Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Btw उद्या किती वाजता फिनाले
Btw उद्या किती वाजता फिनाले आहे. लाईव्ह नाहीये का तो, आज झाला का.
समजलं मला, फिनाले सहा वाजता आहे. मला घरात आलेल्यांपैकी किर्तनकार, योगिता (सॉरी हिचा ड्रेस नाही आवडला), निखिल, पॅडीदादा यांचा वावर आवडला.
आज खूप दिवसांनी एपिसोड आवडला
आज खूप दिवसांनी एपिसोड आवडला (मायनस अरबाझ निकी क्रिन्ज कन्टेन्ट )
आजचा दिवस वैभवने गाजवला, बिघडलेली इमेज पूर्ण क्लिअर करून बाहेर पडला , मलाच बरं वाटलं !
अरबाजह्शी एक शब्दही बोलला नाही तिथेच त्याने अरबाझ २.० टॅग पुसला !
अभिजीत धोबी का कुत्ता , घर का ना घाटका.. त्याच्याशी गप्पा मारायला कोणी उत्सुक नवह्ते कारण तो माणुस डिझर्व करतच नव्हता बी आणि ए दोन्ही गृपचा सपोर्ट.
तरीही बिबॉला त्यालाच जिंकवायचे असेल , तरी अभिजीत पूर्ण फेल.. अगदी पुढारीही अभिजीत पेक्षा बरा..बाहेर येऊन बिघडलेली इमेज व्हाइट वॉश करावा लागेल त्याला.
पॅडीला बघूनही छान वाटलं, पुरुषत्तम-निखिल-योगीताही आधीपेक्षा कॉन्फिडन्ट दिसत होते.
अरबाझ बद्दल नो कॉमेन्ट्स.
बिग बॉसच्या मते अभिजीत
बिग बॉसच्या मते अभिजीत स्पष्टवक्ता आहे,
#कपालबडवतीयोग
अरबाझ मीडिया मुलाखती देताना व्यवस्थित होता. मग त्याचा मूड डाउन कधी झाला?
आर्याला बोलवलं नाही, याबद्दल पब्लिक बोंबलतंय.
कालचा भाग आवडला. योगिता निखिल
कालचा भाग आवडला. योगिता निखिल छान वाटले. योगिताचा ड्रेस भयंकर. तिच्या स्वभावाला अजिबात शोभणारा वाटला नाही. पॅडी नेहेमीप्रमाणे मस्त. वैभव काल खूप आवडला. आधी असा राहिला असतात तर कदाचित चित्र वेगळं असतं. अरबाज निकी मुर्खपणा बोअर झाला. निकी उगीच कॅमेरा साठी नाटक करतेय कळत होतं. तरी जास्त दाखवलं नाही ते बरं वाटलं. छोटा पुढारी त्यांच्या मध्ये मध्ये करत होता तर निक्की ने चक्क हाकललं त्याला. पॅडी ने विचारलं पण नंतर त्याला कि मिटलं का त्यांचं, गेला होतास ना तू ऐकायला. बाहेर एवढं बघून सुद्धा पुढारी साहेबाना समजत नसेल काय कि आपण त्या दोघांच्या मुर्खपणात वाटा उचलू नये. येडंच आहे खरंच.
वैभव निक्की शी पण बोलला नाही अजिब्बात. गुड मूव्ह.
अभिजीतला दोन्ही डगरींवर पाय ठेवल्याची शिक्षा मिळाली.
आर्या ला का नाही बोलावलं ?
मागे शिवानी हिंसा करून बाहेर पडलेली तर तिला नंतर परत घरात घेतलं होतं मग आर्या बाबत वेगळा नियम का केला.
शिवानी हिंसा करून बाहेर
शिवानी हिंसा करून बाहेर पडलेली >>>हे नाही आठवत मला....काय केलं होतं शिवानीने??
म्हणजे आधी राक्षसीण होती हे तिला पण मान्य आहे तर...
कालचा जान्हवीचा डायलॉग खास होता , " मी या घरातून माणूस म्हणून बाहेर पडणार आहे "
निक्की जिंकली.
निक्की जिंकली.
कालचा जान्हवीचा डायलॉग खास
कालचा जान्हवीचा डायलॉग खास होता , " मी या घरातून माणूस म्हणून बाहेर पडणार आहे " Lol म्हणजे आधी राक्षसीण होती हे तिला पण मान्य आहे तर...>>>>>> हो ना, कितीही इमेज क्लिनींग केलं हिचं बिबॉ नी तरी कधीच आवडणार नाही.
