मनाचे श्लोक – चित्रपटाच्या नावावरून चालू असलेला वाद

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 October, 2025 - 19:40

वादाची पार्श्वभूमी

मनाचे श्लोक नावाने एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या नावाला काही संघटनांनी विरोध केला. त्याचा शो बंद पाडला. आता तो चित्रपट येत्या आठवड्यात नाव बदलून प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात हिरोईनचे नाव मना (की मनवा?) आहे आणि हिरोचे नाव श्लोक आहे. अश्या अर्थाने चित्रपटाचे नाव मनाचे श्लोक केले आहे.
चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर असून समर्थ रामदासांचे मूळ मनाचे श्लोक सोबत चित्रपटाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. तर यामागे केवळ कल्पकता आहे.

यावरून वाद उद्भवले आहेत ज्यात प्रामुख्याने दोन ते तीन गट तयार झाले आहेत.

१) या नावाला विरोध करणारे – ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

२) या नावाला विरोध करणाऱ्यांना विरोध करणारे – ज्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले असे वाटत आहे.

३) ज्यांना हा निव्वळ मार्केटिंग फंडा वाटत आहे – म्हणजे मुद्दाम असे खोडसाळ नाव देऊन एका गटाच्या धार्मिक भावना दुखवायच्या आणि आपणच त्यात तेल ओतून वणवा पेटवायचा. जेणेकरून समोरून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जागरूक असलेला गट सक्रिय होईल आणि दोघांची छान जुंपेल. यातून जी चर्चा होईल त्याने चित्रपटाची आयती जाहिरात आणि मार्केटिंग होईल असे जे समजतात.

या तिसऱ्या गटात सुद्धा दोन उपगट आहेत.

३ अ) ज्यांचा अश्या प्रकाराच्या मार्केटींगला विरोध आहे. – कारण त्यांच्यामते यामुळे समाजात नाहक तेढ निर्माण होते आणि समाजाचे स्वास्थ्य बिघडते.

३ ब) ज्यांना अशी मार्केटिंग पटते. – म्हणजे याकडे ते फक्त व्यवसाय म्हणून बघतात. याउपर एका मराठी चित्रपटाची चर्चा होत आहे तर चांगलेच आहे असे समजतात.

तुम्ही यापैकी कुठल्या गटात आहात? किंवा यापलीकडे काही विचार करता का? किंवा एकूणच या वादाकडे कुठल्या नजरेने बघता?

मी माझे मत सांगतो,
मी तिसऱ्या गटात आहे. पण या केस मध्ये ३ अ की ३ ब हे अजून तरी ठरवता आले नाहीये.

------------

(मराठी चित्रपट कसा वाटला या धाग्यावर चर्चा न करता इथे स्वतंत्र धाग्यात करता आली तर तिथे अवांतर पोस्ट टाळून इतर मराठी चित्रपट कसे वाटले यावरच बोलता येईल.)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथले प्रतिसाद इथे कॉपी पेस्ट करतो

पुण्यात चित्रपटगृहाच्या बाहेर लाइव्ह चित्रपट
https://www.facebook.com/reel/2023374338423503
चित्रपटाच्या फक्त नावाला आक्षेप आहे.चित्रपट इतिहास पुस्तके

सेन्सॉर बोर्ड , नावं नोंदवणारी संस्था यांच्यावर याच लोकांना बसवून टाका एकदा. उद्या मुलांच्या नावांना पण आक्षेप घ्यायला लागले की भरून पावलं.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यनगरी सध्या अगदी झळाळून उठली आहे.

मायबोलीवर सुद्धा वादविवादात कोणी रचून काही सांगत असलं की या चित्रपटाचं जे नाव आहे, ते तुम्ही रचताय का असं विचारलं जायचं. यापुढे कोणी तसं विचारू नका. मायबोलीवर सुद्धा मोर्चा येईल. यांची आम्रविकेत शाखा (म्हणजे शाहरुख नाही - शाखा म्हणजे फांदी , पारंबी ) असेलच.
Submitted by भरत. on 12 October, 2025 - 17:29

मनाचे श्लोक ची काय कॉन्ट्रोवर्सी आहे मला माहित नाही म्हणजे मी त्याच्या खोलात शिरले नाहीये.

