शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“भोंदू बाबा” हे expression खूपदा वाचतो. भोंदू म्हणजे ढोंगी, खोटारडा किंवा फसविणारा हे माहित होते

परंतु

“भोंदणे” असे कधी वाचनात आधी आले नव्हते, ते इतक्यात वाचले.

मराठी शब्दकोष बघितला तर आहे तसा शब्द:

भोंदणे = वश करणे, फसविणे, भुलविणे

भोंदू- भोंदणारा, फसविणारा

उलटी अंबारी
= भिक्षेची झोळी

(गाठ मारलेल्या भिक्षेच्या झोळीचा आकार उलट्या अंबारीसारखा असतो यावरून)
(दाते)

ऑनलाइन मराठी बृहद्कोशाचा विस्तार होऊन आता त्यात तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह झालेला आहे.

ऋतुराज, Happy
आणि पछाडणे .. कशाबद्दल मग?

असे वाटते की :
एखाद्या गोष्टीचा युद्ध पातळीवर शोध घेणे/ कष्ट करणे , असे असावे.
त्याचा शब्दशः अर्थ (literal sense) माहीत नाही असे जालशब्दकोश म्हणताहेत.

हो, जंग हे लढाई अर्थानेच असावे आणि पछाडणे हे झपाटणे, ग्रासणे या अर्थी.
शाहिस्तेखानाने जंग जंग पछाडले. हे पहिलेच वाक्य आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात शाहिस्तेखानाची फजिती या धड्यात होते. महाराजांचा पराभव करण्यास फौज घेऊन हात धुवून मागे लागला होता या अर्थी. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन अथक प्रयत्न करणे यासाठी पण वाक्प्रचार मग वापरात आला असेल.

Happy हो.

आणि कुणाच्याही मागे लागण्यापूर्वी हात का धुवायचे असतात म्हणे?
आणि एकच हात (डावा ?) धुवायचा की दोन्ही? ..

Happy म्हणजे, सगळी कामं पूर्ण करून, मागे काहीही पाश न ठेवता, एखाद्याचा पाठपुरावा करायचा...असे असावे का?

हात धुवून पाठीस लागणे
मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
= जेवणाचा जो काय खंड पडेल तेवढाच, बाकी जेवण झाल्याबरोबर त्या कामाला लागणे.

https://www.transliteral.org/dictionary/%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%...

जेवणाचा जो काय खंड पडेल तेवढाच, बाकी जेवण झाल्याबरोबर त्या कामाला लागणे.. किंवा,
कसेबसे घाईत जेवण उरकायचे, पटकन हात धुवायचे आणि मग कामाच्या पाठीस किंवा मागे लागायचे....
.
.
हे अर्थ काही सुसंगत वाटत नाहीत!

मानवजी+११ जंग/ जाँग (मूळ फारसी) लढाई अर्थी च आहे इथे. युद्ध पातळीवर प्रयत्न. आज फारसी चे गुरुजी आठवले ह्या शब्दावरून, अमेरिका युद्धखोर आहे त्यासंदर्भात हे शब्द ऐकलेत.. WhatsApp बंद आहे बहुदा इराण मध्ये सध्या, मेसेजना उत्तर नाही आले, सुखरूप असू दे बिचारा. जाँग / जाँगी / जाँग्जू असे शब्द क्लासमध्ये ऐकले आहेत. जंगी तयारी पण त्यावरूनच आला असावा.

कुणाच्याही मागे लागण्यापूर्वी हात का धुवायचे असतात म्हणे?
आणि एकच हात (डावा ?) धुवायचा की दोन्ही? >> योग्य प्रश्न. विशेषतः डावा असेल तर हात धुवून मागे लागण्यापेक्षा मागे लागून हात धुवायला पाहिजेत.

चांगल्या चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद !
इथली पृष्ठसंख्या बरीच झाल्याने आता नव्या घरात प्रवेश : भाग 6 : https://www.maayboli.com/node/88632

इथून पुढची चर्चा तिकडे करावी ही विनंती.

Pages