महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज कर्मकांडात अडकला आहे? असे काही वाचले/पाहिले नाही. धार्मिक जरूर आहे पण बाकी कर्तव्ये व जबाबदार्‍या टाळून ते करत आहेत असे काही कधी ऐकले नाही. प्रत्यक्ष अनुभवही नाही. उलट सर्व जातींमधे सर्वात कमी धार्मिक समाज हाच असेल.

<< याउलट गेली २५ वर्षे इतिहासाबद्दल अपमान फिशिंग करून , सरंजामी व्यवस्था ग्लोरिफाय करून स्वतःच्याच समाजातील मुलांना नादी लावणारे मराठा नेतृत्व हे त्यांच्याच समाजाच्या हिताविरूद्ध आहेत. २५ वर्षे संभाजी ब्रिगेड च्या मार्फत काय काय पसरवले, तरूण पोरांची डोकी भडकावली, दंगे घडवले. "खरा इतिहास" म्हणे. एकूण निष्पन्न काय? तर दोन पुतळे हलवले, जे मुळात जेथे होते ते बहुतांश लोकांना माहीतही नव्हते. >>

----- फारण्ड यांच्या प्रतिसांदतला भाग. संभाजी ब्रिगेड बद्दल प्रेम नाही हे आधीच लिहीतो.

संभाजी ब्रिगेडच्या --->जागी संघ ( आवरण काहीही असले तरी केवळ ब्राह्मणांचीच संघटना आहे ).
मराठा ---> ब्राह्मण
२५ ---> १००
(माथी भडकाविली जाणारी) तरुण पोरे ---> येथे फार कावेबाज प्रकार असतो, ब्राह्मणेतरच.

तरुण पिढी वर काही चांगले संस्कार घडविण्यासाठी भोळे पालक मंडळी विश्वासाने बालकांना शाखेत सोडतात / सोपवितात. छान छान कवायती, खेळ, स्पर्धा, सण वार.... समाज सेवा हे वरवर असतो. सोबत आजन्म मुस्लीम ( ख्रिश्चन.... ) द्वेष घेऊनच बाहेर पडतो. माझे सर्व मित्र - नातेवाईक या रोगाने ग्रस्त आहेत. प्रत्येक दिवशी, २४-७, ३६५ दिवस ते मुस्लीम द्वेषाशिवाय काहीही बोलूच शकत नाही.

(मुस्लीम द्वेषापाई ) एक - दोन नाही पाच पिढ्या घालविल्या आहेत. मुस्लीम.... मग इतरही आहेतच. पण सध्या मुस्लीमच. सर्व पालकांनी आपापल्या लहानग्यांना / निरागस मुलांना द्वेष पसरविणार्‍या संघटनांपासून चार हात सुरक्षित ठेवावे. संस्कार केंद्रात संस्कार होत नाही.

संघटना ब्राह्मणांची असेल तर इतरांची डोकी कशी भडकावतात? ब्राह्मणांना एकजात सोमिवर पीठमागे वगैरे हिणवणारे (इथे माबोवरही आहेत) इतके साधेभोळे आहेत की ज्यांची ते हेटाळणी करतात त्यांच्या शिकवणूकीचा त्यांच्या बालमनावर परिणाम होतो!

संघटना ब्राह्मणांची असेल तर इतरांची डोकी कशी भडकावतात? ब्राह्मणांना एकजात सोमिवर पीठमागे वगैरे हिणवणारे (इथे माबोवरही आहेत) इतके साधेभोळे आहेत की ज्यांची ते हेटाळणी करतात त्यांच्या शिकवणूकीचा त्यांच्या बालमनावर परिणाम होतो!>>>>

हाहा…मलाही हा प्रश्न नेहमी पडतो. Happy

एका समाजाने इतर समाजाला हजारो वर्षे काय काय कसे कसे छळले याच्या गोष्टी सांगणारे आजही स्वतःच्या घरातली कर्मकांडे करवुन घ्यायला ब्राम्हणांच्याच पाया पडायला का जातात देव जाणे. ब्राम्हण आजही कर्मकांडात अडकले असतील तर ते इतरांच्या घरची कर्मकांडे करण्यात. आजही प्रत्येक धार्मिक कार्यात ब्राम्हण बोलावल्याशिवाय पुण्यप्राप्ती होत नाही असे इतर समाजाला वाटते त्याचे काय?