तूर्तास राजकीय/ धार्मिक/ जातीय भावना, त्या दुखावलेली माणसे किंवा त्या दुखावण्याचे (?) निमित्त ठरलेले ह्या बाजूला ठेवू या.

या आधी सुद्धा अनेक वेळा जाणवलं होतं, पण काल बघितलेलं शिकायला गेलो एक
नाटक किंवा मनाचे श्लोक नावाचा चित्रपट, ह्या लागोपाठ आलेल्या दोन गोष्टींमुळे ही पोस्ट लिहायची ठरवली.चित्रपट इतिहास पुस्तके

कॉपी राईट - एखाद्या कलाकृतीवर/ साहित्यावर ते या जगात आणणाऱ्या / निर्माण केलेल्या व्यक्तीचा / संस्थेचा त्यावर असलेला अधिकार. त्याचा वापर करायचा असेल ( ह्यात शीर्षक, ओळी सर्व आले) तर त्या मूळ लेखकाची/ निर्मात्याची अनुमती घ्यावी लागते.

ही व्यावसायिक मंडळी जे स्वतः च्या कॉपी राईट बद्दल जागरूक असतात त्यांना आधीच्या थोर, लोकप्रिय , रूढ ( त्या तशा आहेत म्हणूनच ह्यांना वापरायच्या असतात ) कलाकृती/ साहित्यातील अंश व्यावसायिक गोष्टींसाठी वापरताना त्यांच्या कॉपी राईट चा जराही विचार मनात येत नाही ?
बरं ते आहे तसे न वापरता त्याचा अपभ्रंश करून/विपर्यास करून easy punches (आणि त्यातून होणारा आर्थिक लाभ) मिळवितात.
का? तर आज ती मूळ मंडळी जिवंत नाहीत म्हणून?

असे सोपे मार्ग अवलंबिण्यापरीस स्वतःची कल्पकता वाढवा, जास्त अभ्यास करा आणि अशा कुठल्याही कुबड्या न वापरता स्वतःचा (ओरिजनल ) कंटेंट तसा तयार करा.
Submitted by छन्दिफन्दि on 13 October, 2025 - 01:22

असे सोपे मार्ग अवलंबिण्यापरीस स्वतःची कल्पकता वाढवा, जास्त अभ्यास करा आणि अशा कुठल्याही कुबड्या न वापरता स्वतःचा (ओरिजनल ) कंटेंट तसा तयार करा.>>> +१
Submitted by प्राजक्ता on 13 October, 2025 - 02:22

मनाचे श्लोक ची काय कॉन्ट्रोवर्सी आहे मला माहित नाही म्हणजे मी त्याच्या खोलात शिरले नाहीये.
>>>>>
चित्रपटात हिरोईनचे नाव मना (की मनवा?) आहे आणि हिरोचे नाव श्लोक आहे अश्या अर्थाने मनाचे श्लोक केले आहे.
चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर असून मूळ मनाचे श्लोक सोबत चित्रपटाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. निव्वळ आपल्या फायद्यासाठी "मनाचे श्लोक" हे नाव वापरले आहे.चित्रपट इतिहास पुस्तके

असे मी एके ठिकाणी वाचले.

हे जर खरे असेल तर .. हे करायची गरज नव्हती, उगाचच खोडसाळपणा केला आहे असे प्रथमदर्शनी वाटते. संबंधितांनी आक्षेप घेतला असेल तर आपला पाणचटपणा कबूल करत नाव बदलायला हरकत नाही. तसेही जो मूळ हेतू होता तो साध्य झाला आहे. वाद निर्माण होऊन मार्केटिंग झाली आहे. कदाचित निर्मात्यांनीच वाद पेटेल हे बघितले असेल अशीही शक्यता आहेच.

