शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरिसेलु म्हणजे अनारसे….

क्या याद दिलाए ! याबद्दल एक विस्तृत चर्चा झाली होती दुस ऱ्या एका धाग्यावर

असो, इथे अधिक अवांतर करत नाही.

नाराजी
या अर्थाच्या अरबी/फारसीतून मराठीत आलेल्या शब्दांची अगदी रेलचेल आहे :

इतराजी, गैरमर्जी, खपामर्जी, दिकमर्जी, नामुरादी, खफगी, आजुर्दगी, इ.

वरीलपैकी पहिले तीन शब्द सामान्य साहित्यात वापरलेले आढळतात. इतर शब्द मात्र ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये दिसून येतात.

खपामर्जी - नेहमी पुस्तकातच वाचला आहे. वरिष्ठांची/ बॉसची खपामर्जी या अर्थाने जास्त वाचला आहे. ह्याला काही तरी ऑथॉरिटी लागते असे वाटायचे. कनिष्ठाच्या मर्जीला असंही कोणी विचारत नाही. तरीही Happy

आता चर्चा मुळावरच आली आहे तर आधुनिक मराठीतील एक बहुचर्चित शब्द पुन्हा एकवार चर्चेला :
अतरंगी

हा म्हणे कुठल्याही पारंपरिक कोशांत मिळत नाही. म्हणून त्याला मूळचा मराठी म्हणता यावे.
अशा काही शब्दांचा शोध घेता येईल.

Pages