Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
आज संजय दिना पाटील यांनी
आज संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करून धमकी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही स्पष्टीकरण दिले किंवा सारवासारव केली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
कित्येक लेखक, विद्वान,
कित्येक लेखक, विद्वान, संशोधकांकडे डिग्रीचे कागुद नाहीत पण त्यांचे कार्य आणि लेखन आणि शोध डिग्रीवाल्यांना अभ्यासासाठी आहे. गाळीव रत्ने सोडून द्या.
पत्रकार परिषदेत आया
पत्रकार परिषदेत आया बहिणींवरून गलिच्छ शिव्या द्यायला संजय नाव असणे पुरेसे नाही. राऊत असे आडनावही आवश्यक आहे बहुधा!
'गद्दारांच्या' मतदारसंघात
'गद्दारांच्या' मतदारसंघात जाऊन उद्धवसाहेबांनी जनतेसमोर बाजू तर चांगली मांडली आहे. फक्त मतदारांना हे पटून मतदारांनी कृती करायला हवी.(केव्हा करणार?)
करून काय फायदा...
करून काय फायदा...
महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला कौल दिलेला होताच की.
पण मग काहीना काही करून खासदार फोडायचे आणि आपल्याकडे वळवायचे.
तुम्ही कुणालाही मत द्या, ते शेवटी आमच्याकडेच येईल याची पूर्ण तजवीज केली आहे.
हे मायबोलीवरील एक (एक्स)
हे मायबोलीवरील एक (एक्स) आदरणीय व्यक्तिमत्व! मोदी सत्तेत यावे ह्यासाठी एक वर्षभर त्यांनी चहाचा त्याग केला होता. आता 'हेची फल काय मम तपाला ' अशी अवस्था झालीये. भाजप सत्तेत आला की ब्राह्मण लोकाना अच्छे दिन येतील असे त्यांना वाटले असावे किंवा तसे यावेत म्हणून भाजप सत्तेत यावा असे असावे . असो. सबका नंबर आयेगा !!
युतीत सेनेने दोन वेळा
युतीत सेनेने दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळवले होते हे ते विसरले आणि तिसऱ्या वेळी आदित्यला मुख्यमंत्री न केल्याने मतदारांच्या कौलाला टांग मारून पवारांकडे गेले मग सांगा गद्दार कोण?
>>> युतीत सेनेने दोन वेळा
>>> युतीत सेनेने दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळवले होते हे ते विसरले आणि तिसऱ्या वेळी आदित्यला मुख्यमंत्री न केल्याने मतदारांच्या कौलाला टांग मारून पवारांकडे गेले मग सांगा गद्दार कोण?
Submitted by Srd on 29 June, 2026 - 13:16
त्यांचा राजकीय प्रवास संपलेला आहे. जी प्रचंड संपत्ती आहे तिचा विनियोग करून मोठ्या सभा भरवणे, अर्वाच्य बोलणे व उरलेल्या आमदारांची मनधरणी करणे ही दोन, तीन कामे हातात उरलेली आहेत. सत्य कटू असते.
'गद्दारांच्या' मतदारसंघात
'गद्दारांच्या' मतदारसंघात जाऊन उद्धवसाहेबांनी जनतेसमोर बाजू तर चांगली मांडली आहे >>> त्यांना लोकांनी जर हेच तुम्हाला २०१९ मधे का वाटले नाही विचारले तर काय सांगणार? तेव्हा यांनी केवळ मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून लोकांच्या कौलाचा मान राखला नाही ते कसे समजावणार.
ती "जनतेसमोर मांडलेली बाजू" वाचून चायना गेटमधला एक डॉयलॉग बदलून "या तो तुम नाइव्ह हो या हमे समझ रहे हो" म्हणावेसे वाटले. सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला त्यातला एक इतका वाईट आहे हे इतकी वर्षे माहीतच नव्हते. मात्र त्याने पक्ष सोडल्यावर लगेच २-३ दिवसांत तो साक्षात्कार झाला.