बाकी माझ्या पर्सनली काही भावना वगैरे दुखावत नाहीत..पण तटस्थपणे विचार करता जे वाटले ते वर लिहिले. कारण हल्ली अभिव्यक्तिस्वातंत्र्य नावावर खोडसाळपणा करणारे सुद्धा बरेच झाले आहेत. आणि त्याचा फटका जेन्युइन लोकांना बसतो.
Submitted by ऋन्मेऽऽष on 13 October, 2025 - 02:33

चित्रपटात हिरोईनचे नाव मना (की मनवा?) आहे आणि हिरोचे नाव श्लोक आहे अश्या अर्थाने मनाचे श्लोक केले आहे. >> व्याकरण चुकलंच आहे.

भन्नाट क्रिएटिव्हिटी (?)

इतका टुकार/ पाणचट विचार शीर्षकामागे असेल तर चित्रपट कसा असेल... वरवरचा असेल.चित्रपट इतिहास पुस्तके
Submitted by छन्दिफन्दि on 13 October, 2025 - 02:55

व्याकरण चुकलं हे बरोबर लिहिलंत छंदीफंदी. मनवाचा श्लोक किंवा तिला मना म्हणत असतील तर मनाचा श्लोक असं हवं होतं, हे मी वाचलं असंच कुठेतरी. पोस्ट दोन तीन वाचल्या, सिनेमा काढलेल्यानीही एक पोस्ट टाकलीय त्यापैकी नक्की कुठल्या पोस्टखाली ही कमेंट वाचली आठवत नाहीये.

सेन्सॉर बोर्डाने पास करताना हा मुद्दा लक्षात न घेता पास केला असेल तर कायदेशीर मार्गाने जायला हवं, तोडफोड करण्याला विरोध, चुकीचा मार्ग.

मनाचे श्लोक वाचल्यावर रामदासस्वामी आणि ते श्लोकच आठवतात.
Submitted by अन्जू on 13 October, 2025 - 03:29

एक टुकार चित्रपट आणि त्या चित्रपटाला असली प्रतिक्रिया देणारी तितकीच टुकार माणसे. चित्रपट इतिहास पुस्तके

म्हणजे कशाला तरी क्वालिटी असावी की.

दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे एकूण.

आधीच रामदास बदनाम आहे. म्हणजे बोहल्यावरून पळून गेला म्हणून नाही. तर शिवबाचा न-गुरु असल्याबद्दल. तिकडे तर विचारूच नका. वेगळ्याच प्रतलावर लोक भांडत असतात.

नशीब इथे कुणी एकेरी उल्लेख करू नका अशी हिन्दी संवेदना घेऊन पिडणारे लोक नाहीत.

गावोगावी मारुतीच्या देवळांसमोर हा चित्रपट फुकट दाखवला तरी लोक बघणार नाहीत. नाव मग मनाचे श्लोक असले काय किंवा मनसमझावन असले काय.चित्रपट इतिहास पुस्तके
Submitted by रॉय on 13 October, 2025 - 03:39

जेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा त्या पिक्चरचा दर्जा, कॉपीराइट हे मुद्दे दुय्यम होतात. मुळात इथे कॉपीराटचा काही संबंध नाही. रामदासस्वामींनी मनाचे श्लोक लिहीले त्याला तीनशेहून अधिक वर्षे झाली. या पिक्चरचे नाव ते दिले म्हणून उद्या मृण्मयी देशपांडेने मनाचे श्लोक लिहीलेत असे कोणी समजणार नाही. इतक्या जुन्या आणि इतक्या प्रचलित गोष्टीचे नाव वापरणे ही एक प्रकारे ते नाव लोकप्रिय असण्याला दिलेली दाद असते. दुसरा मुद्दा पिक्चर बंडल असेल हा. असेल. बंडल पिक्चर काढणे कधीपासून शो बंद पाडण्याइतके सिरीयस झाले?

