Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
ढुढूक ढुढूक ढुढूक ढुढूक.. <<<
ढुढूक ढुढूक ढुढूक ढुढूक.. <<<<<
नेटफ्लिक्स चित्रपट तसे चांगले असतात. पण साच्यातले वाटतात हे खरे आहे. पडद्यामागील कलाकारांची साधारण एकच टीम असेल तर असे होणे स्वाभाविक आहे. म्हणून तो आमीर खान वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायचा, रिपीटेशन टाळायचा.
इथे छुपे influencer आहेत..
इथे छुपे influencer आहेत..
नेटफ्लिक्सचं टेंप्लेट असतं
नेटफ्लिक्सचं टेंप्लेट असतं बरेचदा. मी ज्वेल थीफ टाळला. अधूनमधून येताजाता जो काही नजरेला पडला तो पण इतका बकवास होता की मी पुस्तक वाचत बसले टिव्हीसमोर
मला तो राजकुमार रावचा 'टोस्टर' येतोय त्यात मात्र इंटरेस्ट आहे. तो बघेन.
शुद्ध हिंदी बोलणारा चिनी डॉन
शुद्ध हिंदी बोलणारा चिनी डॉन बघून टडोपाच झाले का तो भारतीय होता काय माहीत.
अगं पुढे तर त्याने अडकित्त्याने सुपारीची खांडं केली आणि जयदीपला पण ऑफर केली. जुन्या डॉन सिनेमात खऱ्या डॉनच्या जागी गंगाकिनारेवाला बनारसी पान खाणारा डॉन येतो. इथेही तसंच काहीसं झालं असेल.
<<<<<<<
हो, हो. अडकित्त्याने खांडं
हो, हो. अडकित्त्याने खांडं करताना पाहिले मी. फक्त चंचीच तेवढी नव्हती. यडेचेत. जेवेल थीफ - जर वाढेल पोलिस.
नेटफ्लिक्स जागतिक स्तरावरील बालाजी टेलिफिल्म्सच आहे. ऐका माझं जरा.
इस उमरमें एक नजरमें पता चल जाता है के लडका और लडकीके बिचमें क्या चल रहा है..! त्यांच्या सिरीज जरा बऱ्या असतात पण सिनेमे फॅक्टरीजन्यच होतात.
ज्यांना 'ढुढूक ढुढूक' कळाले नाही त्यांच्यासाठी - बालाजीच्या मालिका सुरू होण्याआधीचे म्युझिक आहे ते. मग बालाजी उडत येतो व 'सास बहू और कारस्थानं' सुरू होतात.
'ढुढूक' मुळे हातातले काम सोडून आले आहे.
धन्यवाद भरत. मी
तेव्हा बापाची काही रिअॅक्शन आठवत नाही. त्याची पुरती उतरली नसावी. >>>>
स्वस्ति
'मैं खिलाडी तू अनाडी'तला सैफ जपानी बोलताना आठवत नाहीये पण ह्या सिनेमातल्या सारखेच तोही अक्षयच्या घरीच रहायला येतो. हे 'अतिथी देवो भव' काय आहे कळत नाही. त्यांच्या त्यांच्या घरी राहून रक्षण/ पाळत वगैरे करता/ ठेवता का येत नाही. एवढे बॉडीगार्ड काय कामाचे..! जयदीपचे डोळे हिरवट पिंगट केले आहेत, जे क्लोज अप मधे दाखवलेत. आणि पिक्चर संपला की सर्वांचा नाच आहे. पोलिस, डॉन आणि चोर व नकली वाणी - सर्वकॅरेक्टर समभाव.
ह्या सिनेमातल्या सारखेच तोही
ह्या सिनेमातल्या सारखेच तोही अक्षयच्या घरीच रहायला येतो >>> यावरून इतकंच लक्षात येतं की सैफ फुकट्या आहे
फुकट्या आणि 'अतिथी लाईन मारो'
'मैं खिलाडी तू अनाडी'तला सैफ
'मैं खिलाडी तू अनाडी'तला सैफ जपानी बोलताना आठवत नाहीये
>>
गावठी (विजय) शिल्पा शेट्टी ला मॉडर्न अवतारात (डॉन) शक्ती कपूर (नारंग) कडे घेऊन येतो तेंव्हा आहे, किमोनो घातलेला सैफ
'मैं खिलाडी तू अनाडी'तला सैफ
'मैं खिलाडी तू अनाडी'तला सैफ जपानी बोलताना आठवत नाहीये >> कारण तो जपानी बोलत नाही आणि त्याने कपडेही जपानी नाही तर चायनीज घातले आहेत. तो फक्त एवढंच सांगतो "आय अॅम डॉक्टर फू मांचू फ्रॉम चिंचपोकली".
