कशाला काय म्हणायचं?

Submitted by वामन राव on 15 July, 2025 - 10:15

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.‌

उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!

फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.

- वामन राव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा आहे हा..
मराठवाड्यात वरणफळे-चकल्या-डाळढोकळी ला शेंगोळे म्हणतात. कडबोळ्याचा आकार असतो.

उलटपक्षी मराठीतले काही शब्द, उदा. 'खमंग' - इंग्रजीत भाषांतरित करता येत नाहीत >>> अगदी अगदी.
दोन्हीही प्रतिसादांची पूर्णपणे सहमत

पुरणपोळी म्हणजे कानडीत होळिगे >> टेक्निकली होळीगे म्हणजे पोळी किंवा stuffed पोळी. हुरणद होळीगे म्हणजे पुरणाची पोळी. काई होळीगे म्हणजे नारळाचे सारण घातलेली (नारळी) पोळी. इत्यादी.

(सहसा तमिळ शब्द प ने सुरू होणारा असेल तर कन्नडात त्याचा ह होतो. पाल = हालु, पत्त = हत्तु वगैरे. पण पुरण = हुरण असं झालं असेल तर पुरण हा मूळ कुठल्या भाषेतला शब्द आहे बघायला हवं)

मराठवाड्यात -
कणिकेची - वरणफळे
ज्वारी पिठाचे - शेंगोळे

तेलुगुत -
पुरणपोळ्या - बोब्बटलु

हरचंद हालव! >>>
स्वतःच्या हायावर धोंडा हाडून घेतला मी >>> Lol

हरचंद हालव! >>>
स्वतःच्या हायावर धोंडा हाडून घेतला मी >>
Lol आता नावाला जागून प्रत्येक धाग्यावर "हिला दुंगा" म्हणत जा हर्हा Wink

श्रवु, करंजीला नेवरी महाराष्ट्रातही म्हणताना ऐकलं आहे. नेवरी वरून निवग्र्या शब्द आला नसावा ना असं मला वाटतं कधी कधी. मोदक करताना जास्त उकड करून, मोदक झाल्यावर उरलेल्या उकडीत आम्ही आलं मिरची कोथिंबीर ठेचा, जिरे, मीठ घालून पारी थोडी मध्ये फोल्ड करून उकडून घेतो. कधी कधी तिखट मीठ आणि जिरेही घालून उकडून घेतो. काहीजण ह्याला फळंही म्हणतात. आम्ही निवग्र्या म्हणतो.

उकडीचे मोदक, (सोबत एक करंजी) केले की ह्या करतातच आमच्याकडे.

आंबोलीत करंज्यांना न्हेवर्‍या म्हणतात. कढिपत्त्याला पुसपाला म्हणतात. धण्यांना कोथमिरे म्हणतात. मी मागे लिहिले का आता आठवत नाही.

२-३ पाना आधी अस्मिता ने लिहीलाय मुद्दा भाजी , हा शब्द मी माझ्या सासरीच पहिल्यांदा ऐकलाय. पिठ पेरून करायच्या भाज्यांना म्हणतात - >>> हा शब्द मी सायली राजाध्यक्षच्या अन्न हे पुर्णब्रम्ह मध्ये पहिल्यांदा वाचला. त्याआधी मुद्दे गुद्दे हेच माहिती होते. म्हणजे मुद्दे संपले की गुद्द्यांवर यायचे त्यातले मुद्दे. तिने हा कर्नाटकी प्रकार आहे असे लिहिल्याचे आठवतेय. पिठ पेरुन वगैरे काही नाहीय. दोनचार पालेभाज्या मिळुन करायचा प्रकार आहे. मी एकदोनदा बनवलीय. सगळे झाले की वरुन सणसणीत फोडणी. गुलाबजाम चित्रपटात हा पदार्थ आहे.

तिची रेसिपी परत वाचली. तिने बेसनही नंतर घातलेय पण ते घालुन भाजी घोटलीय. आधी उकडुन डाळ, नंतर बेसन.. असो, लागते मस्तच त्यामुळे ठिक आहे.

पिठ पेरुन करायच्या भाज्या मी कोरड्या करते किंवा माझ्या कोरड्या होतात, मुद्दाभाजीसारख्या ओल्या करत नाही. पिठ पेरुन म्हणजे शब्दशः ९० टक्के तयार भाजीवर तिला झेपेल आणि अगदीच कोरडे होणार नाही इतकेच पिठ शिवरुन. भाजी थोडी कोरडी होते, झुणक्यासारखी.

पण तरी अस्मिता किंवा इतर म्हणताहेत तेही बरोबरच असावे.

ज्याच्यावरून घनघोर चर्चा होऊन हा धागा निघाला त्या मराठवाडी वाळकांना मुंबईत मद्रास काकडी म्हणतात. (असं मला चित्र बघून वाटलं.) पण ती काही आंबट नसते फारशी. रादर काही चवच लागली नाही एकदा आणली होती तेव्हा.

हं.

बाकी इथली माणिकपैंजणावरुन सुरू झालेली दंगामस्ती पुन्हा एकदा वाचून अक्षरशः वेड्यासारखा हसत होतो!

रागी मुद्दे - ( कानडी) - नाचणी उकडून त्यांचे गोल लाडू करायचे. गायीला चारा आणि लाडू खायला घालतात त्यातले.

गायीला चारा आणि लाडू खायला घालतात त्यातले.>>>>

कर्नाटकातील कन्नडीग रागी मुद्दे सांबारासोबत खातात हो..

मुंबईत गायींच्या चार्‍यासाठी ज्या गुजराथनी गाय, चारा व लाडु घेऊन बसलेल्या असतात त्यांच्याकडे जे लाडु असतात त्यात अळिवासारखे काहीतरी दिसते, पण भाकड गायींना अळिव का घालेल कोण?

त्यात अळिवासारखे काहीतरी दिसते

>>> रागी धान्य हे अळिवासारखे दिसते. त्याच्या पिठाचे लाडूसारखे गोळे करून ते वाफवतात. सांबर, चटणी, काही भाज्या वगैरेंसोबत खाल्ले जातात. त्यांना रागी मुद्दे / रागी संगटी / रागी संकटी म्हणतात. रायलसीमा / उत्तर कर्नाटक भागांत प्रामुख्याने करतात.

रागी म्हणजे नाचणी.
रागी मुद्दे म्हणजे नाचणीच्या पिठाच्या उकडीचे गोळे. माणसं
सांबार/कडधान्याची सरसरीत उसळ/पातळ पालेभाजी यांच्याबरोबर खातात. छान लागतात.

आम्ही चिकमगळूरु आणि मडिकेरी येथे हॉटेलात मागवले ( आहेत का विचारले) तर त्यांनी सांगितले की हे इकडे वेज हॉटेलात ठेवत नाही. नानवेज हॉटेलात मटण करीबरोबर खायला मिळतील. मंगळुरूतही मिळाले नाहीत.
(>>सांबार/कडधान्याची सरसरीत उसळ/पातळ पालेभाजी यांच्याबरोबर खातात>> हे यूट्यूबवर दाखवतात परंतू आम्ही गेलो त्या हीटेलमध्ये नाही मिळाले.)

Pages