यावर आउटरेज दाखवणार्‍या पब्लिकला मुळात कॉपीराइट, दर्जा ई मुळे राग आलेला नाही. त्यांना आपली पॉवर दाखवायची संधी मिळाली, ती ते दाखवत आहेत. मनाचे श्लोक, आनंदवनभुवनी सारखी गाणी आणि मारूती स्तोत्र हे सगळे भारी आहे. मला रामदासस्वामींबद्दल आदरच आहे. पण हे नाव पिक्चरकरता वापरल्याने त्यांचा अपमान कसा होतो मला समजत नाही. आणि झाला, तर सेन्सॉर आहे, कायदा आहे. तो वापरा. ज्या लोकांनी, गटाने याला विरोध केला आहे त्यांना अनुकूल सरकार आहे. मग रस्त्यावर येण्याची गरज काय आहे?

That said, या बंदीच्या मागणीवर टीका करणार्‍या अनेकांनी पूर्वी अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर बहुताश सोयीस्कर भूमिकाच घेतलेली आहे. "अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण..." असे वाक्य जर तुमच्याकडून यापूर्वी इतर कोणत्याही "अपमान" केस मधे आले असेल तर तुमचा सध्याचा पुळका तात्कालिक आहे.
Submitted by फारएण्ड on 13 October, 2025 - 03:57

इतक्या जुन्या आणि इतक्या प्रचलित गोष्टीचे नाव वापरणे ही एक प्रकारे ते नाव लोकप्रिय असण्याला दिलेली दाद असते >>
किंवा सहज सोपा मार्ग ज्यामुळे आपला फायदा होईल. म्हणूनच ना ! म्हणजे ह्यात त्या लेखकाची मर्यादा उघडी पडतेच ना!

तीनशे वर्षांपूर्वीचे आहेत, copyright कक्षेच्या बाहेरील म्हणून आपल्या फायद्यासाठी काहीही कसंही वापरा...

बरं, पाश्चात्य संस्कृतीला अंगिकारून त्याला प्रमोट करणारे चित्रपट बनवायचे आणि त्याकडे प्रेक्षकांचे लक्ष वळावे म्हणून तीनशे वर्ष जुन्या(?) श्लोकांचा आधार घ्यायचा .. height of hypocrisy आहे. चित्रपट इतिहास पुस्तके

साने गुरुजींच्या प्रार्थनेच काय?

या नुकत्याच दोन (सलग) समोर आलेल्या गोष्टी होत्या म्हणून त्यांचा उल्लेख केला पण बरेच वेळा असे होत असते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा महत्वाचा आहेच पण आता वरच्या माझ्या मूळ पोस्टशी त्याचा संबंध नाही .
माझा मुद्दा लेखक/ दिग्दर्शक/ निर्माते काढत असलेल्या पळवाटांविषयी/ शॉर्ट कट विषयी आहे. तसेच ते ज्या मूळ कंटेंट चा ( स्वतःच्या व्यवहारिक फायद्यासाठी ) वापर करून घेतात / प्रसंगी त्याचा विपर्यास करतात त्या मूळ लेखकाप्रती साधी कृतज्ञता ही न दाखवण्याचा आहे.
Submitted by छन्दिफन्दि on 13 October, 2025 - 04:58

प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाचे निकष वेगळे असतात.
ज्या गोष्टींनी एखाद्याच्या भावना दुखावल्या जात नाहीत त्या गोष्टींनी इतरांच्या दुखावल्या जाऊ शकतात.. आणि व्हायसे वरसा

त्यामुळे भावना दुखावल्याच नाही गेल्या पाहिजेत असे आपण सर्वांच्या वतीने म्हणू शकत नाही. त्यानंतर विरोध निषेध कसा करायचा यासाठी कायदे आहेत.

पण इतरांच्या भावना बावळट कारणांसाठी दुखावत असतील तर तसे म्हणणे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यात आले. खासकरून भावना दुखावल्याने सेंसरशिप करण्याची मागणी होत असेल तेव्हा.

ते कारण बावळट आहे हे तुमचे मत झाले. अर्थात ते मांडायला काहीच हरकत नाही. आणि भावना दुखावून घेणाऱ्यांना मूर्ख ठरवायचा तुमचा अधिकार मान्य आहेच.

