कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उशिरा प्रतिसाद देण्याबद्दल सॉरी. पण फोटो अपलोड न करता शेअर करायला मी खालील प्रकारे करतो.

अ. गूगल फोटो अल्बम तयार करणे आणि त्याची लिंक पब्लिकली उपलब्ध करुन देणे.
हा भाग फक्त एकदा करायचा आहे.

१. गूगल फोटोजला जा. https://photos.google.com/albums
२. तिकडे एक नवा अल्बम क्रिएट करा. वरची अल्बमची लिंक ओपन केलीत की उजव्या बाजूला वरच्या कोपर्‍यात 'क्रिएट अम्बम' आणि 'अधिक' ची खुण असेल त्याचा वापर करा.
३. या अल्बमला मायबोली किंवा काहीही सुटसुटीत नाव द्या, आणि आता मायबोलीवर शेअर करायचे फोटो यातुनच शेअर करत जा, म्हणजे तुमचे खाजगी फोटो आणि सार्वजनिक फोटो यांची काही गल्लत होणार नाही.
४. अल्बम तयार करताना यात कुठले फोटो अ‍ॅड करायचे ते विचारलं की आपल्याला हवे ते फोटो त्यात टाका. हे नंतर ही करता येईल.
५. आता अल्बम मधुन बाहेर पडून परत एकदा आत जा आणि हवा तो फोटो आलाय खात्री करुन घ्या.
६. अल्बमच्या आत गेल्यावर उजव्या बाजूला वरच्या कोपर्‍यात तीन उभे डॉट्स दिसतील ते क्लिक करा, आणि ऑप्शन्स मध्ये जा. तिकडे लिंक शेअरिंग स्लाईड बार दिसेल तो अनेबल करा.

ब.
आता मायबोलीवर इथले फोटो लिंक कॉपी कशी करायची?
१. हा इमेज टॅग कॉपी करा. < img src= " " />
इथे हा टॅग दिसायला '<' आणि 'img' मध्ये मुद्दाम एक स्पेस देऊन सिंटॅक्स एरर केलेला आहे.
२. आता गूगल फोटोज मध्ये शेअरेबल अल्बम मधील कुठल्याही फोटोवर क्लिक करा.
३. फोटो ओपन झाला की त्यावर राईट क्लिक करुन 'कॉपी इमेज अ‍ॅड्रेस' वर क्लिक करा. या फोटोचा अ‍ॅड्र्रेस कॉपी होईल.
https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOniNfMJDzMQ_Qbk36_y6kOPC0FCnM...

४. आता हा अ‍ॅड्रेस वेगळा ब्राऊजर वापरुन ( नेहेमी क्रोम वापरत असाल तर मायक्रोसॉफ्ट एज मध्ये) चालतोय ना बघा. याने अल्बम शेअरेबल झाला आहे त्याची खात्री होईल. हे ही एकदा पहिल्या फोटोला केलंत की बास आहे.

५. आता वरच्या इमेज टॅग मध्ये src= " " मधल्या डबल टॅग मध्ये हा अ‍ॅड्रेस पेस्ट करा.
< img src="https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOniNfMJDzMQ_Qbk36_y6kOPC0FCnM..." />

इथेही तोच सिंटॅक्स एरर आहे. तो एरर अर्थात ती स्पेस काढलीत की फोटो दिसू लागेल.
६. प्रतिसाद सेव्ह करा.

यापुढे फोटो शेअर करताना इमेज टॅग कॉपी करणे, आणि त्यात सोर्स मध्ये अ‍ॅड्रेस सेव्ह करणे (अर्थात ब. १, ३, ५ ) या स्टेप्स केल्या की तुमच्या गूगल ड्राईव्ह वरचा फोटो शेअर होईल.

थेरां 😀

कैर्‍या. पुदीना. रम ? मग झकास होणार. करा, sip in style आणि आमच्यासाठी फोटो डकवा इथे.

इथेच कुठेतरी लिहिले होते की कोकम, पन्हे, chilled रस्सम हे सगळे पाण्याऐवजी सोडा वापरून केले तर “टॉक्क” लेव्हलचे होतात. इकडच्या स्वारींची ट्रिक. Try it guys.

रम - व्हडका घाला, घालू नका, आवडीप्रमाणे.

चिल्ड रसम म्हणजे काय?
चांगले लागते का?
अमित व, तुम्ही उदाहरणादाखल म्हणून टाकलेला फोटो फारच अप्रतिम आहे! सुंदर आकाशी छटा! डोळे अगदी निवले उन्हाच्या काहिलीत !
Happy

… चिल्ड रसम म्हणजे काय?