तुमची कर्मकांडे बंद करा, पुण्यप्राप्ती ही भाकड कल्पना आहे हे मान्य करा, ब्राम्हणांना घरी पुजा सांगायला बोलावु नका. तसेही ब्राम्हण २.५ टक्केच आहेत म्हणे. मग हा २.५ टक्के समाज स्वतःच्या घरात काय हवे ते कर्मकांड करेना का, तुमचे काय जाते??? तुम्ही उरलेले ९७.५० टक्के लोक कर्मकांड पुर्ण बंद करा. तुम्ही उरलेले ९७.५टक्के लोक आधी आत्मपरिक्षण करा की.

आता गणेशोत्सव येतोय, त्यानंतर अंबाबाई. मंडप घालुन मुर्ती बसवुन १०-१० दिवस टाईमपास करणे कर्मकांड नाहीतर दुसरे काय आहे? त्यात एक दिवस सत्यनारायण पुजाही असते. हे सगळे गणेशोत्सव काय ब्राम्हण करताहेत? त्यांचा संबंध फक्त मंडपातील गणेशाची पुजा करण्याइतपतच. बाकी त्या मंडपात जे॑ १५ फुटी फलक लावलेले असतात त्यावर ब्राम्हण अभावानेच आढळतो.

तुमच्या भागातले सगळे लहानमोठे गणेशोत्सव यंदा बंद करा म्हणजे एका मोठ्या कर्मकांडाला फाटा दिल्याचे पुण्य तुमच्या पदरी पडेल.

हे कोण करणार?? आहे हिंमत??

तोवर चालुद्या. आज सहज म्हणुन हा धागा उघडला, मनोरंजन मुल्य निश्चितच चांगले आहे पण तोचतोचपणा खुप आहे.

>>"खरा इतिहास" म्हणे.<<
मग खरा इतिहास बालभारती मधुन शिकवला गेला तो आहे का? दादोजी कोंडदेव, रामदास स्वामींच्या बाबत जाणुन्बुजुन केलेली धूळफेक तात्कालिन पत्रव्यवहाराच्या आधारे खोडुन काढली तर ते फॅक्ट फाइंडिंग खोटा इतिहास का? आणि महाराजांच्या मृत्युनंतर १००-१५० वर्षांनंतर लिहुन घेतलेल्या बखरीतला मजकुर हा "खरा इतिहास" अशी तुमची धारणा असेल तर विषय संपला..

माझ्या मते दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामीबाबत इतिहासात फेरफार करणारे, आणि आजच्या काळात त्याचं समर्थन करणारे स्वतःचच हसु करवुन घेत, एकाअर्थी दाकों/रास्वा यांच्यावर अन्याय करत आहेत.. बघा पटतंय का...

सबळ पुराव्याच्या आधारे इतिहासांत झालेली फेरफार समोर आणल्यावर स्विकारायला हवी. पुतळा तिथे होता हे फारसे कुणाला माहित नव्हते पण हलविल्याचे दु : ख आज एव्हढ्या वर्षानंतरही खोलवर मनांत कुठेतरी सलत रहाते.

माझ्या मते दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामीबाबत इतिहासात फेरफार करणारे, आणि आजच्या काळात त्याचं समर्थन करणारे स्वतःचच हसु करवुन घेत, एकाअर्थी दाकों/रास्वा यांच्यावर अन्याय करत आहेत.. बघा पटतंय का... >>> १००% मी त्याचे समर्थन करत नाहीये. उद्या दादोजींनी शिवाजी महाराजांना मोंगलाविरूद्ध वापरायचे पवित्रे शिकवले असे कोणी सांगू लागले तर ते हास्यास्पदच होईल.

पण एका बाजूच्या एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले की त्या व्यक्तीला दुसर्‍या बाजूचे सगळे पटत असले पाहिजे अशा थाटात वाद "फ्रेम" करणेही चुकीचे आहे.

