महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.
उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!
फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.
- वामन राव
आंबा कापायचा की फोडायचा?
आंबा कापायचा की फोडायचा?
पिळायचा
पिळायचा
मस्त धागा!
मस्त धागा!
सध्या प्रतिसाद वाचतोय (दोन पाने वाचुन झाली आहेत, पुढचे सवडीने वाचतो)... सगळेच प्रतिसाद रोचक आहेत 👍
आधी ऐकलेल्या विविध बोलीभाषेतील काही प्रतिशब्दांची उजळणी झाली तर काही नव्याने समजले, उदा. 'भेदरे', 'वरणफळे' वगैरे 😀
तुकडा, शाही तुकडा, मनोहर उदास
तुकडा, शाही तुकडा, मनोहर उदास >>>
एका माहितीतल्या कोकणी कुटुंबात 'थालिपीठ लावणे' याला 'तुकडा लावणे' असा शब्द ऐकला आहे. (म्हणजे थालिपीठ लावताना गोलाकाराचं बंधन नाही - असं माझ्यासारख्या किचन-कंटाळा व्यक्तीला वाटल्याशिवाय राहत नाही.)
'टाच दुखतेय' याला 'खोट दुखतंय' असं म्हणताना ऐकलं आहे.
खोट शब्द नेहेमी ऐकलेला आहे.
खोट शब्द नेहेमी ऐकलेला आहे. पण स्त्रीलिंगी. खोट दुखते आहे.
आज तुकडा काय आहे, असं ही ऐकलं आहे. म्हणजे 'आमटी भात' असं फक्त जेवायला असेल तर तोंडी लावायला काही तरी साधारण थालीपीठ असच आठवतं.
खोट म्हणतात टाचेला.
खोट म्हणतात टाचेला.
थालीपीठाला थालीपीठच ऐकलंय.
ही आज सकाळची न्याहारी, शाही
शाब्दिक चर्चा खूप झाली, प्रात्यक्षिक करू या -
ही आज सकाळची न्याहारी, शाही तुकडा म्हणा, हवं तर
तुम्ही दोन्हीपैकी माणिकपैंजण कशाला म्हणता?
वाळलेल्या पोळीच्या चकोल्या
वाळलेल्या पोळीच्या चकोल्या आणि फोडणीची पोळी / कुस्करा जर कोणी अशा पंचतारांकित सजावटीने वाढणार असेल तर त्याला नक्कीच 'माणिक पैंजण ' म्हणावे लागेल, मी तर या पूर्ण डिश / प्लेटलाच 'माणिक पैंजण म्हणेन.
सुंदर दिसते आहे थाळी, वामनराव
सुंदर दिसते आहे थाळी, वामनराव.
आम्ही चपातीचा चिवडा म्हणतो.
आम्ही चपातीचा चिवडा म्हणतो. माझ्या माहितीतले सगळे चचि च म्हणतात.
>>> आम्ही चपातीचा चिवडा
>>> आम्ही चपातीचा चिवडा म्हणतो.
म्हणजे आम्ही ज्याला कुस्करा म्हणतो तो, वरील फोटोतला उजवीकडचा, थोडा कमी असलेला पदार्थ ना?
बरोबर.
बरोबर.
मजा चालू आहे इथे
मजा चालू आहे इथे
तुकड्यासाठी अमितला +१ पण माझ्या मते तुकडा हे नाव पोळी/भाकरी/घावन/थालीपीठ अशा category साठी जनरल आहे(ज्याचा तुकडा मोडून खातात). आमटीभाताबरोबर तोंडी लावायला असं नसावं.
वामनरावांनी कन्फ्युज करायला
वामनरावांनी कन्फ्युज करायला खरंच माणकासारखे दिसणारे डाळिंबाचे दाणे पण टाकलेत. तरी पण - कितीही सजवा, फो. पो. ला माणिक पैंजण नाव फार म्हणजे फारच फार फेच्ड आहे पण
कुणाच्या डोक्यात अन का आले असेल हीच एक उत्सुकता आहे.
>>> फो. पो. ला माणिक पैंजण
>>> फो. पो. ला माणिक पैंजण नाव फार म्हणजे फारच फार फेच्ड आहे
हो ना. ना माणकाचा रंग, ना पैंजणांचा आकार -
उगाच ललित पाडायचं म्हणून पाडलेल्या लेखांसारखं नाव आहे.मला 'पूर्वरंगा'तलं "अशाने 'गणपतीबाप्पा मोरया'चा खरा अर्थ '१८५७चं बंड' असा आहे असं कोणी सांगितलं तरी आश्चर्य वाटायला नको!' आठवलं.
आम्ही इडली उरली कि ती फ्राय
आम्ही इडली उरली कि ती फ्राय करून तिचे तुक डे किंवा कुस्करा करतो. त्याला काय नाव आहे ?
