हैदराबाद गटग - डॉ. कुमार सोबत- ०१ जून २०२५

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 May, 2025 - 08:58

तर हैदराबादकरहो,

पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.

तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9

भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.

तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.

https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8

कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.

गटगला यायचंच हं!

आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:

वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५

शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…

निवासी गटगचा पहिला फोटोनिवासी गटग चा पहिला फोटो

सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.

मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगतानाएक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…

एका घुमटाखाली माबोकरबरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!

माबोकर गोलकोंडा पाहतानामाबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना

सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.

सात जणांचा फोटोजेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)

दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!

फानुस हॉटेलात काही माबोकर्सफानुस हॉटेलात काही माबोकर्स

प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.

पदार्थांचे फोटोहलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश

रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
रिकाम्या टेबलाचा फोटो

आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.

सूप दोनसूप आलं

त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.

कुमार१ चे अभिवाचनकुमार१ यांचे अभिवाचन

यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.

वेज बुलेट्सवेज बुलेट्स १

चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिशचिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश

नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.

दम की बिर्याणीदम की बिर्याणी

शाही तुकडा आणि खुबानी का मीठाशाही तुकडा आणि खुबानी का मीठा

मिपाकरांचा लॉबीमध्ये फोटोलॉबीमध्ये एक फोटो काढला

पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसला इंटरेस्टिंग पदार्थ दिसतोय >>> टोटली. मला माहीत नव्हता. मी मधे तीन आठवडे हैदराबादला होतो पण माधापूर्/गच्चीबौली ई एरियात जेथे खाल्ले तेथे कधी गोड काही मिळाले तर ते डबल का मीठा, खुबनी का मीठा असले दोनतीनच प्रकार होते.

हा पदार्थ आम्हालाही उशिरा समजला, नवरा जॉब करताना एकदा आणि भाऊ अनेकदा हैद्राबादला जाऊन आलेला. माहिती नसल्याने आणायला सांगितलं नव्हतं.

>>त्या पदार्थाच रिळ बघितल होत पण नाव आज समजल.>>
मला हा पदार्थ आणि त्याचे नाव आता पहिल्यांदाच (इथली चर्चा वाचून) समजले आहे... आज संध्याकाळी-रात्री घरी पोचल्यावर अनबॉक्स केल्यावर मानवदांनी दिलेला हा पदार्थ कसा दिसतो आणि चवीला कसा लागतो ह्याचीच प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे 😀

गटग मस्त झालेलं दिसतंय! कल्पना, फोटो आणि वर्णन सगळंच आवडलं.
पुथरेकुलू छान लागतो. नजाकतदार पदार्थ आहे. मला गुळापेक्षा साखरेचा आवडतो. बंगलोरला मिळतोच, पण मध्यंतरी एकीने हैदराबादहून आणला होता तो जास्त भारी होता.

गटग फार भारी झालेलं दिसतंय. निवासी गटग सुचून, त्याला चार टाळकी मिळून ते झटपट यशस्वी करून दाखवलंत! अभिनंदन Happy
सगळ्यांचे वृत्तांत, खादाडी फोटो, त्यावरील चर्चा सगळच वाचून एकदम गटगंज झाल्याचा फील इथे बसून येतोय.
आज काहीनाही तर बकलावा खातो.

गटगंज >>> भारी शब्द.
या गटगंज मधून जो काही ऑक्सिजन मिळाला आहे त्याने ऑक्सिजनची पातळी नॉर्मलच्याही वर जाऊन बसली आहे व अजूनही त्याचा प्रभाव जाणवतो !
आणि
पुढचे गटगंज कधी आणि कुठे याची स्वप्ने पडू लागलीत Happy

वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५

शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…

निवासी गटगचा पहिला फोटोनिवासी गटग चा पहिला फोटो

सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.

मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगतानाएक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…

माबोकर गोलकोंडा पाहतानामाबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना

एका घुमटाखाली माबोकरबरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!

सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.

सात जणांचा फोटोजेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)

दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!

फानुस हॉटेलात काही माबोकर्सफानुस हॉटेलात काही माबोकर्स

प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.

पदार्थांचे फोटोहलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश

रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
रिकाम्या टेबलाचा फोटो

आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.

सूप दोनसूप आलं

त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.

कुमार१ चे अभिवाचनकुमार१ यांचे अभिवाचन

यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.

वेज बुलेट्सवेज बुलेट्स १

चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिशचिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश

नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.

