Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
>>> "थिटा" सुद्धा मला ग्रीक
>>> "थिटा" सुद्धा मला ग्रीक सिम्बॉल वाटला

गेल्या काही दिवसांत कालीचरण,
गेल्या काही दिवसांत कालीचरण, नसीब, दोस्ताना (जुना) बघितले. शत्रुघ्न सिन्हाचा स्टडी चालवलाय म्हणू शकता.
कुठला सिनेमा त्यातल्या त्यात कमी अ आणि अ - अशी स्पर्धा लावू शकतो. आणि स्लो सायकलिंगसारखं कुणीच मागे राहू शकत नाही.
तरी त्यातल्या त्यात दोस्ताना बरा! मनमोहन देसाईच्या खात्यावर सगळं ढकलून नसीब दुसर्या नंबरवर.
कालीचरण - अ-गा-ध !!
पक्की सिनेमाप्रेमी असल्याने असा काही ना काही क्रम ठरवल्याशिवाय चैन पडत नाही.
कालिचरण आणि दोस्ताना भारी
कालिचरण आणि दोस्ताना भारी आहेत. बहुतेक कालिचरण मध्ये नंतरच्या बऱ्याच हिंदी चित्रपटांची बीजे सापडतील. कुठली ना कुठली गोष्ट तिकडून आलेली आहे. अ अ असणे हा हिंदी चित्रपटांचा हक्क आहे त्यामुळे त्याची भीती वाटत नाही.
परवा रात्री MI बघितलाच. Rmd
परवा रात्री MI बघितलाच. Rmd ला अनुमोदन. मस्त engaging आहे. या अगोदरच्या सिनेमांत इथन आणि त्याची टीम , इतर आजुबाजूची लोक यांची interaction जास्त आहे. इथे फोकस जास्त इथन आणि टास्कवर आहे. काही emotional सीन्स आहेत पण too much planning , मोठमोठे events , भारीतले कपडे इ गोष्टींना वगळले आहे. चित्रपटाचा टोन चकचकीत नाही world crisis ला अनुसरून earthy , dark आहे.
अतिरंजित आहे आणि केवळ तो इथन हंट आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहू शकतो हे आम्ही कधीचच मान्य केलं आहे.
सुरुवातीचे काही सीन्स बघून आता ही सीरीज शेवटाकडे चालली ह्य विचाराने अचानक मनात कुठेतरी गलबललं. Its like full circle .. सुरवातीच्या सिनेमातले glimpses आहेत , संदर्भ आहेत, characters आहेत.
एकंदरीत , बघायचा असेल तर ott वर यायची वाट बघू नका. काही थरार मोठ्या पडद्यावरच अनुभवावेत. सबमरीन चा सीक्वेन्स खूप लांबला आहे , शेवट काय होणार आहे आपल्याला माहिती आहे पण आपण खिळून राहतो. थिएटरमध्ये लोकांच्या एकत्र उत्स्फुर्त reactions ऐकायला गंमत वाटतो. Ohhh , हुशशश , noo , आआईई गं , आआआ ,
Tom cruze म्हातारा दिसतो, चेहरा सुजलेला वाटतो, treadmill वरच्या सीनमध्ये मला तो थुलथुलीत वाटला.पण एक "चिकना म्हातारा " म्हणून संझा आहे.तो त्या वर्गात येतो. त्याचे running चे iconic scenes इथेही आहेत. Its been more than 30 years that Ethan Hunt is saving the world. चिरतरूण नाहीये तो , कधीतरी म्हातारा होणारच.
काही थरार मोठ्या पडद्यावरच
काही थरार मोठ्या पडद्यावरच अनुभवावेत >>> यू सेड इट! IMAX मध्ये पहायला अ मे झिं ग वाटतो.
शत्रुघ्न सिन्हाचा स्टडी
शत्रुघ्न सिन्हाचा स्टडी चालवलाय म्हणू शकता
>>
आता विश्वनाथ बघ
जली को आग कहते है
बुझी को राख कहते है
उस राख से जो बारूद बने
उसे विश्वनाथ कहते है
अरे हाच डॉयलॉग तेजाबमधे कॉपी
अरे हाच डॉयलॉग तेजाबमधे कॉपी केलाय का? हा पूर्वी ऐकल्यासारखे वाटायचे पण विश्वनाथ मधला आहे हे लक्षात नव्हते. कालिचरण प्राचीन काळी पाहिला आहे पण अजिबात लक्षात नाही. फक्त डॉन मधली अदलाबदली ही कालिचरणवरून बेतलेली आहे असे वाचले आहे.
