Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो बरोबर दहा वाजता घुटमळतो
तो बरोबर दहा वाजता घुटमळतो क्रेटपाशी हे म्हंटले की निघतो, कधीकधी वाट पाहतो कमांडची..... अस्मिता, तू जावे हे लिहिलंस त्याच्याबरोबर आदल्या दिवशी मी एक रील पाहिलं होतं त्याच्यात एका जर्मन शेफर्डने झाडाची फांदी दातात पकडली होती.एक मुलगी ती फांदी वाकवायचा प्रयत्न करत होती.2 वेळ तिने फांदी जमिनीपर्यंत वाकवली.कुत्र्याने फांदी सोडली नाही. बिचारा कुत्रा फांदीला लटकत होता आणि कुई कुई ओरडत होता.व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने शेवटी त्यांच्या भाषेत कमांड दिली त्याबरोबर त्याने फांदी सोडली कमांडसाठी बिचारा थांबला होता.रीलसाठी कोणत्या थराला ही मंडळी जातात देव जाणे.
देवकी मुक्या प्राण्यांच्या
देवकी मुक्या प्राण्यांच्या दुर्बळतेचा गैरफायदा हा जो मुद्दा मी मांडलेला त्यात हा प्रकार मोडतो. फार छळ मांडतात लोकं. का तर ते मुके प्राणी आज्ञाधारक असतात, बोलू शकत नाहीत.
हो सामो.
हो सामो.
(No subject)
आधी जरा रिक्षा फिरवून घेतो -
आधी जरा रिक्षा फिरवून घेतो -
मी वाचलेले पुस्तक - ४ धाग्यावर एक ब्रिटिशकालीन १९३७ मध्ये प्रकाशित डिरेक्टरी (सिविल लिस्ट ऑफ इंडिया अँड बर्मा) वाचतोय त्यात कैक मजेशीर गोष्टी वाचण्याची मौज येते आहे.
आता मुख्य काम -
त्याच डिरेक्टरी मधे केनेल क्लब ऑफ इंडिया (सन १९३७) ची जाहिरात आहे
जाहिरात म्हणते की तुमचा डॉगी पेके किंवा ग्रेट डेन असेल पण त्याची पेडिग्री महत्वाची आहे, तेव्हा तुम्ही आम्ही पुरवलेले फॉर्म विकत घ्या (द सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेट लिमिटेड, पोस्ट बॉक्स क्र. ३६, लाहौर, पंजाब ह्यांच्याकडून) आणि तो नीट भरून आम्हाला पाठवा (म्हणजे आम्ही त्याची नोंद करून ठेवू) किंमत रूपये एक फक्त (२५ फॉर्म दस्त साठी).
मला माझे इन्स्टा अकाऊंट
मला माझे इन्स्टा अकाऊंट सापडले. मला खूप गंमत वाटली. आनंदी जग आहे.
ladyandtheblues - https://www.instagram.com/ladyandtheblues/?utm_source=ig_embed&ig_rid=A3...
खूप सुंदर व्हिडिओज आहेत.
-----------------------
मला आशुचँप, मैत्रेयी, कविन, अस्मिता आणि अन्य माबोकरांच्या भूभूज, माऊंचे व्हिडिओ कुठे सापडतील? त्यांची इन्स्टा अकाऊंटस काय आहेत?
सामो - सिंबाचे अकांऊट
सामो - सिंबाचे अकांऊट
https://www.instagram.com/simba_thegsd1?igsh=MTV2ejN0N3c4NjN2Nw==
धन्स हरीतात्या. करते फोलो.
धन्स हरीतात्या. करते फोलो.
माउई - https://www.instagram
माउई - https://www.instagram.com/maui_goodboy/
) पण जोवर त्याचे बटन चालत होते तोवर सतत तेच चालू करून दे म्हणून डोक्याशी कटकट करायचा. आता त्यातले एलेक्ट्र्निक पार्ट खुळ खुळ वाजत आहेत 
हे इतक्यातले रील https://www.instagram.com/p/Das3CrLJbYb/ एक मस्त इन्टेरॅक्टिव बॉल मिळाला होता वॉलमार्ट मधे. माऊई ने फार एंजोय केला. ( जोवर टिकला तोवर
नवा तसाच आणावा म्हटले तर आता नाहीये अव्हेलेबल!
थँक्स मै. करते फॉलो.
थँक्स मै. करते फॉलो.