"खरा इतिहास" म्हणून सध्या ज्या कंड्या पिकवल्या जात आहेत त्या म्हणजे आख्खी ब्राह्मणजात शिवरायांच्या विरूद्ध होती, सतत स्वराज्यविरोधी कारवाया करत होती, अजूनही त्यांना "शिवाजी" खुपतो असले पसरवत राहणे. यालाच पब्लिक सध्या खरा इतिहास म्हणते. सोमिवर तेच दिसते. मी "खरा इतिहास म्हणे" लिहीले आहे ते त्याबद्दल. ब्रिगेडी उद्योगांबद्दल.

इतिहास उपलब्ध पुराव्यांनुसार असतो. ते पुरावे वापरून ती माहिती ठरवायला हवी. त्याबदल काही प्रॉब्लेम नाही.

पुतळा तिथे होता हे फारसे कुणाला माहित नव्हते पण हलविल्याचे दु : ख आज एव्हढ्या वर्षानंतरही खोलवर मनांत कुठेतरी सलत रहाते. >>> तुम्हाला मुद्दा लक्षात आलेला नाही किंवा विरोध करायचे आधीच ठरवून तुम्ही मुद्दा "फिश" करताय. पुतळे ठेवा, हलवा काही प्रॉब्लेम नाही. त्याकरता तरूण पोरे नादाला लावली जातात, त्यांच्यावर केसेस होतात, आणि जे नेते याला फूस लावतात ते ज्यांना विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेत जातात. हा पॉइण्ट होता, त्याबद्दल तो उल्लेख होता.

>>"खरा इतिहास" म्हणून सध्या ज्या कंड्या पिकवल्या जात आहेत त्या म्हणजे आख्खी ब्राह्मणजात शिवरायांच्या विरूद्ध होती,<<
त्या कंड्याच आहेत, दुर्लक्ष करण्याच्या लायकिच्या. अडाणी, फटिचर लोक अशा पुड्यांना बळी पडतात. अशा लोकांचं वाचन मूळात नसतं, त्यांचं ज्ञान सोमिवर (गुगल प्रेरीत) अवलंबुन असल्याने त्यांच्या कामेंट्स वाचण्यालायक देखील नसतात. दुर्दैवाने असे काहि नग इथेहि (चालु घडामोडि, राजकारण धाग्यांवर) आहेत. त्यांना बेदखल करणं हाच एक उपाय आहे...

>> तुम्हाला मुद्दा लक्षात आलेला नाही <
माझं रिडिंग बरोबर असेल तर उदयशेठने ते सार्कॅस्टिक हेतूने लिहिलेलं नाहि, ते सविस्तर खुलासा करतीलच. असो..

एक गोष्ट मात्र आवर्जुन मांडाविशी वाटते ती म्हणजे, बर्‍याच बाबतित, विशेषतः अमेरिकन राजकारणा बाबत उदयशेठ आणि माझी मतं परस्परविरोधी आहेत. तरि देखील जे बरोबर आहे ते बरोबर आहे हे लिहिण्याचे धारीष्ट्य त्यांनी इथे आणि इतरत्र दाखवुन दिलेलं आहे. हा गुणविशेष तथाकथित कंपुबाजांमुळे माबोवरुन जवळजवळ नामशेष झाला आहे..

एक निरिक्षण नोंदवावसं वाटलं, बाकि काहि नाहि...

पोस्ट लिहीणार्‍याच्या उद्देशावर शंका घेउन जजमेण्टल कॉमेण्ट केलेली आहे त्यांनी. ते ही इथे बरेच लोक करतात. स्वतःला लिबरल समजणारे तर जास्तच करतात.

दादोजींचा पुतळा मुद्दाम कचऱ्याच्या ट्रकमधून नेऊन पु ल देशपांडे उद्यानात भिरकावण्यात आला होता.

(उत्तरेततर अलीकडे आंबेडकरांच्या पुतळ्याचीही विटंबना सुरू आहे, तेही चूकच)

फारएन्ड ह्यांच्या पोस्टशी सहमत आहे.