दोस्ताना त्या प्रेमाच्या त्रिकोणातील गोष्ट होती तोपर्यंत मस्त होता. नंतर फायटिंग वगैरे आली तेव्हा मसाला झाला. पण एकूण चांगला असावा कारण सलीम-जावेदची स्क्रिप्ट आहे. पिक्चर नीट लक्षात नाही. नसीब तर फुल-ऑन मनमोहन देसाई आहे. अमिताभ मस्त आहे त्यातला पण.
अकाऊंटंट -२ पाहिलाय का कोणी?
अकाऊंटंट -२ पाहिलाय का कोणी?
पहिला आवडलेला.
दोस्ताना हळू हळू गंडत गेला
दोस्ताना हळू हळू गंडत गेला आहे. मधेच सलिम जावेदला आपले स्टार कोण आहेत हे आठवले नि भरकटत गेला सिनेमा असे वाटात राहते.
अरे हाच डॉयलॉग तेजाबमधे कॉपी
अरे हाच डॉयलॉग तेजाबमधे कॉपी केलाय का?
>>
तेजाब मधला आठवत नाही
तेरी जिंदगी और मौत के बीच का फासला मुन्ना की चाकू की धार से ज्यादा नाही... आठवतोय
डॉन मधली अदलाबदली ही कालिचरणवरून बेतलेली आहे असे वाचले आहे.
>>
अख्खा डॉन बऱ्यापैकी शक्ती सामंता च्या चायना टाऊन वरून उचलला आहे.
त्यात माईक (डॉन) जेल मधे जिवंत असतो अन् दुसऱ्या शम्मीचा बिछडलेला जुडवा असतो...
चायना टाऊन >> याची आठवण
चायना टाऊन >> याची आठवण म्हणजे यात शेट्टीला चायनीज माणूस केलेले आहे. ही हाईट होती. पिक्चर सुरू होता आणि शेट्टीला असे पाहून आम्ही फुटलोच
दोस्ताना शाळेत असताना पाहिला
दोस्ताना शाळेत असताना पाहिला होता. (पाचवी-सहावीच्या वयात)
त्यानंतर आत्ता पाहिला.
सलीम-जावेदने शत्रुघ्न सिन्हाच्या पात्रावर जास्त फोकस ठेवला आहे. हा पिक्चर मुख्य त्याचा आहे.
शाळेतल्या तेव्हाच्या वयातली आठवण म्हणजे सिनेमा बघून आल्यावर आई-बाबा कुणालातरी सांगत होते- शत्रुघ्न सिन्हाचं काम मस्त झालंय, वगैरे.
तेव्हा ज्ञानात भर पडली होती, की अच्छा! थेट्रातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा सिनेमातला जो अॅक्टर लक्षात राहतो त्याचं काम चांगलं झालंय असं म्हणतात!
@ शत्रुघ्न सिन्हा स्टडी - त्याचे डोळे आणि चेहर्यावरचे हावभाव, बारीकसारीक अॅक्शन-रिअॅक्शन्स अगदी नोट करण्यासारखे होते. लाँग शॉट्सपेक्षा तो क्लोज-अप्समध्ये छाप पाडणारा होता. पुढे पुढे त्याला बहुदा दिग्दर्शकांनीच ओव्हरअॅक्टिंग करायला लावलं की काय असं मानायला जागा आहे.
पुढे पुढे त्याने फिटनेसकडे लक्ष पुरवलं नसावं. लाँग शॉट्समध्ये स्क्रीन व्यापून टाकणारं फिजिक नव्हतं त्याचं. प्लस, त्याच्याकडे डान्सिंग स्किल्स नव्हती.
दोस्तानात अमरीश पुरी होतकरू व्हिलन आहे.
कालीचरणमधला अजित मला जाम बोअर झाला. जंजीरच्या पुण्याईवर तो पुढे तेच तेच करत राहिला. तोच चेहरा, तीच एक्सप्रेशन्स, तीच ती डायलॉग डिलिव्हरीची पद्धत.
सारा शहर त्याला LION के नाम से का ओळखत असतं कोण जाणे.
नसीब तर फुल-ऑन मनमोहन देसाई
नसीब तर फुल-ऑन मनमोहन देसाई आहे
>>>
अगदी!
त्यातली पात्रांची टेलिस्कोपिक व्हिजन हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
काचेच्या घराच्या बाहेर लांब टेकडीवर शक्ती कपूर बंदूक रोखून उभा असतो. तर घरातून अमजद खान केवळ एक नजर टाकून त्याला ओळखतो.