उठांच्या मुख्यमंत्री म्हणून कारकीर्दीबद्दल ड्यू क्रेडिट आधीच दिलेले आहे. तेव्हा उठा विरोधक म्हणून हे लिहीले आहे असे वाटत असेल तर ती पोस्ट आधी वाचा.
युतीत सेनेने दोन वेळा
युतीत सेनेने दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळवले होते हे ते विसरले आणि तिसऱ्या वेळी आदित्यला मुख्यमंत्री न केल्याने मतदारांच्या कौलाला टांग मारून पवारांकडे गेले मग सांगा गद्दार कोण?>>>
मग आदित्य ठाकरे झाला होता की मुख्यमंत्री
हा महाराष्ट्रातील राजकारण
हा महाराष्ट्रातील राजकारण ह्या विषयावरचा धागा आहे हे माहीत आहे, पण हे लिहावेसे वाटले.
राहुल गांधी व उद्धव ठाकरे (दोघेही 'साधारण' आपापल्या पक्षाचे प्रमुख) ह्यांच्यात दोन फरक आहेत.
■ राहुल गांधींकडे सातत्याने नवीन मुद्दे असतात. जुने मुद्देही ते घेतातच सभेत, पण नवनवीन मुद्देही काढतात. त्या मुद्यांमध्ये सकृतदर्शनी जनतेचे भले व्हायला हवे ही भूमिका असते. उध्दव ठाकरे ह्यांच्याकडे नवीन मुद्दे नाहीत. खोके, गद्दार, खंजीर, माझा महाराष्ट्र, माझा मराठी माणूस, काही कोट्या आणि जहाल भाषेतील टीका एवढेच आहे. ह्या गोष्टी आता जनता मनावर घेत नाही. त्यात संजय राऊत हे आणखीनच खालच्या स्तराची भाषा वापरतात अधूनमधून! ह्या सगळ्यात एक किमान रंजनमूल्य होते तेही संपलेले आहे. राहुल गांधींकडे ते अजून शाबूत आहे. मोदीही अधूनमधून 'रात्री विमान पाठवा, ढगांमुळे दिसणार नाही' वगैरे विधाने करून लोकांचे चार दिवस बरे घालवतात.
■ जनता आपल्या सार्वजनिक वक्तव्यांना कंटाळली आहे हे ठाकरे ध्यानात घेत नाहीत आणि जनता आपल्याला ध्यानात घेत नाही ह्याचा राहुल गांधींना कंटाळा येत नाही.
वेळ गेली निघून.
वेळ गेली निघून.
नरेटिव =बतावणी हा शब्द बरोबर वाटतो आहे.
प्रत्येक पक्ष निवडणूक प्रचारात काही बतावणी करतात. त्यांचे नेहमीचे पाठराखे त्यांनाच मतदान करतात. तीच तीच बतावणी किती वर्षं करताहेत हे विसरून मतदार मत टाकतात. पण काय झालं की त्यांची संख्याच घटत गेली आणि उजेड पडेनासा झाला. किंवा एकाच गुहेत दोन सिंह राहू शकत नाहीत. हे तत्त्व सर्वच राज्यकर्त्यांना इतिहासात लागू झालेले पाहतो. शकले होतात.
आणि मग वारा येईल तसे नेते फिरत आहेत. काय करणार.
आलू से सोना बनाने की मिशीन.
आलू से सोना बनाने की मिशीन.
आलू से सोना बनाने की मिशीन.>>
आलू से सोना बनाने की मिशीन.>>>> ह्या मशीन चे संशोधक आहेत तुमचे प्रिय विश्वगुरु
दोघांनी मिळून स्टार्टप काढावे
दोघांनी मिळून स्टार्टप काढावे. एक मदत योजना सरकारने काढली आहेच.
सध्या ठाकरे जिथे जातील तिथले
सध्या ठाकरे जिथे जातील तिथले लोक त्याचदिवशी त्यांचा पक्ष सोडत आहेत असे वाचले. यवतमाळ, अहिल्यानगर. काय माणूस आहे राव! हीच आता बी टीम वाटते.