राज - थँक्स

काही दखल घेण्यासारखे असेल तर लिहीतोच.

पुतळे हलवा-हलवी कडे विषय भरकटत नेला गेला पण ते तेव्हढेही महत्वाचे मला वाटत नाही.

महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज स्वतः स्वतःचा दुश्मन आहे असे जेम्स यांनी मागच्या पानावर मांडले आहे. अनेक वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर त्यांचे असे मत बनले आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतील. चर्चा व्हायला हवी असे वाटते. विषय भरकटवून ( धागे बंद पाडायला भाग पाडून) प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही किंवा प्रश्न नाहिसा होणार नाही. तो अजून उग्र रुप धारण करेल.

शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्व कमी करण्याचे प्रकार या आधी झालेले आहेत आणि आजही होत आहेत - कधी उघडपणे कधी आडवळणाने.

महाराष्ट्राच्या राज्यापाल पदावर बसविलेल्या कोश्यारी ने अनेकदा शिवाजी महाराज तसेच फुले दांपत्य यांच्या बद्दल अवमानकारक मत प्रदर्शित केले होते. एक राज्यपाल, जबाबदार व्यक्ती , असे बेताल विधाने कशी करु शकतो ? अशा वेळी जमिनीवर काम करणारा प्रचारक म्हणतो " मी त्यांचे संपूर्ण भाषण एकले नाही " , " संदर्भ काय होता हे बघायला ..." .
पुढे त्या राज्यपालाला पद्म विभूषणाने गौरविले जाते.
काळ्या टोपीवाल्यांचे हेच ते कपटी राजकारण आहे.

डरो मत.

हे आधी पण झाले आहे सान्गून.

चर्चा व्हायला हवी असे वाटत असेल तर मुख्य मुद्द्यावर बोला. तपशीलातले उल्लेख हाच मुख्य मुद्दा आहे असे भासवून स्ट्रॉमॅन आर्ग्युमेण्ट करू नका.

ब्राह्मण समाज हा स्वतःचा दुश्मन आहे याबद्दल जे उदाहरण दिले आहे ते इतरांनी केलेल्या स्टीरीओटायपिंगचे आहे. मुस्लिमांचे स्टीरीओटायपिंग जितके चुकीचे आहे तितकेच इतरांचे आहे. एकाबद्दल कळवळा तर दुसर्‍याला ब्लेम द विक्टिम हे बरोबर नाही.

जो न्याय मुस्लीमांना लावाल तोच ब्राह्मणांना लावा किंवा vice versa.
ब्राह्मणांबद्दल कळवळा पण... हे धोरण दुटप्पी पणाचे आहे.

कालपर्यंत भक्ताडे वाट्टेल तशा शिव्या द्यायचे. कसे छान थंडगार वाटायचे. कारण त्रास दिली जाणारी व्यक्ती कधी नेहरु, इंदिरा , सोनिया होती...
अगदी मायबोलीवर पण बार मधे काम करणारी... म्हणून उल्लेख होतो. अशी टिका मी करत नाही या तटस्थतेलाही अर्थ नाही.

वरिल व्यक्तींच्या धोरणांवर टिका करा. काहीच प्रॉब्लेम नाही. पण तसे झाले नाही. आज त्याच शिव्या व्याजासकट परत मिळत आहे तर जेन झी चे संस्कार निघत आहेत. अगदी १५- २० वर्षांच्या मुलांच्या मागे लागले आहेत. काय भाषा, काय संस्कार?

<< काही लोकांनी भ्रष्टाचार केला म्हणून सगळी राम मंदीर मोहिम भ्रष्ट म्हणणे म्हणजे घरात उंदीर झालेत तर सगळे घर जाळून टाका म्हणण्यासारखे आहे.
ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. पण म्हणून अ ते ज्ञ सगळे भाजप वाले हरामखोर असा व्यापक दृष्टीकोन भाजप द्वेष्ट्यांचा असला तरी जनतेचा नसेल. >>

----- उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड करतांना , शेंडे यांनी छान मत मांडला आहे. त्या वेळी नोट केले होते.

