
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
भारी!
भारी!
चैत्र अभी बाकी है, मेरे दोस्त
चैत्र अभी बाकी है, मेरे दोस्त!

वा मस्त. चांदीचं ताट वगैरे
वा मस्त. चांदीचं ताट वगैरे काही ऐकत नाही.
मस्त स्वाती
मस्त स्वाती
सेम वाटी आहे माज्ञ्याकडे
वॉव स्वाती! किती सुरेख!!
वॉव स्वाती!
किती सुरेख!!
फणसाचे सांदण आणि सान्ना भाउ
फणसाचे सांदण आणि सान्ना भाउ-बहिण आहेत.
फक्त ह्याच्यात भाताची पेज व शहाळ्याचे पाणी असते आंबवलेले (सूर) तांदूळाच्या रव्यात. आता, प्रत्येक घराची पद्धत असतेच वेगळी.
ओके, सूर = शहाळ्याचे आंबवलेले
ओके, सूर = शहाळ्याचे आंबवलेले पाणी ?
नवीन माहिती मझ्यासाठी. 👍
तुम्ही कैरी पापडाचा विषय शिताफीने टोलवलाय हे नमूद करतो याठिकाणी 😀
@ स्वाती, राजेशाही सरंजाम 👌
सायो, what telepathy !!! मी
सायो, what telepathy !!! मी वाटच पहात होतो तुमच्या अपडेटची.
मी इच्छा व्यक्त केल्याबरोबर बहिणीने बेत अमलात सुद्धा आणला. हापुस आंबा.
फक्त आत सारण (?) भरले की आंबे (की mango shell) लवंडत होते. मग असा गार केलेल्या metal glasses चा जुगाड करून “उभे” केले. 👆
आता फ्रिजमधे थोडा मुक्काम.
इंशागोविंदा लवकरच मुखी पडावी ही कुरेमल स्टाइल
कुल्फी 😍
अनिंद्या अहो मी आहे लिखाणात
अनिंद्या अहो मी आहे लिखाणात आळशी
आणि असे खास मेनु काही मी बनवत नाही. तरी पण पारंपारीक रेसीपी टाकते आईला विचारून.
हि मी केलेली लिहिते. डिहाय्ड्रेटर (फळं सुकवायचे मशिन) मध्ये केला प्रयत्न पण जरा लिबलिबीत बन्नले. फ्रूट रोल सारखे लागले.
आंबट गोड कैरी पण पुर्ण आंबा नाही असा अवन मध्ये शिजवून घ्या. तुमच्या चवीप्रमाणे मसाले घाला. लाल मिरची, आलं खिसलेलं(हवच), सैम्धव नमक, गुळ, जीरे, मग ते गॅसवर घोटूनच घ्यायचे. मग ताटात थापून कडकडीत उन्हात वाळवायचे. मी ठेवले डिहाय्ड्रेटर मध्ये.
आता तुम्ही कराच आणि टाका इथे फोटो.
पारंपारीक रेसीपीत बहुतेक आरारूट व किंचित पापड खार घालून थापून सुकवून मग तळून खायचं. उपवासाला चालतात. चकचकीत दिसतात आरारूटने
पण इतकी मगजमारी कशाला?
सूर = शहाळ्याचे पाणी दोन दिवस आंबवायचे वरती फडका बांधून.
मी आहे लिखाणात आळशी….
…मी आहे लिखाणात आळशी….
गंमत केली हो. उलट विस्तृतपणे सांगितले तुम्ही, आळस न करता. थँक्यू. केले तर फोटो डकवीन इथे.
प्रज्ञा९, पायरी च्या रेटकार्डबद्दल आभार
वा अनिंद्य, मस्त दिसतेय तुमची
वा अनिंद्य, मस्त दिसतेय तुमची कुल्फीही. ग्लासचं काही सुचलं नाही. म्हणून अंडी ज्यात येतात त्या ट्रेमध्ये ठेवले आंबे.
सर्व फोटो एकसे एक.
सर्व फोटो एकसे एक.
सायो भारीच, अनिंद्य बहीणीचीही कमाल.
अनिंद्य, भारी दिसतोय
अनिंद्य, भारी दिसतोय इन्शागोविंदा तुमचा.

सायो, कुल्फीची रेसिपी शेअर करणे.
अवल, हो या फार फॅशनीत होत्या वाट्या!
सायो, Ataulfo चा असा वापर
सायो, Ataulfo चा असा वापर पुढच्या वेळी करण्यात येईल
यावेळी आणलेले चारही आंबे गोड निघाले चक्क त्यामुळे इतर काही करायचे सुचले नाही.
अनिंद्य, कुल्फी भरला हापूस म्हणजे टोटली डोळ्यात बदाम!!
स्वाती, चांदीच्या वाटी
स्वाती, चांदीच्या वाटी भांड्यातलं डाळ पन्हं पाहून चैत्र गौरीचा नेवैद्य च आठवला. मस्तच...

