मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा बेटर हाफ ची लव्ह स्टोरी कदाचित मराठीतल्या सर्वात बाद चित्रपटांमध्ये मानाचे स्थान मिळवणार.
बाद म्हणजे जेन्युइनली बाद. too bad, इट's good छापाचा क्रिंज बॅड नाही. खरोखर मनापासून बाद.

Too Bad She's Bad
हा एक चांगला पिक्चर होता. सफाया लॉरेन आणि मार्सेलो मास्त्रीआनी ची भन्नाट कामं आहेत. कुठे मिळाला तर अवश्य पहा,

सुभाने आता काही काळ ब्रेक घ्यावा.
मध्येच त्याचा असाच एक मूवी होता.
“सल्तात रेशीम्गाठी“ त्याला सतत दारु पिवुन तट्ट् झालेली भुमिका जराही जमत न्हवती…

आता अजुन एका सिरियलीत येतोय… परत लग्नाचीच कहाणी आहे वाटतं..

त्या ट्रेलर मधे रिंकू राजगुरू एकदम ग्रेसफुल दिसत आहे.

सुभाची तेजश्री प्रधानबरोबर अजून एक सिरीज दिसत आहे झी मराठीवर. तुपारेसारखाच सुभा त्याच्या ऑफिसमधे. ऑफिस म्हणजे एक डेस्क, कॉम्प्युटर, एक दोन नम्र सहकारी. तेथे सूट घालून सुभा.

मुळशी पॅटर्न थोडा पाहिला परत. एकदम अंडररेटेड पिक्चर आहे. सुरूवातीपासूनच मस्त आहे. यातला ओम भूतकर नंतर "आता थांबायचं नाय" मधे एकदम वेगळा वाटला होता. इथे टोटल भाई. प्रतिस्पर्धी गँगपासून पळताना फ्लॅशबॅक, त्याची एकेकाळची प्रेमिका तिच्या नवर्‍याबरोबर समोरून जाताना धुरामागे अदृश्य होणे वगैरे वातावरण निर्मिती मस्त आहे. मोहन जोशीची पूर्ण बॉडी लँग्वेज खतरनाक आहे.

पोलिसांमधे तो सैराट मधला तिचा बाप - त्याचा रोल अस्सल वाटतो. उपेंद्र लिमयेची भूमिका मात्र उगाचच भावखाऊ आहे. त्यापेक्षा आर्चीच्या बापाने रंगवलेला पोलिस जास्त अस्सल वाटतो.

रिंकू खरंच फार छान दिसते. गर्ल नेक्स्ट डोअर लूक आहे खरं तर पण एकदम काय म्हणतात ते ऑर्गॅनिक सौंदर्य. इन्डस्ट्रीमधे अनेक मुलींप्रमाणे काही "करेक्शन्स" केलेल्या दिसत नाहीत चेहर्‍यावर त्यामुळे फार सुरेख वाटते. शिवाय प्राइम यंग इयर्स मधे तो एक मूळचा ग्लो असतो ना मुलींच्या चेहर्‍यावर तसा आहे. पण दुर्दैव असं की हिंदीसारखी मराठीत पण कंपूगिरी भरपूर आहे त्यामुळे त्याच त्याच लोकांना सगळ्या सिनेमात घेतात की बघणार्‍यांना अजीर्ण होतं, सिनेमाची क्लिप पाहिली तर सिनेमा हा की तो हेही कळत नाही! पण रिंकूला आणि इतर बर्‍याच टॅलेन्टेड लोकांना कामच मिळत नाही फार.
फा- मुळशी पॅटर्न चांगला घेतला होता. ते पाठलागामधे येणारे फ्लॅशबॅक आणि ते म्यूझिक पण लक्षात राहिले होते.
सुभाचे कपडे Happy
subha.jpg

सुभाचे कपडे Lol विनोदी आहेत. पहिल्या स्क्रिनशॉटमध्ये त्याला तुपाने मसाज केल्यासारखा तूपकट, तुकतुकीत दिसतोय.

मुळशी पॅटर्न जबरदस्तच आहे. >>> १०००+
बऱ्याच दिवसांनी (राजवाडे स्टाईल गुळगुळीत नसलेला ) कंटेम्पररी चित्रपट.
राजवाडे एकेकाळी बरे पिक्चर काढायचा आजकाल तो मराठीतला कारण जोहर व्हायची स्वप्न बघतो का काय माहीत नाही.