रीना रॉय एका उंच टेकाडावर जीव द्यायला उभी असते. खाली मोठं तळं. दुसर्या बाजूने ऋषी कपूर, किम जीपने अचानक तिथे अवतरतात. किम इतक्या अंतरावरून केवळ एक नजर टाकून म्हणते - वो देखो ज्यूली, खुदकुशी करने जा रही है
बरं, ही व्हिजन ऐच्छिक असते.
अमरीश पुरी आणि प्राण खलबत करत असतात, तेव्हा समोरच्या उंच बिल्डिंगच्या गॅलरीत तिघी नायिका उभ्या असतात. ग्रे कलरची ओसाड वाटणारी बिल्डिंग, त्यात ब्राइट रंगाचे कपडे घालून फक्त या तिघी उभ्या असलेल्या, तरी या दोघांना त्या दिसत नाहीत.
या २ चित्रपटांबद्दल मी पूर्वी
या २ चित्रपटांबद्दल मी पूर्वी लिहीलेले आहे का? नक्की लिहीलेले असणार कारण माझे आवडते सिनेमे आहेत. जर लिहीले असेल तर द्विरुक्ती होण्याचा धोका आहे. तो पत्करुन इथे लिहीते आहे -
------------------------------ येन्टल----------------------------------
आज, बार्बरा स्ट्रेसँडचे, तिनेच दिग्दर्शित केलेले, माझे अतिशय आवडते २ सिनेमे, एका बैठकीत परत पाहीले - कोणत्याही ओटीटी वरती उपलब्ध नाहीत. विकत अ थवा भाड्याने घेउनच पहावे लागतील. इटस वर्थ इट. आय हायली रेकमेन्ड.
पहीला आहे येन्टल (YENTL) - ही युरोपमधली त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा, स्त्रियांना फक्त चित्रे असलेली पुस्तके वाचायची परवानगी होती, पुरुष धार्मिक पुस्तके वाचू शकत. एक ज्यु स्त्री आहे - नाव येन्टल. तिला मात्र धार्मिक पुस्तके वाचायची आहेत. तिला आयुष्याकडुन खूप काही हवे आहे. तिच्या खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा , तिच्याकरता पुरेसा नाही. एका मोकळ्या , विशाल नभांगणात झेप घेण्याची तिची कामना आहे. तिच्या भावाने आत्महत्या केलेली आहे , ज्याचे नाव आहे अँसेल.
जेव्हा येन्टल चे वडील, वारतात तेव्हा तिच्या गावात, तिला बांधून ठेवणारे काहीच पाश उरत नाहीत आणि येन्टल आपले केस कापून, स्वत:चे नाव घेते अँसेल आणि जगात नशीब काढायला निघते. वाटेत अनेकानेक चांगले-वाईट अनुभव घेत ती , कथेच्या नायकाबरोबर पोचते एका तेव्हाच्या काळच्या अध्ययन मंदिरात. तिथे ती खूप शिकते, नायकाबरोबर, अन्य पंडितांबरोबर वादविवाद करते, शी प्रुव्ह्स हर मेटल. नायकाला माहीतच नाही की अँसेल म्हणुन वावरणारी ती एक स्त्री आहे. आणि अशी अँसल बनलेली येन्टल, नायकाच्या प्रेमात पडते. पण त्याला सांगायचे कसे की ती एक स्त्री आहे. बरं त्यात भर म्हणुन तिच्या या प्रियकराचीच भावी वधू, अॅन्सेलच्या म्हणजे आत्ता पुरुषाच्या रुपात असलेल्या येन्टलच्या प्रेमात पडते.
पुढ त्यांची एकतर्फी प्रेमकहाणी सफळ होते का? येन्टल आकाशी झेप घेते का? असा हा सिनेमा असून, अ तिशय गोड आणि अर्थवाही शब्द असलेले. संगीत आहे.
अभिनेत्री बार्बरा स्ट्रेइसँडने, येन्टलची जिद्द, महत्वाकांक्षा, सकारात्मकता, धैर्य तिच्या डोळ्यातून, देहबोलीतून विलक्षण प्रभावी रीत्या प्रकट केलेले आहे. वन ऑफ माय फेवरेट मुव्हीज. खूप आवडतो हा सिनेमा. सकारात्मक आफ्टर टेस्ट रहाते. मस्त मस्त!! जरुर पहा.