सायो, आंबा कुल्फी छानच दिसतेय.
कुणाल कपूर ने का कोणी तरी कलांडायला नको म्हणून असेच स्टीलच्या ग्लासा मध्ये आंबे ठेवलेले पाहिले होते व्हिडिओ मध्ये. असो.
आज मी केलेलं पन्हं.. स्टीलच्या पातेल्यात नको म्हणून काचेची चहाची किटली आहे जी चहा करायला विशेष वापरली जात नाही त्यात ठेवलं आहे.
सर्व कौतुकउधळ्यांचे आभार.
सर्व कौतुकउधळ्यांचे आभार. सायो यांनी आयडियाची कल्पना सर्वप्रथम मांडली त्यामुळे त्यांचे तर विशेषच. 🙏
पहिला कोरीव क़ुल्फ़ी आंबा कापला, थोडी घाईच झाली. निष्कर्ष = सेटिंग साठी किमान एक दिवस द्यावाच.
फोटो काढल्यानंतर परत freezer मधे पाठवली कुल्फी आणि नंतर बदाम काप वगैरे टाकून सजावट. आंबे अती गोड असल्याने वरून साखर टाकली नाही
खाण्याची घाई झाल्याने makeup केलेल्या मँगो सुंदरीचे फोटो काढायचा विसर पडला 😀
माझ्या सुखसंवर्धनासाठी नित्य तत्पर असणाऱ्या बहिणीला जादू की झप्पी ❤
अहाहा भारी दिसतेय अनिंद्य.
अहाहा भारी दिसतेय अनिंद्य.
कातिल दिसते आहे कुल्फी!
कातिल दिसते आहे कुल्फी!

आता करणं आलं - मला हवी म्हणून नव्हे, तुमच्या पोटात दुखू नये म्हणून!
सायो, स्वाती
सायो, स्वाती
तुमच्या सचित्र अहवालाची वाट पहातो आहे
म्हणून अंडी ज्यात येतात त्या
म्हणून अंडी ज्यात येतात त्या ट्रेमध्ये ठेवले आंबे.>> ही आयडीया भारिच आहे की!
खाण्याची घाई झाल्याने makeup केलेल्या मँगो सुंदरीचे फोटो काढायचा विसर पडला >> हापुस सिर्फ नाम ही काफी है
दोन्ही फोटो भारी
स्वातिचा फोटो बघुन चैत्र गौरीचे हळदीकुन्कु आठ्वले...
मनिमोहरची आयडीया मस्त आहे पन्ह सर्व्ह करण्याची.
भारी दिसते आहे आम्रसुंदरी! या
भारी दिसते आहे आम्रसुंदरी! या बाफवर येऊन जळजळच फार होते आहे !
… जळजळच फार होते आहे…
… जळजळच फार होते आहे…
अरे तुम्हीपण करून बघा की. आंबेका सीझन भी है, मौका भी है, यहॉं रेसिपीज भी है
काय म्हणता ?
आज बरंच काही केलं, फोटो काढले
आज बरंच काही केलं, फोटो काढले पण नंतर कश्मीर घटना समजली, एकदम निराश झाले, फोटो सकाळी पोस्ट करेन.
सगळ्यांचे फोटो मस्त. माझं पन्हे सेंद्रिय गुळ पावडर घातल्यामुळे ब्राऊनच होतं.
एक आंबा कापण्यात आलेला आहे.
एक आंबा कापण्यात आलेला आहे.

वा सायो! फारच सही दिसतंय हे
वा सायो! फारच सही दिसतंय हे प्रकरण!
सहीच सायो.
सहीच सायो.
भाहारीही!!
भाहारीही!!
मस्तच हं सायो!
मस्तच हं सायो!
काल संध्याकाळी कैरी शिजवून गर
काल संध्याकाळी कैरी शिजवून (उकडवून) गर काढून त्याचा गुळांबा, आम (चिली फ्लेक्स वापरले, लाल सुक्या मिरच्यांऐवजी) आणि पन्हं केलं
डावीकडे आम आहे, उजवीकडे गुळांबा.
फोटो नवऱ्याने, त्याच्या मोबाईलने काढलेले बरे आले. त्यामुळे तेच पोस्ट करतेय.
मागे इथेच लिहिल्याप्रमाणे पन्हं मिक्सरमध्ये केलेलं किंवा गाळून घेतलेले आवडत नाही आमच्याकडे, खाताना तोंडात गर यायला हवा. सेम आमरसबाबत गुठळ्या यायला हव्यात खाताना तोंडात.
मस्त ! आम म्हणजे काय असतं?
मस्त ! आम म्हणजे काय असतं?
Pages