऐकला आहे कोकणी लोकांकडून. चेडू "सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट" मुळे माहीत आहे.
काजूची फका>> जेव्हा काजूगर
काजूची फका>> जेव्हा काजूगर ओले असतात तेव्हा फाका....
फाविदडी आणि गजानन, भरपूर नवीन
फाविदडि आणि गजानन, भरपूर नवीन शब्द कळाले.
आंबे ज्या टोपलीतून झाडावरून
आंबे ज्या टोपलीतून झाडावरून दोराच्या सहाय्याने खाली उतरवतात त्याला शिकारनी, ज्या मोठ्या ( २०-२२ किलो क्षमतेच्या) टोपल्यात त्याची ने आण केली जाते तो घुडा, नारळ पाडायला उंच बांबू (त्याला वरच्या टोकाला बेचकी सारखी लहान काठी बांधलेली असते) असतो त्याला गडका, आणि दगडाच्या भिंतीच्या कंपाऊंड ला गडगा बोलतात. पावसा नंतर आंब्याच्या बागेत जी साफसफाई केली जाते किंवा एकूणच झाडे झुडपे तोडून जमीनीचा भाग मोकळा करण्याला जमीन बेनने असं बोलतात. कमरेला कोयती अडकवण्याच्या दोरीला बांधलेल्या खाच असलेल्या लहान लाकडाला आकडी असं बोलतात. मुंबई, पुण्या, सांगलीतल्या दलालाकडून एका आंब्याच्या पेटीच्या मिळणाऱ्या दराला पट्टी बोलतात.
>>> अतिशय निगरगट्ट व्यक्तीला
>>> अतिशय निगरगट्ट व्यक्तीला “ए हुडव्या!” अशी प्रेमळ उपाधी दिली जाते.

सीमाभागातले कानडी लोकं हुच्च
सीमाभागातले कानडी लोकं हुच्च हुडगा म्हणतात खुळ्या मुलाला. तो हुडगा या हुडव्यातून आला आहे की काय?
हुडगा म्हणजे मुलगा कानडीत!
बाँड म्हणजे बहुतेक
बाँड म्हणजे बहुतेक प्रमाणभाषेतलं बोंड असावं.>> हो.... मालवणीत तो I'm बॉंड असतो...but not James bond.
फार्स मला वाटत ते उन्ह निंभआर
फार्स मला वाटत ते उन्ह निंभआर आहे का?>> मुळ शब्द काय असेल काही कल्पना नाही... तसेही जे शब्द जसे कानावर पडले तसे लक्षात राहिले काही प्रमाणात त्यात बदलही असू शकतो.... निंभआर पेक्षा मला त्याच्या उच्चारामुळे निम्भार हे देखील जवळपास ऐकल्या सारखे वाटतेय.
बरोबर! ताजी ताजी अगदी मधुर
बरोबर! ताजी ताजी बोंड अगदी मधुर लागतात. बरीच वर्ष खाल्ली नाहीत. ते निंभार च आहे, मला लिहिता येत नाही व्यवस्थित.
आमच्या गावात बांधकामात विटा वापरत नाहीत तर शीन्याल वापरतात.
गायरी <<< आमच्याकडे याला गार
गायरी <<< आमच्याकडे याला गार (स्त्रीलिंगी) म्हणतात. >> तुझ्या प्रितीचे दु:ख मला गाण्यात
रत्न टाकुन पदरात गार घेऊ नको रे.
मधली 'गार' म्हणजे शेणाची गार असावी का? मला गारगोटी, दगड वगैरे वाटायचं.
जांब/ बॉंड जाम
जांब/ बॉंड
-----------------------------------------------------------------------------------
जाम
अर्र! कित्तीच दिवसांत जांब
अर्र! कित्तीच दिवसांत जांब (तुमचा जाम!) खाल्ला नाही!! फोटो बघून जीव अर्धाअर्धा झाला!
>>> मधली 'गार' म्हणजे शेणाची गार असावी का?

अरे त्यांनी गार/गायरी म्हणजे कम्पोस्ट पिट म्हटलंय ना - ते कसं पदरात घेणार?
ती गारगोटीच असावी.
खल्ल्लास फोटो जामांचे!
खल्ल्लास फोटो जामांचे!
