
भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
हो बरोबर केकू. आधीच्या
हो बरोबर केकू. आधीच्या गोंधळाबद्दल क्षमस्व.
लोकप्रिय: लोकांना प्रिय/लोक
लोकप्रिय: लोकांना प्रिय {असलेला नेता,कलाकार इ}
लोक ज्याला प्रिय आहेत तो {लोकांना टाळणारा किंवा माणुसघाणा नसलेला अशा अर्थाने}
हरचंद पालव, पटले. समासांची
हरचंद पालव, पटले. समासांची नावे इ. विसरलो आता. मध्यमपदलोपी, द्वंद्व, द्विगु असे काही लक्षात आहेत.
नञ तत्पुरुष असा काही होता का?
नञ तत्पुरुष असा काही होता का?
नञ तत्पुरुष असा काही होता का? >> होञ ... आपलं... होय, होता
समास !
समास !
द्विगु म्हणजे ज्यात संख्या असली तर जो समास होतो तो न?
बहुव्रीही, अव्ययी भाव, कर्मधारय अशी नावे आठवतात.
कांतचे अन्य अर्थ शोधताना हे
कांतचे अन्य अर्थ शोधताना हे एक सापडले :
लोहकांत याचा संक्षेप = चुंबक
भारतातील काही प्रमुख
भारतातील काही प्रमुख प्राण्यांची पर्यायी नावे (सर्व बृहदकोशातून) :
हत्ती : हस्ति, वारण, गज, करटी, कुंजर-रु, ( ऐरावत - इंद्राचा हत्ती; ऐरावताची मादी -अभ्रमु)
वाघ : व्याघ्र, शार्दूल. बिबट्या (तेंडवा), चित्रक चित्ता; चिट्ट्या, ढोऱ्या, गाडेसोनाऱ्या, गोटू(तंजावर), खरड्या, वाघट, ढाण्या, दिवट्या. (यातील काही जाती आहेत).
सिंह : मृगेंद्र, घजन्फर, शेर (= वाघ, सिंह), सिंघ-ग, सिंव्ह,
अरण्यराज, हुझूब्र, केशरी/केसरी, कंठीरव, कटिरव, पंचानन, सारंग, शहाडा, सरजा
कोल्हा : जंबूक, शृगाल, शियाल, क्रोष्ट, शृंगाल-ळ
*वरीलपैकी काही नावे सामान्य वापरात नसली तरी शब्दकोड्यांमध्ये त्यांचा बऱ्यापैकी वावर असतो.
( घोड्याची यादी पूर्वी एकदा लिहिली होती).
मागच्या आठवड्यात मटामधल्या
मागच्या आठवड्यात मटामधल्या कोड्यात हत्तीकरता व्याल हा शब्द होता
बरोबर
बरोबर
यादीमध्ये कोणीही भर घालू शकतो.
पेजिंग हर्पा/मानव/ऋतुराज
पेजिंग हर्पा/मानव/ऋतुराज किंवा कोणीही जाणकार!>>>>>> बापरे. हर्पा, मानव यांच्याबरोबर माझे नाव. _/\_
दडपण आले. परंतु माझी तेवढी गती नाही.
मानव यांनी केलेले विवेचन पटते आहे.
लांच्छन / लांछन दोन्ही बरोबर वाटतायेत.
लांछन शब्द बरेचदा दोष, डाग यासाठी वापरतात. परंतु मूर्ती शास्त्रात लांछन हे त्या मूर्तीचे व्यवच्छेदक लक्षण/ खूण सांगण्यासाठी वापरतात.
व्याल हा एक काल्पनिक प्राणी आहे बऱ्याच मंदिरावर तो आढळतो. सिंहाचे शरीर, हत्तीचे तोंड, वाघ साप इत्यादीचे तोंड. अश्वव्याल, गजव्याल असे अनेक प्रकार आहेत.
द्विगु म्हणजे ज्यात संख्या असली तर जो समास होतो तो न?
हो
पंचवटी - पाच वटांचा समूह.