-------------------------- द मिरर हॅज टु फेसेस-------------------------------
हा एक वेगळाच मस्त सिनेमा आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीचे २ प्राध्यापक आहेत. दोघे अर्थात कमालीचे बुद्धीमान, व्यासंगी, अभ्यासू आणि इन्टलेक्ट्युअल. दोघे मेड फॉर ईच अदर - पण कसे? ती एक गंमतच. आणि या गंमतीवरती आधारीत हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. नायकाला 'सेक्सच्याही पलिकडची रिलेशनशिप हवी आहे. ' त्याला सेक्स मधे विशेष गम्य नाही म्हणण्यापेक्षा देअर मोअर टू अ रिलेशनशिप दॅन मिअर सेक्स असा त्याचा विश्वास आहे तर ही जी नायिका आहे - बार्बरा स्ट्रेइसँड तिला नटणे मुरडणे यात अज्जिबात रस नाही. ती स्वतः प्रचंड आत्मविश्वास असलेली, फनी, बुद्धीमान आणि विद्यार्थ्यांची लाडकी प्राध्यापिका आहे. अन्य बायकांसारखी, खाण्यात फार नखरे न करणारी, खाणे पिणे आणि एकंदर आयुष्य आवडणारी अशी ती आहे. मात्र प्रेमात एका प्रसंगाने ती पोळलेली आहे. त्यामुळे प्रेमावरचा, तिचा विश्वासच उडालेला आहे. या सगळ्या सलाडमध्ये तिच्या आईचे एक पात्र आहे जिचे स्वतःचे तारुण्य संपलेले असले तरी शेवटच्या काही उरलेल्या वर्षांतही तिला तरुण दिसायचे आहे, डेटिंगला जायचे आहे.
नायक जो आहे तो एकदा वर्तमानपत्रामध्ये 'कंपॅनिअनशिप/मैत्री' शोधण्याकरता एक जाहीरात देतो आणि नायिकेस भेटतो. त्यातून पुढे त्यांची निखळ मैत्री कशी बहरत जाते, कसे दोघे बाँड होत जातात, एकमेकांच्या सहवासात त्यांचा एकाकीपणा दूर होतो, बाँडिंग होत जाते व पुढे मग त्यांच्या 'मैत्रीविषयक, शारिरिक इन्टिमसीबद्दल' धारणा बदलतात का? हे सारे खूप रोचक आहे.
पोस्टी वाचेन हळूहळू, पण
पोस्टी वाचेन हळूहळू, पण शत्रुघ्न सिन्हाच्या कालीचरणची री पुढे ओढत -
काल 'काला पत्थर' शेवटची अठ्ठावीस मिनिटे सोडून पाहिला. त्यात संजीव कुमार, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, राखी, परविन बाबी, नीतू सिंग एवढी दणदणीत स्टार कास्ट आहे. शत्रुघ्नचे बरेचसे संवाद "बाळ - राकु" गटात येणारे वाटले. मंगलका खून कोई ऑरेन्ज कोला (?) नहीं है, जो विजय एक झटकेमें पी जाये. एकदम राकु रिअलायझेशन झाले पण राकु सारखे कोणी नाही. गुण, बुद्धी, रूप, प्रतिभा, सुडौल बांधा, काहीकाही नाही पण शून्य आत्मभान व त्यामुळे येणाऱ्या दुर्दम्य आत्मविश्वासाचे साक्षात दैवी रूप म्हणजे राकु. त्यामुळे शत्रु फक्त भक्त वाटतो, देव नाही.
अमिताभचे संवाद तर जीएंच्या व्यक्तिरेखांचे संवाद वाटावेत इतके विमनस्क व हताश आहेत. त्याचा पूर्वेतिहास - एका जहाजाचा कॅप्टन असतो ते जहाज दुर्दैवाने बुडताबुडता वर येऊन बसते, त्याने ह्याचे आपल्या जहाजाला सोडून दिलेला भ्याड कॅप्टन म्हणून कोर्ट मार्शल होते व तो जीए- धर्म स्विकारून एकदम शब्दशः 'भूमिगत' होऊन कोळशाच्या खाणीत मजूर होतो. हमारी कश्ती वहां डुबी जहाँ पानी कम थाच्या- उलट हमारी कश्ती वहां आपोआपच बाहर आई जहां पाणी का वावटळ था.