अगदी असाच न्याय शेंडे ( सम विचारी ) मुस्लीमांना / किंवा इतर वेळी का नाही लावत ?

जो न्याय मुस्लीमांना लावाल तोच ब्राह्मणांना लावा किंवा vice versa. >>> मग मी वेगळे काय सांगतोय. कोणाचाच घाऊक द्वेष करू नका, आणि ज्यांच द्वेष केला जातो त्यांनाच दोष देऊन द्वेषाचे समर्थनही करू नका. सगळीकडे एकच फुटपट्टी लावा.

अजित पवार साहेबांबद्दल. महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस जनसेवा दिवस म्हणून साजरा केला. हे छान केले.

या व्यक्तीने भरपूर टिका हसत झेलली आहे. राज्याचा अभ्यास दांडगा होता. सरकारांत सामिल झाल्यावरही धर्माचे किंवा जातीचे राजकारण त्यांनी केले नाही हे विशेष. कायम सर्वांना जोडणारेच विचार मांडले आहेत. हेच थोरल्या पवारांबाबतही म्हणता येते.

अजित दादांवर अनेक गंभिर आणि धादांत खोटे आरोप करण्यात आले होते. हे खोटे आरोप करणार्‍यांत भाजपा, फडणवीस, मोदी हे अग्रभागी होते. हा सर्व आटापिटा त्यांनी भाजपा सरकारांत सामिल व्हावे याकरताच होता का असा संशय येतो. ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केला असे सातत्याने विविध स्तरावर म्हणत रहायचे आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची ओढ बाळगायची या सारखा मोठा ढोंगीपणा नसेल.

अजित दादांवर घोर अन्याय झाला आहे. त्यांच्यावर सातत्याने जाहिरपणे खोटे आरोप करणारे त्या कृत्याबाबत माफी मागतील का? भ्रष्टाचाराच्या आरोपां बद्दल अजितदादांच्याच शब्दात,
https://www.facebook.com/watch/?v=1771475386864812

त्यांचे अकस्मित जाणे चटका लावून जाते.

>>अगदी असाच न्याय शेंडे ( सम विचारी ) मुस्लीमांना / किंवा इतर वेळी का नाही लावत ?

काहीतरी मोघम बोलू नका. राम मंदीर पैसा अपहार प्रकरण आणि इस्लामी अ तिरेक आणि दहशतवाद हे दोन वेगळे आहेत.
हिंदू धर्मात असे काही नाही ज्यामुळे राम मंदीर भ्रष्टाचार घडला.
इस्लाममधे हिंसक, असहिष्णू, कालबाह्य, रानटी विचार आहेत ज्यामुळे मुस्लिम व्यक्ती दहशतवाद करायला उद्युक्त होतो.
एका जनमतचाचणीत मुस्लिम लोकांना काही प्रश्न विचारले होते त्यावरून हे स्पष्ट होते की टोकाचे अ तिरेकी विचार हे कमी अधिक प्रमाणात समस्त मुस्लिम समाजात आहेत आणि त्याचे कारण त्या धर्माचे तत्त्वज्ञान आहे.
उदा. इस्लाम सोडल्यास मृत्युदंड द्यावा असा विचार किती मुस्लिम करतात?
अफगाणिस्तानः ७९%
पाकिस्तानः ७६%
इजिप्तः ८६%
जॉर्डनः ८२%
पॅलेस्टाईनः ६६%
नायजेरिया: ५१%
मलेशिया: ६२%
इत्यादि इत्यादि
हे खरोखर केलेल्या जनमत चाचणीचे निकाल आहेत. (प्यू रिसर्च)
अशाच प्रकारे महंमदाचा अपमान, इस्लामचा अपमान केल्यास मृत्यूदंड द्यावा असे मानणारे मुस्लिम प्रचंड संख्येने आहेत.
. ह्याला शांतताप्रेमी विचार म्हणता येईल काय?
अशा प्रकारे हिंदूंची जनमत चाचणी घेऊन रामजन्मभूमीत झालेला पैशाचा अपहार समर्थनीय आहे असे किती हिंदू समजत असतील?
माझ्यामते जवळपास शून्य.
अर्थात अशी चाचणी झाली असेल तर त्याची आकडेवारी जरूर द्या.