भारतातील काही प्रमुख प्राण्यांची पर्यायी नावे>>>> रोचक. यातील बरीच नावे पहिल्यांदा पाहतोय
सिंह -
मृगराज, मृगरिपु, मृगपति पशुराज, पशुपति, वनराज, मृगारि, गजारि
हत्ती -
मातंग, करिन, दन्तिन
व्याल म्हणजे gargoyle की मग,
व्याल म्हणजे gargoyle की मग, मला वाटायचं gargoyle ला मराठी प्रतिशब्द नाही. धन्यवाद ऋतुराज.
*व्याल हा एक काल्पनिक प्राणी
*व्याल हा एक काल्पनिक प्राणी आहे
>>> ओहो! फारच रोचक
व्याल सारखाच “शरभ”
व्याल सारखाच “शरभ”
हा हत्तीचे मुंडके अन सिंहाचे शरीर असणारा काल्पनिक प्राणी
आवडत्या मैसोर साबणाचा लोगो
शरभ हा शिवाचा अवतार
शरभ हा शिवाचा अवतार
हिरण्यकश्यपूचा वध केल्यावर उन्मत्त झालेल्या नरसिंह अवताराला ताळ्यावर आणण्यासाठी शिवाने घेतलेला अवतार.
या काल्पनिक पशूला सिंहाचे एक किंवा दोन डोकी, दोन पंख आणि आठ पाय असतात. .
जाणकारांनी अधिक सांगावे.
हे त कैचनै मोड ऑन
हे तं कैचनै मोड ऑन
गुगलबाबा सांगत्यात की एक नवगुंजार/रा नावाचा प्राणी आहे. मी तरी आधी कधी ऐकला नाहीये.
त्याची माहिती अशी :
Made up of 9 animals, the Navagunjara was said to have a rooster’s head, three feet of an elephant, tiger, and horse respectively, along with the fourth limb being a human’s raised hand holding a lotus. Further, the creature had the neck of a peacock, the hump of a camel, the tail of a serpent, and the waist of a lion. It is believed that Lord Krishna took this form to test Arjuna while he was hunting in the jungle.
https://www.herzindagi.com/society-culture/10-hindu-mythology-creatures-...
ऋतुराज, मस्त माहिती. शरभ
ऋतुराज, मस्त माहिती. शरभ माहित आहे. देवळाच्या बाहेर असतोच असतो.
https://shivanirajandesign
https://shivanirajandesign.wordpress.com/2021/07/17/10-indian-mythologic... इथे अजून दोन माहित नसलेले प्राणी सापडले.
तिमिंगिला - In Sanskrit, ‘timi’ is whale and ‘gila’ means swallow. Timingila is a gigantic sea serpent from Indian mythology. It is said to be so big that it could easily swallow a whale. It has been mentioned in both Ramayana and Mahabharata.
किर्तीमुख - Kirtimukha (kīrtimukha, also kīrttimukha compound translating to “glorious face”) is the name of a swallowing fierce monster face with huge fangs, and gaping mouth, very common in the icon of temple architecture in India and Southeast Asia
Unlike other Hindu legendary creatures, for example the Makara sea-monster, the kirtimukha is essentially an ornamental art which has its origin in a legend from the Skanda Purana and Shiva Purana – Yuddha khand of Rudra Samhita.
हा की हे? कारण नुसताच चेहरा आहे. किर्तीमुख देखिल देवळाच्या प्रवेशद्वारावर असतो.
* नवगुंजार आणि सर्व इतर
* नवगुंजार आणि सर्व इतर कुतूहलजनक आहे !
मस्त. . .
ऋतुराज, हा शरभ ना?
ऋतुराज, हा शरभ ना?
हे फोटो ओडीशातील खंडागिरी पर्वतावरील मंदिराबाहेर घेतले आहेत. हे दोघे पायऱ्यांच्या दोन बाजूला होते. हे एकसारखे नाहीत.
ऋतुराज, मस्त माहिती. शरभ
ऋतुराज, मस्त माहिती. शरभ माहित आहे. देवळाच्या बाहेर असतोच असतो.>>>>> शरभ शक्यतो नसतो
व्याल व गंडभेरुंड जास्त असतो
कीर्तिमुख हे शक्यतो मुख्य गाभाऱ्याच्या उंबरठ्या खाली असते.