पण जर ती लोकं कायदेशीर पद्धतीने विरोध करत असतील, तोडफोड न करता सेन्सॉरशिपची मागणी करत असतील तर त्यांचाही तो हक्क नाकारू शकत नाही. पुढचे कोर्टावर आणि कायद्यावर सोडून द्यावे.

पण जर ती लोकं कायदेशीर पद्धतीने विरोध करत असतील, तोडफोड न करता सेन्सॉरशिपची मागणी करत असतील तर त्यांचाही तो हक्क नाकारू शकत नाही. पुढचे कोर्टावर आणि कायद्यावर सोडून द्यावे.

>>>>
हे ही योग्य. ह्यासाठी भावना दुखावल्या म्हणून सेन्सॉरशिप करण्याचा हक्क कायद्यानेच अमान्य करायला हवा.

असा कसा सरसकट कायदा करणार?
ते केस टू केस च ठरवावे लागेल.
नाहीतर ती हुकूमशाही झाली.
कोणी काही करेल, तुम्ही त्रास करून घ्यायचा नाही.

किंबहुना उद्या जर तुमच्या माझ्या भावना दुखावल्या तर त्यावेळी कोणाकडे दाद मागणार हा प्रश्न पडेल..

हुकुमशाहीच्या अगदी उलट आहे. दुसऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्यांना कायदा भीक घालणार नाही.

कॉमी +१
तिकडच्या फा च्या पोस्टला ही +१
यडपट आणि पोळी भाजायचा प्रकार आहे आणि त्यात इथली लोक वहावत गेली.

रॉय...तुम्ही हे लिहिलेत "आधीच रामदास बदनाम आहे. म्हणजे बोहल्यावरून पळून गेला म्हणून नाही. तर शिवबाचा न-गुरु असल्याबद्दल." ते अर्थातच दासबोध वाचून, समजून, (pure वाचक असल्यानं) त्यातले काहीच न पटल्याने / फालतू वाटल्याने दासबोधाचा संदर्भ सोडून,रामदास या व्यक्तीचा फुटकळ उल्लेख केला असणार. बरोबर न?

बाकी भावना दुखावणे हे प्रत्येकाच्या विविध सामाजिक, भावनिक, राजकीय मतांशी जोडलेले आहे. त्याला एकच माप नाही.
पण मनाचे श्लोक म्हणजे त्या एका मना नावाच्या मुलीला श्लोक नावाचे बरेच boy friends असतील किंवा ती पारंपरिक विचार करणारी असल्याने अहो श्लोक असे म्हणत असणार. त्याशिवाय असे नाव देण्यामध्ये मराठी भाषेचा अपमान नक्कीच आहे.

दुसऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्यांना कायदा भीक घालणार नाही.
>>>>>>

हो, पण हे कायद्याला ठरवू द्या
तुम्ही त्यांच्या वतीने ठरवत असाल तर तुम्ही तेच करत आहात जो आरोप तुम्ही दुसऱ्यांवर करत आहात.

पोळी भाजायचा प्रकार आहे
>>>
अमितव
+७८६
मत क्रमांक ३
आपल्याकडे सध्या भावना दुखावणारे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येणारे असे दोन गट तयार झाले आहेत.
त्यांचा फायदा उचलला जात आहे.

हो, पण हे कायद्याला ठरवू द्या
तुम्ही त्यांच्या वतीने ठरवत असाल तर तुम्ही तेच करत आहात जो आरोप तुम्ही दुसऱ्यांवर करत आहात.

>>>कायदाच ठरवणार की.
ज्यांना खुट्ट झालं की रडारड करत सेन्सर बोर्डाकडे जायचे आहे ते जावोत बापडे. माझी मागणी आहे कायद्यातच ह्या लोकांना भाव देण्याची तरतूद नसावी.

