कशाला काय म्हणायचं?

Submitted by वामन राव on 15 July, 2025 - 10:15

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.‌

उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!

फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.

- वामन राव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडबू नाव कर्नाटकातल्या शेजारच्यांकडून शिकली बहुतेक आई, दिंडच म्हणायची जास्त करुन आधी ती. असं वाटतं मला.

अस्मादिक नागपंचमीला हे काही करतच नाहीत, पंचामृत दाखवतात. हळदीची पानं, तवस वगैरे आणलंच तर पातोळे. तेही काकडी आदल्या दिवशी किसून सारण करुन ठेवायचं. किसत, कापत वगैरे नाही त्या दिवशी.

अंजू, वरच्या आवरणाला चिरोट्यासारखे पदर सुटणारी साटाची करंजी . यात आवरणाच्या पोळ्या वेगवेगळ्या रंगांच्याही करतात.
-------
करंजीला उत्तर भारतात गुजिया म्हणतात.

असेच मराठी पदार्थांचे इतर प्रांतातील भाऊबंद कोणकोणते?

सातकापे घावण - पाटीशप्ता (बंगाली). हे नाव शोधताना त्यांच्याकडेही उकडीच्या करंज्या आहेत आणि त्यांना भापा पुली पिठा म्हणतात हे कळलं.

आपले चिरोटे म्हणजे त्यांचा खाजा.

अनारसा दक्षिणेकडे अधिरसम होतो आणि चकली मुरुक्कू - ही तमिळ नावं.
एम्पनाडा हा करंजीचा स्पॅनिश भाऊबंद, आणि कॅल्झोन हा इटालियन.

एम्पनाडा खाल्लेला आहे. पण 'जमैका' नामक न्यु यॉर्कमधील अतिगरीब भागात खाल्लेला आहे आणि काहीतरीच बनवलेला होता. चांगल्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये ट्राय केला पाहीजे.
-------------
अनारसे प्राणप्रिय. गूळाचे पदार्थ इन जनरलच आवडतात.
----------
कॅलझोन पाहीलेला आहे.

अंजू, वरच्या आवरणाला चिरोट्यासारखे पदर सुटणारी साटाची करंजी . >>> बरोबर, ह्यालाच त्यांच्याकडे कानवले म्हणतात. हा प्रकार आमच्याकडे करतच नाहीत. चिरोटे करायची आई पण दर दिवाळीत नाही, कधीतरी.

सातकापे घावण - पाटीशप्ता (बंगाली). हे नाव शोधताना त्यांच्याकडेही उकडीच्या करंज्या आहेत आणि त्यांना भापा पुली पिठा म्हणतात हे कळलं. >>> वाह, नवीन माहीती.

रेव्ह्यु 'कालुवे' म्हणजे काय? हा कोणता गोड पदार्थ? माहीते का तुम्हाला?

सक्करे तुप्पद कालुवे हरिसि
शुक्रवारद पूजेय वेळेगे ।
अक्करेयुळ्ळ अळगिरि रङ्गन
चोक्क पुरन्दर विठ्ठलन राणी ॥ 5 ॥
भाग्यद लक्ष्मी बारम्मा ॥

भजी किंवा बटाटेवडे तळताना जे पीठाचे बारीक बारीक कण किंवा पिल्ले तळली जातात त्यांना चोर म्हणतात >>> अच्छा , आम्ही चुरा म्हणतो.

कालुवे म्हणजे मराठीतील कालवा (कॅनॉल)

>>>रेव्ह्यु 'कालुवे' म्हणजे काय? हा कोणता गोड पदार्थ?>>>
साखर व तुपाचा कालवा (पाट/कॆनॊल) वाहवून
शुक्रवारच्या पूजेच्या वेळेस
प्रेमळ अशा अलगिरी गावातल्या रंगा...ची (कृष्ण)
चोक्क/शुध्द भक्त पुरंदरदासाच्या विठ्ठलाची राणी
हे भाग्यदात्री लक्ष्मी तू ये

>>> मराठीतील झाडांची कुंडी म्हणजे कानडीत पार्श्वभाग?
हे मजेशीर आहे! Lol
पार्श्वभूमी तरी म्हणायचं! Proud

करंजी - कानवले आणि अनरस्यांच्या देशी-विदेशी भाऊबंदांची आवडली.

पुढे "म्हणतात" असेही हवे म्हणजे एकदम उडी मारून शेवटच्या काही पोस्ट्स वाचणार्‍यांचा गोंधळ होणार नाही Happy

उत्तरेत कडीला कुंडी म्हणतात. त्यामुळे एखाद्याने या शब्दाचा वापर करून हाय कॉण्टेक्स्ट मधे वापरलेली वाक्ये इतरभाषिकांचा गोंधळ उडवत असतील नक्कीच. पूर्वी जसे हिंदी गाण्यातील मिस्री, सागर वगैरे शब्दामुळे आमचे व्हायचे तसे. त्यावर वेगळा बाफ आहेच.

>>> पुढे "म्हणतात" असेही हवे ... उत्तरेत कडीला कुंडी म्हणतात
मग तू ते 'लावतात' असं समजला नाहीस ना? Lol

पुढे "म्हणतात" असेही हवे ... उत्तरेत कडीला कुंडी म्हणतात
मग तू ते 'लावतात' असं समजला नाहीस ना? Lol>>>> Lol हे एकदम आईने अकबरी च्या तोडीचं झालं. Lol

अधिरसम आहे का ते? मी अतिरसम वाचत असे. >> तो तमिळजन्य लिप्यंतराचा घोळ सर्वच दाक्षिणात्य भाषांत आल्यामुळे आहे. (पारंपरिक/जुन्या) तमिळात त थ द ध पैकी थ आणि ध नाहीत. शिवाय त आणि द साठी एकच अक्षर लिहिलं जातं. शब्दाच्या सुरुवातीला आलं तर त म्हणून वाचायचं आणि नंतर आलं तर द म्हणून.

(स्पेलिंग Th असेल तर त आणि dh असेल तर द वाचायचा)

तमिळ सोडून बाकी दक्षिणी भाषांत थ ध वगैरे आहेत. पण आता तमिळजन्य लिप्यंतर स्वीकारल्यामुळे त्यांचा फार घोळ होतो अशी अक्षरं आली की.

Pages