Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>>कुत्री जेव्हा पुर्ण
>>>>>>कुत्री जेव्हा पुर्ण रिलॅक्स असतात तेव्हाच असे पाठीवर झोपतात.
मांजरे, कुत्री पाठीवर लोळत, आपल्याला जेव्हा पोट दाखवितात तेव्हा समजावे की त्यांनी आपल्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे. इट इज अ सेफ स्पेस फॉर देम.
हाहा सिंबा सिली बॉय
हाहा सिंबा सिली बॉय


मिडियावर त्याचे इन्तरव्ह्यू व्हायरल झालेत 
लेटेस्ट ती गोल्डन रिट्रिवर ची बातमी पाहिली की नाही. एका बंद घरात इन्ट्रुडर घुसला. घरात उचकापाचक केली, फूड घेऊन खाल्ले, नॅप पण घेतली. त्यांचा गोल्डन घरात होता. तो अजिबात भुंकला वगैरे नाहीच उलट तीन वेळा त्या चोराकडे जाऊन चल खेळु म्हणून त्याला टॉय दिले
मालक बाहेर होते त्यांनी हे सर्व रिंग कॅमेर्यात पाहिले ( डोक्याला हात लावला असेल) आणि पोलिस बोलावले, पोलिस आल्यावर त्यांचे देखेल या गोल्डन ने टॉय देऊन स्वागत केले
अशा रितीने गार्ड डॉग म्हणुन सपशेल नापास झाला बिचारा स्वीट डॉग
हो मी पण वाचलं.किती गोड असेल
हो मी पण वाचलं.किती गोड असेल ते कुत्रं. आमच्या घरचे म्हटले की त्याचे मूळ मालक त्याला वेळ आणि प्रेम देत नसतील म्हणून बिचारं आल्या गेल्याकडे खेळणं घेऊन जात असेल.
मूळ मालक त्याला वेळ आणि प्रेम
मूळ मालक त्याला वेळ आणि प्रेम देत नसतील म्हणून बिचारं आल्या गेल्याकडे खेळणं घेऊन जात असेल.... हेच मनात आले. तसेही लॅब आणि रिट्रिवर हे संरक्षण करण्याचे नाहीत.
आमची लॅब्राडूडल बेल वाजली की
आमची लॅब्राडूडल बेल वाजली की आधी जिन्याच्या वरच्या लॅंडींगकडे पळते मग तिथून सुरक्षित अंतरावरुन भुंकणे चालू करते
आमच्या घरचे म्हटले की त्याचे
आमच्या घरचे म्हटले की त्याचे मूळ मालक त्याला वेळ आणि प्रेम देत नसतील >>> उलट असण्याची जास्त शक्यता आहे.
म्हणजे घरच्यांशी नेहमी तसे खेळायची सवय असल्यामुळे इन्ट्रुडर शी तसेच वागला असेल. कुत्र्यांना सवय असते खेळणे आणून पायाजवळ ठेवायचे अन म्हणायचे खेळा! गोल्डन तसेही फ्रेन्डली असतात फार.
हो, असू शकेल.मूळ ब्रीडच
हो, असू शकेल.मूळ ब्रीडच प्रेमळ दिसतेय. तसंही कुत्री मांजरं आणि लहान मुलं अन प्रेडीक्टएबल वागू शकतात.
विकऐंड चा आराम सुरू …
विकऐंड चा आराम सुरू …
वाह! राजबिंडां कोण आहे!
वाह! राजबिंडं कोण आहे!
खरंच राजा आहे.
खरंच राजा आहे.
काल मित्राकडे गेलो होतो,
काल मित्राकडे गेलो होतो, त्याने नुकतीच ही मनीमाऊ ॲडाप्ट केली आहे. मनीबाई मी तिथे गेल्यापासून माझी पाठच सोडे ना. खातांना देखील मांडीवरच बसुन होती. घरी निघालो तर ती पण माझ्या मागेमागे निघाली, शेवटी ऊचलून मित्राच्या हाती द्यावी लागली धरायला. काय कनेक्शन होतं माहित नाही पण मनीला बहूदा माझी कंपनी आवलेली दिसते
कसलं गोड!!
कसलं गोड!!
खूप छान...
खूप छान...
मांजरे खूप कमी जणांना असा भाव देतात.. लकी आहात..
पण घरी नेले असते तर सिंबाने घर डोक्यावर घेतले असते.
धनवन्ती — घरी नेण्याचा विचार
धनवन्ती — घरी नेण्याचा विचार पण नाही करू शकत.
मागे एकदा बायकोने घरी एक डॅागी टेडी आणला होता, तर जेलसी ऐव्हडी झाली सिंबाला की त्याने दुसर्या दिवशी तो टेडी गुपचूप मागे झाडीत नेऊन ठेवला होता. परत घरी आणला तर परत त्याची रवानगी घरा बाहेरील झाडीत झाली. व्हीडीओपण आहे करीन शेअर कधीतरी.
