महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.
उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!
फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.
- वामन राव
>>>
>>>
इथूनतिथूनमिथुन फाडलेलं दूध
पाकातली नासकवणी
नावडतीचं दूध नासकं
मनलो नं मी, मले तं मस्त मजा येऊन ऱ्हायली भाऊ मनुन!
>>>
बेळ गावकडे जहांगिर म्हणतात
मनोहरा (एकाने मनोरमा लिहिलं आहे)
+१०८
जहांगीर ? काय राव बनवता का
जहांगीर ?
काय राव बनवता का आम्हाला?!
चहाच्या टपरीवर पुर्वी चहा आणि
चहाच्या टपरीवर पुर्वी चहा आणि कॉफी मिक्स पेय मिळत असे त्याला 'मारामारी' म्हणत.
काहीतरी हिरवा रंग, पिस्ते
काहीतरी हिरवा रंग, पिस्ते वगैरे घालावे लागतील त्यात >>
माणिक पैंजण मधे माणिकाचा रंग आणि पैंजण मिसिंग आहे तसंच. तीच मुख्य अट आहे नावं ठेवताना.
आता मारामारी झालीय चाय लाटे
आता मारामारी झालीय चाय लाटे
सगळ्या गप्पा भारी...
>>> माणिक पैंजण मधे माणिकाचा
>>> माणिक पैंजण मधे माणिकाचा रंग आणि पैंजण मिसिंग आहे तसंच. तीच मुख्य अट आहे नावं ठेवताना.
पृच्छा: गुलाबजामुनात गुलाब असतात का?
हे "मारामारी" प्रकरण माहित नव्हतं. कुठल्या भागात होते ती?
जहांगिर म्हणजे फो.पो. असेल तर
जहांगिर म्हणजे फोडणीची भाकरी असेल तर फोडणीच्या भाताला अनारकली म्हणूया.
चहाच्या टपरीवर पुर्वी चहा आणि
चहाच्या टपरीवर पुर्वी चहा आणि कॉफी मिक्स पेय मिळत असे त्याला 'मारामारी' म्हणत. >>
चव ?
>>> गुलाबजामुनात गुलाब असतात
>>> गुलाबजामुनात गुलाब असतात का
सजावटीसाठी पाकळ्या घालतात, पाकातही गुलाबजल घालतात स्वादाला.
>>> जहांगिर म्हणजे फो.पो.
>>> जहांगिर म्हणजे फो.पो. असेल तर फोडणीच्या भाताला अनारकली म्हणूया.

नाही म्हणायला पुणेकरांनी फालुद्याला मस्तानी म्हणून रसिकतेचा उच्चांक गाठला आहे म्हणायचा त्यांच्या परीने.
पोहेहार हा पोह्यांचा नसतो.
पोहेहार हा पोह्यांचा नसतो.
पोह्यांचं नाव सुवर्णतन्मणी !
अनारकली कनीज होती. फोडणीच्या
अनारकली कनीज होती. फोडणीच्या भाताला नूरजहाँ पुलाव म्हणा.
मारामारी प्रकरण माहिती आहे,
मारामारी प्रकरण माहिती आहे, बाबा सांगायचे लहानपणी.
एकेक प्रतिसाद
रानभूली
.पोळीत लाल तिखट जास्त घातलं तर थोडा लाल माणिक रंग येईल.
पोळीत लाल तिखट जास्त घातलं तर
पोळीत लाल तिखट जास्त घातलं तर थोडा लाल माणिक रंग येईल. >>> मग फाऊल ना ?
सुवर्णतन्मणीचा पिवळा रंगही
सुवर्णतन्मणीचा पिवळा रंगही फाऊल होईल मग. नुसतं तन्मणी चालेल.
>>> फोडणीच्या भाताला नूरजहाँ पुलाव म्हणा

