Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद.
धन्यवाद.
फेस्टिवल्सना जाणं जमतंच असं नाही, पण आता फॉल रिलीजकडे लक्ष ठेवीन.
शेवग्याच्या शेंगा म्हणून नाटक
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांचे शेवग्याच्या शेंगा म्हणून नाटक येत आहे.
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांचे शेवग्याच्या शेंगा म्हणून नाटक येत आहे.
>>
स्टेज वर नाचणार नाहीत अशी आशा...
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांचे शेवग्याच्या शेंगा म्हणून नाटक येत आहे.
>>>>> शेंगा डान्स करणार नाहीत ना?
कुर्ला टु वेंगुर्ला पाहिला.
कुर्ला टु वेंगुर्ला पाहिला. मस्त मस्त चित्रपट. कोकणी माणसांना आवडेलच पण इतरांनाही तितकाच आवडेल असा.
ड्रोनच्या नजरेतुन दिसणारा कोकण भुरळ पाडतो. एकही प्रसंग असा नाही की पाहताना ‘काय हे??? कोकणात कोण असे करते काय‘ असे वाटत नाही. उलट ‘कोकणात अगदी अस्सेच करतात‘ असे वाटुन हसायला येते. मालवणी अगदी वस्त्रहरण नाटकातल्यासारखी शुद्ध आहे, कोणीही भाषेचे बेअरिण्ग सोडले नाही. कोकणात सगळे मालवणीत बोलत असले तरी कोकणी ब्राम्हण मात्र घरात शुद्ध मराठीत बोलतात आणि बाहेर इतरांशी मालवणीत बोलतात. हे सुद्धा चित्रपटात बर्रोब्बर उचलले आहे.
वीणा जामकर, सुनिल तावडे, वैभव मांगले व स्वानंदी टिकेकर सोडता बाकी कोणी ओळखीचे वाटले नाहीत, हा त्यांचा पहिलाच चित्रपट असायची शक्यता आहे पण पाहताना अजिबात कळत नाही. नंदु तर तुफानी.. त्याची डायलागबाजी जबरी. एस्टी स्टांडावरचा प्रसंग आठवुन आताही हसायला येते. भविष्यात मुलांवर असे प्रसंग ओढवण्याची शक्यता वाढलीय


जो प्रश्न चित्रपटात मांडलाय त्याचे उदात्तीकरण करुन नेहमीसारखे शेवटच्या पाच मिनिटांत भंपक जनरलाइज्ड सोलुशन दिले असे अजिबात केले नाही.
अजुन पाहिला नसेल तर नक्की पाहा.
शेवग्याच्या शेंगा नावाची जुनी
शेवग्याच्या शेंगा नावाची जुनी कथा होती असे आठवतेय.
शेवग्याच्या शेंगा म्हंटले की
शेवग्याच्या शेंगा म्हंटले की हाच एक डान्स आठवतो.
https://www.youtube.com/watch?v=IVRyYX3yRSs&list=RDIVRyYX3yRSs&start_rad...
कुर्ला टू वेंगुर्ला बद्दल रिव्यू चांगले वाचले. बघायचा आहे. वीणा जामकरचे काम आवडते. बर्याच दिवसांनी तिचा पिक्चर आलेला दिसतोय
एकदम बरेच सिनेमे आलेत की...
एकदम बरेच सिनेमे आलेत की... हा पण नक्की बघणार.
नंतर त्यांच्या घराची वाटणी
नंतर त्यांच्या घराची वाटणी होते तेव्हाही यांच्या वाटणीला आलेली काहीतरी वस्तू लाथाडतं कोणीतरी आणि ही परत पदर पसरून धावते आणि झेलते.>>>>झाडू होती गं ती वावे
कुर्ला टू वेंगुर्ला मलाही
कुर्ला टू वेंगुर्ला मलाही बघायचा होता. कालच रात्री चेक केले होते पण नेहमीच्या जवळच्या तिन्ही चित्रपटगृहात नाहीये. एकही स्क्रीन एकही शो देता येत नाही कसे चालणार हे..
कदाचित पहिल्या आठवड्यात तिथे असावा पण तेव्हा माझ्या पर्यंत पोहोचला नव्हता.
असो, अगदीच वाटले तर जरा लांबवर प्रवास करून जाईन किंवा बघू ओटीटीची वाट.. पण हल्ली कोकण मोठ्या पडद्यावरच बघायला मजा येते. ती खंत राहील.
