महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.
उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!
फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.
- वामन राव
कुटका हा शब्द इथे अनेक वेळा
कुटका हा शब्द इथे अनेक वेळा वाचून लक्षात आले की आमच्याकडे याला कुंडका असे म्हणतात.
कोकण / कोल्हापूर भागात
कोकण / कोल्हापूर भागात पालेभाजीची "पेंडी" असते तीच नाशिक / खान्देश भागात "जुडी" होते.
पुण्यात गड्डी
पुण्यात गड्डी
मस्त धागा… इथपर्यंत
मस्त धागा… इथपर्यंत पोचेपर्यंत लिहायचे शब्दच विसरायला झाले. तरी माझेही २ पैसे…
) आता एवढंच…
मी नाशिकचा. माझी आई काळ्या मसाल्याची पातळ (घट्टसर) भाजी बनवते, त्याला आमटी म्हणते. मग ती भाजी शेवग्याच्या शेंगांची, बटाट्याची, भज्यांची, अंड्यांची, डाळींची, फ्लॉवरची असायची. बायको जळगावची, तिच्यासाठी ती आमटी नसते, रसा / रशी असते. आई शेंगदाण्याचं घट्ट कालवण बनवते, कधी त्याला(पातळ असेल तर) बट्टं म्हणते, बायको त्याला बंग म्हणते.
मी लाल तिखट म्हणतो, ती चटणी म्हणते.
जळगावकडे डाळ बट्टी ला दाळ बाफले पण म्हणतात.
आमच्या घरी झाडू चं स्त्रीलिंगी रूप झाडणी, शिराई म्हणतात.
नागपंचमीच्या दिवशी तव्यावर पोळ्या शेकत नाही, भाजी चिरत नाही
म्हणून आई खीर कान्होले (वाफवलेल्या घडीच्या पोळ्या) करते.
शिळ्या पोळ्यांचा कोरडा चुरमा, ओला असेल तर काला म्हणतात.
मिठाईमध्ये बारके गुलाबजाम आणी बारकी बुंदीचं मिश्रणाला (शक्यतो गुजराती जेवणात पाहिलंय) मधुमीलन किंवा राजाराणी म्हणतात.
डाळीचे, कोथिंबिरीचे बेसण घालून वाफवून बनबलेले फुनके, मुटकुळे म्हणतात (हाताने लांबोडके वळलेले असतात).
पुरणाचे खापरावर बनवलेले मांडे (मोठ्या पुरणपोळ्या), लग्नाच्या वेळी भाऊबंदांसोबत खायच्या नैवेद्याच्या दूध-भाताला मोगरा (आणि तो खातांना ढेकर आल्याशिवाय ऊठता येत नाही अशी रीत
डोळे गुड्डे झालेत का तुझे?
डोळे गुड्डे झालेत का तुझे?
.
हे माहितेय का?
रमाने हे ऐकलं कोणाकडे तरी
आणि तिला complement वाटली.
Good day अशी
❔
गुड्डं, डकनं, बांगं...
शालेय जीवनातले शब्द आठवले!
तपशीलवार कृतीबद्दल धन्यवाद
तपशीलवार कृतीबद्दल धन्यवाद राभु. नक्की करून बघेन.
२-३ पाना आधी अस्मिता ने
२-३ पाना आधी अस्मिता ने लिहीलाय मुद्दा भाजी , हा शब्द मी माझ्या सासरीच पहिल्यांदा ऐकलाय. पिठ पेरून करायच्या भाज्यांना म्हणतात, पालकाची मुद्दा भाजी, एक मुद्दा वरण ही असतं. घट्ट वरणात कच्चा कांदा , मिठ, मसाला घालून फोडणी द्यायची . पोळीशी खायला आमच्या कडे ऑटाफे आहे.
माझ्या साबा शेंगदाण्याना शेंगादाणे म्हणायच्या .
>>> डोळे गुड्डे झालेत का तुझे
>>> डोळे गुड्डे झालेत का तुझे?>>>
>>>>>रमा गं रमा
माहितेय का?
रमाने हे ऐकलं कोणाकडे तरी
आणि तिला complement वाटली.
Good day अशी Lol
आधी ची सगळी दंगामस्ती पण भारीच आहे.