सचिन अहिर ही सोडून गेला. हा
सचिन अहिर ही सोडून गेला. हा धक्का जोरात बसला असावा कारण संज्याच्या जिभेवर जी कुणी शिवीदायिनी देवी बसलेली असते तीही गप्प होती. ह्या नराधमाच्या पत्रकार परिषदेत एकही आया बहिणीवरून शिवी दिली नाही ह्याचा अनेक पत्रकारांना धक्का बसला असेल!
बारक्याची साहिल जोशीने मुलाखत घेतली तेव्हा बारक्या म्हणाला की आम्ही यांच्यासाठी सगळे काही केले. आता काय यांच्या बरोबर आंघोळीला जायचे का? एवढं मी कुणाला आत घेणार नाहीये!
नक्की ह्या उपरोधिक प्रश्नाचा अर्थ कळला नाही. बारक्याची काही तरी विचित्र फँटसी असावी!
चुकूनही असे विधान नाही की आमचे काहीतरी चुकले असेल. आत्मपरीक्षण केले पाहिजे.
छान!
आपलं कुठेतरी मूलभूत चुकतंय हे
आपलं कुठेतरी मूलभूत चुकतंय हे जोवर मान्य होत नाही तोवर चूक सुधारणे शक्य नाही.
श्री फडणवीसांना सर्व तर्हेच्या शिव्या देऊन झाल्या पण शेवटी तेच शहाणे ठरले
आणि श्री उद्धव ठाकरे आणि श्री शरद पवार हे घट्ट मुठीतून वाळू गळून गेल्यासारखा पक्ष हातातून जाताना पाहत राहिले.
आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे अशी स्थिती झाली आहे!
महाभारताच्या धृतराष्ट्रासारखी सर्वनाश झालेला हताशपणे पाहत राहण्याची अवस्था या दोघांची झाली आहे.
आता मोचा (मोदी चाटू) लोकांनी
आता मोचा (मोदी चाटू) लोकांनी सान्गाय्ला हरकत नाही की ठाकरेंचे काय चुकले. ठाकरे सोडून बाकी सर्वांनाच ते ठाऊक आहे असे दिसते. ठाकरेंनी हिंदुत्व सोडले अशी भंगार कारणे देऊ नयेत. त्या हिशोबने चंपत चाचा ची देखील सुंता करायला हवी.
मोरु, मोचा इत्यादी लेबलात न
मोरु, मोचा इत्यादी लेबलात न बसता माझे दोन पैसे -
- उद्धव मार्केटिंग मध्ये कमी पडले खासकरून कोव्हिड मॅनेजमेंट मधे परत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अजूनच gaslight झाले अन् त्यावर काही करू शकले नाहीत
- outreach कमी पडली, आमच्या घराजवळच्या शाखेतली पोरे सुद्धा सांगतात, बाळासाहेब होते तेव्हा वाटेल तेव्हा मातोश्रीवर जायला मिळायचे, आता साहेब भेटतच नाहीत.
- ट्रॅडिशनल पॉलिटिक्स (फार राइट हिंदुत्व) सोडून एकदम सेक्युलरिस्ट राजकारणात येण्यासाठी राजकारणावर पकड तितकी घट्ट हवी, Aura हवा तो उद्धव साहेबांत नाही, म्हणजे बाळासाहेबांच्या इतका नाही.
- शरद पवारांच्या ओंजळीने पाणी पिणे थोडे कमी केले असते तर चालण्यासारखे होते.
- मुसलमान मतदारसंघांत ऑलरेडी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी, मजलिस अन् अगदी मालेगावात नवीच तयार झालेली इस्लाम पार्टी असताना तुष्टीकरणात काहीही व्हरायटी न आणता जाणे ते पण ट्रस्ट फॅक्टर क्रिएट न करता भोवले असावे.
