Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओडिन छान आहे मजेत आहे
ओडिन छान आहे मजेत आहे
आता पूर्वीसारखा मस्ती जास्त नाही करत
कॅनाल ला जातो तिकडे एक भुभिने 7 8 पिल्ले दिली आहेत ती भुभीपण पांढरी शुभ्र आहे आणि आम्ही तिकडून गेलो की ती पिल्ले आई समजून त्याच्या मागे मागे पळत येतात, तो बिचारा इतका गरीब आहे की कधीच त्या पिलांना ओरडत नाही, ती उड्या मारून मारून त्याला छळतात तरी
फक्त आम्ही म्हणजे मी आणि पोरगा त्याना खायला घेऊन गेलो तर ओडिन पण त्यांच्यात बसून त्याचा शेअर खातो
एक मांजर पण भेटले आहे मन्या नाव त्याचे
त्याच्या गमतीजमती सांगतो नंतर
Odin is a true good boy ..
Odin is a true good boy ..
ओडिन सध्या फुटबॉल वर्ल्ड कप
ओडिन सध्या फुटबॉल वर्ल्ड कप चे प्रेडिक्शन करण्यात मग्न आहे
पण रक्त अटवतोय व्हिडिओ काढताना
मज्जा येते ओडिन ची प्रेडिक्शन
मज्जा येते ओडिन ची प्रेडिक्शन बघायला
रक्त अटवतोय व्हिडिओ काढताना >>> अरे मग ही तर अजूनच मज्जा, लिहा डीटेल मधे !!
नेशन वाँट्स टू नो प्लीज लिहा
नेशन वाँट्स टू नो
प्लीज लिहा
एकतर बिचाऱ्याला काय सुरुये
एकतर बिचाऱ्याला काय सुरुये कळत नाही
आधी आम्ही झेंडे लावतो आणि मग त्याचे डॉग फूड समोर ठेवतो प्रत्येक झेंड्याच्या आणि तो सुसाट खायला पळत येतो
मग त्याला कसेतरी पकडून ठेवावं लागतं, नो, किंवा स्टे ची कमांड देऊन
तो मग नंतर बराच वेळ स्टे मधेच राहतो
गो, खा, घे म्हणलं तरी येड्यासारखा निस्ता बघतच बसतो
अरे घे की रे बाबा म्हणलं तरी
आणि तेवढ्यात कोणी गेट उघडून आलं, किंवा बाहेर भुभु आलं किंवा अंगणात मांजर आलं की झालं.
त्याचे अटेन्शन तिकडे जात आणि तो विसरूनच जातो की आपण काय करत होतो कशासाठी बसवलं होतं
कसेतरी त्याला परत पकडून आणून बसवावे लागतं, त्यात त्याने दोन वेळा डॉग फूड च्या नादात झेंडेच टेस्ट करून खायचा प्रयत्न केला
मग ओरडलो तर घाबरून डॉग फूड खायला पण येईना पळून दुसऱ्या खोलीत जायला लागला
विचारू नका 10 सेकंदाच्या व्हीडिओसाठी किमान 10 मिनिटे तरी स्ट्रगल करायला लावतोच
कधी कधी जास्तच
घरचे जाम चेष्टा करतात आमच्या या प्रोजेक्ट प्रेडिक्शन ची
डोळ्यापुढे आले सगळे..
डोळ्यापुढे आले सगळे..
याचा व्हिडिओ काढ, तो जास्त फेमस होईल
डोळ्यापुढे आले सगळे..
डोळ्यापुढे आले सगळे..
याचा व्हिडिओ काढ... ..
+1
ओडिन बिचारा. त्याला कळत नसेल
हिलेरियस! पण बिचारा ओडू...
चुलीत घाला तुमचा फिफा असं
चुलीत घाला तुमचा फिफा असं म्हणत असेल ओडीन.
ओड्या म्हणत असेल बाबा फिफाटला
ओड्या म्हणत असेल बाबा फिफाटला आहे …
मै दोन वेळा नको मारू गं
मै दोन वेळा नको मारू गं
खरंच की , आता एडिटताही येईना!
ओडिन पिक्स व्ह्डिओज भारी
त्याने दोन वेळा डॉग फूड च्या नादात झेंडेच टेस्ट करून खायचा प्रयत्न केला