>>उगाच काहीही राव. ह्यात काय आहे भावना दुखावण्यासारखे ? निव्वळ फालतूपणा आहे.<<. +१
उद्या कोणि मन्याच्या फेल्ड लव-स्टोरीवर चित्रपट काढला मनु-स्मृती नावाचा, तर हे लोक थिएटर जाळायला निघणार का?

मागे, फुल्यांचा चित्रपटावर असाच बावळटपणा झालेला. तिच मंडळी आहेत का इथेपण?

बाय्दवे, मनाचे श्लोक हे नांव या चित्रपटाच्या संदर्भात देखील ग्रमॅटिकली करेक्ट आहे - आदरार्थी दृष्टिकोनातुन. या वादाला घाबरुन चित्रपटाचं नांव मनाचा श्लोक ठेवलं तर या रॅडिकल मंडळींची त्याला संमती मिळेल का?.. Wink

मला या सिनेमाच्या बाबतीत ते नाव म्हणजे प्युअर बॅड जजमेन्ट वाटते आहे. नाव देताना त्यांना असे काही होऊ शकते हे लक्षात यायला हवे होते. ते लक्षात आले असते तर (झाले ते चूक असो की बरोबर) आपल्या सिनेमाला ते परवडणार का हा प्रॅक्टिकल विचार केला असता निर्मात्यांनी.
बरं, वाद वगैरे निर्माण करून पब्लिसिटी मिळवणे हे हिंदीत होते पण हे मराठीच्या बजेट ला न झेपणारे प्रकरण आहे.
त्या नावात तसेही काहीही क्रिएटिव वगैरे नाही. स्टोरीशी त्याचा संबंध नाही, म्हणजे विरोध सहन करून अभिव्यक्ती जपणे असे वर्थ काही नाही.
मग उरले काय ? Happy फुकट वाद.

वाद वगैरे निर्माण करून पब्लिसिटी मिळवणे हे हिंदीत होते पण हे मराठीच्या बजेटला न झेपणारे प्रकरण आहे.
>>>>

हे नाही समजले. आय मीन असे का वाटले?
वाद निर्माण करायला कुठे काय बजेट लागते. आणि वादाचा फटका बसेल म्हणत असाल तर सध्याचे काही सन्माननीय अपवाद सोडल्यास असे मराठी चित्रपट कधी येतात आणि कधी जातात हे सुद्धा कोणाला समजत नाही. थिएटर मध्ये भलेभले मराठी चित्रपट सुद्धा चालत नाही आणि हा ओटीटीवर जरी लोकांनी नाव कानावर आले असल्याने पाहिला तरी वाद फायदेशीर ठरेल.

याउपर आता बातमीदार बातमीच्या शोधात स्वतः जाऊन जाऊन यांचे इंटरव्ह्यू घेत असतील आणि हे सटासट देत सुटले आहेत. शॉर्ट्स आणि रीळचा जमाना आहे. त्या माध्यमातून जाहिरात व्हावी असे मटेरिअल स्वतः फार कष्ट न घेता धडाधड तयार होत आहे.

म्हणजे थिएटर बुक झालेत, शो लावलेत पण ते झालेच नाहीत तर त्याचे नुकसान सोसणे. हिंदीत स्वतःच सर्व तिकिटे आठवडाभर विकत घेऊन सिनेमा हिट झाल्याचे सोंग घेता येते.
या सिनेमाची जी काही बातमी झाली आहे त्याने सिनेमा बघण्याची उत्सुकता तयार झाल्याचे वातावरणही वाटत नाही.

सिनेमा बघण्याची उत्सुकता तयार झाल्याचे वातावरणही अजिबात नाही.
>>>>
हो, ते स्टारपॉवर असल्याशिवाय होणे अवघड.
पण मराठी चित्रपटांबाबत जी एक रड असते की मार्केटिंग बजेट नसल्याने म्हणा कोणापर्यंत चित्रपटाचे साधे नाव देखील पोहोचत नाही. ते आता पोहोचले आहे. पुढे चित्रपट कसा आहे त्यावर त्याचे नशीब.