कवितेत घेई पर्यंत त्या गार ची शेणाची गोवरी झाली असेल! काय सांगता येतय होय कविंचं!
हात् मेल्या!
हात् मेल्या!
आमच्या गावच्या आसपास त्याची (
आमच्या गावच्या आसपास त्याची ( बाँड ची) (अवैध ) दारू काढतात अस ऐकलय. >>>> आणि पिताना कशी पितात? shaken or stirred?
मज्जा चालू आहे धाग्यावर. 'धमाल धाग्यात' समाविष्ट.
>>> वेस्वारला आमच्याकडे 'येसर
>>> वेस्वारला आमच्याकडे 'येसर' म्हणतात. येसर-मेतकूट म्हणजे करण- अर्जुन
व्वा! येसर मेतकूट हे लग्नकार्याच्या तयारीचे एक essential ingredient! ते मराठवाडा, उत्तर कर्नाटक व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातही होतं आणि त्याला वेस्वार म्हणतात माहित नव्हतं!
>>> आमच्याकडे "भरडा" भाजी म्हणतात.
आमच्याकडे भरडा (चणाडाळीचा जाड रवा) घातलेल्या भाजीला भरडा भाजी म्हणतात.
>>> जांब - एक पांढरट पोपटी रंगाचे फळ असते त्याला म्हणतो. > ते जाम ना??
प्रमाणित मराठी पेरू, त्याला आम्ही जांब म्हणतो.
पेरू नाही हा. आता
पेरू नाही हा. आता मराठवाड्यातील प्रमाण मराठीत पेरू असूच शकतो.
वेस्वार आणि येस्सार मध्ये
वेस्वार आणि येस्सार मध्ये फरक आहे. वेस्वार मेतकूट किंवा गन पावडरची चुलत बहीण म्हणू शकतो.
फार्स तुमचं आणि आमचं गाव जवळ जवळ असेल असं वाटतंय सेम शब्द आम्ही ही वापरतो बोली भाषेत.
वरचे जांब फोटो मस्त आहेत.
वरचे जांब फोटो मस्त आहेत. लालसर गुलाबी रंगाचे फार छान दिसतायेत. मला आवडतात जांब, डोंबिवलीत सहज मिळतात, लाल कमी दिसतात. मी खाली सोसायटीत रोप लावलेले, ते मोठं झालंय.
आहे, आहे. मी लहानपणापासून
मडकं म्हणू नये अशुभ असते म्हणून सुगडं. आमच्या घरी चुकूनही "दिवा विझला" म्हणत नाहीत, "शांत झाला" म्हणतात. माझ्याही बोलण्यात 'दिवा शांत झाला' असंच येतं. अंधविश्वासापेक्षा परंपरेतून- संस्कारांतून येणाऱ्या भाषासमृद्धीचा गोडवा असल्याने आवडतंच.
बांगड्या फुटल्या म्हणत नाहीत
बांगड्या फुटल्या म्हणत नाहीत वाढल्या म्हणतात तसे.
जांब बरून जांबुवंत आणि
जांब बरून जांबुवंत आणि जांबुद्वीप आठवले.
अस्मिता त्या दिवशी मी
अस्मिता त्या दिवशी मी लिहिलेलं खोडले दिव्याबाबत. आमच्याकडेही दिवा तेवतोय, दिवा शांत झाला म्हणतात, माझ्याही तोंडात तेच आहे. दिवेलागणीला दिवा लावला म्हणतात. बरेच जण दिवाबत्ती केली म्हणतात.
अन्जुताई
अन्जुताई
पेरू आतून लाल / पांढरा
पेरू
आतून लाल / पांढरा
आतून लाल असलेला पेरू सासवडला
आतून लाल असलेला पेरू सासवडला मिळतो. शनिवारी सासवडच्या शेतकरी बाजारातून खूपदा आणलेत.
सिंहगडला जाताना सकाळी सकाळीच रस्त्याच्या कडेला असे पेरू विकायला बसलेले आढळतात.
आमच्याकडं बी पेरताना बी पेरू
आमच्याकडं बी पेरताना बी पेरू म्हणतात
मग आमच्याकडे बी जांबू
मग आमच्याकडे बी जांबू
Pages