अचो यांचा साबरबोंडं चा
अचो यांचा साबरबोंडं चा रिव्ह्यू आवडला. बरेच पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत. या विषयाबद्दल उदासीनता आहे असं नाही. पण हल्ली तो पूर्वीच्या सेक्यूलर मूल्यांना रिप्लेसमेंट म्हणून घेतात. तसा हा नाही हे बरं वाटलं. त्या ही पलिकडे फिल्म म्हणून बघेन. चिनूक्स यांनी पाहिलाय याची कल्पना नव्हती. कुठे होतं हे स्क्रीनिंग?
कुर्ला टू वेंगुर्ला - नोट
कुर्ला टू वेंगुर्ला - नोट केला आहे. मलाही वीणा जामकरचे काम आवडते. कोकणच्या पार्श्वभूमीचा खरेतर कंटाळा आला आहे. हिंदीत पंजाबी तसं मराठीत कोकणी झालं आहे. काही तरी दुसरेही मिळेल या आशेने सहन करेन तेवढं.
फा, मलाही 'टांग टिंग टिंगा' आठवलं होतं. पण विश्वाचे आर्त तुझ्या पोस्टी प्रकाशले
माझी यादी वाढतच चालली आहे. चार झाले आता.
आरपार, दशावतार, साबर बोंडं, कुर्ला टू वेंगुर्ला.
माझी यादी वाढतच चालली आहे. >
माझी यादी वाढतच चालली आहे. >> गावी गेल्यावर पोट भरल्यावर सुद्धा दोन घास खा म्हणून भावकीत ठिकठिकाणी आग्रह होतो तसं का ?
पण पंगतीतून उठायचं नाय....
चार स्क्रीनची पाहुणी उपाशी
चार स्क्रीनची पाहुणी उपाशी
साबर बोंडं पाहिला. आवडला.
साबर बोंडं पाहिला. आवडला.
यामध्ये समलैंगिकतेसारखा टॅबू असणारा विषय कुठलाही मसाला न घालता, कसलाही भावनिक अत्याचार न करता, कसलाही थिल्लरपणा न करता, आपल्याकडच्या सगळ्या पूर्वग्रहांना फाटा देऊन, अतिशय संयतपणे, परिपक्वपणे हाताळला आहे.
यातलं जे गाव दाखवलं आहे ते 'आजचं' आणि जसंच्या तसं दाखवलं आहे. एकही पात्र फिल्मी/बनावटी वाटत नाही. संवादांमध्ये दैनंदिन बोलीभाषा आहे. त्यातला सच्चेपणा भावतो.
शिवाय यामध्ये मनुष्य मयत झाल्यानंतर दहा दिवसांपर्यंतचे जे विधी, रितीभाती असतात, त्यांचं चित्रण एवढं जिवंत आहे की आपल्या घरचाच कुणी माणूस गेलाय असं वाटत रहावं.
सगळ्यात जास्त काय आवडलं? तर यातल्या मुख्य पात्राची आई. फारच सही आहे ही..! जगातल्या सगळ्या मुलांना अशा आया लाभो वगैरे.!
(बाकी, शो'ज् एवढे कमी का ठेवलेत कळलं नाही. सो कॉल्ड संस्कृतीरक्षक बोंबाबोंब करत येतील म्हणून की काय? अर्थात विषय त्यांच्या डोक्याच्या वरचा आहे म्हणा. असो. )
आणि तुम्ही पदर पसरून झेलायचात
आणि तुम्ही पदर पसरून झेलायचात?! हो तर! कित्येक सिनेमे बघितलेत असे. चांगलेही बघितलेत.
झाडू >> हो ना? मला वाटत होतं पण खात्री नव्हती.
कुर्ला टू वेंगुर्ला बघायला पाहिजे.
वेंगुर्ला ते कुर्ला बघितला.
वेंगुर्ला ते कुर्ला बघितला.
चांगला आहे. आवडला. सगळ्यात काय आवडलं तर समस्येवर उत्तर सोप्पं तर होतं इतकं ते सोपं नाही हे दाखवणे.
कोकणातील मुलींना शहरातील मुलगे लग्नाला हवे असतात. तर मुलगा मुंबईत कायमचं काम करतो असं खोटंच सांगुन वीणा जामकरचं लग्न लावलेलं आहे, तिचा नवरा मुंबईहुन आहे ते काम सोडून वेंगुर्ल्याला येतो तिथून गोष्ट चालू होते. मुलाचे बाबा विनोद तावडे, आणि लग्न जुळवणारा वैभव मांगले तेवढे ओळखीचे चेहरे. पण आई, आजोबा आणि बहिणीने मस्त कामं केली आहेत. मुलाचा गावतला मित्र सीओईपी मधुन इंजिनिअर होऊन गावातच काही करू म्हणून गावात येतो. मुलाची बहिण कॉलेजात शिकते आहे. पण ती पण कोकणीच आहे. वयाप्रमाणे कोकणी सडेतोड! तिला उजवायची बापाला घाई, तर तिचा कॉलेजात क्रश. पण मुलगी हुषार आहे. तिला मुंबईची ओढ नसली तरी गोडगुलाबी प्रेमात भुलुन भावनिक वेडेपणा करणे तिच्या बुद्धीला पटणारेच नाही.