सिंबा हे पण भारी गोड! केवढं
सिंबा
हे पण भारी गोड! केवढं कळतं ना त्यांना.
सॅमी जरा चिवित्रच वागते कधीकधी. सगळे दुनियातले आणलेले स्क्रॅचर सोडून आमचा सोफाच खराब करायचा असतो आणि जिथे करते तिकडे नखं हमखास अडकतात मग अजून ओरखडू नये म्हणून त्यातून सोडवायला गेलं तर ओरडते आणि चावायला बघते. परवा एवढा आवाज केला नवरा उठून आला की मी काय करतेय तिला म्हणून.
काल तिला एक पक्ष्यांचा विडीओ दाखवत होते लॅपटॉपवर तर उडी मारून त्याच्या मागे गेली तिकडे आहेत का बघायला. एकदा दाखवलं की इंडियातली एक मांजर वाट बघतेय पहाटे दुधवाला भैय्या येईल आणि तिला दुध देईल. १-२ तास बिचारी गेटच्या इथे बसून होती. तो आला की घुटमळणं चालू त्याच्या सायकलपाशी. म्हटलं सॅमीला तुला बघ किती रॉयल ट्रीटमेंट मिळतेय. मागायच्या आधी फुड हजर असतं.
तर काही ढिम्म दाद दिली नाही. व्हॉटेव्हर!
काल तिला एक पक्ष्यांचा विडीओ
काल तिला एक पक्ष्यांचा विडीओ दाखवत होते लॅपटॉपवर तर उडी मारून त्याच्या मागे गेली तिकडे आहेत का बघायला — हे भारी आहे. मांजरं जात्याच जरा explorer स्वभावाची असतात…
आमचं येडं टीव्हीवर जरी प्राणी दिसले तरी भुंकतात. परवा सिंहाला पाहून भुंकत होता, म्हटलं लेका खरा सिंह नुसता समोर आला तरी चड्डी पिवळी होईल तुझी …
दिपावलीच्या सगळ्यांना हार्दिक
दिपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा
आता डिजे आणि ऑस्करचा दिवाळी
आता डिजे आणि ऑस्करची दिवाळी क्लिप पाहिली, मस्त आहे. अगदी जरीचा ड्रेस आहे ऑस्करला. खूपच गोड दिसतोय.
आताच मी दिवाळी म्हणून कोकोनटला खरखर खरारा टाईप स्नान घालून बसले होते, सगळे बाथरूम ओले केले. वर ते सुद्धा undo करायला गवतात लोळून आला.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DflVpKLxtFm/?obrf=MXhkeW0yOXN2aDZvaQ==
सिंबा एक नंबर नाटकी आहे. मुलगी नुसती त्याची नखं कापण्याची ॲक्टींग करत होती, पण हा असं ॲक्ट करतोय की खरच नखं कापताय याची आणी याला दुखतंय
आताच मी दिवाळी म्हणून
आताच मी दिवाळी म्हणून कोकोनटला खरखर खरारा टाईप स्नान घालून बसले होते, सगळे बाथरूम ओले केले. वर ते सुद्धा undo करायला गवतात लोळून आला. >>
अरे देवा !! हॉनेस्टली सान्गा पेट पॅरेन्ट्स लोक तुमची चिडचिड होत नाही का?
वरून चिडचिड, आतून कौतुक वाटते
वरून चिडचिड, आतून कौतुक वाटते
यावेळी दिवाळीत फाटक्यांनी
यावेळी दिवाळीत फाटक्यांनी उच्चाक केला असावा
पहिल्यांदाच ओडिनला घाबरून कॉट खाली लपताना पाहिले
एरवी तो छोटेसे फटाके फुलझाड वगैरे बघत बसतो तो लाईट वगैरे
पण यावेळी अक्षरशः युद्ध चालावे असा दणदणाट होता आणि प्रचंड धूर
तो तर इतका घाबरला होता की पोटी साठी पण बाहेर जायला तयार नव्ह्ता
रात्री पार अगदी 1 वाजता जरा आवाज कमी झाल्यावर मग नेलं त्याला बाहेर
तेव्हाही पटकन उरकून घरी पळून आला
बिचारे भुभु काय होत असेल त्यांचं
सिंबाचा हा विडीओ इन्स्टावर
सिंबाचा हा विडीओ इन्स्टावर बघितला... फार फनी
अस्मिता... अर्रर्र!
बिचारा ओडू!
