शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवंगत व्यक्तीच्या नावाआधी वापरायचा अजून एक शब्द अलीकडे काही ठिकाणी वाचण्यात आला :
स्मृतिशेष

१. “ही गुढी उभारणारे समर्थ हात होते स्मृतिशेष बिंदुमाधव जोशी, बाबूजी (संगीतकार सुधीर फडके), मधु मंत्री आणि त्यांचे सहकारी यांचे”.
https://www.loksatta.com/sampadkiya/features/golden-jubilee-year-of-mumb...
. . .

२. 'महात्मे कालवश होऊन स्मृतिशेष होतात.'
दाते शब्दकोश

छान !
उजळणी झाली.
या शब्दाचा वापर वाढता राहिला तर भविष्यात त्याचे स्मृ. असे लघुरूप होईल का ? (कै. प्रमाणे)
एक शक्यता.

तर्जुमा/ तरजुमा
फारसीतून आलेला हा शब्द रोचक आहे. कोशात त्याचे अनेक अर्थ मिळतात :
लेख; अर्थ; भाषान्तर; ताळेबंद.
(फारसी-मराठी शब्दकोश)

एखादा मजकूर अनेक वेळा लिहून काढून मग पक्का केला की त्यालाही तर्जुमा म्हणतात असे खालील वाक्यावरून दिसते :

"त्या कादंबरीसाठी लेखकाने खूप मेहनत घेतली. तिचे बत्तीस की काय तर्जुमे खरडले".

चमनगोटा [ फा. चमन (= बाग), क. गोट्ट (=
आंब्याची कोय); त. कोट्टै (= दगड); म.
कोट्ट (= बी); क. कोट्टे; ते. गोवण ] कोयीसारखी
तळतुुळीत हजामत
कृ .पां.कुलकर्णी संपादित ‘मराठी
व्युत्पत्ति कोश
गोटा खोबरे बघितले असेलच.

फळाच्या आतली बी या अर्थाने केसांच्या आतले डोके म्हणजे गोटा हे फिट बसते. नारळाच्या शेंड्यांच्या आतले खोबरे म्हणजे गोटा पण चमन का लावायची गरज पडली ते कळत नाही. फारसी चमन चा गोटा हे बागे संदर्भात पण वापरात पाहिजे होते. पण तसे दिसत नाही. त्यामुळे चमन गोट्याचे विशेषण किंवा कारण असले पाहिजे.

अलगुज
अरबी अल+ ऊद फा. अल्गोजाह बासरीचा एक प्रकार.
पण मला दिसलेल्या संदर्भावरून अल्गुज=पावा हा फारसी शब्द आहे.

अपत्य
अपत्य म्हणजे संतती मुले बाळे.
मूळ धातू पत् म्हणजे पडणे, पतन होणे. "पातळ" शब्द ह्यावरूनच आला आहे. पडण्याचा ज्याचा स्वभाव आहे ते. अपत्य म्हणजे ज्याच्या योगाने पूर्वज पतन पावत नाहीत ते.
ज्यास संतती नाही त्यास स्वर्ग प्राप्ती नाही असे शास्त्रवचन आहे. मुलगा श्राद्धादि क्रिया करतो त्यांच्या योगाने पूर्वजांस सद्गति प्राप्त होते असे मानले जाते.

'पतन'- चर्चा आवडली. पतित शब्द आठवला.
पूर्वज पतन पावत नाहीत म्हणजे पुढची गती मिळून पुन्हा पतन - जन्म घेऊ शकत नाहीत, भटकतबिटकत राहतात ह्या अर्थाने असेल असं वाटतंय.

ओह ओके ओके. धन्यवाद. Happy
माझा गोंधळ झाला. स्वर्गप्राप्ती हे अपतन आहे तर.

पतंग माहित नाही पण प्रपातचा निश्चित आहे. BTW प्रपात शब्द बृहद कोशात मिळाला नाही. कॉलींस डिक्शनरी मध्ये धबधबा असा अर्थ दिला आहे. म्हणजे पाण्याचे पतन.
पतंग शोधून बघतो.
अलगुज शब्दासाठी आज फारसी मराठी शब्द कोश उघडावा लागला. त्यावरून एक मज्जा आठवली.
ती नंतर लिहीन.

श्राद्ध न केल्याने नरकात पतन होते (नरक खाली आहे) , ते होत नाही अशा अर्थाने असावे ते.

पतितपावन म्हणजे जो पतन झालेल्यांना पावन करतो.

हो, धबधबा माहिती होते. पत्+ अंग= पतंग वगैरे ओढूनताणून होते का बघत होते.
अलगुज ची गंमत लिहा, त्याचा अलगद, अलवार शी संबंध आहे का ..

नरक खाली आहे - म्हणजे ते सप्तलोकाच्या लोकेशन प्रमाणे खाली - अधःपतन. स्वर्गनरक असं सहसा स्पष्ट नसतं, 'गती' असं मोघम ठोकून दिलेलं असतं. श्राद्ध केलं तर पुढची गती म्हणजे सप्तलोकात 'त्या त्या' माणसाच्या योग्यतेच्या स्टेशनाचे तिकीट काढून ट्रेन मधे मुलं बसवून देतात. नाही केले तर नो टिकीट गाडीतून खाली ढकलून नरकात. Happy उगाच अवांतर.

Lol 'पतझड सावन' गाणं सुद्धा येऊन गेलं डोक्यात.

पत्-ते हे नावही ते देखील खाली टाकून (उतारी) खेळतात >>> Rofl
पण मग "नॉट अ‍ॅट होम" (आम्ही लहानपणी त्याला नाटे आटे ठोम म्हणायचो) हा पत्त्यांचा खेळ होणार नाही

अपत्य हे मुलगा किंवा मुलगी दोघांना म्हणतात. पण कर्मकांडांप्रमाणे तर्पण फक्त मुलगाच करू शकतो. म्हणजे मुलगी अपत्य नसते का?

अलगुज मधला अल कोणत्या अर्थाने?
Submitted by अवनी on 2 April, 2025 - 14:57
मराठी मध्ये अल् म्हणजे काय?
मराठी शब्दकोशातील अल् व्याख्या
अल्—१ अरबी भाषेंतील षष्ठीचा प्रत्यय, चा, ची, चे. उ॰ अल् बेरुनि = बेरुनीचा. २ इंग्रजी 'दी' प्रमाणें निश्चितार्थी उपपद. उ॰ अलेंबिक-अल् = उपपद + अंबिग = आसुतिपात्र.
https://educalingo.com/mr/dic-mr/al#examples

जेव्हा शास्त्रे लिहिली गेली असतील तेव्हा स्त्रिया देखील अनेक विधी करण्यास अधिकारी असतील . सध्या तर पूजा पाठ सांगण्यासाठी स्त्री उपाध्याय मिळू शकतात.

पतंग [ स. पढंग, पन्नग; ते. गालिपडंग, गालिपट.
गालि (= वारा), पट (= कापडाचा तुकडा )]
वावडी

'वावडी' हा शब्द नेहमी अनेकवचनातच ऐकला आहे. वावड्या. उडवायचेच आहे तर एकच कशाला असा विचार असेल. पट पासून पतंग याची नोंद घेतली.
इंटरेस्टींग पोस्टी.

Pages