
भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
+चोराची आळंदी नावाचे एक गाव
+
चोराची आळंदी नावाचे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे.
हे चोरांचे उत्पत्तिस्थान म्हणावे काय ?
चोरी मारी चोर शिपाई चोर ओटी
चोरी मारी
चोर शिपाई
चोर ओटी
"चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला" अस ऐकलंय
चोर आले की मागोमाग शिपाई
चोर आले की मागोमाग शिपाई येणार. शिपायांचेही त्यांच्या specific duties नुसार प्रकार असतात/ असायचे.
हा एक :
बंकाईत = किल्यावर चौकीपहारा करणारा शिपाई.
इथे “बंका” म्हणजे किल्ल्याभोवती किंवा शाही तंबूभोवती असलेली पहारेकर्यांची अथवा चौकीदारांची फौज/रांग असा अर्थ आहे.
शब्द “बंकर” bunker ला जवळ जाणारा आहे.
बंका
बंका
या शब्दाचा बंकापुरे या आडनावाशी काही संबंध असावा का?
का बंकापुर आहे एखादे?
चोरटे स्पर्श/कटाक्ष, मोठ्याने
चोरटे स्पर्श/कटाक्ष, मोठ्याने बोला/हसायची चोरी इत्यादीही नोंदवावं का पूर्णतेसाठी?
चोरटे स्पर्श/कटाक्ष….
चोरटे स्पर्श/कटाक्ष….
हो हौ, एक मोठा कप्पा / कालखंड कोंबलाय या चोरीत 😄 😄 😄
जीवनात पाण्याचे महत्त्व
जीवनात पाण्याचे महत्त्व सांगणे नलगे. परंतु जुन्या काळचे एक वेगळेच ‘पाणी' पाहायचे आहे का?
हे पहा :
चोरटे पाणी / चोरटे पीक
= गुप्त स्नान.
मुंबईजवळच्या काही शेतकरी लोकांत विवाहापूर्वी मुलगी ऋतुमती झाल्यास तिला चौथ्या दिवशी गुप्तपणे घातले जाणारे स्नान.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
चोरटे पाणी = गुप्त स्नान
चोरटे पाणी = गुप्त स्नान 👌
तिकडच्या आम्रचर्चेतली पोस्ट
तिकडच्या आम्रचर्चेतली पोस्ट इथेही डकवतो :
“रायवळ” हा शब्द गावठी, specific / विशेष नाव नसलेल्या आंब्यासाठी वापरतात कोकणात.
महाराष्ट्रात अन्यत्र रायवळ हा शब्द जंगली लाकडासाठी वापरात आहे. घरबांधणी, फर्नीचर करायला अयोग्य कनिष्ट दर्ज्याच्या लाकूडफाट्याला “रायवळ” म्हणतात.
इंजायली/ आडजातीचे लाकूड असेही म्हणतात.
* रायवळ हा शब्द जंगली
* रायवळ हा शब्द जंगली लाकडासाठी >>>
ओहो ! रोचक.
कनिष्ट दर्ज्याच्या
कनिष्ट दर्ज्याच्या लाकूडफाट्याला “रायवळ” म्हणतात.>>>> नवीन माहिती
रायवळ आणि गोश - वरची माहिती
रायवळ वरची माहिती आवडली. खूप दिवस मराठीची शिकवणी बुडवून आज आल्यासारखे वाटतेय.
रायवळ माहीती फार आवडली. हे
रायवळ माहीती फार आवडली. हे शब्द आपण वापरात ठेवले पाहीजे.
राय हा मूळ शब्द देशी
राय हा मूळ शब्द देशी भाषेतला आहे. ह्याचा अर्थ चिमणा. ह्याचा "लहान" असा अर्थ विस्तार झाला. कमी प्रतीचा.
उदा. रायआवळा म्हणजे लहान आवळा. मोठ्या आवळ्याला डोंगरी आवळा म्हणतात.
राय = चिमणा ?
राय = चिमणा ?