बिचारे भुभु काय होत असेल त्यांचं>>>> आय नो. स्ट्रीट डॉग्ज चं किती अवघड होत असेल या दिवाळीच्या दिवसात. आय होप लोकं जरा सेन्सिबल होवोत... शक्यता नाहीचे पण तरी प्रे फॉर ह्युमन बिईंग!
यावरून सिद्ध होतं की कोकोनटला
यावरून सिद्ध होतं की कोकोनटला फक्त त्याचाच वास आवडतो
विनोदाचा भाग सोडून द्या पण मला वाटतं त्यांच्या आजूबाजूचे जग हे चितपरीचीत वासावर अवलंबून असते त्यामुळे त्यात बदल झालेला त्यांना आवडत नसाव.
ओडीनची परीस्थीती अगदीच केवीलवाणी झालेली दिसतेय. बिचारा … त्याला हा ट्रॅामा दिवाळी नंतर पण असतो का २-३ दिवस?
फटाक्यांमुळे आमचा वान्या
फटाक्यांमुळे आमचा वान्या बावचळून गेट वरुन उडी मारून पळायला गेला आणि गाडीखाली आला. तेव्हापासून फटाक्यांबद्दल तिडीक बसली माझ्या डोक्यात.
परवा पुतणीच्या कुत्र्याची
परवा पुतणीच्या कुत्र्याची अवस्था बघितली मी. फटाक्यांच्या आवाजाने इतका थरथरत होता नां. इतका राग आला होता मला फटाके वाजवणाऱ्या लोकांचा. पक्षी पण आवाजाने वेड्यासारखे उडत होते.
त्याला हा ट्रॅामा दिवाळी नंतर
त्याला हा ट्रॅामा दिवाळी नंतर पण असतो का २-३ दिवस?>>>
हो पण आता आलाय बँक टू नॉर्मल
तरी त्याला बाहेर नेताना चेक करावं लागतं
लोकं अर्धवट जळलेल्या फुलबाजया फटाके तसेच टाकून देतात कडेला
त्यापासून जपावं लागतं
आज कोकोनटचा वाढदिवस आहे. १४
आज कोकोनटचा वाढदिवस आहे. १४ नोव्हेंबर २०२२ जन्मदिवस. आमचा कुत्रा घ्यायचा काहीच प्लॅन नव्हता, इथल्या चार्मिंग पेट रेस्क्यू सेंटर म्हणून बेवारशी कुत्री सांभाळणाऱ्या शेल्टरच्या फेसबुकवर कोकोनटचे जेमतेम चार पाच आठवड्याचे पपी पिक्चर दिसले. मी त्या वर लगेच रूमाल टाकला होता. फारच गोंडस असल्याने. शिवाय त्याच्या दोन बहिणी सुद्धा होत्या. त्या ह्याच्या इतक्या बाळसेदार नव्हत्या. तीनच पपी एका वेळी जन्मलेले असल्याने सुदृढ होते तिघेही. मेक्सिको आणि टेक्सास बॉर्डर जवळ एका शेतकऱ्याच्या घरी याचे आईबाबा होते. शेतकऱ्याने पपीज मात्र रेस्क्यूला देऊन टाकायचे ठरवले होते. ते ह्यांनी दुसऱ्या दिवशीच जाऊन आणले व आम्हाला फोन केला बघायला या. आम्ही बघायला गेलो आणि घेऊनच आलो.
हा कधीही रस्त्यावर राहिलेला नाही, तो नेहमीच सुरक्षित हातात पोचला आहे. देवाचा जीव म्हणतो तसे. मग त्याचे नाव आम्हाला कॅनडाचे खूप ॲटॅचमेंट आणि आठवणी असल्याने, बेसिकली कॅनडाच घर वाटत असल्याने तिथल्या जॅस्पर नॅशनल पार्क वरून जॅस्पर नाव ठेवायचं होतं पण बरीच चर्चा करून अगदी ओल्या नारळासारखा दिसायचा व वरचे तपकिरी डाग सुद्धा सुक्या नारळासारखे आहेत म्हणून लेकीने "कोकोनट" नाव ठेवले.
आज चार वर्षे झाली. आम्ही सहा आठवड्याचे पिल्लू आणले होते. मी जन्म दिला नाही त्याला पण यशोदा आणि कृष्ण असेच कनेक्शन झाले आहे. खोड्या केल्या की उखळाला बांधून ठेवेन तुला असेही म्हणते. घरी उखळ नाही पण म्हणायचं. 
टवणेसर
टवणेसर
हॅप्पी बड्डे टु कोकोनट! भरपूर
हॅप्पी बड्डे टु कोकोनट! भरपूर खोड्या करायला मिळू देत आणि आईला कधीही उखळ न मिळू देत
टण्या, वानू वरची लेख मालिका आठवतेय. फार मस्त लिहीली होती.
सिंबा, नौटंकी वाटतोय
बिचारा ओडीन ..
Pages