<<<
ओडिन पिक्स व्हिडिओज फार भारी असतात, वर्थ द केऑस इन मेकिंग
आम्ही वाट बघतो त्याच्या निर्णयाची !
फार नका त्याला गरीब समजू तो
फार नका त्याला गरीब समजू तो डबल ट्रीटस खातो
त्याला मी किबल्स च्या खाण्याऐवजी झेंडे सिलेंक्त करताना दिले मला वाटलं झालं आता आजचा खाऊ
तर डॉग बाउल जवळ बसून राहिला, त्याच्या डोक्यात हे येत नाही की हेच आपण तिकडे खाल्लं
मी म्हणलं झालंय तुझं खाऊन पण ते डॉग बाउल मध्ये नसल्याने ते तो गृहीत धरत नाही
मग अगदी केविलवाणा चेहरा करून किती दिवसाचा मी उपाशी असं करत भांडे चाटत बसतो
शेवटी मलाच दया येऊन त्याला बोनस खाऊ द्यावा लागतो भांड्यात
हो मग. त्याचे रुटीन प्रमाणे
हो मग. त्याचे रुटीन प्रमाणे खाऊ पिऊ झालंच पाहिजे
अशा बाबतीत त्यांचे गैरसमज होतात ते बरोब्बर त्यांच्याच सोयीचे असतात 

माउई ला झोपायच्या आधी २ छोट्या ट्रीट खायची सवय आहे. पण समजा वरच्या मजल्यावर झोपायला गेल्यावर ती द्यायच्या ऐवजी त्याला खालीच ट्रीटच्या डब्याजवळ उभे राहून तीच ट्रीट दिली तर तो ती घेतो पण काउंट करत नाही. वर गेल्यावर पुन्हा ट्रीट कुठेय? असा प्रश्न असतो
क्यूट बेबीज
क्यूट बेबीज
सॅमी सध्या मुंग्याच्या मागे लागली असते. उन्हाळ्यामुळे दिसतात कुठे कुठे मग मँडम खेळत बसतात पंंजा मारत.
मागे एकदा तिच्या वाढदिवसाला ट्रेलवर घेऊन जायचं ठरलं तिच्या कॅरियर बॅगेत घालून. प्रचंड अँक्शस होती बहुतेक. सतत हलत होती आणि पुर्णवेळ तोंड उघडं जीभ बाहेर. आम्ही घाबरलो आणि ट्रेल अर्ध्यातच सोडून आलो परत. तहान लागली असं वाटलं पण पाणी नाही प्यायली तरी. कारमधे शांत होती पण तरी तोंड उघडंच. काय झालं नक्की देव जाणे!
https://youtube.com/shorts/YPQvSmqNXLQ?feature=share
रूटीन हे सिंबासाठी सगळ्यात
रूटीन हे सिंबासाठी सगळ्यात महत्वाचे…
रात्री १० ही त्याची झोपायची वेळ, पण त्या आधी गेट ईन ही कमांड द्यावी लागते मगच साहेब झोपायला जातात. एकदा टीव्ही पहाणाच्या नादात मी कमांड द्यायला विसरलो … साहेब माझ्या तोंडासमोर येऊन भुंकले … सुरवातीला मला कळले नाही का भुंकला ते मग कळलं कमांड द्यायची राहिले ते… कमांड दिल्यावर मग गुमान झोपायला गेला
सॅमी ती कॅरियर खूप हलत
सॅमी
ती कॅरियर खूप हलत असल्यामुळे अॅन्क्झायटि आली असेल.
हरितात्या, थोडक्यात काय तर सिंबाने तुम्हाला कमांड दिली , की आता गुमान कमांड द्या म्हणून
गुमान कमांड द्या म्हणून Lol
गुमान कमांड द्या म्हणून Lol
हरितात्या, थोडक्यात काय तर
हरितात्या, थोडक्यात काय तर सिंबाने तुम्हाला कमांड दिली , की आता गुमान कमांड द्या म्हणून.....
ओडीनcha किस्सा मजेदार.
अंजली, कॅरियरमध्ये असल्याने जास्त गरम झाले असेल का?
हरितात्या, थोडक्यात काय तर
हरितात्या, थोडक्यात काय तर सिंबाने तुम्हाला कमांड दिली , की आता गुमान कमांड द्या म्हणून.....
ओडीनcha किस्सा मजेदार.
अंजली, कॅरियरमध्ये असल्याने जास्त गरम झाले असेल का?
त्या कॅरीयर ला जाळी आहे तशी
त्या कॅरीयर ला जाळी आहे तशी सगळीकडून
अंजली तिला मानसिक ट्रॉमा झाला
अंजली तिला मानसिक ट्रॉमा झाला असावा, की आपल्याला सोडून देणारेत वगैरे. नशीब हार्ट अॅटॅक नाही आला. मला वाटतं पहील्यांदा जवळ घेउन कंफर्टींग टोनमध्ये बराच वेळ बोलून सांगीतले असते तर तसे झाले नसते. माझा असा नुसता कयास आहे.
सामो, तसा ट्रॉमा तेव्हाच होईल
सामो, तसा ट्रॉमा तेव्हाच होईल जर आधी असे कुणी तिला केले असेल तर. जन्मापासून सुरक्षित, प्रेमाच्या वातावरणात वाढलेल्या प्राण्यांना कळणार कसे की लोक असे जंगलात नेऊन सोडून देतील वगैरे . त्यांच्याकडे व्हॉट्सॅप ही नसते
हो तसेही बरोबर वाटते मै.
हो तसेही बरोबर वाटते मै. त्यांना तसे नकारात्मक विचार करण्याची क्षमता नसेलही.
सिम्बा, ओडीन, सॅमी - धमाल
सिम्बा, ओडीन, सॅमी - धमाल किस्से.

