
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
देवकी लोणच्याचा फोटो सुरेख
देवकी लोणच्याचा फोटो सुरेख अहे.
.
ममो आमरसाचा फोटो मलाच का दिसत नाहीये?
सर्व फोटो अप्रतिम !
सर्व फोटो अप्रतिम !
आमच्याक्डे काल सिझनचे पहिले आन्बे आलेत..हापुस बिपुस नाही मेक्सिकन..पिकवावे लागतिल पण रन्ग वास चान्गला आहे.
धन्यवाद अन्जूताई आणि अमित.
धन्यवाद अन्जूताई आणि अमित.
डाळ तूरीची असते का यात? का चण्याचीच भिजवून घालतात. मग हे वरणच होईल जे आम्ही करतो पण त्याला आंबाडाळ म्हणत नाही.
ममोंमुळे मी भेळ करून खाल्ली, फोटो नाही. असाच विश्वास ठेवा आता.
प्राजक्ता, हो. आमच्याकडेही हा Ataulfo ज्याला मी अल्ताफ असं वाचते. तो दिसला.
"तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे" पण आठवतं मागोमाग.
परफेक्ट पिकलेले,.... तेच
परफेक्ट पिकलेले,.... तेच मनाला भावले. कापले आहेत पण देखणे.
बेडेकर लोणचे मसाला आहे. यावेळी मी स्वतः करायच्या फंडात पडले नाही.
तुम तो ठहरे परदेसी
तुम तो ठहरे परदेसी 😀
हेमाताई फोटो आहाहा.
हेमाताई फोटो आहाहा.
आमचेही काल आले गावाहून हापूस, कच्चे आहेत, पिकले की फोटो काढेन.
सोबत दोन पायरी, चार केशर आलेत. एकेक झाड आहे त्याचे.
हेमाताईंचे सदरीकरणाकडे
हेमाताईंचे सदरीकरणाकडे काटेकोर लक्ष असते, नुसतं रंगसंगतीकडेच नाही.
@अस्मिता वरण शिजवतात ना? आंब्याच्या डाळीत चणाडाळ भिजवून कच्चीच भरड वाटतात.
हेमाताई फोटो फार सुरेख!
हेमाताई फोटो फार सुरेख!
लोणचं अशक्य मस्त दिसतंय..
कैरी भेळ.. अहाहा... केली पाहिजे!
आंबेडाळ पण तोंपासू!
इथे आलं की कामात लक्ष लागत नाही.
माधव, मला वाटलं तूर डाळ आहे
माधव, मला वाटलं तूर डाळ आहे की काय! कळाले.
सर्वांना आंबा , भेळ ह्यासाठी
सर्वांना आंबा , भेळ ह्यासाठी थँक्यू. सामो तुला का दिसत नाहीयेत फोटो कोण जाणे ? नेहमी करते तसेच केलेत अपलोड.
आंबा कापण्याचं पण एक तंत्र आहे. जास्त फुगीर भाग असतो तिथेच दोन्ही बाजूनी आंबा कापायचा. तसेच कोयीला चिकटून असलेल्या रेषा फोडीत येऊ नयेत म्हणून अगदी कोयी लगत ही कापायचा नाही . आजचे आंबे आमच्या मुलाने कापले होते.
अस्मिता आंबा डाळ इथे बघ. ह्याच्याशी चैत्र गौर हळदी कुंकवाच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत, म्हणूनच ती जास्त आवडते असं वाटत. हल्ली मिक्सर मध्ये करतो , आमची आई खलबत्त्यात कुटून करत असे. ती कुटायचं काम माझंच होतं. प्रत्येक घरागणिक थोडा बदल रेसिपि मध्ये होत असेलच पण ही बेसिक रेसिपी आहे. आमच्याकडे ह्यात सुक्या खोबऱ्याचा कीस घालतात, फोडणीत लाल सुकी मिरची असते. थोडा कच्चा हिंग ही घालतो वासासाठी. आंबट थोडी गोड , तिखट अशी चव असते.
हो हो हीच ममो. आम्ही कैरीची
दोन तिन वेळेस ३५-५० $ घालवुन
दोन तिन वेळेस ३५-५० $ घालवुन हापुस /केशर बन्डल निघाल्यापासुन मॅरेथॉन अटाल्फो वर समाधान मानुन घेतो...भारतातल्या अनेक गोस्टी बरोबर हापुसला मिस करतो.