अस्मिता, केल्यावर फोटो टाक
अस्मिता, केल्यावर फोटो टाक नक्की.
हर्षल चव्हाण उत्तम प्रतिसाद.
हर्षल चव्हाण उत्तम प्रतिसाद.
>>> डाळीचे, कोथिंबिरीचे बेसण
>>> डाळीचे, कोथिंबिरीचे बेसण घालून वाफवून बनबलेले फुनके, मुटकुळे म्हणतात
आमच्याकडे अळूवड्या वाफवण्यासाठी 'बांधल्या' की त्या वळकटीला उंडा (अनेकवचन उंडे) म्हणतात.
पोळ्या, पापड वगैरेंसाठी भिजवलेल्या कणकेचा हातावर गोळा/पेढा करून घेतो त्याला लाटी (अनेकवचन लाट्या) म्हणतात.
मोदक/करंजी/समोसा इत्यादींचं कव्हर म्हणजे पारी. त्यातलं स्टफिंग म्हणजे सारण. पुरण म्हणजे स्पेसिफिकली पुरणपोळ्यांसाठीचं चणाडाळ+गूळ सारण.
पुरणाची वाफवलेली आणि (सहसा कातण्याऐवजी) मुरड घातलेली करंजी म्हणजे कानवला (अनेकवचन कानवले) हे मंगळागौर किंवा नागपंचमीला करतात.
शंकरपाळे किंवा करंजीच्या कडा कापण्यासाठी नागमोडी कडांचं चाक बसवलेली छोटी दांडी असते (जिच्या दुसर्या टोकाला सहसा चमचा असतो) तिला 'कातणं' म्हणतात.
पाणी प्यायच्या भांड्याला फुलपात्र, घाटदार असलं तर गडू किंवा (लहान मुलांना पाणी प्यायला द्यायचे तो) चंबू - मोठा असला तर गडवा किंवा (स्टीलचा असला तरी) तांब्या.
माठातून पाणी भांड्यात घेण्यासाठी लांब दांडा बसवलेला गडू असायचा त्याला ओगराळं म्हणायचे.
डाळीचे, कोथिंबिरीचे बेसण
डाळीचे, कोथिंबिरीचे बेसण घालून वाफवून बनबलेले फुनके, मुटकुळे म्हणतात>>
मोकळ भाजणीसाठी भिजवलेल्या भाजणीच्या कधी बदल म्हणून आजी मुटकुळ्या करत असे. मुटके करुन तेलावर सोडायचे. पिठात कांदा आणि सरसरीत भाजणी असल्याने क्रिस्पी होतात आणि गरम गरम तुपाची धार सोडून फार भारी लागतात.
इथे कदाचित काहीसं अवांतर होईल
इथे कदाचित काहीसं अवांतर होईल, पण खाद्यसंस्कृतीतले काही शब्द अनेकदा भाषांतरित करता येत नाहीत.
उदा. 'क्रीमी टेक्स्चर'ला मराठी प्रतिशब्द मला तरी सापडलेला नाही. 'स्निग्ध' म्हणजे ऑइली, क्रीमी नव्हे. शिवाय "पनीर माखनीची ग्रेव्ही 'स्निग्ध' असते" असं म्हटलं तर काहीही अर्थबोध होणार नाही.
एखादा घटकपदार्थ मिक्स करणे आणि दुसरा 'फोल्ड इन' करणे याला चपखल प्रतिशब्द मराठीत नाहीत. मिसळा/ढवळा यांत तो अर्थ पूर्णपणे ध्वनित होत नाही.
उलटपक्षी मराठीतले काही शब्द, उदा. 'खमंग' - इंग्रजीत भाषांतरित करता येत नाहीत. कुरकुरीत म्हणजे क्रंची, पण खुसखुशीत म्हणजे?
चपात्या पोळ्या लाटताना जे
चपात्या पोळ्या लाटताना जे कोरडं पीठ घेतो, त्याला गुजरातीत अटामण म्हणतात.
इडली, ढोकळा, डोसा इत्यादीसाठीच्या batter ला गुजरातीत खिरू म्हणतात.
या दोहोंसाठी मराठीत शब्द आहे का? रचलेला कोरडे पीठ किंवा मिश्रण असा शब्द अभिप्रेत नाही.