तुम्ही कुणी hurding ball
तुम्ही कुणी hurding ball वापरला आहे का? मी सिंबासाठी एक मागवला होता पण पठ्ठ्याने तो १० मिनीटत फोडला…
तुमचा काही अनुभव असेल तर सांगा
आत्ता बघितले तो काय बॉल आहे
आत्ता बघितले तो काय बॉल आहे ते. माउई ला आवडेल नक्की. पण फोडणार लगेच.
अन्य माबोकरांच्या भूभूज,
अन्य माबोकरांच्या भूभूज, माऊंचे व्हिडिओ कुठे सापडतील? त्यांची इन्स्टा अकाऊंटस काय आहेत?>>>> माझ्या माऊंचं अकाऊंट आहे https://www.instagram.com/monkey_and_sammie/ मंकी काही वर्षांपूर्वी गेला बिचारा, सॅमीचं मी जमेल तसे करते विडीओ अपलोड. फार अॅक्टीव्ह नाहीये पण.
सॅमीचे अपडेट:
गेले काही दिवस आम्ही नोटीस करत होतो की ३-४ ठिकाणी तिच्या केसांमधे मोठमोठ्या जटा होत आहेत आणि जेव्हा विंचरायला जाऊ ती करू देत नाही. एकदम हिस्स करते, कदाचित दुखत असेल. मग वेगवेगळे निष्कर्ष आणि चर्चा ... ती नीट स्वतःला साफ करत नाहीये, वजन वाढलेय का कारण मोस्टली सगळ्या जटा शेपटी आणि मागच्या पायांच्या वरच्या बाजूला झालेल्या तिथे ती पोचत नाही का आपण ग्रुमिंग करत नाही (मुलगी नेहेमी नको म्हणते कारण ते केस फार कमी करतात अल्मोस्ट टकलू) तिचे केसच तिची शान आहेत खरं तर, एकदम चमकदार फर आहे. कमी करावेसे वाटत नाही, पण काय करावं हेही कळेना, शेवटी एक वेगळ्या प्रकारचा टोकेरी हेअर ब्रश आणून ती जेव्हा झोपलेली असते किंवा फर ब्लँकेट वर बिस्किट्स करते त्यावेळी त्या जटा हळूहळू विंचरत सोडवल्या. बरेच दिवस लागले पण फायनली आता बर्यापैकी कमी झाल्यात पण जटाधारी बाई असं आम्ही उगीच तिला म्हणत होतो लाडाने.
तुमच्या भूभू किंवा माऊंना असं कधी झालंय का? उपाय काय केला?
आज मॅडमने एका चिमणीची शिकार केली. काय माहित आम्हाला गिफ्ट देण्याचा प्लॅन होता बहुतेक. पण आम्ही हाणून पाडला.
माउईचे मऊ फर आहे पण त्यामुळे
माउईचे मऊ फर आहे पण त्यामुळे रेग्युलरली विंचरत रहावे लागते. नाहीतर जटा होतात
तसे झाले तर कोंब करताना दुखते अर्थात मग तो करू देत नाही. त्यामुळे वेळीच तो गुंता सोडवावा लागतो. नाहीतर ग्रुमिंग च्या वेळि ते केस पूर्ण शेव्ह करून काढतात त्या नॉट्स.
मी एक पंजाच्या आकाराचा तारेचा कंगवा आणला आहे तो चांगला वर्क होतो. तेही नीट काम करू दिले की ट्रीट ची लाच मिळेल म्हटले की करू देतो. पूर्ण वेळ झालं का? अशा चेहर्याने बघत बसतो माझ्याकडे. "ओके" असं म्हटले की उडी मारून ट्रीट च्या कपाटाजवळ उभा राहतो
धन्यवाद अंजली, फॉलो करते.
धन्यवाद अंजली, फॉलो करते.
धन्यवाद अंजली, फॉलो करते.
धन्यवाद अंजली, फॉलो करते.
ओके मै मांजरांचे केस पुर्ण
ओके मै मांजरांचे केस पुर्ण काढतात का ग्रुमिंगला बघायला पाहिजे. कधीच केलं नाहीये.
धन्यवाद सामो
We trim Rambo's hair. No need
We trim Rambo's hair. No need to remove completely.
माझी दोन्ही माऊ indi आहेत,
माझी दोन्ही माऊ indi आहेत, त्यामुळे केस लांब नाहीत. कधी हा प्रश्न आला नाही त्यामुळे.