दम की बिर्याणीदम की बिर्याणी

शाही तुकडा आणि खुबानी का मीठाशाही तुकडा आणि खुबानी का मीठा

मिपाकरांचा लॉबीमध्ये फोटोलॉबीमध्ये एक फोटो काढला

पान डब्ब्यापुढे एक बाइक होती, तिथे मानवांचा एक फोटो काढला. का काढला कुणास ठाऊक? Wink

बाइक व मानव

पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.

ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.

पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.

>>>>>>>>>>>बरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!
Proud
त्या सूपचे नाव काय?
एकंदर फार फार मजा केलेली आहे. कळतय ना ते.

वामन-मानव, सतीश-कुमार, ऋतुराजासह संजय यांच्या नजरेतून गोवळकोंडा पाहून श्रीगणेशाच्या भेटीने नवाबी गटगसह कृत़कृत्य झाले असे वाटले फोटो पाहून आणि सर्व वृत्तान्त वाचून.

मस्त वृत्तांत लिहिलाय वामनराव!
>>"प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला">>
फक्त वरील वाक्यात एक भर टाकू इच्छितो...
आदल्या दिवशी ताज महाल हॉटेलच्या रेस्टोरंटमधली तंदूर रोटी 'आटा मिक्स्ड' असल्याच्या अनुभवावरून दुसऱ्या दिवशी फानुसमध्ये मुद्दाम असली भेसळ नको असे सांगून प्रॉपर (मैद्याचा पांढरा) 'नान' मागवला होता, पण तिथेही निराशाच पदरी पडल्याने तोही टाकावाच लागला होता 😀

बाकी तो ''शिरमल नावाचा (कॉम्प्लिमेंटरी) इराणी ब्रेड" अगदीच बेचव वाटला होता मला बुवा 😂

मस्त लिहीत आहात सगळे.
वामन राव छान पोस्ट व मस्त फोटोज. व्हेज बुलेट्स फार भारी दिसतेय. गोवळकोंडा मी एकटीनेच लिहिल्याने गोलकोंडा योग्य आहे असे लक्षात आले पण तुम्ही वर लिहिले तेही वाचले.

मस्त पोस्टी संजय भावे. रामोजीचे फोटो आहेत का ? सालारजंग म्युझियम लहानपणी पाहिलेले आहे, रामोजी काही वर्षांपूर्वी. त्यामुळे छान वाटले वाचून.

'गटगंज' शब्द आवडल्याचे कळविणाऱ्यांना धन्यवाद. तुमच्यासाठी तो प्रताधिकारमुक्त केला आहे. प्रत्येक गटगत माझी आठवण काढायला हवी या अटीवर, नाहीतर नाही. Happy

वृत्तांत रोमातल्या माबोकराने लिहीलेला नसून एकदम प्रो गटगेश्वरांनी लिहीलेला आहे असे वाटले.
खाली नावाचा अंदाज चुकला.
ऋतुराज मुकेश अंबानी सारखे नाही तर संजीव कुमार यांच्यासारखे दिसतात आणि मानव सर अभिभट्टाचार्य यांच्यासारखे. (नाव चुकण्याची शक्यता आहे).

एकदम प्रो गटगेश्वरांनी लिहीलेला आहे असे वाटले.>>
+ १.
वृत्तांत मस्तच जमला आहे वामन. हेडरमध्ये हाच वृत्तांत घेतो.

साजिरा, योग्य उच्चार पूतरेकुलु आहे असे वामन राव यांच्याकडुन कळले.

सामो फोटोत आहे ते क्रीम ऑफ चिकन सूप. दुसरे व्हेज क्लिअर सूप ऑर्डर केले होते.

माझे एक निरीक्षण सांगायचे राहिले. कुमार१ थोडे ॲर्नॉल्ड श्वार्झेनेगर सारखे दिसतात.

कुमार१ थोडे ऍर्नॉल्ड श्वार्झेनेगर सारखे दिसतात.
>>>> Lol माझ्या मनातील प्रतिमेपेक्षा एकदम विपरीत.

मस्त वृत्तांत आणि फोटो. एकदम भारी झालेले दिसतेय निवासी गटग. खादाडी फोटो पण आकर्षक. हैदराबाद la 2005 मध्ये भेट दिली होती. तेव्हा आवडले होतेच. आता एकदा परत जायला हवे असे वाटले.

सगळे फोटो आणि पोस्ट मस्तच..!