इकडे वीणा जामकर फसवल्याने घर सोडून जाते. इंजिनिअर मित्र लग्नबिग्न होईल न होईल आत्ता गावात काही कारखाना चालू करू च्या मागे. आता या भावा बहिणींच्या प्रेमाचं, लग्नाचं आणि मित्राचं काय होणार ही साधारण सिनेमाची कथा.
सिनेमाभर कुठेही गाव कित्ती चांगलं, गावातच राहिलं तर विकास होईल, इथे राहुन इथला विकास करा असं अजिबात सांगितलेलं नाही. शेवट अर्थात आपल्याला जो वाटतो तोच होतो पण तो त्यांचा प्रवास आहे. त्या निर्णयाला येण्यातील प्रत्येकाचा प्रवास आणि अंतिम निर्णय वेगळाच असणार असं मला तरी वाटलं.
वैभव मांगलेचे काही आचरट विनोद आवरले असते तरी चालतं. साधनाने लिहिलंय तसं भटं घरात मराठी आणि बाहेर मालवणी बोलतात. मालवणी बोलणे ही सहज आहे. मला समजत नसली तरी पुरेशी समजते असं कळलं. चित्रपट समजण्यात काही अडचण आली नाही. विणा जामकरची सासू मला एकदम आवडली. बाकी लहान लहान प्रसंग ... जसे लग्न मोडू नये म्हणून निवाडा करायला बसलेले असताना घरातील बाई किती माणसं आहेत ते मोजून चहा टाकते ... आणि बाहेर बोलणी फिसकटून माणसं उठून जाऊ लागतात तशी एकएक चहाचा कप कमी करते.. ते मजेदार आहे. असे बारीक बारीक प्रसंग छान आहेत. एकुण बघणेबल आहे.
अमित कुठे पाहिलास?
अमित कुठे पाहिलास?
हो ना, कुठे आहे? आयपी
हो ना, कुठे आहे? आयपी टिव्हीवर दिसला नाही.
आयपी वर मराठी कॅम मध्ये इथे
आयपी वर मराठी कॅम मध्ये इथे आहे. त्यांचे पण दोन तीन सर्वर आहेत. कदाचित तुम्ही वापरता त्या सर्वरला नसेल मग.
शहरात मुलगा मुलगी पाहायला
शहरात मुलगा मुलगी पाहायला जाणे हा कुटुंबाचा व्यक्तिगत प्रश्न असतो पण गावी तसे नसते. गावातले गावकार पण बोलावले जातात. ते मुलाला/मुलीला प्रश्न विचारतात. काही प्रश्न घरातले संकोचाने विचारत नाहीत ते हे गावकरी विचारतात.
चित्रपटात सुरवातीला मुलगी बघायला येतात तेव्हा जो सिन सुरु असतो तो कोकणात सर्रास होतो, अर्थात प्रेमप्रकरणाची कबुली सोडुन
माझ्या चुलत भावाच्या मुलीच्या लग्नात मुलगा प्रथम घरी आला तेव्हा सेम असेच सगळे खळ्यात बसले होते, मुलाला प्रश्न विचारले गेले. सग़यांसमोर मुलीला मुलगा मान्य आहे का विचारले गेले.
मुली मुलाने लग्न स्वतःच जमवले होते. मुलाचे आईबाबा आमचे नातलगच आहेत, मुलीच्या जन्माच्या आधीपासुन घरी येणेजाणे आहे, गावातले पण ओळखतात पुर्वीपासुन. तरी बसुन हा विधी केला गेला. चित्रपटात बघुन मजा आली.
आणि येड्यासारखे काहीतरी विचारणारा एखादा निघतोच
आरपार बघितला.
आरपार बघितला.
आवडला.
' भांडू तरी नांदु ' ही शेवटची tagline आपिलिंग वाटली.
नेहेमीच गोड / सात्विक/ आदर्श / त्यावर आधारित प्रेम न दाखवता दोन्ही पात्र grey एरियात वावरतात. त्यामुळे realistic वाटला.
मराठी मध्ये असे वेगळे विषय/ वेगळी मांडणी असणारे चित्रपट हाताळतायत हे चांगल वाटलं.