<<<< थिएटर बुक झालेत, शो लावलेत पण ते झालेच नाहीत तर त्याचे नुकसान सोसणे>>>>
हा एक मुद्दा आहे. पण यात निर्मात्याचे वितरकाचे काय नुकसान होते की याचा इन्शुरन्स असतो की आणखी काही याची माहिती काढावी लागेल.

विषयाशी फार संबंधित नाही, त्यामुळे एडिट केलं

या धाग्यावर अवांतर आहे आणि या विषयावर लिहीणे योग्य आहे का माहिती नाही.

पण गेली काही वर्षे भावना दुखावणे, भावना दुखावण्याची टिंगल आणि अभिव्यतीस्वातंत्र्य याबाबतीत टोकाची मतं व्यक्त होतात. त्यात विवेक आढळत नाही. भारत हा काही पाश्चिमात्य देशांसारखा किंवा पूर्वकडच्या देशांसारखा (त्यातल्या त्यात) एकजिनसी देश नाही. श्रमजीवींना एक्स्पोजर मिळून खूप अवधी लोटलेला नाही. त्यांना पाश्चात्य जगाच्या व्याखेत तोलणं हा अजणातेपणी किंवा जाणतेपणी केलेला बौद्धिक गाढवपणा (माफ करा शब्द नाही सापडला) वाटतो.

तर जे बुद्धीजीवी राहिलेले आहेत ते ही भावना दुखावण्यातून बाहेर पडलेले नाहीत. म्हणजे जो काही वर्ग यातून बाहेर पडलेला आहे तो अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्यासारखा आहे. यांनी एखादी गोष्ट भावना दुखावणारी आहे किंवा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे हे ठरवणे हे बुद्धीमान काम असेल, पण ते शहाणपणाचं असेल का ? म्हणजे समाजस्वास्थ राखण्यासाठी बुद्धी गरजेची कि शहाणपणा ?

न्यायालयात काही काही गोष्टी ही जज्जच्या बुद्धीवर सोडून देण्याचं कारण हे असेल का ? या पोस्टमधे उदाहरण दिली नाहीत नाहीतर मोठी होईल.

ताक : @ साजिरा, अगदी समयोचित व्हिडीओ दिला आहे. खूपच सुंदर. बर्‍याच शंकांचं समाधान आहे.

ह्या वादावरून "एकूण समर्थांनी मूर्खांची एव्हढी लक्षणे लिहूनही काही बाकी राहिली" हे आठवले.

सेंसॉर बोर्डाने संमत केलेल्या सिनेम्यावर नंतर गदारोळ उठला तर त्यावर बोर्डाची काही कायदेशीर किंवा नैतिक भुमिका असते का, आणि ती कायदेशीर भुमिका बजावल्याची, किंवा नैतिक भुमिका जाहीर केल्याची उदाहरणं आहेत का? कुणाला माहिती असेल तर लिहा..

साजिरा, सेन्सॉर बोर्डाला देव बनवू नका.
त्यांचाही चुका करायचा आणि नंतर त्या सुधारायचा हक्क अबाधित राहू द्या Happy

(याचा अर्थ या केस मध्ये ते चुकले असे म्हणायचे नाहीये)

'देव' कुठचीही नैतिक भुमिका घेत नाहीत, जाहीर करतही नाहीत.

असे गदारोळ सतत होत आहेत, आणि त्यांची अनेक टोके आहेत. त्यासंदर्भात सेंसॉर बोर्ड कुठे काही म्हणत आहे किंवा म्हणाले आहे का, असा प्रश्न आहे. कुणावरही नेम नाही, आणि कुणालाही दोष नाही.

आपली बुद्धी कशात खर्च करायची, जग कुठे चाललय, आपण कशावरुन वाद घालतोय - कशाचा कशाला पत्ताच नाही.
ऋन्मेष तुम्हाला उद्देश्युन नाहीये. इन जनरल या काँन्ट्रोव्हर्सीबद्दल लिहीलेले आहे.

असामी Lol
सिनेमाचे नाव बदलून मन की बात करा" >> सिक्सर! Lol

Pages