आपले नेहेमीचेच रस्सम हो. बर्फगार करायचे आणि Aperitif म्हणून काचेच्या सुंदर ग्लासात घालून प्यायचे. उन्हाळा साजरा करायला नको का ? Try it.

कैरीचे रस्सम केले तर सोने पर सुहागा आणि धाग्याच्या विषयानुकूल.

उन्हाळ्यात नेहमी रायवळ आंब्यांच्या सासव ची रेसिपी पाहते पण रायवळ आंबे मिळालेच नाही कुठे मागच्या उन्हाळ्यात. यावर्षी पुन्हा मला चिडवण्यासाठी सोमी वर तीच रेसिपी दाखवण्यात आली. झालं.. अस्मादिक पुन्हा तयार झाले की यावर्षी जमवूच. तशीच तडक पिंपरी मार्केट गाठून जंग जंग पछाडले. सगळे फळवाले मला सांगून थकले की बाई रायवळ आंबे आत्ता कुटं, पण मी ऐकतेय कुठे म्हटलं रेसिपी वाल्यांना मिळताय मलाच का गावत नाय. पण नाही मिळाले कुठे पण मी हार n मानता परत पुढच्या महिन्यात जाणार..

सान्वी,हल्ली रायवळ आंबे मिळत नाहीत.बर्‍याच जणांनी असलेली झाडे तोडली आहेत म्हणे.यावर्षीचे पहिले सासव कर्नाटकी आंब्याचे केले.अर्थात चांगले लागले नाही.अगोड किंवा कोवळा हापूस्/पायरी आंब्याचे मी सासव करते.

Screenshot_20260328_184920_Gallery.jpg
दिल्लीच्या लाल किल्ल्यातील एका भिंतीवरील हे आंब्यांनी लगडलेल्या झाडाचे चित्र.

ऋतुराज , छान चित्र.
सध्या मी कोकणात आहे. आज सड्यावर बागेत गेलो होतो. ह्या वर्षी आंबे अजिबातच नाहीयेत. दरवर्षी आंब्यानी लगडलेली झाडं पहायची सवय झाली आहे पण ह्या वर्षी अजिबातच आंबे नाहीयेत. एवढ्या झाडांवर शोधून शोधून मोजून तीन आंबे दिसले खूप वाईट वाटलं बघताना. त्यामुळे फोटो काढावा असं ही वाटलं नाही. वर्षभराची मेहनत, खर्च अगदी च फलद्रूप झाली नाही ह्या वर्षी.

धागा असाच मोहरत राहो.…

तथास्तु ! Amen ! सुब्बाआमीन !

@ मनीमोहोर,

यावर्षी हापूस नाही / कमी आहे हे वाचून वाईट वाटते आहे.

ऋतुराज,

लाल किल्ल्यातले भित्तिचित्र छान.

इतक्यात renovate / repaint झालेले दिसतेय चित्रातलं दालन.

मुग़ल बादशाहांचे आंबा प्रेम well documented आहे, भरपूर लेखी पुरावे असलेले प्रेम.

अकबर पातशाहाने बिहार प्रांतात दरभंगा येथे उत्तमोत्तम आंब्यांच्या एक लक्ष वृक्षांची आमराई “खाजगी”तून (using personal funds) वसवली होती, फक्त स्वत:लाच हवे तेव्हढे आंबे खायला मिळावेत म्हणून.

पुढे अशीच भव्य खाजगी आमराई जहांगीरनी लाहौरला आणि शाहजहाँ ने दिल्लीनजिकच्या झरना कुतुब (आजचे महरौली) ला विकसित केली.

उन्हाळ्यात आवडत्या आंब्याच्या रसात शिजवलेला केसरिया पुलाव - आम का मुतंजन म्हणजे बादशाहांच्या दस्तरख़ानाची शोभा.

शहाजहॉं ने आपला उत्तराधिकारी दारा शिकोह याला आंब्याच्या grafting चे प्रशिक्षण घ्यायला लावले होते. दाराला बागकामाची फार आवड असल्याने त्याने अनुभवांती “नुस्खा दर फन्नी फलाहत" नामक पुस्तक सिद्ध केले त्यात आंब्याची लागवड, जोपासना, द्यायची खते, फळांची प्रतवारी वगैरे १२ अध्याय आहेत.

दुसरा मुलगा औरंगज़ेब दक्कनचा सुभेदार असतांना त्याला दरवर्षी दक्कनचे जातीवंत आंबे जलदगती सांडणीस्वारांकरवी शहाजहां बादशाहाला पाठवण्याचे फरमान होते. एका वर्षी औरंगज़ेबाने बादशाहाला न पाठवता सर्व आंबे स्वत:च फस्त केले म्हणून त्याला नाफ़रमानीचा दंड लावण्यात आला.

