Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ॐ अंजनिगर्भ संभूताय रामदूताय
ॐ अंजनिगर्भ संभूताय रामदूताय नमो नमः
संभूत - च्या पासून जन्मास आलेला.
अनिंद्यदा,
अनिंद्यदा,
"भूतभावन” हे शिवाचे नाव आहे हे माहीत नव्हते.
मात्र भूतभावन वाचल्यावर मनभावन आठवले.
सुरवातीला मनभावन असलेला नंतर भूतभावन होत असावा.
>>>>सुरवातीला मनभावन असलेला
>>>>सुरवातीला मनभावन असलेला नंतर भूतभावन होत असावा. Happy
मलाही मनभावनच आठवलेले.
मनभावन के घर जाए गोरी
घूँघट में शरमाए गोरी बंधी रहे ये प्यार की डोरी
हमें ना भुलाना हमें ना भुलाना
सुरवातीला मनभावन असलेला नंतर
.. मनभावन असलेला नंतर भूतभावन होत असावा,,
😀
भूतनाथ = साहब, बीबी और गुलाम ✔
डिजिटल मराठी बृहद्कोशाचा
डिजिटल मराठी बृहद्कोशाचा आता विस्तार झालेला असून त्यात आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्द एकत्रित केलेत.
यात आता क्रियापदांचा समावेश
यात आता क्रियापदांचा समावेश केलेला दिसतोय.
उदाः 'वाढणे' असा शब्द शोधला असता आधी 'हा शब्द सापडला नाही' असे दिसत असे. आता अर्थ दिसतोय.
पण सगळी क्रियापदे अद्याप समाविष्ट केलेली नाहीत, काही नेहमीच्या वापरातील क्रियापदे दिसली नाहीत.
* काही नेहमीच्या वापरातील
* काही नेहमीच्या वापरातील क्रियापदे दिसली नाहीत. >>> +१
काही अगदी सोप्या शब्दांच्या बाबतीतही हा अनुभव आलाय.
दायाद
दायाद
= (सं) वारस, आप्त; अनुशेष
. .
हा विशेष शब्द चंद्रकांत कुलकर्णींच्या मुलाखतीतून समजला. वाडा चिरेबंदी या नाटकाच्या त्रिनाट्यधारेवर आधारित 'दायाद' हे पुस्तक प्रशांत दळवींनी संपादित केलेले आहे : https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4656925817855735290
'ही नाट्यधारा एलकुंचवारांनी महाराष्ट्राला दायाद दिली', असा त्याचा आशय आहे.
दायाद म्हणजे वारशातीह
दायाद म्हणजे वारशातील हिस्सेदार, वारसा नव्हे. 'दायाद दिली' हा वाक्प्रयोग चुकीचा ठरतो मग. 'दाय दिली' असं हवं किंवा 'महाराष्ट्र या वारशाचा दायाद ठरला/झाला' असं काहीतरी हवं.
दायाद / दाय दिली…
दायाद / दाय दिली…
नवीन शब्द.
या “दाय”चा धर्म”दाय” शी काही संबंध असेल काय ?
दायाद / दाय दिली…
दायाद / दाय दिली…
नवीन शब्द. >>
मीही याआधी कधीच ऐकला नव्हता.
मूळ शब्द दाय.
मूळ शब्द दाय.
>>> दायजी, दायाद, इ. अनेक . . .
(दाते)
गैरवाका
गैरवाका
आधी कधी न वाचलेला हा शब्द वाचला, अर्थासाठी कोश बघावा लागला.
गैरवाका = खोटी, चुकीची बातमी
इथे मला “वाका” हा उर्दू-हिंदी “वाक़या” चा अपभ्रंश वाटतो आहे. तिकडे वाक़या चा अर्थ = वृत्तांत; हालहवाल, समाचार; ख़बर.
हे “ग़ैर-वाक़या” असावे का ?
पहिल्यांदाच ऐकला हा शब्द.
पहिल्यांदाच ऐकला हा शब्द.
मला 'वाका' वाणी - वाक् चेही
मला 'वाका' वाणी - वाक् चेही वाटले. हा शब्द कधीही ऐकलेला नाही. येथे सापडला.
https://m.transliteral.org/dictionary/%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%...
वाका' वाणी - वाक् चे ?
वाका' वाणी - वाक् चे ?
असेलही.
इतक्यात संपादक लोक साध्या लेखनात असा एखादा अपरिचित शब्द बेमालूम पेरतात असे निरीक्षण आहे. वरचा “चूष” होता तसाच हा.
तेव्हढाच डोक्याला खुराक व्युत्पत्ती / अर्थ शोधायचा.
जिकनी
जिकनी
दोन भिन्न अर्थ असलेला रोचक शब्द !
१. तोल संभाळण्यासाठी खालून दिलेला आधार; धीरा. [झुकणे?]