गर्लफ्रेंड नावाचा मराठी पिक्चर सुद्धा आहे
अमेय वाघ आणि सई ताम्हणकर
थोडक्यात सांगायचे तर त्यात दोघांचे कॅरेक्टर जरा हटके आहे Happy

मचिकवावर हलवतो ही पोस्ट

गर्लफ्रेंड नावाचा मराठी पिक्चर सुद्धा आहे
>>
दिग्दर्शक उपेंद्र सिधये
निशिकांत कामतच्या बऱ्याच सिनेमांच्या स्क्रिप्ट्स यानी लिहिल्या होत्या (मुंबई मेरी जान, फोर्स, दृश्यम् वगैरे)

बिन लग्नाची गोष्ट - उमेश कामत, प्रिया बापट, मोने पतिपत्नी, गिरीश ओक, निवेदिता सराफ
मी पहिली १० मिनिटे बघितला. त्यावर नाही बघू शकलो.
उका आणि प्रिबा मराठी चित्रपटाला अनुदान मिळतं म्हणून लंडन (किंवा इंग्लंड मध्ये ज्या शहरात अनुदान मिळतं त्या शहरात) रहात असतात. लिव्ह इन. म्हणजे बिन लग्नाचे. तर बापट पोटुशी आहे. कारण तिला रहायचं आहे. प्रेग्नंट म्हणजे अगदी कधीही वॉटर ब्रेक होईल इतकं पोट वाढलेली आहे. ती अत्यंत अनॉईंग वागते. अशा कजाग मुलीला सोडून उका शांतपणे जगणे का पसंत करत नाही तोच जाणे. तर मग प्रेग्नंसीत मदत म्हणून उकाच्या आईला म्हणजे मोने पत्नी आणि गाड्याबरोबर नाळ्याला म्हणजे मोनेला ही बोलवावं का ... ज्यांचा बिन लग्नाचं रहायला विरोध आहे .... इतकं ऐकल्यावर मी बंद केला. छ्या! लग्न - लिव्हइन डोस नाही ऐकायचे मला.
प्रिबाच्या आईची काही तरी वेगळीच स्टोरी आहे ज्याचा तिच्याच्याने विचारही होऊ शकत न्हवता ती ऐकायला मी टीव्ही चालू ठेवायचा विचार करणे शक्यच न्हवते.
शितावरुन अत्यंत रटाळ स्टोरी, उकाचा अत्यंत पाट्याटाकू कर्कश्य अभिनय आहे हे पहिल्या दहा मिनिटांत समजले.
वाट्यालाही जाऊ नका. तरी गेला तर पुढे काय होतं ते लिहा. मी किती वेळ गमावण्यापासून वाचलो याची गोष्ट म्हणून वाचेन.

प्रेग्नंट म्हणजे अगदी कधीही वॉटर ब्रेक होईल इतकं पोट वाढलेली आहे >>> Lol

मोने पतीपत्नी लिहीलेस तर कामत पतीपत्नी असेही लिहायला हवे. ते पिक्चरमधे लिव्ह इन आहेत, प्रत्यक्षात लग्न केले आहे ना? याची खात्री करायला वेबवर Is Priya Bapat इतके टाइप केले (पुढे "मॅरिड" लिहायला), तर गूगलची पहिली सजेशन "Pregnant" आली.

"अनुदान मिळते त्या शहरात" वाचून टोटल फुटलो. यापुढे महाराष्ट्रात शूटिंग केलेल्या मराठी चित्रपटांना "विना अनुदान तत्त्वावर" असे म्हणायला हवे.

प्रेग्नंट म्हणजे अगदी कधीही वॉटर ब्रेक होईल इतकं पोट वाढलेली आहे >> Lol

यापुढे महाराष्ट्रात शूटिंग केलेल्या मराठी चित्रपटांना "विना अनुदान तत्त्वावर" असे म्हणायला हवे. >>> Lol

सेन्सॉर बोर्डावर ए / यू लिहीतात तसं अनुदानित / विनाअनुदानित असंही पोस्टरवर लिहायला पाहीजे, म्हणजे सरकारी शाळा, हॉस्पिटल मधे न जाणारे त्या वाटेला जाणार नाहीत.

अमितवने लिहीलेला दशावतारचा सूक्ष्म रिव्ह्यू पण छान आहे. अगदी याच्याशी मिळताजुळतं मत माहीतीतल्या एका सिने पत्रकाराने मांडलंय. म्हणजे काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही तर असे प्रयत्न कुणी करणार नाही असं.

नसलेली सासू नसलेल्या सुनेचं बाळंतपण करणार?
लिव्ह इन किंवा कसेही बिनलग्नाचं गरोदरपण निभवणाऱ्या बायका नसलेल्या सासूच्या जीवावर बाळंतपण करत नसाव्यात, अगदी भारतातही.