साबर बोंडाचे एक्झिक्युटिव्ह
साबर बोंडाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स म्हणून निखिल अडवाणी , सई ताम्हणकर, विक्रमादित्य मोटवानी , नागराज मंजुळे यांची नावं आहेत. EP काय करतो ते शोधलं तर securing funding, managing the budget, and overseeing the distribution and marketing हे दिसलं. अशा चित्रपटाला हात धरून प्रेक्षकांपर्यंत पोचवल्याबद्दल यांचेही आभार मानायला हवेत.
मी थेटरात जाऊन सिनेमा पाहत नाही. हा पहावासा वाटला. पण फार कमी ठिकाणी आहे. आणि वेळही सोयीची नाही.
साबर बोंड्यांवरुन
साबर बोंड्यांवरुन
ही बाबर बाँडं आठवली.
https://www.youtube.com/shorts/LadlBwjuvUg
साबर बोंडंचा लेखक/ दिग्दर्शक
साबर बोंडंचा लेखक/ दिग्दर्शक रोहन कानवडे याची भारद्वाज रंगनने घेतलेली मुलाखत काल बघितली. रोहनने सिनेमा, त्याची मतं, त्याचा प्रवास इ. फार मोकळेपणे मांडला आहे. विचारपूर्वक मांडलेली मते आणि त्यामागचे कनविक्शन जाणवल्याने मुलाखत आवडली.
भरत, मनात आलंय बघावं तर बघुनच टाका, अर्थात जमत असेल तर. पण जमवाच.
मुंबईत असतो तर तुम्हाला घेऊन गेलो असतो. 
सई आणि रोहनची ही राजश्रीवरची
सई आणि रोहनची ही राजश्रीवरची मुलाखत पण आवडली.
नाळ व नाळ २ पाहीले - खूप
नाळ व नाळ २ पाहीले - खूप आवडले.
>> साबर बोंडं <<
>> साबर बोंडं <<
या चित्रपटाचा ट्रेलर काही महिन्यांपूर्वी किंवा मागच्या वर्षी का ते आठवत नाही पाहिला होता.
त्यावरून मला एका चित्रपटाची आठवण झाली.
नव्हे, ब्रोकबॅक माउंटन नव्हे.
तर तो आहे :
गॉड्स ओन कंट्री ( God's own country) हा स्कॉटिश (?) चित्रपट.
मला शेकी कॅमेरा अजिबात आवडत नाही. अगदी खूप कमी चित्रपटांना तो सूट होतो. आणि कॅमेरावर्क, प्रसंग, भाव भावना, अभिनय (संयत वगैरे असला आव असलेला कृत्रिम किंवा नैसर्गिक वाटणारा असा कोणताही अभिनय केलेला अभिनय अजिबात नाही) असा सर्व बाजूंनी हा चित्रपट अत्यंत दर्जेदार चित्रपट झालेला आहे. बहुतेक चागल्या अशा चित्रपटांना असते तशीच पात्रे ठराविक काळासाठी एकत्र राहतात अशी पूरक कथा यालाही आहे. त्या दृष्टीने तो ब्रोकबॅक ची परंपरा सांगतो. पण तो तिथेच थांबत नाही. यातली पात्रे अतिशय खरी वाटली. रॉ देखील वाटली. थोडासा सुखांत असाही चित्रपट आहे. अवश्य पाहा. मला तर साबर बोंड या चित्रपटाच्या परंपरेतला किंवा त्याच प्रभावातला वाटतो. याहचीही सगळी पार्श्वभूमी ग्रामीण आहे आणि एक पात्र मेंढपाळ आहे. इंग्लंडातल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थित मधे शेती भाती करणाऱ्या एका कुटुंबाचे अस्सल चित्रण आहे. त्यातले सगळे चॅलेंजेस खूप सुंदररित्या या चित्रपटाच्या कथेत येतात. कथा सुसाट वाऱ्याप्रमाणे वाहत जाते त्या दृष्टीने एडिटिंग, कॅमेरा, लाइटिंग, चित्रपटाचा कलर पैलेट इत्यादी सगळे केवळ अप्रतिम असे आहे. संवाद देखील कुठेही ओव्हर द टॉप नाहीत की उगाच नैसर्गिक नाहीत. एकंदरीत माझी दणदणीत शिफारस आहे. अशी भट्टी खूप कमी चित्रपटांची जमून येते.
हे माझ्याकडून अजून एक रेअर असे रेकमंडेशन आहे. कुणाला याच कॅटेगरीत अजून चित्रपट हवे असतील तर कळवावे.
https://youtu.be/q1YAhyU6-tA?si=iNxVLbJD125ai5U-
रॉय पाहते आणि सांगते.
रॉय पाहते आणि सांगते. ब्रोकबॅक कुठे पाहिला?
Pages