शशी कपूर जरा नॉर्मल आहे, तो प्रेमात पडतो फ्लर्ट करतो गाणी गातो, कोळशाचे सारखेच - दोन्ही काळे असलेले प्रकार सांगतो. विनाकारण कन्हतकुथत नाही, जमेल तसा खाणीचा इंजिनिअरही होतो. प्रेम चोप्रा सगळीकडेच जसा असतो तसा आहे. राखी नेहमीच नर्चरिंग टाईप भूमिका असतात, इथे पण ती डॉक्टर आहे. अमिताभ एकदम पाप्याचं पितर दिसतो यात, तो मारतोय तर मार खाणाऱ्याला लागतेय हे फक्त त्याच्या डोळ्यातल्या आगीवरून समजून घ्यायचे. भाभु एक चहाचा दुकानदार व सर्व खबरा सर्वांपर्यंत पोचत्या करणारा बडबडा माणूस आहे.
नाय नाय ऐसा मत कहो! राखीच्या
नाय नाय ऐसा मत कहो! राखीच्या टेबलवरचं पुस्तक अभावितपणे उचलून चाळून बघणारा हीरो आपला फेव्हरिट आहे!
बरं. अभिरुची संपन्न असे
बरं. अभिरुचीसंपन्न पाप्याचं पितर
संजीव कुमार डॉक्टरचा कोतबो - यहां सिर्फ लाशें आती है, लाशें- मरीज नहीं, इलाज करें तो किसका करे - म्हणून जो गायब झाला तो आता शेवटच्या अठ्ठावीस मिनिटांत दिसला तर ठीक आहे नाहीतर 'अमलताश' मधे दोन डबे दाण्याचे लाडू घेऊन गायब झालेल्या अमोलची आठवण जवळजवळ आलीच आहे म्हटलं तरी चालेल.
काल Coherence पहिला.
काल Coherence पहिला.
एका संध्याकाळी आठ मित्रमैत्रिणी डिनरसाठी जमलेले असतात. अचानक लाईट जाते आणि पुढे काय होतं ते तुम्हीच बघा.
थोडा वेगळा sci fi thriller. Human nature बद्दल बराच वेळ विचार घोळत होते मनात...
सुपर धमाल लिहीली आहेस ती काला
सुपर धमाल लिहीली आहेस ती काला पत्थरची पोस्ट अस्मिता
मंगलका खून कोई ऑरेन्ज कोला (?) नहीं है, जो विजय एक झटकेमें पी जाये >>> नो नो. "मंगल का खून कोई लेमन सोडा नहीं, जिससे विजय जैसे औंगे पौंगे अपनी प्यास बुझाते फिरे"
शब्दशः 'भूमिगत' >>>
टोटल फुटलो हे वाचून.
आणि तो चहावाला मनमोहन कृष्ण आहे. दीवार मधे ज्याने नीतू सिंगच्या वडलांचा रोल केला आहे. भाभू नव्हे.
शशीचा कोळशाचे दोन प्रकार वाला मोनोलॉग स्टार्ट टू एण्ड धमाल आहे.
अमिताभ यात खरे म्हणजे पाप्याचे पितर वाटत नाही. पण तुमचा पॉइण्ट ऑफ रेफरन्स दारासिंग असेल तर वाटेल. माझा रेफरन्स त्याआधीचा बच्चन आहे जो तसा वाटतो. इथे बर्यापैकी मारामारी करू शकेल असा वाटतो. अमिताभचा यातला रोल करीयरमधल्या सर्वोत्कृष्ठ पाच पैकी असेल.
राखीच्या टेबलवरचं पुस्तक अभावितपणे उचलून चाळून बघणारा हीरो आपला फेव्हरिट आहे! >>> टोटली. इथे तो खाणकामगार असला, तरी मूळच्या सुशिक्षितपणाच्या साइन्स दोन-तीन ठिकाणी सहजपणे त्याने दाखवल्या आहेत. अर्थात दिग्दर्शकालाही क्रेडिट आहे. हे पुस्तक चाळणे, राखीबरोबर असताना आदबशीर वागणे, तिच्या इंग्रजी रिमार्कला दिलेले उत्तर इंग्रजीतून आहे व ते पिक्चर पहिल्यांदा बघताना आपल्यालाही स्तिमित करते पण त्यात इंग्रजीपेक्षाही ते बोलण्याची सफाई मूळचा सुशिक्षितपणा आपल्याला दाखवते म्हणून. ७० च्या दशकात इंग्रजी सफाईने बोलणे याचे आपल्याकडे असलेले अप्रूप बघता थिएटर रन मधे याचा इम्पॅक्ट किती आला असेल याची आपण कल्पना करू शकतो.
पण यातला बच्चन खरा पाहायचा तो कामगार वेषात. खुरटी दाढी वगैरे. शरत सक्सेना चाकू खोलतो. तेव्हा तो मागे वळून बघतो. तो सीन - ती एक फ्रेम. एकही काफी है.
