कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदा आंबा नाही हे पालुपद गेली ३० -३५ वर्षे मी कोकणात ऐकतो आहे.

पाच पैकी निदान चार वर्षे तरी हेच पालुपद असते.

कारण मुंबैकरांकडून भाव जास्त मागण्यासाठी ती फिल्डिंग लावली जाते.

थोडा फार चढउतार असतोच. फलमाशी वगैरेचे कौतुक ज्यांना आंबा निर्यात करायचा आहे त्यांच्यासाठी कीटकनाशक वापरता येत नाही म्हणून ठीक आहे.

कोणत्याही वर्षी कोकणात काही भागात भरपूर आंबा असतो आणि काही भागात कमी. एखादेच वर्ष असे असते जेथे सरसकट आंबा जास्त किंवा कमी असतो.

भरत,

झ का स

आबशोला है, कैरी के बालां है, आम के झाडां है, बचपने से बनारै उनों, हौर क्या होना ? 😀

@ अमितव,

… माबोवरची जागा न वापरता, इथे फोटो शेअर करायचा सोपा उपाय…

हे सांगा. त्याबद्दल तुम्हांला गिफ्ट इन एडव्हांस 👇

4e8999ad-7bb3-4d62-9980-ae9fb3e964da.jpeg

तुमच्या दोन धाग्यांचं फ्युजन - कच्ची कैरी का अबशोला>>>>>> हे भारी आहे. जबरी
फुटक्के चिंधिया चिंधिया हो गई>>>>> Lol
आबशोला हा शब्दच पहिल्यांदा ऐकला.

उपकरी? Happy म्हणजे, मेन कोणती तरी करी झाल्यावरची ही उपकरी?
की खाणार्‍यावर उपकार करण्यासाठी केलेली करी?

आंबे उपकरी.. ( नुसती फोडणीची भाजी असते त्याला उपकरी म्हणतात.. ) गोवा.. कारवार ला ह्याला आंब्या हुमन म्हणतात..
BTW आपण हि आंबे उपकरी करून खाणाऱयांवर आपण उपकारच करत असतो.. आधी ते झाडाखाली पडलेले लहान आकाराचे रायवळ.. किंवा बिट्टी आंबट गोड आंबे वेचून आणा. आंबे गोड असतील तर.. आंबटपणासाठी आंबट कैरीच्या फोडी टाका.

श्रवु्

उपकरी = 👌

शॉर्ट रेसेपी जरूर लिहा

यंदा दारच्या रायवळ आंब्याला उशिरा मोहोर आलाय त्यामुळं अजून छोट्याशा आहेत कैर्‍या. 🙂

🥭🥭🥭

रच्याकने : अमितव यांना वेळ देता आलेला दिसत नाही त्यांची गूगल फोटोज सोपी पद्धत द्यायला.

इथे गूगल ड्राईव्ह वरुन फोटो डकवण्याची पद्धत दिली आहे. पण ज्यांना लिंक बदलणे, img टॅग मधे अडकवणे, मग माबोवर पेस्ट करणे हे त्रासदायक वाटतं त्यांच्यासाठी हा सोपा पर्याय.

१. हे वेबपेज बुकमार्क करुन ठेवा.

२. गूगल ड्राइव्ह मधील पब्लिक शेअर्ड फोटोची लिंक पहिल्या चौकटीत द्या. फोटोशी निगडित Alt शब्द दुसर्‍या चौकटीत देऊन Generate link वर क्लिक करा.

३. Direct Image Url च्या खालच्या दुसर्‍या चौकटीतील html version कोड कॉपी करा.

४. मायबोलीवर पेस्ट करा. फोटो डकवला जाईल.

@ सुनील.

बेबी मँगोज = 👌

तुमच्या ट्रिक ने फोटो अपलोड करून बघतो. नवीन एक फोटो डकवायचा झाला तरी आधीचे काही काढून टाकावे लागत आहेत. जागा नाहीच माझ्याकडे.

बरेच दिवसांनी मायबोलीवर आलो.
आंबे उपकरी.. जबरी दिसतंय...
@ सुनील, बालकैऱ्या मस्तच.

ह्या घ्या कैऱ्या... परभणीवरून थेट...

20260323_193635.jpg

आंब्याचे रायते

पहिल्यांदाच हा पदार्थ केला. पण भारीच लागतोय.

Mango Raita

पाकृ:

https://www.youtube.com/watch?v=s0BKVHH8kN8

@सुनील, फोटो द्यायची नवीन पद्धत सुट्सुटीत आहे. धन्यवाद.

ऋतुराज,

Welcome Back. वानवळा = 🤤

माधव,

प्रकरण चमचमीत दिसत आहे. शॉर्ट रेसिपी लिहा सोबतच, चवी ची कल्पना येण्यासाठी.

❝ हे रायवळ आंबे आहेत की तोतापुरी? ❞

देवकी, यू इज द म्हणिंग राईट !

तोतापुरीच आहेत.

रायवळ लिहिलं का मी? 🤦

@माधव 🙏

क्यूट आहे सट आणि तो चौकोनी तळाचा ग्लासही!
सट बघितल्यासारखा वाटतो. Happy

माझा डाळ-पन्ह्याचा फोटो काढायचा राहिला यंदा.
पण हा इथे रसरशीत मेक्सिकन शँपेन आंबे आलेत बाजारात त्यांचा फोटो:
936d06c6-aa55-4e86-9648-54f61db20ba7.jpeg

चौकोनी तळाचा क्यूट ग्लास …

होय, जणू ऑरिगामी कलाकृती. आतले द्रव तर पसंतीचे आहेच.

आमच्याकडे यंदा कैरीच्या पन्ह्यात पाण्याऐवजी सोडा वॉटर टाकून त्याचे रॉ मँगो मोईतो करण्याची थेरं चाललीत 😀

मेक्सिकन मँगोज् = सालीचा रसरशीत रंग आणि चमकदार skin 😍

>>> रॉ मँगो मोईतो करण्याची थेरं चाललीत
चांगली आठवण करून दिलीत! आता आणते पुन्हा कैर्‍या. आणि पुदीना. आणि रम. Happy
थेरां कायकू बोलते?! Proud

Pages