स्वाती, कातण्याऐवजी मुरड घातली की कानवले असे आहे का? की वाफवणेही अभिप्रेत आहे? मी खाज्याचे कानवले वाचले पाहिले आहे आणि हे तळलेले असतात.
पिठाच्या , पुरणाच्य गोळ्यांनाही उंडा म्हटलेलं ऐकलं आहे. लाटी फक्त पापडाचीच ऐकली आहे.
स्वाती, दोन्ही पोस्ट्स
स्वाती, दोन्ही पोस्ट्स = 👌
स्वाती, सगळ्या शब्दांसाठी +१
स्वाती, सगळ्या शब्दांसाठी +१ फक्त आमच्याकडे फुलपात्राला 'पाणी प्यायचं भांडं' असं म्हणतात

खुसखुशीत, खमंग, फोल्ड वगैरे 'हाय कॉन्टेक्स्ट' शब्द आहेत
भरत, हो, पुरणाच्या गोळ्यालाही उंडा म्हणतात.
खुसखुशीत म्हणजे?>>>> Crisp?
खुसखुशीत म्हणजे?>>>> Crisp?
खाद्यसंस्कृतीतले काही शब्द अनेकदा भाषांतरित करता येत नाहीत.>>>> अगदी सहमत
मिक्स - ढवळून/ घोटून एकजीव
मिक्स - ढवळून/ घोटून एकजीव करा.
फोल्ड इनः उलथण्याने कडेचे मिश्रण निपटल्यासारखे करुन मध्यभागी हलकेच सोडा. ही क्रिया वारंवार हलक्या हाताने करा म्हणजे ढवळले ही जाईल आणि पिठात हवेचे बुडबुडे कायम रहातील. हा अर्थात निबंध झाला. प्रतिशब्द नाही. पण 'फोल्ड इन' हा विशिष्ट अर्थ आधीच असलेला शब्द स्वयंपाकात तीच क्रिया करण्याने साधर्म्य साधून वापरला आणि आता वापरुन वापरुन गुळगुळीत झालेला आहे, त्यामुळे पटकन समजतो.
मेरी बेरीला फोल्ड इन करताना न बघितलेल्या माणसाला 'केकचे मिश्रण फोल्ड इन कर' सांगितलं तर काही अर्थ बोध होईल का? मला वाटतं नाही होणार.
आता केकच्या रेसिपी वारंवार मराठीत लिहू लागले की वरचा निबंध न लिहिता काही तरी सुटसुटीत शब्द तयार होईल. अर्थात सोपा, कमी त्रासाचा आणि आळसाचा मार्ग अर्थात फोल्ड इन शब्दच आपण उचलायचं ठरवलं, तर तसं काही होणार नाही.
वावे +१. ते हाय कॉन्टेक्स्ट शब्द आहेत. वापरा योग्य परिस्थिती न आल्याने त्या त्या भाषेत तसे शब्द तयार झाले नाही इतकंच.
खमंग खुसखुशीत बरोबर क्रीमी आणि फोल्ड इन लिहिलंय त्यामुळे 'आमची मराठी कस्ली भारी' असं पुलंच्या नावावर लिहिता येणार नाही आता कोणाला

स्वाती- वावे+११ सेम टू
स्वाती- वावे+११ सेम टू आमच्या कडे पण.
'हाय कॉन्टेक्स्ट' शब्द >> +१
'हाय कॉन्टेक्स्ट' शब्द >> +१
'हाय कॉन्टेक्स्ट' शब्द >>
'हाय कॉन्टेक्स्ट' शब्द >>
यु नेल्ड इट
https://www.maayboli.com/node/86383
भरत, अटामण आणि खिरूला मराठी
भरत, अटामण आणि खिरूला मराठी प्रतिशब्द मलाही नाही माहीत.
)
एक पाकाच्या तारा वगळता कन्सिस्टन्सी-रिलेटेड शब्द फारसे नाहीतच बहुतेक. (मला एकदम लेह्य, चोष्य वगैरे आठवलं.
पाककृतीत सूचना देतानाही 'हे भज्याच्या पिठाइतकं सरसरीत भिजवा, ते बासुंदीइतकं दाट करा' हाच प्रकार. आता ज्याला मुदलात भजी आणि बासुंदीही माहीत नसेल त्याने काय करायचं?!
