शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काना-मात्रा-वेलांटीविरहित शब्द रोचक असतात.
तलग
याचे विभिन्न अर्थ पहा :
(न.) = पिलू; बालक.
(पु.) = प्रेम.
(क्रिवि.) = तेथपर्यंत; तोपर्यंत

ज्ञानेश्वरीत त्याचा चकोराचे पिल्लू असा उल्लेख आहे :
“ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें “
. . .
तलग >>> तलगी/ तलंगी = अंडी घालण्याच्या वयास न आलेली कोंबडी; तरुणी.

>>>>amphitheater ला “मुक्ताकाश मंच” हा शब्द वाचला.
वाह!! फार मस्त.

चरवी/चर्वी
= दूध काढण्याचें भांडे
= कासंडी.

या दोन्ही समानार्थी शब्दांची व्युत्पत्ती पाहण्यासारखी आहे :
सं. चरू = यज्ञपात्र >>> कन्नड - चरविगे >>> चरवी.
..
कास = पशूंची दुधाची ओटी >>> कासंडी
* * *
चरवी (कोंकणीत) = मधाचे पोळे
हा पण भिन्न अर्थ.

छान आहे शब्द. आवडला.

हृत्संताप हा हृद्विलासचा विरुद्ध अर्थ दिलाय कोशात.

अस्मिता यांनी निर्मिलेल्या एका नव्या खास मायबोली शब्दाची नोंद हैदराबादच्या धाग्यावरून इकडे करून ठेवावीशी वाटते :

'गटगंज'
= माबोकरांना समृद्ध आणि प्रसन्न करणारे गटग
Happy

तुम्ही 'गटगंज' होऊन हैद्राबादहून परत येऊन माबो-चर्येला (माबोवरील दिनचर्या) लागला असाल आणि येथे नवीन शब्द घेऊन आला असाल असे समजून वाचायला आले तर माझाच शब्द दिसला. या कौतुकासाठी धन्यवाद Happy /\

Lol लाजवू नका. गडगंज सारखा गटगंज. Happy

माबोकरांचे गटग 'गटगंज' करतात या अर्थाने म्हटला होता पण गटगलाच 'गटगंज' म्हणणं सुद्धा आवडलं आहे. चपखल आहे तेही. Happy

अस्मिता.
काही शब्द नाम आणि विशेषण अशा दोन्ही रूपात असतात.
तसे म्हणूयात. Happy

रोचक चर्चा.
जुन्या काळी दीर आणि नणंद होणे किती भारी असेल असे वाटून गेले!! अगदी गटगंज वाटत असेल.
Happy

Lol जे का रंजले 'गंज'ले, त्यासी व्हर्च्युअल आपले
तेची गटग जाणावे, गडगंज तेथेची व्हावे

हर्पाला समर्पित. Happy

>>>>>तसेच, आवरण शब्दाला अन् लावून ( unwind, undo अशा इंग्लिश शब्दांप्रमाणे ) विरुद्धार्थी झालेला हा एकमेव मराठी शब्द दिसतो!
अनंत, अनादि, अनामिक

सॉरी मी पहील्या पानावर होते ते विसरुन ही कमेन्ट लिहीली आहे. प्लीज कंटिन्यु.
---------
>>>>त्यासी व्हर्च्युअल आपले
Proud

दण्णी
हा शब्दकोशात तर काही मिळत नाही. परंतु तो सतीश आळेकरांनी वापरला आहे असे या
लेखातून समजले.

" . . . खुज्या मध्यमवर्गाची ‘दण्णी’ निष्क्रियता . . ."

त्याचा अर्थ दणदणीत असाच घ्यायचा ना ?

आजच्या मटा संवाद मध्ये भानू काळे यांचा तेलुगु मराठी अनुबंध हा लेख आहे. त्यातले हे वेचक :

. . . तेलुगु भाषेत उकारांत शब्द मोठ्या प्रमाणावर आहेत (कालु, नखु, वेलु). त्या बाबतीत ज्ञानेश्वरीचे तेलुगुशी बरेच साम्य आहे. . .
तेलुगुतून मराठीत आलेल्या शब्दांमध्ये किडूक-मिडूक, अनारसा, पिल्लू आणि गदारोळ, इ. चा समावेश आहे. . .

Pages