रुचिरामध्ये अकबर्या नावाचा
रुचिरामध्ये अकबर्या नावाचा पदार्थ आहे.
सुवर्णतन्मणीचा पिवळा रंगही
सुवर्णतन्मणीचा पिवळा रंगही फाऊल होईल >>
याच न्यायाने पाणीपुरीला चिंचपेटी नाव देता येणार नाही.
हो, चिंचपेटी पेढ्याला वगैरे
हो, चिंचपेटी पेढ्याला वगैरे म्हणावं लागेल.
>>> रुचिरामध्ये अकबर्या नावाचा पदार्थ आहे.
हो की काय! कुठल्या शिळ्या पदार्थाला फोडणी दिली आहे?
शिळ्या ब्रेडचाही
मनोहरमुरलीधर करतात ना बाकी?ही एकेक नावं म्हणजे कुणाचे
ही एकेक नावं म्हणजे कुणाचे तरी फावल्या वेळचे उद्योग असणार आहेत. जसे आपले चालू आहेत.
नाही. अकबर्या अनारशाच्या
नाही. अकबर्या अनारशाच्या मार्गाने जाता जाता वळण घेतो. लोणी आणि साखर. थापायच्या ऐवजी गोळी आपटी बाँबसारखी आपटायची. मग तळायची.
>>> थापायच्या ऐवजी गोळी आपटी
>>> थापायच्या ऐवजी गोळी आपटी बाँबसारखी आपटायची. मग तळायची.
अरे देवा!
हा त्या मुळ्याच्या आळसासारखा अनारशाचा कंटाळा झाला म्हणजे!
हा त्या मुळ्याच्या आळसासारखा
हा त्या मुळ्याच्या आळसासारखा अनारशाचा कंटाळा >>>
आज काही खरं नाही. बाळसे बल्लवाचार्य काँबो आहे !!
रुचिरामध्ये अकबर्या नावाचा
रुचिरामध्ये अकबर्या नावाचा पदार्थ आहे.>>>>> बरा होत असेल.
मारामारी, गंगा जमुना संत्री- मोसंब्याच्या रसाला म्हणतात ना?
आपला सुधारस विसरलात मंडळी?.
माझ्या लहान भावाने तेल समजून डोक्याला लावला होता.
मला चहा कॉफी एकत्रला मारामारी
मला चहा कॉफी एकत्रला मारामारी म्हणतात हे माहीतेय.
माझ्या लहान भावाने तेल समजून डोक्याला लावला होता. >>> हाहाहा. लावताना चिकटपणा नाही का जाणवला त्याला.
एकेक प्रतिसाद म्हणजे कहर आहेत
एकेक प्रतिसाद म्हणजे कहर आहेत!
>>> आपला सुधारस विसरलात मंडळी?
माझ्या लहान भावाने तेल समजून डोक्याला लावला होता.
हहपुवा! त्या चित्तचक्षुचमत्कारिक दृश्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करत आहे!
अकबर्या, अनारकली, नूरजहॉं,
अकबर्या, अनारकली, नूरजहॉं, जहांगिर
पाकातली नासकवणी
🤣 🤣 🤣
महान प्रतिसाद आहेत!
महान प्रतिसाद आहेत!
आज काम करायला द्याल का नाही!
>>> माझ्या लहान भावाने तेल
>>> माझ्या लहान भावाने तेल समजून डोक्याला लावला होता.

कणकेत मऊसरपणा राहण्यासाठी
कणकेत मऊसरपणा राहण्यासाठी घालतात ते तूप = मोहन.
मोहन म्हणजे व्यक्तीचे नाव हेच माहीत होते तेंव्हा 'कणीक मळताना मोहन घातलेस का' वगैरे ऐकल्यावर लहानपणी डोक्यात काय काय कल्पनाविलास व्हायचा.
एका मिठाईचे नाव लवंगलतिका असे
एका मिठाईचे नाव लवंगलतिका असे देखील वाचले आहे.
Pages