बादशाह बेगम नूरजहाँ ला आंब्याचे सरबत आणि पन्हें फार आवडत असल्याचे आणि तिने स्वत:च्या सिक्रेट रेसिपीने आंबा + गुलाब वापरून कलालांकडून एक विशेष मद्य बनवून घेतल्याचेही उल्लेख आहेत.

बादशाहों जैसे खास लोगों की पसंद “आम” है Happy

ज्जे बात, Cheers !

एकदम साग्रसंगीत.

फोटू = 👌

पण सोबत लिंबू ? आंबा पुरेसा आंबट नसावा

@ माझे आंबटशौक

c703e306-6e03-4697-b975-5f3ff7ced2e0.jpeg

सिंधी स्टाइल टका आमडीची तयारी. संध्याकाळी मसाल्यात घोळवून तव्यावर shallow fry.

हो, आंबा पिकून गोड झाला होता.
पुदिना आणायला गेले तेव्हा इथल्या Whole Foods दुकानात एक पाइनॅपल मँगो साल्सा मिळाला. दोन्ही फळं बारीक चिरलेली + हॅलापिनो मिरची + लिंबाचा रस + मीठ + कोथिंबीर + पुदिना + लेमन झेस्ट.

cb453e66-af4b-4abb-9261-471a925727c7.jpeg
फार भन्नाट चव होती. मग तोही क्रश करून घातला आमरसाच्या जोडीला. त्यामुळे मिरची निराळी घातली नाही, नाहीतर खरंतर तीही खरंतर असायची या फॅमिली फोटोत. Happy
पुदिना आणि लिंबू तरीही लागलंच - किंचित रस पिळून आणि गार्निश. त्याशिवाय मजा नाही कॉ/मॉकटेलला!

टका आमडी गूगल करते. कैर्‍या शॅलो फ्राय?! इन्टरेस्टिंग!

एक सहज सुचवणी देऊ का? इथे फोटो पेस्ट करताना मी एक थंब रूल म्हणून सहसा त्याचा साइज निम्मा तरी करते. हा असा:

Screen Shot 2026-03-30 at 8.54.23 AM.png

यामुळे (विशेषतः लॅपटॉपवर बघताना) फोटो 'इन युअर फेस' अगडबंब दिसत नाहीत - आणि मुख्य म्हणजे मजकूर झाकोळून टाकत नाहीत.

अर्थात, हा माझा पर्सनल चॉइस - सर्वांनाच रुचेल असं नाही, आणि सगळ्याच फोटोंना लागू पडेल असंही नाही. Happy

इतक्यात renovate / repaint झालेले दिसतेय चित्रातलं दालन.>>>>>> नाही, मला तर ते जुनेच वाटले.

स्वाती, भन्नाट दिसतोय फोटो.
अनिंद्य,
सिंधी स्टाइल टका आमडीची तयारी, भारी दिसते आहे.
सुरमईचे काप जणू.
फायनल फोटो टाका

.. सुरमईचे काप जणू….

हो. भाचा याला “व्हेज फिश“ म्हणतो 😀 बहुतेक मी लिहिले आहे वर.

स्वाती, फोटो साइज कडे कधी लक्ष दिले नव्हते, आता देत जाईन. 👍

मँगो साल्सा, हॅलापिनो, लेमन झेस्ट ….. नावे ऐकूनच “टॉक्क” लेवल चे कॉकटेल झाले असणार खात्रीने

@ अन्जू,

कैरी कत्तल तर दररोज सुरु आहे माझ्याकडेही. लोणची, तक्कू, सलाड, कैरी डाळ, पन्हे, कैरीचा पुलाव वगैरे भरपूर प्रकार होत आहेत आणि नुसते मीठ लाऊन कैरी खाणे ही.

फोटो काढायचे थोडे कमी झालेय.

आंबे मात्र अजून म्हणावे तसे चांगले / मनपसंत आलेले नाहीत बाजारात 👎

तुम्ही सर्व मेहनती आहात.

तोतापुरी आंबा एकच आणलाय, थोडा मुरांबा करेन. मी खात नाही. बाकी मध्ये मध्ये भेळ, सॅलड (कैरी घालून), कोशिंबीर वगैरे सुरू आहे.

आंबेडाळ पन्हे एकदाच केलं, नवऱ्याने एकदा पो भा केंद्रातून डाळ आणलेली. सोसायटीत पहिल्यांदा यावर्षी सार्वजनिक चैत्रगौर हळदी कुंकु केलेलं, उत्साही मेम्बरनी, तेव्हा आंबेडाळ खूप मागवलेली, त्यामुळे भरपूर मिळाली, फ्रिजरमध्ये ठेवली, दुसऱ्या दिवशी खाल्ली, परत वरून फोडणी करून.

Pages