कोणाला असे जाणवले का - कभी कभी हा सलीम-जावेदची स्क्रिप्ट असलेला पिक्चर नाही. पण तरीही तो धरून हे यश चोप्राचे पिक्चर (दीवार, त्रिशूल, काला पत्थर) आहेत त्यातला अमिताभ हा सलीम-जावेद इतकाच साहिरचा "प्रातिनिधिक" नायक वाटतो.
मला तो भाभूच वाटला. आणि
मंगल का खून कोई लेमन सोडा नहीं, जिससे विजय जैसे औंगे पौंगे अपनी प्यास बुझाते फिरे" >>>
व्वा. पाठ आहे.
औंगेपौंगे शब्द सोड्यापेक्षाही महत्त्वाचा आहे आणि माझी सोड्याची ऑर्डरही चुकली.
शेवटच्या परिच्छेदातले निरीक्षण भारी आहे.
मला तो भाभूच वाटला. अमिताभ पॉलिश्ड आणि अदबशीरच आहे, ते गरज असताना जेव्हा बाहेर पडतं त्यातली सफाई लपत नाही. त्यामुळे अनुमोदन. अमिताभ उंचच्याउंच दिसतो, लांबलांब ढांगा टाकत चालतो, तोंडाला सतत काळं फासलेल्या अवस्थेत आहे. परिक्षीत सहानीची गाणी अमाप आणि कंटाळवाणी वाटली, तो दिसलारेदिसला की फाफॉ केले.
चित्रपट एन्जॉय केला खूप. बऱ्याच दिवसांनी टिपिकल मसालेदार व जुना पिक्चर पाहिला. संवाद जबरदस्त आहेत, मी तर आता काय करतात बघू म्हणत परीक्षा बघण्यासाठी सबटायटल्सही वाचले. संवाद नुसते जबरदस्तच नाहीत तर प्रत्येक पात्र वेगवेगळे एस्टाब्लिश करण्यात संवादांचा हात आहे व त्याने सगळे प्रॉमिनन्टली उठून दिसतात.नीतू सिंगचा रोलही खूप हाय एनर्जी - बांगड्या, अंगठ्या विकणाऱ्या बाईचा आहे. परविन पत्रकार आहे, राखी डॉक्टर आहे. तरीही गावातील एका लग्नात त्यांच्या त्यांच्या क्लासनुसार त्या त्या वेशभूषेत तिघींचं एक गाणंही आहे.
राखी व विजय पावसात कुणालातरी इंजेक्शन द्यायला जातात, पाऊस व अंधार असल्याने तिचा पाय घसरून ती त्याच्या सेमी - मिठीत पडते. तर ते शत्रुघ्न मस्त आपल्या घरातील बाजेवरून पडल्यापडल्या पाहतो, इतका 'स्ट्रेटफोरवर्ड' शॉट आहे.
मग ती अमिताभला म्हणते की मला तर अंधारात काही दिसत नाही. तुला कसं दिसतं तर याचं माझ्या जीवनातच अंधार आहे , त्यामुळे मला कुठेही दिसतं - टाईप विमनस्क "जीए-स्पीच" सुरू होते. भारी डायलॉग आहेत पण, थेरपी द्या याला कुणीतरी वाटतं आपल्याला, म्हणजे भारीच की. 
एक मिनिटही बोअर होत नाही, खूप ड्रामा आहे. विजय पूर्वाश्रमीचा इतका उच्चभ्रू निघेल असे न वाटल्याने धक्का बसला. मी बहुतेक पूर्ण विसरून गेले होते हा सिनेमा. शरत सक्सेना एवढा प्राचीन आहे हेही नवलच.
नवीन भर - पूर्ण केला आहे. संजीव कुमार पुन्हा आलाच नाही. पाहुणा कलाकारच होता. खाणीत पाणी जाऊन खाणकामगारांचा जीव धोक्यात आलेला असताना विजयने आपले कोर्ट मार्शलचे पाप ह्याच पाण्यात धुवून घेतले. शशी कपूर त्याला 'तू जा तुझा जीव वाचव, माझा पाय दगडाखाली अडकलेला आहे. मी काही आता वाचत नाही' म्हणतो तर हा 'जीव तर एकदा वाचवून झाला आहे, आज आत्म्याला वाचवायचे आहे' म्हणतो. एवढ्या गोंधळात एक तुटलेला दगड थर्माकोल उघडे पडून रामसेतूतल्या दगडांप्रमाणे तरंगत इकडून तिकडे गेलेला दिसला. परिक्षीत सहानीचा खटारा ट्रक बंद पडून (तो 'पुली' करून यांना ओढत असतो) यांची लिफ्ट खाणीत अडकते व तो वाहेगुरूंचे नाव घेताच खटारा ट्रक चालू लागून त्याच्या मदतीने शशी व अमिताभ बाहेर येतात. मॅकमोहन पत्त्यातली दुर्री घेऊन फक्त वाहून गेला, पण तेवढं चालायचंच.