आम्ही इडली फ्राय असं सोयीचं नाव ठेवलंय.
मी फोडणीची इडली म्हणते, इथे
मी फोडणीची इडली म्हणते, इथे सौदिंडियन रेस्टॉरन्ट्समध्ये 'मसाला इडली' नावाने पाहिली आहे.
रत्नहार वगैरे म्हणायला हरकत नाही वरच्या लॉजिकने.
रत्नहार
रत्नहार
मी इडली फ्रायच म्हणते.
रत्नहार
रत्नहार
मी फ्राय ईडली, फ्राय ढोकळा
मी फ्राय ईडली, फ्राय ढोकळा म्हणते, फोडणीत परतून या दोघांना घेतलं की.
बाय द वे शिळ्या पोळीचा लाडू करतो आपण त्यालाही आहेका अलंकारीक नाव, त्यात तर गूळ आणि साजूक तूपही असतं. आम्ही पोळीचा लाडूच म्हणतो.
बाय द वे शिळ्या पोळीचा लाडू
बाय द वे शिळ्या पोळीचा लाडू >> खूप खाल्लेत लहानपणी.
अलंकारीक नाव, >> पाचू झुमका
पिकतं तिथं विकत नाही हेच खरं!
पिकतं तिथं विकत नाही हेच खरं!
आपलं नाणं खणखणीतच आहे हो पण आपलीच माणसं त्याला नावे ठेवतात अन् आपली माती करतात हे काही दिसत नाही का आम्हाला? म्हणूनच तर मराठी माणूस मागे पडतो!
काय तर हे माणिकपैंजण नव्हेत म्हणे! चांगली नावे नकोत तर किमान थोडी बरी दिसणारी नावे तरी द्यायची! फोपो, पोचि, पोकु, पोतु, ही काही नावे आहेत का?आपल्या पाककृती, संस्कृती, परंपरा, लोकशाही, भाषा, साहित्य, समीक्षा, रुढी यांचे आपण कौतुक आपण करणार नाही तर कोण फिरंगी लोक करणार?
त्या जळ्ळ्या मेल्या परप्रांतीय पांढुरक्या इडलीला रत्नहार घालायचा पण मराठमोळ्या माणिकपैंजणाचे मोती फारच फेच्ड म्हणून उधळून द्यायचे! कलियुग हो कलियुग!
साध्यासुध्या बंगाली मिठायांची नावे किती साहित्यिक असतात ते अनिंद्यना विचारा हवं तर! शिका थोडं त्यांच्याकडून!
---
मले तं मस्त मजा येऊन ऱ्हायली भाऊ!
बंगाली मिठायांची नावं असूदेत
बंगाली मिठायांची नावं असूदेत साहित्यिक वगैरे, पण इथूनतिथून मिथुन (तोही चक्रवर्ती) सगळ्या मिठायांमधे फाडलेलं दूधच असतं त्याचं काय?
बरं मग बंगाली मिठायांना
बरं मग बंगाली मिठायांना मरहट्टी नावं सुचवा.
उदा. रसगुल्ला/रसमलाई म्हणजे 'पाकातली / बासुंदीतली नासकवणी'
नावडतीचं दूध नासकं ...
नावडतीचं दूध नासकं ...
इथे आणखी नावं कळली
इथे आणखी नावं कळली
चुरमा, कुटके, मनोहरा (एकाने मनोरमा लिहिलं आहे) , सुग्रभुग्र , शिवाजी चिवडा (हे नाव मी इंदूरमध्ये ऐकलं होतं).
>>> शिवाजी चिवडा (हे नाव मी
>>> शिवाजी चिवडा (हे नाव मी इंदूरमध्ये ऐकलं होतं)
याला आता छत्रपती शिवाजी महाराज चिवडाजी वगैरे म्हणतात का मग?
>>>उप्पू म्हणजे मीठ, मावे/
>>>उप्पू म्हणजे मीठ, मावे/ मावू म्हणजे मैदा/ आटा. त्यावरुन सौदिंडियन लोकांनी उपमा केला. रणवीर ब्रारच्या उपमा रेसिपी च्या सौजन्याने.
नमकीन आटा म्हणजे उपमा.>>> चूक
उप्पु म्हणजे मीठ= बरोबर
हिट्टु म्हणजे पीठ
मग असे झाले उप्पुहिट्टु= उप्पीट्टू
पाचू झुमका
पाचू झुमका
काहीतरी हिरवा रंग, पिस्ते वगैरे घालावे लागतील त्यात. पाचू रंग दिसायला हवा ना.
शिळ्या भाकरीला फोडणी देऊन
शिळ्या भाकरीला फोडणी देऊन कांदा घालून जो प्रकार करतात त्याला बेळ गावकडे जहांगिर म्हणतात
Pages