दुटप्पी पणा आहे. एका विषयांत शितावरुन ( चार हिंसक घटना) भाताला ( धर्म ) दोष देणे योग्य ठरते तर मग दुसर्‍या घटनेत का नाही?

चार हिंसेच्या घटनांमूळे समस्त मुस्लीम धर्माला दोष देण्याचे जनरलायझेशन करणे चालते तर एका भ्रष्टाचाराच्या घटनेत सर्वच्या सर्व आरोपीच एका जातीचे आहेत , एकाच विचारसरणीचे आहेत, एकाच परिवार शाखेतून आलेले आहेत मग दोष त्या जातीला का नको द्यायला?

मी दोष कुठल्याही जातीला / धर्माला देणार नाही पण तुमच्या विचारसरणीचे गंडलेले लॉजिक दाखवण्याचा प्रयत्न.

कुठल्याही धर्मात हिंसेला स्थान नाही. हिंसा करणारी लोक धार्मिक नाहीतच. समझौता एक्प्रेस, मालेगांव, अजमेर दर्गा येथे बाँब स्फोट घडविणारे वेगळेच आणि अनेक वर्ष त्या हिंसाचाराचे बिल मुस्लीम धर्माच्या नावाने फाडल्या जाते.

<< उदा. इस्लाम सोडल्यास मृत्युदंड द्यावा असा विचार किती मुस्लिम करतात? >>
----- ते केवळ विचार करतात. भारतात धडक कृती असते.
भारतात निरपराधी मुस्लीमाला मारायचे असेल तर त्याच्याजवळ गोमांस आहे असे फक्त ओरडायचे. बघा काय होते.

लिंचींगच्या शेकडो घटना घडलेल्या आहेत आणि बहुतेक वेळा निरपराधी मुस्ली माचा बळी गेलेला आहे. ट्रेन मधे पण अगदी नाव विचारुन , निवडून मारलेले जाते.

या मुस्लीम द्वेषा मुळे कधी भवरलाल जैन पण बळी पडतात. त्याला पण को लॅटरल डॅमेज समजणारे आहेत.

कुणीतरी "भारतीय संविधानाच्या ठिकाणी मनुवादावर आधारित संविधान आणण्याचे फायदे होऊ शकतात का?" (संविधान काढून मनुवाद आणावा का? असा सरळ प्रश्न विचारू नये Wink ) प्रश्न घेऊन असा विचार किती ब्राम्हण करतात हा सर्वे समस्त ब्राम्हण समाजात करायला हवा. अशा सर्वेचे आकडे जेंव्हा येतील तेंव्हा ते पाहणे कदाचित आपल्याल रंजक असेल, आणि मुस्लिमांना स्वतःच्या विचारसरणीवर चिंतन करण्यासाठी त्याचे निकाल उत्साहवर्धक असतील. Rofl

हे खरोखर केलेल्या जनमत चाचणीचे निकाल आहेत. (प्यू रिसर्च)

यावर विश्वास ठेवायचा डोळे झाकून का तर आपल्या द्वेषाच्या नॅरेटिव्हला पूरक आहे आणि बाकी हंगर इंडेक्स,हॅप्पीनेस इंडेक्स ,Environmental Performance Index,Gender Disparity & Empowerment इंडेक्स,Passport Index.Air Quality Life Index ,प्रेस फ्रीडम इंडेक्स याचे आकडे आले कि मात्र जागतिक षडयंत्र /भारताला बदनाम वगैरे वगैरे

लगे हात हे पण बघून घ्या

Pew Research Center demographic projections, Islam will not become the dominant religion in India. Hindus are projected to remain a large majority at approximately 77% to 79% of the population through 2050, while Muslims are expected to comprise roughly 18%.

हिंदू काही खतरेमे येत नसतो आणि मुस्लिम लोकसंख्येचा बागुलबुवा दाखवून हिंदूंना घाबरण्याचे धंदे भाजपे आणि संघ्यानी बंद करावे

Pages