बाजारात हापुस होता तेव्हा तो घ्यायची ऐपत नव्हती आता ऐपत आहे तर हापुस मिळत नाही
अस्मिता चणाडाळ भिजवलेली,
अस्मिता चणाडाळ भिजवलेली, वाटून कच्ची घालतात किसलेल्या कैरीत किंवा कैरी घालतात डाळीत. मी थोडी मुगडाळ घेते, माझी मीच कधीतरी. तूरडाळीचा काहीच संबंध नाही.
तू वरणापर्यंत नको पोचूस
नांदेडला चैत्रगौरीचं हळदीकुंकु नसतं का.
तुझी पोस्ट आत्ता वाचली, तू
तुझी पोस्ट आत्ता वाचली, तू परतून करतेस अच्छा.
पैशाकडे बघायचं नाही आणि हापूस
पैशाकडे बघायचं नाही आणि हापूस आणायचे. बरे निघाले तर ठीक नाहीतर हॉटेलातल्या एका जेवणावर १०० - १५० घालवतो आणि ते ही बेकार निघतच तसे आंबे खराब होते नशिबात म्हणायचं. गेली तीन चार वर्षे हापूस चांगलेच निघाले आहेत. पूर्वी मुद्दाम पिकवलेले बाठीला खराब निघत, पण हल्ली बरे निघतात. बट अगेन हु नोज यंदा काय होईल!
काल मी ही अल्तुफो आणले आहेत.
इंग्रोत आलेत का हापूस?
हो हो. ओटीत येते ती भिजवलेली
आमच्याकडे कोकण प्रांतात
आमच्याकडे कोकण प्रांतात आंब्याची (कैरीची डाळ) आणि पन्हे करून प्रसाद म्हणून देतात आणि भिजवलेल्या हरबऱ्याची ओटी भरतात, त्याची घरी जाऊन उसळ करायची. आंब्याची डाळ करायची जबाबदारी हळदीकुंकु ज्यांच्याकडे असतं त्यांची असते.
हळदीकुंकु केलं नाही केलं तरी आंब्याची डाळ चैत्रात घरी करून खायची असते आणि सोबत पन्हे करायचं असतं. शास्त्र असतं ते. असं केलं की थोडी शेजारी देते, माहेरी पाठवते.
आमच्याकडे कोकण प्रांतात
आमच्याकडे कोकण प्रांतात आंब्याची (कैरीची डाळ) आणि पन्हे करून प्रसाद म्हणून देतात आणि भिजवलेल्या हरबऱ्याची ओटी भरतात, त्याची घरी जाऊन उसळ करायची. आंब्याची डाळ करायची जबाबदारी हळदीकुंकु ज्यांच्याकडे असतं त्यांची असते.>>> अन्जु , मला वाटत बहुतेक ज्याच्याकडे चैत्रगौर हळदीकुन्कु करतात त्याच्याकडे हिच प्रथा आहे , आइकडे खिरापत पण असते गणपतित करतो ती .
नाशिक,पुणे, जळगाव, नागपुर सगळीकडे तु लिहलय तेच बघितल आहे.
इंग्रोत आलेत का हापूस?>> अजुन
इंग्रोत आलेत का हापूस?>> अजुन तर नव्हते आले, मागच्या वेळेस आणलेले खराबच निघाले, आता परत जरा दुसरीकडून आणू....ढालगज मेले, लगेज बरोबर आणु देत नाहित...नाहितर स्वतःच मागवुन घेतले असते.
प्राजक्ता थँक्स.
प्राजक्ता थँक्स.
अस्मिताने नांदेडकडचं थोडं वेगळं लिहिलं ना, म्हणून मी नक्की माहितेय कसं तो कोकण प्रांत म्हणून तसं लिहिलं.
अकबराच्या आंब्याच्या बागेच्या
अकबराच्या आंब्याच्या बागेच्या गोष्टी ऐकून दादोजी कोंडदेवांनी खेड शिवापूर ला शहाजी राजांसाठी आंब्याची बाग वसवली होती त्याची आठवण झाली..
कैरी आणी आंबे आणले आहेत..पण आंबे अजून हवे तसे गोड नाहीत. कैरीची कढी, तक्कु , मेथांबा करून झालाय..
Pages