मोठमोठे रायबहाद्दूर आठवले… चिमणराव
रायबहादूर/ रावबहादूर
रायबहादूर/ रावबहादूर
राय सं. राजा > प्रा. राया> राव. राउ. मराठीत अर्थसंकोच होऊन केवळ बहुमानार्थी शब्द झाला.
बहादूर मूळ शब्द फारसी> बहाद्दर. शूर वीर.
आणि
Roy
In India, Roy is an anglicized variant of the surname Rai, likewise meaning "king". Rai (title) is a historical title of royalty and nobility in the Indian subcontinent used by rulers and chieftains of many princely states.[2]
विकी वरून
राय आणि रॉय काही संबंध असेल काय?
राय-रॉय असू शकेल संबंध.
राय-रॉय असू शकेल संबंध. अन्यथा “व्हाइसरॉय” का झाले असते ?
एक मजेशीर निरीक्षण:
“राय”बहादुर, “राय”गड, “राय”रेश्वर इ. मधे राय आधी तर खंडे”राय”, शिव”राय” मधे नंतरही येतो.
कल्याण करी रामराया
कल्याण करी रामराया
राय-रॉय संबंध >> रॉयल
राय-रॉय संबंध >> रॉयल
एवढ्या ठिकाणी राय, राया
एवढ्या ठिकाणी राय, राया वापरला गेला आहे
आणखी कोणाचीतरी यावर "राय" घ्यावी लागणार...
मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया..
"राय"
"राय"
हा शब्द फारसीतून मराठीत आला आहे. जरी आता आपल्याला तो हिंदी वाटत असावा,
मत, अभिप्राय.
संदर्भ मराठी शब्दरत्नाकर
राय आधी तर खंडे”राय”, शिव”राय
राय आधी तर खंडे”राय”, शिव”राय” मधे नंतरही येतो.>>
राय चर्चा वाचतेय. ज चा उच्चार कधीकधी य सारखा होतो, तेव्हा हे शेवटी येणारे राय हे राज सारखे वाटतात.
रामराया - रामराजा ई.
तरी इथे सोबर लोकं आहेत म्हणून
तरी इथे सोबर लोकं आहेत म्हणून पंढरीचा राया आणि रामरायाच आठवला.
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टापलं किंवा राया चला घोड्यावरती बसू .. वगैरे नाही आठवले कुणाला 😂
"राया मला पावसात नेऊ नका का
"राया मला पावसात नेऊ नका का घेऊन चला" कालपासून वाजतेय. चांगले गप बसले होते पण ...
मी सोबरच आहे तरीदेळील
मी सोबरच आहे तरीदेळील ऐश्बर्या रायची आठवण झाली होती. पण विचार केला "नको."
राया मला पावसात नेऊ नका का
राया मला पावसात नेऊ नका का घेऊन चला
अस्मिता, तुमखामैं
हे मी लिहिलेलं खोडले
म्हटलं आधी हरपांनी रामराया लिहिलंय आपण पंढरी राया लिहू. पण मनात सोंगाड्या होता
(No subject)
.. ज चा उच्चार कधीकधी य सारखा
.. ज चा उच्चार कधीकधी य सारखा होतो…
आमचे सर्व जर्मन मित्र आपल्या मिस्टर जाधवांना मिस्टर “यादव” अन् मिस्टर जोशींना मिस्टर “योशी” का म्हणतात त्याचा उलगडा झाला 😀
…मनात ऐश्वर्या राय 😀
… मनात सोंगाड्या 😀
शब्दप्रतिभेचा महापूर !
राया तुम्ही जाळ्यात पाखरू
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टापलं किंवा राया चला घोड्यावरती बसू ..>>>>
सोबर राहणं इथे बरं नाही
आपण सर्वच सुसाट सुटतो.
आपण सर्वच सुसाट सुटतो.
कुमार रागवत असतील त्यांच्या सिरियस धाग्यावर आपण करत असलेल्या टिवल्याबावल्यांवर
Pages