Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओहो!!! वाचतेच.
ओहो!!! वाचतेच.
>>>>कटितटपीत-दुकूलविचित्र-मयूखतिरस्कृत-चन्द्ररुचे
बरोबर. पण ओळीचा अर्थ लागला नाही असो.
थोडक्यात जिने कमरेवर पिवळे
थोडक्यात जिने कमरेवर पिवळे वस्त्र धारण केले आहे आणि ज्या वस्त्राच्या किरणांमुळे चंद्राचे तेज देखील फिके पडले आहे.
ओहो!! धन्यवाद. वाटलेले मला
ओहो!!
धन्यवाद. वाटलेले मला तसे.दुकुल म्हणजे वस्त्र, पीत म्हणजे पिवळे. तिरस्कॄत म्हणजे चंद्राला असूया होणारे अधिक सुंदर आभा असलेले वगैरे 
Desalination plant साठी
Desalination plant साठी “विलवणीकरण संयंत्र” असे वाचले.
फार कृत्रिम आणि थोडेसे विनोदी वाटले.
नीरक्षारविवेकीयंत्र
नीरक्षारविवेकीयंत्र
विलवणीकरण संयंत्र >> खतरनाक!
विलवणीकरण संयंत्र >> खतरनाक! आता हे वि-लवणीकरण नाव बदलून सोपे द्यावे म्हणून विनवणीकरण करणे आले.
क्षारविवेक विनवणीकरण
क्षारविवेक 😀
विनवणीकरण 😀
Deployment ला मराठीत काय
Deployment ला मराठीत काय म्हणतात

फोल्डर ला नाव द्यायचंय
खूप झालेत ह्या नावाने
नेमणूक, नियुक्ती, तैनाती अशी
नेमणूक, नियुक्ती, तैनाती अशी नावे देत सुटा 😀
हा का ना का
वजाई
वजाई
आधी कधी न वाचलेला शब्द. सरकारी आदेशपत्रात (work order) असा वापरला होता :
कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची बडतर्फी किंवा वजाई करण्याचा पूर्ण हक्क तुमच्याकडे राहील.
अर्थ = वजा करणे, कामावरून काढून टाकणे.
बडतर्फी आणि वजाई दोन्ही एकाच अर्थाचे शब्द वापरण्याचे प्रयोजन मात्र समजले नाही. Am I missing something ?
डॉ कुमार दिसले नाहीत बरेच
डॉ कुमार दिसले नाहीत बरेच दिवसांत. All well?
अनिंद्य , मला वाटते, वजाई हा
अनिंद्य , मला वाटते, वजाई हा शब्द इथे उणे अशा अर्थी वापरला असावा. म्हणजे मनुष्यबळ एकतर पूर्णपणे काढून टाकले जाईल ( बडतर्फ) अथवा कमी केले जाईल ( वजाई)...अशा अर्थी.
>>> बडतर्फी आणि वजाई दोन्ही
>>> बडतर्फी आणि वजाई दोन्ही एकाच अर्थाचे शब्द
वजाई तात्पुरती (furlough) असू शकेल का?
Pages