कशाला काय म्हणायचं?

Submitted by वामन राव on 15 July, 2025 - 10:15

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.‌

उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!

फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.

- वामन राव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बेंगळुरात खाल्ले आहेत, पण वरती कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ते उत्तर कर्नाटकी खाद्य असावे. किंवा दक्षिणेत/मंगळूर भागात त्याचं रूप किंवा सोबत खायचा प्रकार बदलत असावा.

आणि तसा हा घरगुती पदार्थ आहे. आमच्या ऑफिस कँटीनमध्ये मिळतात, पण हॉटेलांमध्ये मीही फारसे कधी पाहिल्याचं आठवत नाही.

>>>मी बेंगळुरात खाल्ले आहेत, पण वरती कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ते उत्तर कर्नाटकी खाद्य असावे>> नाही, हे टिपिकल कष्टकरू लोकांचे पौष्टीक खाद्य असून हे दक्षिण कर्नाटकात खूप खाल्ले जाते. याचेच सॉफिस्टिकेटेड प्रकार म्हणजे रागीमाल्ट इ. पावडरी. रागी मुद्दे खूप जुने खाद्य आहे.

मराठी - भेंडी
तमिळ Vendakkai
तेलुगु Beṇḍakāya

>>> हं. अजून एक तुलना सांगतो.

तेलुगु -- हिंदी
कंदी -- तुव्वर
पंदी -- सुव्वर!

सवांतर: तेलुगुत फळे-भाज्यांच्या नावांत साधारणतः एक logic असते. त्याबद्धल इथे अजून काही उदाहरणे दिली आहेत.

मराठी - भेंडी
तमिळ Vendakkai
तेलुगु Beṇḍakāya

>> यावरून आठवलं.

मराठी - मूळ इंग्रजी उच्चार
भेंडीबाजार (मुंबईतील ठिकाण) - behind the bazaar

या भाजीला काय म्हणतात? अश्याच डार्क हिरव्या रंगाच्या शेंगांना आम्ही नाशिक घेवडा म्हणतो. पण या चॉकलेटी झाक असलेल्या शेंगा पहिल्यांदाच पाहिल्या आणि आणल्या. आता विचार करतेय की भाजी कशी करावी.

chokleti shenga.jpeg

@ हरचंद पालव
>>>"मराठी - मूळ इंग्रजी उच्चार
भेंडीबाजार (मुंबईतील ठिकाण) - behind the bazaar"
>>>
क्या बात... क्या बात 👍

@ माझेमन
>>>"आता विचार करतेय की भाजी कशी करावी. ">>>
वालाची उसळ किंवा बिरडं करतात तशी करून बघा... होपफुली चांगली लागेल!
उकडून नुसत्या खायलाही चांगल्या लागतील असे वाटते...

@ किल्ली
>>>"जांभूळ घेवडा">>>
सिरिअसली?
अविश्वास दाखवण्याचा कोणताही हेतू नाही, हे नाव खरंच समर्पक वाटले आहे, पण पहिल्यांदाच ऐकले असल्याने कुतूहलापोटी विचारले...

Pages