कानवल्यांबद्दल - माझ्या माहेरी हा शब्द वापरातच नाही, सासरी ऐकला तो मी वर लिहिलेल्या अर्थाने. माहेरी पुरणाचे वाफवून दिंड करतात, ते पारीला पुरणाभोवती चारही बाजूंनी (एन्व्हलपसारखं) दुमडून बंद केलेले असतात.
खाजाचे कानवले ही कायस्थी (सॉरी, जातीवाचक शब्द आला, मी टाळायचा प्रयत्न करत होते. पण माझ्या माहितीनुसार ही खरोखर फक्त त्यांचीच खासियत आहे!) तळून करतात हे खरं आहे. पण ते कातरूनही करतात.
वावे
ऋतुराज, हो, क्रिस्पी बराच जवळ जातो खरा, पण 'खुसखुशीत'मध्ये एक क्रम्बलही अभिप्रेत असतो, जो क्रिस्पीत नाही. शंकरपाळे क्रिस्प झालेत असं आपण म्हणणार नाही, तसंच अमेरिकेत कुरमुर्यांना 'राइस क्रिस्प्स' म्हणतात पण आपण कुरमुरे खुसखुशीत आहेत असंही म्हणणार नाही.
(आणि खुसखुशीत लेखनशैलीही असते तिचं काय?
)
त्याउलट 'क्रिस्प स्क्रीनप्ले'चं भाषांतर बहुधा 'गोटीबंद पटकथा' असं करावं लागेल का?
खुसखुशीत म्हणजे चकली-शंकरपाळे
खुसखुशीत म्हणजे चकली-शंकरपाळे च. रवाळ म्हणजे कलिंगडच.
Food Textures (How to
Food Textures (How to Describe How Food Feels)
स्वाती आंबोळे यांनी लिहीलेले
स्वाती आंबोळे यांनी लिहीलेले बरेच शब्द तसेच म्हणतात आमच्याकडे. कानवले मात्र आमच्याकडे म्हणतंच नाहीत. करंजी म्हणतात, उकडून केलं की कडबू म्हणतात बहुतेक. पाणी प्यायच्या भांड्याला फुलपात्र म्हणतात.
कानवले शेजारी सबनीसकाकू आणि प्रधानकाकूंकडे (माहेरचे शेजारी) म्हणायचे. त्या करंजीची पद्धतही वेगळी असायची, जास्त खुसखुशीत प्रकार. दिवाळीत सबनीसकाकू आम्हा मुलींना मदतीला बोलवायच्या. आम्ही लाटून द्यायचो. त्यानंतर त्यावर तूप आणि पीठ लाऊन परत लाटायचं, लेअर्स येतात त्याने. मला अगदी नक्की आठवत नाही, फार लहान होते. इथल्या मैत्रीणी सांगतील नीट.
>>>>स्वाती आंबोळे यांनी
>>>>स्वाती आंबोळे यांनी लिहीलेले बरेच शब्द तसेच म्हणतात आमच्याकडे.

होय सेम.
>>>>>दिवाळीत सबनीसकाकू आम्हा मुलींना मदतीला बोलवायच्या. आम्ही लाटून द्यायचो.
अंजूताई, आमच्याकडे पुरणाच्या
अंजूताई, आमच्याकडे पुरणाच्या (तळलेल्याच) करंज्यांनाच कडबू म्हणतात.
मला अहोजाहो करू नका प्लीज.
भरत, लिंक बघते, धन्यवाद.
एका उकडलेल्या करंजीला दिंडे
एका उकडलेल्या करंजीला दिंडे (ह्याचे आकार वेगवेगळेही करतात) आणि एकाला कडबू म्हणतात, दोन्हीत पुरणच. नागपंचमीला आई करायची. तळलेल्या सर्व करंज्याच. शक्यतो पुरण घातलं की उकडवायचीच ती, नागपंचमीलाच करायची. एरवी आठवत नाही.
मला अहोजाहो करू नका प्लीज. >>> हो नक्की.
करंजी छान शब्द आहे. त्याचे
करंजी छान शब्द आहे. त्याचे वेगवेगळे आकार म्हणजे आणखी सुंदरच असणार तर त्याला कडबू सारखं नाव! गाईगुरांचा कडबा आठवतो.
माणिकपैंजण नाही आठवला का???
Pages