मी त्यांना cat comb ने vincharate, जर त्यांना मूड असेल तर
ओके.
ओके.
ओड्या चे केस इतके लांब
ओड्या चे केस इतके लांब नाहीयेत आणि त्याला गृमिंग करून घेणे प्रचंड आवडते, रोज एकदा तरी बेली रब आणि ब्रश फिरवावा लागतो
आणि मस्त राजेशाही थाटात करून घेतो आणि लगेच लाडात येऊन पाप्या देतो
अर्थात हे फक्त मी किंवा पोरगा यांनाच
बाकीच्यांना नाही, त्यांना तो फारसा अंगाला हात लावू देत नाही, पळून जातो
क्यूट!!
क्यूट!!
आमच्याकडे सिंबा लॅांग हेअर
आमच्याकडे सिंबा लॅांग हेअर नसल्याने तसा गुंतागुंती प्रकार कमीच आहे, पण शेपर्ड असल्यामुळे केस गळती खुप असते १२ ही महिने. घरीच डी शेडींग ब्रशने करतो. दुसर्या कुणी ग्रुमिंग करणे शक्यच नाही कारण घरचे सोडून कुणाला हातच लावू देत नाही, कुणी डेअर पण करत नाहीत. घराजवळच पेट स्टोअर आहे तिथे सगळी आंघोळीची सोय असते तिथे नेऊन मीच आंघोळ घालून आणतो.
ओके. डॉगज ची फर दिसते छान पण
ओके. डॉगज ची फर दिसते छान पण एकदम..
माझ्या मुलीने सॅमीची एकच गाठ रेझर (फार शार्प नाही) ने काढली मग तिथे लॉन कटींग करतात तसा एक चौकोनी पॅच तयार झाला.
न्यू हेअरस्टाईल 
म्हटलं असं केलं तर सॅमीची पाठ चेकरबोर्ड सारखी दिसेल..
करून बघ
करून बघ

मिनी चे ऑपरेशन केलेले तेव्हा फर असाच पॅच काढला होता. १५-२० दिवसात पूर्ण भरून आला.
माउईची छोटीशी गंमत - आम्ही
माउईची छोटीशी गंमत - आम्ही बॅकयार्ड मधे एक छोटा झेन गार्डन पॅच करत आहोत. त्यासाठी एक बुद्ध फाउंटन आणले. ते टेस्ट करण्यासाठी व्हरांडा/डेक वर ठेवले होते. बुद्ध साधारण अडीच फूट उंचीचा आहे म्हणाजे बर्यापैकी मोठा आहे. माउई त्या दिवशी नेहमी प्रमाणे उड्या मारत बाहेर गेला तेव्हा त्याला तो बुद्ध दिसला नाही. पण रमत गमत घरात यायला डेक वर आला तेव्हा अचानक समोर मोठा बुद्ध दिसला! असला टरकला एक क्षण! पार २ फूट मागे उडी मारली
नंतर लांबूनच वेगवेगाळ्य्या अँगल ने जोरजोरात भुंकत बसला त्याच्यावर पण खूप वेळ त्याला ओलांडून घरात यायला पण घाबरत होता! नंतर पण दर वेळी तिथे गेला की २ मिनिट भुंकूनच मग पुढे! इतके विनोदी झालं आम्हाला हे , म्हटलं तो बुद्ध आहे , विश्व शांतीचे प्रतिक वगैरे आणि तू त्याच्याशीच रोज उठून भांडशील ? 

हे पहा एक रील केले आहे: https://www.instagram.com/reel/Dbo7Zautmch/?utm_source=ig_web_copy_link&...
आता पुढल्या १-२ दिवसात भीड चेपली आहे आता, जवळ जाऊन वास घेतो पण सवधच असतो
maitreyee — वा काय मस्त भाव
maitreyee — वा काय मस्त भाव टिपले आहेत माउईचे …
बघितला, ये कौन आ गया मेरे
बघितला, ये कौन आ गया मेरे इलाके मै
अस करत भांडतोय माव्या
>>>>वा काय मस्त भाव टिपले
>>>>वा काय मस्त भाव टिपले आहेत माउईचे
+१
हो आज पाहिलं हे रील.... फार
हो आज पाहिलं हे रील.... फार गोड आहे
किती इनोसंट आहे मावू
Pages