अस्मिता, मला वाटलं मी आधीच्या पोस्ट मध्ये गोलकोंडा असं चुकीचं लिहिलंय की काय.. माझ्या मुलाला पाचवीला EVS विषयात एक धडा होता गोलकोंडा किल्ल्यावर .. त्यामुळे गोलकोंडा नाव डोक्यात फिट्ट होतं तरीही वाटलं आपलं चुकलं नाव लिहिताना..!

सालारजंग म्युझियम मला आवडले. इतिहासाच्या खुणा नीटपणे जपून ठेवल्यात तिथे.. फिरून - फिरून पाय दुखले पण म्युझियम संपता संपत नव्हते.

मी गेले होते हैदराबादला तेव्हा रामोजी सिटीमध्ये डिसेंबर महिन्यात देखील १५ दिवसांचा कार्निवल होता. खूप मस्त वातावरण होतं.. पूर्ण दिवस कमी पडेल रामोजी सिटी फिरायला.. बाहुबली चित्रपटाचा सेटही पाहण्यासारखा होता. गर्दीही खूप होती.. सजवलेल्या चित्ररथांची मिरवणूक निघाली आणि त्यात नाचणाऱ्या कलाकारांसोबत मी देखील मनसोक्त नाचून घेतलं .. नवरा आणि माझी पोरंच होती सोबत म्हणून बरं ..तरी माझ्या पोरांनी माझी टिंगल करायची संधी सोडली नाही..

हुसेन सागर लेकला रात्रीचा लाईटिंग शो आणि स्पीड बोटने फेरी मारली .. तोही एक छान अनुभव होता. तिथे समोरच सचिवालय आहे तेलंगणाचे असं आठवते. रात्री खूप रोषणाई होती त्या इमारतीवर..!

तुमच्या गटगमध्ये मी आपल्या आठवणी जाग्या करून घेत्येयं..

>>>हा काय प्रकार आहे? उच्चारायला किती ते कष्ट

म्हणून आम्ही त्यांना सरळ अर्नॉल्ड शिवाजीनगर असं म्हणतो! Wink

वृ आणि फोटो जहबहरीही! धमाल केलेली दिसतेय खरंच.

भावे पठाणीतून जीन्स टीशर्ट मधे आल्यावर प्रचंड वेगळे दिसतात हे एक नमूद करावंसं वाटलं Happy

>>"मी सध्या इथे रुमाल टाकून ठेवतो.....">>

तूर्तास मी पण... 😀
बरंच काही लिहायचंय, आधीच्या काही प्रतिसादांना उत्तरे द्यायची आहेत. ईच्छा आहे पण आता अंगात त्राण राहिले नाहीये 😂

ऋतुराज मुकेश अंबानी सारखे नाही तर संजीव कुमार यांच्यासारखे दिसतात आणि मानव सर अभिभट्टाचार्य यांच्यासारखे. (नाव चुकण्याची शक्यता आहे) >>> मला तो त्या पायरीवरच्या गॉगल वाल्या फोटोत सुबोध भावेसारखा वाटला. हे आगामी मराठी निर्मात्यांकरता कास्टिंग सजेशन म्हणून वेळीच लिहून ठेवतो. आता बायोपिक निघाले तर अ‍ॅक्टरची निश्चिंती आहे. फक्त बायोपिक निघावे असे काहीतरी करण्याची जबाबदारी ऋतुराजची Happy

वामन राव - सगळा निवासी गटग वॄ व फोटो मस्त आहेत!

@ मावा 'यजमानद्वय',
संकलित वृत्तांत आणि प्रातिनिधिक फोटो- संकलन यासह संपादित केलेला धागा अप्रतिम झालेला आहे.
अभिनंदन !!
. . .
तमाम वाचक आणि प्रतिसादकहो,
आपण सर्वांनी अत्यंत आपुलकीने या चर्चेत भाग घेतलात आणि अप्रत्यक्षरीत्या गटगवासीच झालात याचे कौतुक वाटते.
सर्वांना मनापासून धन्यवाद !!
Happy

छान सचित्र वृ येत आहेत
वामनराव छानच लिहिलेत

Veg बुलेट, खुब्बानी का मिठा आणि सगळ्यात जास्त तो रॉयल शाही तुकडा आवडला.

हलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश... आणि खालच सुद्धा बरेच काही काही.. जबरी मेनू.. हे खायलाच यावे असे वाटू लागले..
फिरण्याची ठिकाणे आणि जेवणाची लोकशन सुद्धा भारी ..
दिग्गज लोकांचा गटग तितकाच ग्रँड आणि राजेशाही निजामशाही झालाय

Pages