नथिंग अगेन्स्ट मेथीचे लाडू. मला आवडतात पण उगीच रम चॉकलेटच्या आवरणात गुंडाळून ते सादर करू नका.

लोल अमित. बघवत नाहीत हल्ली पिक्चर. मार्केटिंग वगैरे करुन हवा तर इतकी करतात की अवॉर्ड वर्दीच आहे.
संजय मोने तर झेपतच नाही. अ‍ॅक्टिंगव्या नावाने झिरो आहे तो.

सायो अगदीच सहमत.. हवा एवढी करतात .. आपल्याला वाटतं काय असेल .. थिएटर मध्ये जाऊन सोडाच पण ott वर ही पूर्ण पाहाणं अशक्य असतं.

मी पण आरपार पाहिला. नॉट बॅड Happy मराठीत सगळे इतके तेच तेच म. म. कौटुंबिक तुपकट प्रकरण असते की हे वेगळे काही तरी बघायला छान वाटले. ऑब्सेसिव लव स्टोरी आहे. कबीर सिंग इतकी टॉक्सिक नाहीये पण , कारण ऑब्सेशन दोन्ही बाजूने आहे. त्यांना शेवट नीट करायला जमला नाहीये असे वाटले पण. अजून जरा क्रिस्प शेवट असता तर आणखी आवडला असता.
ललित प्रभाकर एकदम मस्त दिसलाय! मराठीतली रेअर आय कँडी Wink त्याचं काम पण मस्त. ऋता दुर्गुळे पण छान दिसलीय. अ‍ॅक्टिंग मधे जरा कमी पडते ललित पुढे. दोघे एज अप्रोप्रिएट आणि एकत्र छान शोभलेत, केमिस्ट्री मस्त आहे.

प्रिबा आणि उका फार वरणभात तुप मेतकूट जोडी आहे. अगदीच मिळमिळीत आणि प्रचंड लाऊड प्रिबा अज्जिबात आवडत नाही. लाडालाडात करत विचित्र अ‍ॅक्टींग करते.

ललित पण जरा बॉर्डरवरच आहे अजून.. जरा जरी ओव्हरॅक्टींग केली तर आऊट.
मराठीत फक्त मला एकमेव वैभव तत्ववादी आवडलाय पाँडिचेरी मधे टॉक्सिक रोल बद्दल बोलायचं झालं तर.

मराठी सिनेमांना अजून खूप पुढे जाण्याची गरज आहे.

आरपार>
दशावतार च्या नादात हा एक उत्तम रॊमॅंटिक सिनेमा दुर्लक्षित राहून गेलेला दिसतोय.

यातला दोन तासांपैकी मधला वीसेक मिनिटांचा पझेसिव्ह/हिंसक/रिपल्सिव्ह स्पॅन सोडला तर बाकी सिनेमा सर्वच अंगांनी फार चांगला जमून आलाय. रिलेशनशिपमधले कॉम्प्लिकेशन्स इन डेप्थ दाखवले आहेत. डायलॉग्ज विशेष आवडले. फ्रेश आहेत एकदम.. Happy ( उदाहरणार्थ "तो काय समजून बिमजून घेतो की काय तुला?" किंवा "मी सोडून गेले तर टीव्ही विकत बसला होतास"). ऋता दुर्गुळेचा परफॉर्मन्स ललित प्रभाकर पेक्षा जास्त आवडला.
[बाय द वे, ऋता दुर्गुळेची फ्रेंड दाखवली आहे ती मनस्विनी लता रवींद्र (मराठी लेखिका) आहे काय? मी गुगलवर स्टार कास्ट मध्ये नाव चेक करून बघितलं तर काही दिसत नाही. ]

>> दशावतार च्या नादात हा एक उत्तम रॊमॅंटिक सिनेमा दुर्लक्षित राहून गेलेला दिसतोय. <<

लोकांनी ट्रेलर वर कमेंट केल्या आहेत की एकाच दिवशी का रिलीज करता आहात अक्कल नाहीये का तुम्हाला म्हणून.

निर्मात्यांनी ट्रेलरवरच्या कमेंट्स चे सेंटीमेंट analysis करून निर्णय घ्यायला पाहिजे.

चला, कढीपत्ता पण येतोय.. मागे एकदा चर्चा झाली होती ना, गुलाबजाम, गुलकंद आणि तत्सम खाद्यपदार्थांच्या नावांच्या चित्रपटांची. आता मोहरी, हिंग, हळदही येऊद्या. झालंच तर शेंगदाणेसुद्धा. ('हळद रुसली कुंकू हसलं' नावाचा चित्रपट होता पूर्वी एक. )

Pages