सध्या येथेही निक्स व्हर्सेस स्पर्स बास्केटबॉल गेम्स व तसेच भाकीत करणारा एक कॉर्गी असे व्हिडिओ पाहिले. आम्ही म्हणजे सॅन ॲन्टोनियो स्पर्स सगळीकडे दणदणीत हरलो.
कोकोनटला दिवसभर झोपूनही रात्री क्रेटमधे ट्रीट घेऊन झोपायला जायची सवय आहे. आमची कमांड आहे - इनशाईड , इनशाईड, निन्नी निन्नी
बोबडे बोल! तो बरोबर दहा वाजता घुटमळतो क्रेटपाशी हे म्हंटले की निघतो, कधीकधी वाट पाहतो कमांडची.
मैत्रेयीला मम. आपल्या भुभु आणि माऊला अन्याय, भूक, त्रास माहितीच नाही. नुसतं चिल जीवन, माया, गुदगुल्या, पप्प्या - मी तर येताजाता घेत असते.



उदा - कोकोनटचे "चिल"जीवन - लोळणे, ट्रीटसाठी गोजिरवाणं तोंड करून बसणं, ताईचे टॉयज् चोरणे आणि मुद्दाम तिला दाखवणं हे नवीन सुरू झाले आहे.
ह्या कपकेप स्क्विशमेलोसाठी रोज भांडणं होत आहेत, त्याला त्याची टोपलीभर खेळणी आहेत तरीही.
भुभु /माउ नविन किस्से मस्त !!
भुभु /माउ नविन किस्से मस्त !!
आपल्या भुभु आणि माऊला अन्याय, भूक, त्रास माहितीच नाही. नुसतं चिल जीवन, माया, गुदगुल्या, पप्प्या - >>> येस ! म्हणूनच गिव्हन अ चॉइस वर गेल्यावर चित्रगुप्त म्हटला की "अकाउट मधे तितकेसे क्रेडिट नाहित..इन्फेशन आहे परत बाइमाणुस च बनायच की इतर प्राणीमात्र ??तर मी कुत्रा आणी अमेरिकेत जन्म हे सान्गणार आहे.
कमांड किती गोड आहे हे !
कमांड
किती गोड आहे हे !
मै - व्हॉट्सॅप
सामो - नसेल तसं काही. आम्ही अगदी ही पण काळजी घेतली की व्हेट कडे नेतानाचा कॅरीयर वेगळा ठेवलाय जेणे करून तिला असं वाटू नये डॉक्टरकडे जातोय. फिरायला नेण्याच्या बॅगेत आधी एकदाच आली होती ती ख्रिसमस लाईट्स बघायला नेबर हुड मधे. तेव्हा ओके होती.
अगं ती इन जनरलच फार घाबरट आहे. घरात नवीन लोकांचे आवाज वगैरे आले की भरपूर वेळ दडून बसते.
पहील्यांदा जवळ घेउन कंफर्टींग टोनमध्ये बराच वेळ बोलून सांगीतले असते तर तसे झाले नसते>>>>>>>>>>>> हां आम्ही बोलतो खरं तिच्याशी तिला किती समजतं माहित नाही पण वी मेड शुअर तिला म्हटलेलं बाहेर फिरायला जाऊ, तुझा वाढदिवस आहे, येताना ट्रीट घेऊ वगैरे!
जन्मापासून सुरक्षित, प्रेमाच्या वातावरणात वाढलेल्या प्राण्यांना कळणार >>>>>>>>>> माझी मुलगी पण हेच म्हणते तिला तू अशी स्ट्रीट कॅट असती तर तुला किती जगायचा स्ट्रगल करायला लागला असता. इथे आम्ही सगळं कंफर्ट देतोय तुला आणि तु आम्हाला भाव देत नाहीस

जस्ट फॉर बिईंग क्युट इतकं प्रेम मिळायला नशीबच लागतं
Pages