मला माहित असलेली कथा
एका राक्षसाच्या मनात पार्वतीबद्दल आसक्ती निर्माण झाली. मग शिवाने एक राक्षस (कीर्तिमुख) आपल्या जटेतून निर्माण केला. त्याला त्या राक्षसाला खाण्याची आदेश दिला. आता त्याला खाऊन झाल्यावर कीर्तिमुखाला आणखी भूक लागली आता काय खाऊ असे तो विचारू लागला. त्याला भस्म्या झाला होता. त्याची भूक अनंत होती. मग त्याला स्वतःलाच खायला सांगितले. त्याने पायापासून सुरुवात केली पण स्वतःचा चेहरा खाता येईना.
मग त्याला देवळाच्या उंबरठ्यावर बसून येणाऱ्या भक्तांचे पाप खायला सांगितले.
असे हे कीर्तिमुख आता देवळाबाहेर सुद्धा अनेक शिल्पाकृतीत दिसते. तसेच दुकान, वाहन, घर यावर देखील ही कीर्ती मुख लावतात. दक्षिणेत जास्त दिसते.
तिमिंगिला, नवगुंजार नवीन माहिती.
फोटो ओडीशातील खंडागिरी पर्वतावरील मंदिराबाहेर घेतले आहेत. >>≥ सिंह वाटत आहे.
राक्षसाची कथा आवडली !
राक्षसाची कथा आवडली !
हत्ती आणि वाघावरून सुरू झालेल्या चर्चेने आता मंदिरातील शिल्पाकडे सुरेख वळण घेतले आहे. रोचक!

गंडभेरुंड. >> हे पण ऐकून
गंडभेरुंड. >> हे पण ऐकून माहित आहे.
कीर्तिमुख हे शक्यतो मुख्य गाभाऱ्याच्या उंबरठ्या खाली असते. >> हो बरोबर. कथा भारीये.
फोटो ओडीशातील खंडागिरी पर्वतावरील मंदिराबाहेर घेतले आहेत. >>≥ सिंह वाटत आहे. >> अच्छा.
अतिशय समृद्ध चर्चा. ऋतुराज,
अतिशय समृद्ध चर्चा. ऋतुराज, मामी, तुम्हाला दंडवत.
देवळाच्या उंबरठ्यावर बसून येणाऱ्या भक्तांचे पाप खायला सांगितले >> त्याला सतत काय खायला द्यायचं हा प्रश्न इथे मिटला. भक्तांची पापं काही कमी होणाऱ्यातली नाहीत हे एकदम मिश्किल पद्धतीने सांगणारी कथा वाटते आहे.
छान कथा.
छान कथा.
त्याला सतत काय खायला द्यायचं हा प्रश्न इथे मिटला. भक्तांची पापं काही कमी होणाऱ्यातली नाहीत हे एकदम मिश्किल पद्धतीने सांगणारी कथा वाटते आहे. >>
त्याला सतत काय खायला द्यायचं
त्याला सतत काय खायला द्यायचं हा प्रश्न इथे मिटला. भक्तांची पापं काही कमी होणाऱ्यातली नाहीत हे एकदम मिश्किल पद्धतीने सांगणारी कथा वाटते आहे. >>>>
हर्पा, कथे मधिल ही मेख लक्षात
हर्पा, कथे मधिल ही मेख लक्षात आली नव्हती़ऋतुराज फार मस्त कथा.
फार मस्त चर्चा आणि माहिती.
फार मस्त चर्चा आणि माहिती.
फडशा पाडणे याअर्थी असलेले
फडशा पाडणे याअर्थी असलेले विविध शब्द पाहणे रंजक ठरेल :
[सं. आपोहिष्ठा इ॰ मंत्रावरून]
. .
अजून काही ?
मटकावला. सदूने फराळ मटकावला.
मटकावला.
सदूने फराळ मटकावला.
तुटुन पडणे
चिंटू आणि बच्चेकंपनी लाडवांवर तुटुन पडली
तुटुन पडणे समांतर अवांतर होते बहुधा
छान!
छान!
हा एक सापडला :
गट्ट करणे
एका प्राण्याने दुसऱ्याला गिळून टाकणं असा आहे.
(https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E...)
'गट्टम करणे' असं बालगीतांमध्ये वाचले आहे
Pages