तूर्तास इतके जाणवते, व्यैक्तिक पृथक्करण आहे. पटेल त्याने घ्या नाहीतर सोडून द्या.
बाळासाहेबांनी ज्यांना हाणलं
बाळासाहेबांनी ज्यांना हाणलं त्यांचंच तुष्टीकरण अचानक सुरू केलं हे शिवसैनिकानांच पटलं नाही तर मतदारांची बातच सोडा.
हा पण एक मुद्दा आहे,
हा पण एक मुद्दा आहे,
शिवबंधन बांधलेल्या शिवसैनिकांत, शाखा प्रमुखांत खुप मुस्लिम आधीही दिसत सहसा कोकणी मुसलमान जनता असे किंवा आपले दखनी मुल्ला, मुलाणी, सय्यद, तांबोळी इत्यादी.
प्रॉब्लेम हा आहे की larger मुस्लिम diaspora मध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना त्या शिवबंधन धारी स्थानिक मुसलमानांचा सपोर्ट बेस समाजात किती आहे हे असेसमेंट चुकले.
मुस्लिआंचे तुश्टीकरण केले हेच
मुस्लिआंचे तुश्टीकरण केले हेच मुळात फेक नरेटीव्ह आहे .
कोणी केले म्हणणे फेक न्यूज
कोणी केले म्हणणे फेक न्यूज आहे ?
>>> आता साहेब भेटतच नाहीत.
>>> आता साहेब भेटतच नाहीत.
एकनाथ शिंदे ह्यांना अडीच तास बसवून ठेवले होते व तेही आदित्य ठाकरे ह्यांच्या सांगण्यावरून. शेवटी भेट घेऊ दिलीच नाही व शिंदे निघून गेले.
हे खरे आहे कशावरून? कोण
हे खरे आहे कशावरून? कोण बघायले गेले होते?
संज्याच्या जिभेवर जी कुणी
संज्याच्या जिभेवर जी कुणी शिवीदायिनी देवी बसलेली असते तीही गप्प होती.>>>
ह्या नराधमाच्या पत्रकार परिषदेत एकही आया बहिणीवरून शिवी दिली नाही ह्याचा अनेक पत्रकारांना धक्का बसला असेल!>>>
नराधम संज्या
बारक्याची काही तरी विचित्र फँटसी असावी!>>>
हा निकष लावला तर राजकारणाचे
>>> हे खरे आहे कशावरून? कोण बघायले गेले होते?
Submitted by आग्या१९९० on 3 July, 2026 - 12:51
हा निकष लावला तर राजकारणाचे धागे ओस पडतील. ते छापून आले होते एका रविवारच्या पुढारीमध्ये. असे घडलेच नाही हे बघायला तिथे कोण होते?
सर्व राजकीय घटना स्वतः समक्ष पाहिल्यानंतरच येथे लिहाव्यात असा एक नियम वाढवायला सांगायला हवे प्रशासकांना! फाळणीच्या वेळी असणारे कोणी येथे असेल तर त्यांनीच फाळणीबद्दल लिहायचे, वगैरे!
मग भाजपाने महाराष्ट्रात
मग भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासनही खरे मानायचे का? की उद्धव ठाकरेंना वेगळी फुटपट्टी लावायची?
शिंदे कोथरुडात येउन कानात
शिंदे कोथरुडात येउन कानात सान्गुन गेले का?
साहेब भेटत नाहीत तर एबी फोर्म वर सह्या कोण कराय्चे ? शेंडे? की बेफी ?? पक्या सुर्वे रविवारी मटण खायला मातोश्रीवर जाणार होता, त्याला काय पोर्चमधे बस्वुन जेवायला घालणार होते का? मातोश्रीवर जायला आणि काम असेल तर उद्धव साहेबांना भेटायला कधीच अडथळा येत नाही. शेंडे, तुम्ही येता का? तुम्हाला राउत साहेबांना भेटायचे होतेच ना? मातोश्रीवर भेट घालुन देतो.
Pages