आठवलं.
ज्यांना 'ढुढूक ढुढूक' कळाले
ज्यांना 'ढुढूक ढुढूक' कळाले नाही त्यांच्यासाठी - बालाजीच्या मालिका सुरू होण्याआधीचे म्युझिक आहे ते. >>
धन्यवाद!
आणि पिक्चर संपला की सर्वांचा नाच आहे. पोलिस, डॉन आणि चोर व नकली वाणी - सर्वकॅरेक्टर समभाव >>>
मै खिलाडी तू अनाडी पाहिला आहे पण हे वरचे लक्षात नाही.
पिक्चर संपला की सर्वांचा नाच
पिक्चर संपला की सर्वांचा नाच आहे. पोलिस, डॉन आणि चोर व नकली वाणी - सर्वकॅरेक्टर समभाव.


>>>>>>
असा नाच सक्तीचा करायला हवे खरे तर.. छावा चित्रपट अखेरीस अक्षय खन्ना आणि जुवेकर यांचा ठेवला असता तर मनमिलाप झाला असता त्यांचा
Superstars of Malegaon बघितला
Superstars of Malegaon बघितला.
चांगला आहे.
आवडला.
शादी का गोलमाल (हिंदी डब)
शादी का गोलमाल (हिंदी डब)
जियो हॉटस्टार
स्टोरी अतिशय युनिक अतिशय आगळीवेगळी अशी बिलकुलच नाही.
हिरो आणि हिरोईन दोघांच्या घरून लग्नाची घाई, स्थळे बघणे चालू, अश्यात दोघे वर्षभरानंतर डिव्होर्स घ्यायचे ठरवून लग्न करतात. वर्षभर दुसऱ्या शहरात वेगळेवेगळे राहायचा प्लॅन असतो पण काही कारणाने एकत्र राहावे लागते आणि प्रेम जुळते.
पण चित्रपट छान आहे. रिपीट व्हॅल्यू आहे. अजून एकदा कोणासोबत तरी मी नक्कीच बघेन.
झी 5वर बाबील खान चा "लॉगआऊट"
झी 5वर बाबील खान चा "लॉगआऊट" पाहिला सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर चं आयुष्य लाइक्स आणि सबस्क्राईब वर अवलंबून असतं त्यासाठी तो काय काय करतो याचं रिअलिस्टिक आणि तितकंच चिंता करण्यासारखं वास्तव चित्रपटात दाखवलंय . त्यातच ज्या मोबाईल वर हे सगळं अवलंबून असतो तोच जर का चोरीला गेला तर आणि ज्याप्रमाणे हल्लीच्या पिढीचं सगळं आयुष्य त्या मोबाईल शी कनेक्टेड असतं अगदी बँक पेमेंट,शॉपिंग पासून ते पर्सनल चॅट फोटोज व्हिडिओ पर्यंत सर्वच .त्याचा वापर करून कोणी ब्लॅकमेल करून स्वतःच्या मनाप्रमाणे गोष्टी करायला भाग पाडत असेल तर काय होते हे पाहायचे असेल तर चित्रपट पाहा . पिच्चरची सुरुवात उत्कंठावर्धक वाटली तरी शेवटी थोडं फुस्स व्हायला होतं कारण आपल्या अपेक्षा वेबसीरीज बघून भराऱ्या मारून आलेलं असतं त्यामुळे, तरीही चित्रपट बर्यापैकी गुंतवून ठेवतो . बाबील खान मधे इरफान ची झलक दिसते त्याने कामही चांगले केलेय.चित्रपटात लूपहोल्स आहेत तरीही चित्रपट पाहिल्या नंतर इंटरनेट ,मोबाईल इतर अलेक्सा सारखे कनेक्टेड गॅजेट्स, सोशलमिडिया याचा वापर करताना एकदा नक्कीच विचार करू.शेवट आवडला.एकंदरीत चित्रपट वन टाइम वॉच आहे.
Logout सिनेमा मला पण आवडला.
Logout सिनेमा मला पण आवडला.
Influencer आणि त्याचं आयुष्य खरं वाटेल असं दाखवलं आहे...
Pages