संपली आमची गोष्ट. आता आपापलं प्राईमवर पाहा.
एक मिनिटही बोअर होत नाही, खूप
एक मिनिटही बोअर होत नाही, खूप ड्रामा आहे. >> वर फा म्हणतो तसे चोप्रा काकांचे पिक्चर अजिबात बोअर होत नाहीत. आधी बी आर कडे बनवलेले आणि मग नंतर यशराज मधले. अगदी वक्त पासून त्यांनी ते कसब साध्य केलेले आहे.
अस्मिता , भारी पोस्ट!
अस्मिता , भारी पोस्ट!
पिक्चर पहायला पाहिजे पुन्हा.
चोप्राचे सिनेमे कधीही बोअर
चोप्राचे सिनेमे कधीही बोअर होत नाहीत खरेच, हा माझ्या जन्माच्या आधीचा निघाला तरीही बोअर वाटला नाही. 'कंफर्ट फूड' जशी कन्सेप्ट आहे तशीच माझ्यासाठी 'कंफर्ट मुव्हीज' सुद्धा आहे. त्यात अमिताभचे बहुतेक चित्रपट येतील. चोप्राजचेही बरेच. जे पुन्हापुन्हा बघताना किंवा तुकड्यात बघतानाही मजा येते.
थॅंक्यू रमड आणि फा.
पाप्याचं पीतर असुदे, आपला
पाप्याचं पीतर असूदे (तसं पाप्याचं पितर असलेल्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे, एकेकाळी ही बिरुदावली मिरवत होते, अमिताभ काय त्यासोबत अभिनयातही उत्तम), आपला अमिताभ लाडकाच, लक्ष त्याच्या कडेच. तो समोर शत्रू असो किंवा कोणी (अपवाद एकदाच राजेश खन्ना, आनंद) . नंतर मात्र ते मर्द वगैरेच्या लाटेतले नाही आवडत, तिथे अमिताभवर काट, फुकटही नाही बघितले, नंतर परत वयानुसार भूमिका करायला लागला तेव्हा परत आवडला.
मला अमिताभ जया जोडीही फार आवडायाची, बन्सी बिरजू ही आवडलेला, एक नजरही. सगळी दूरदर्शन कृपा, बरेच गणेशोत्सवात पडद्यावरही बघितले. जंजिर त्यापैकी एक. शोले, सिलसिला थेटरात बघितला.
परवाना मध्ये व्हिलन होता ना, आवडला एकदम पण योगिता बालीच्या पाठीमागे का वेडा असं वाटलं. मजबूर तर डोळ्यात पाणी आणणारा पिक्चर, अमिताभबरोबर, व्हीलचेअरवरची त्याची बहीण फरीदा जलाल जाम आवडली, त्यातले काही सीन्स अजूनही आठवतात. मी नावं बरोबर घेतेय ना, काही गल्लत करत नाहीये ना, जाणकारांनी सांगावं प्लिज.
नंतर मात्र ते मर्द वगैरेच्या
नंतर मात्र ते मर्द वगैरेच्या लाटेतले नाही आवडत >>> हो. मर्द व नंतरचा काही वर्षे पुढे अमिताभ बोअर आहे. एखाद दुसरा अपवाद. ते दिग्दर्शकही प्रतिभा विसरलेले होते त्या काळातले. कायच्या काय पकवले आहे. मर्द, गंगा जमुना सरस्वती, तूफान. आखरी रास्ता एक चांगला आहे. पण त्यातला तरूण अमिताभ दाक्षिणात्य स्टाइल बटबटीत आहे. गॉगल लावलेला हीरो एकदा इकडे व एकदा तिकडे लोकांना लोळवत फायटिंग करतो. ही अमिताभची हेटाई आहे. ती दुय्यम हीरोंना शोभते. अस्सल श्रीखंडात भेसळवाली टूटी-फ्रूटी आहे ती. असल्या "एण्ट्र्या" बच्चनला लागत नसत. नुसता झाडाखाली कोठेतरी नजर रोखून बसलेला, बिडीने सुरूंग पेटवून कोणतीही स्टाइल न मारता नुसता चालत येणारा, खांद्यावर फावडे टाकून चालणारा, डुलकीतून जागा होणारा- अशा साध्या एण्ट्र्याही त्याच्या भारी होत्या. मग हळुहळू मसालेदार होत गेल्या.