(दाते शब्दकोश)
२. गाण्यासारखे वृत्तात बांधलेले कोडे
( कातकरी भाषा)
या दुसऱ्या अर्थाशी संबंधित हा एक चांगला लेख : https://www.loksatta.com/lokrang/loksatta-lokrang-sonala-vadavli-youth-p...
मंथर म्हणजे काय?
मंथर म्हणजे काय?
सखी मंद झाल्या तारका..मधे ऐकला हा शब्द!
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी...
मंथर =
मंथर =
वि. प्रचुर; युक्त.
दाते शब्दकोश
इथे ते देखणीचे विशेषण असावे
इथे ते देखणीचे विशेषण असावे असे वाटते.
खूप देखणी (नितांत सुंदर सारखे.)
मधुरात्रीचे विशेषण असेल तर सावकाश, मंदगतीने जाणारी.
आठवणीतली गाणी वेबसाईटवर मंथर
आठवणीतली गाणी वेबसाईटवर मंथर = मंद, हळू चालणारा असा शब्दार्थ दिला आहे.
म्हणजे रामायणातली मंथरा =
म्हणजे रामायणातली मंथरा = मंदा
मॅक्डोनेल मधुन:
मॅक्डोनेल मधुन:
मन्थर manth-ara a. slow, tardy, indolent; dull, stupid, foolish; bent, curved, crooked, humpbacked; –˚, slow to or in: -m or ˚–, ad. ...
यातील crooked, humpbacked या अर्थावरून ती मन्थरा की मंन्थरा अशी होती म्हणुन मन्थर शब्दाला हे अर्थ मिळाले कुणास ठाऊक.
रामायणा आधी कुणी मन्थर /मन्थरा होते का?
मला मंद, हळू चालणारी हा अर्थ
मला मंद, हळू चालणारी हा अर्थ योग्य वाटतोय.
मात्र, दाते शब्दकोशाप्रमाणे, प्रचुर, युक्त... हे योग्य नाही वाटत.
हे शब्दकोश आणि त्यातील अर्थ.. कोण व्हॅलिडेट करते का?
कारण, शब्दांना प्रांताप्रमाणे, मानसिकतेनुसार, संदर्भानुसार..वेगवेगळे अर्थ असू शकतात. त्यामुळे ठामपणे कोणताही एक अर्थ बरोबर आहे, असे म्हणणे अवघड ठरते.
कधीकधी त्यात परस्परविरोधी अर्थही ध्वनीत होऊ शकतात!
* शब्दांना प्रांताप्रमाणे,
* शब्दांना प्रांताप्रमाणे, मानसिकतेनुसार, संदर्भानुसार..वेगवेगळे अर्थ असू शकतात. >>> +१
दात्यांनी हे उदाहरण दिले आहे :
'प्रौढ अलंकार मंथर भाषा- शैलीचा केलेला उपयोग उचितच वाटेल.' -नकुमं ५.
कुसुमाग्रजांच्या 'अहि-नकुल'
कुसुमाग्रजांच्या 'अहि-नकुल' कवितेत
ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग
असं वर्णन आहे.
रामायणातील मंथरेचं नाव तिचं बर्थ सर्टिफिकेटवरचं नाव नसणार - तिला 'मंथरा' म्हणून ओळखत होते या अर्थी ते नाव - जसं श्रीकृष्णाने जिचं कुबड घालवलं तिचं 'कुब्जा' हे 'नाव'.
अच्छा.
अच्छा.
मंथर म्हणजे रवीला गुंडाळुन घुसळण्याचा दोर / (मंथरी - दोरी ) असा अर्थही दिला आहे काही शब्दकोशात. वासुकीला गुंडाळुन समुद्र मंथन केले. मंथर नाग - वळसे घालीत आला अशी उपमा आहे का?
मला त्या कवितेपुरता 'संथपणे'
मला त्या कवितेपुरता 'संथपणे' वळसे घालत आला असाच अर्थ वाटतो.
त्याचं कारण त्यात मुंगूस सामोरा आल्यावर ते वर्णन पाहता पाहता वेग घेतं. कवीच्या शब्दसामर्थ्याची आणि 'स्टोरीटेलिंग'ची कमाल आहे ती!
रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!
कविता जरूर वाचा - चित्रदर्शी वर्णनाचा उत्तम नमुना आहे!
'संथपणे' वळसे घालत आला असाच
'संथपणे' वळसे घालत आला असाच अर्थ वाटतो.>> हो, कविता वाचुन हाच अर्थ योग्य वाटतो.
सुंदर आहे कविता. त्यात आधी वर्णन करुन - 'चालला मृत्युचा मानकरीच महान!'
पुढे - 'घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.'
ही कलाटणी जबरदस्त आहे.
सुरेख चर्चा !
सुरेख चर्चा !
Pages