त्यावेळेचे त्याचे फेमस संवाद सुद्धा उगाच आरडाओरडा वाले नाहीतः "मै आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता" किंवा "जब तक बैठने के लिए कहा जाये, तमीज से खडे रहो" - हे "इन्डोअर व्हॉईस" मधेच आहेत - त्यात काही केवळ प्रेक्षकांकरता ओतलेला ड्रामा नाही. जरी चेहर्यावर संताप असला तरी. ते भारी वाटतात ते त्याच्या नैसर्गिक आवाजामुळे, त्यावेळच्या एक्स्प्रेशन्समुळे व संवादफेकीच्या कौशल्यामुळे.
दगड थर्माकोल उघडे पडून >>>
आठवला तो थर्माकोलचा दगड 
सेमी - मिठीत >>>>
त्यातली पात्रांची टेलिस्कोपिक व्हिजन हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. >>
ही दोन्ही निरीक्षणे अफाट आहेत 
बरं, ही व्हिजन ऐच्छिक असते. >>>
अगदी वक्त पासून त्यांनी ते कसब साध्य केलेले आहे. >>> खरे आहे. मधे मी वक्त बघितला सलग. अजिबात कंटाळा येत नाही.
स्लो डाऊन.
स्लो डाऊन.
मागच्या पानावरून वाचायला घेतलाय धागा. एकदा उघडला कि नवीन चा रेड फ्लॅग गायब होतो.
मधले फारेंड, अस्मिता. रमड यांचे प्रतिसाद मजेदार आहेत.
एम आय फॅन नाही पण आता एक तरी बघावा लागेल.
कालीचरण मधेच वाचलं. धमाल आहे.
कालीचरण बघायला घेतला आहे हे
कालीचरण बघायला घेतला आहे
हे असं करता तुम्ही लोक!
वरच्या लप्रीच्या पोस्टला हसायचं राहिलं होतं
फा आणि अस्मिता : पोस्ट्स भारी आहेत
कालीचरण आणि कोतवालसाब टीव्ही
कालीचरण आणि कोतवालसाब टीव्ही वर एकाच दिवशी लागले होते. जाहीरात सुरू झाली कि चॅनल बदलत दोन्ही पाहिले. पण आता आठवताना मिसळ झाली आहे.
शत्रुघ्न सिन्हा ओबडधोबड असला तरी टपोरे डोळे, करारी चेहरा, रूबाब आणि भारदस्त आवाज उपरसे डायलॉग डिलिव्हरी मुळं आवडला होता. म्हणजे कपाळावर जुल्फे वाला लूक असेपर्यंत. तो नंतरचा कुरळे केस घट्ट चिकटवून बसवलेला, थोडा बाळसे धरलेला विनोदी वाटतो. अमिताभचं नेमकं उलटं आहे.
विनोदी वाटण्यात सोनी वरच्या कॉमेडी सर्कस पासून कपिल शर्मा शो पर्यंतच्या शो मधे सर्व स्टॅन्ड अप कॉमेडियन्सचा सिंहाचा वाटा आहे.
^^^गुण, बुद्धी, रूप, प्रतिभा,
^^^गुण, बुद्धी, रूप, प्रतिभा, सुडौल बांधा, काहीकाही नाही पण शून्य आत्मभान व त्यामुळे येणाऱ्या दुर्दम्य आत्मविश्वासाचे साक्षात दैवी रूप म्हणजे राकु^^^
त्रिवार दंडवत या वाक्यासाठी .....
बाकी काला पत्थर माझा खूप आवडता सिनेमा, फक्त अमिताभ साठी...
चोप्रा काकांचे पिक्चर अजिबात
चोप्रा काकांचे पिक्चर अजिबात बोअर होत नाहीत.
>>>>
अगदी अगदी
काला पत्थर बघितला नाही. त्यातलं बाहों में तेरे गाणं ऍडिक्टिव वाटतं. बघितला पाहिजे.
वक्त कधीही बघू शकते.
साधनाचे लूक्स आवडतात. बाय द वे, ‘आजकल तेरे मेरे प्यार के’ चर्चेमधल्या मुमताजच्या साडीची फॅशन ऍक्चुअली साधनाने आणलीय बरं का. ‘आगे भी जाने न तू ‘ गाण्यात पहा.
कुकातकुका
Pages