जान्हवी बाहेर आणि पॅडीदादा आत
जान्हवी बाहेर आणि पॅडीदादा आत हवे होते. योगिता किंवा निखीलपैकी कोणी हुशारी दाखवली असती तर जान्हवी कधीच बाहेर गेली असती, झक मारत इमेज सुधारुन कलर्स फेस न्यावा लागला त्यांना पुढे. हे मी कितीदा तरी लिहीलं, ती फायनलला असेलच, आहेच.
वैभव बाहेर बघून, घरच्यांनी बोलून सुधारला आहे, त्याला आता काहीही अर्थ नाही. आतमधे खूप चान्सेस घालवले त्याने (हयाला सर्वात जास्त स्पुन फीडींग दिलेलं बिग बॉस, रीतेश, बाहेरुन आलेल्या पाहुण्यांनी). बाहेर गेल्यावर त्याला समजलं बी टीम बाहेर लाडकी आहे आणि ए टीम व्हिलन तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. त्यामुळे ह्याच्याबद्द्ल अजिबात सहानुभूती वाटली नाही.
आता बिग बॉस मेकर्स टीम बदलली आहेना, त्यांनी ठरवलं असेल आर्याला नाही बोलवायचं, परागबाबत मागे जो न्याय केलेला तो केलाय वाटतं तिच्याबाबत आणि सुर्वेबाबत दुसरा न्याय असं एकंदरीत दिसतंय. आर्या गेल्यावर टीआरपी खाली न येता तुफान वाढत गेला (असं बिग बॉस म्हणणं), त्यामुळे तिची गरजही नाही असं चित्र दिसतंय.
मस्त जान्हवी पैसे घेऊन बाहेर
मस्त जान्हवी पैसे घेऊन बाहेर पडली, नाहीतर तिच एव्हिक्ट होणार होती. हे तिला माहीती होतं बहुतेक. आतमधे आलेल्या लोकांनी सांगितलं असावं, असं तिच्या बोलण्यावरुन वाटलं. गुड डिसिजन.
ज्योतिषमहाराजाना बिग बॉसने पढवून पाठवलं आहे का. त्यांनी निक्की, अभिजीत, सुरज टॉप ३ सांगितले आणि सुरज ट्रॉफी मिळवेल की नाही आत्ता सांगू शकत नाही. निक्कीचेही चान्सेस कमी, बिग बॉसला अभिजीतलाच द्यायची आहे की काय.
त्या ज्योतिष्याला आणायची खरंच
त्या ज्योतिष्याला आणायची खरंच गरज होती का? काहीही...
Top 3 leaked yesterday, so
Top 3 leaked yesterday, so no interest in finale !
सुरज जिंकला !!
सुरज जिंकला !!
अभिजित ला ट्रॉफी न दिल्याबद्दल बीबॉ आणि कलर्स चे मनापासून आभार. अभिजित ला ट्रॉफी न दिल्याचा जास्त आनंद आहे
फायनली सुरज जे म्हणत होता ते
फायनली सुरज जे म्हणत होता ते झालं, सुरजने ट्रॉफी जिंकली. अभिनंदन सुरज, चांगल्या मार्गाने जा, शिक, मोठा हो. त्याला केदार शिंदे यांनी पिक्चर ऑफर केला, झापुक झुपुक नाव.
चला इथपर्यंत मी बघितलं, त्याचं समाधान मिळालं.
अभिजित ला ट्रॉफी न दिल्याबद्दल बीबॉ आणि कलर्स चे मनापासून आभार. अभिजित ला ट्रॉफी न दिल्याचा जास्त आनंद आहे >>> अगदी अगदी.
अभिजित ला ट्रॉफी न
अभिजित ला ट्रॉफी न दिल्याबद्दल बीबॉ आणि कलर्स चे मनापासून आभार. अभिजित ला ट्रॉफी न दिल्याचा जास्त आनंद आहे +१
सगळ्या हाउसमेट्सना रिझल्ट आधीपासूनच माहीत होता, असं दिसतं.
हा सीझन , रितेश यांचं किती ते कौतुक! प्रत्येकाकडून रेकॉर्ड टी आर पी आहे हे वदवून घेतलं. प्रोग्राम हेडनेही स्वतःचं प्रमोशन करून घेतलं.
अभिजीत नाही जिंकला ते छान
अभिजीत नाही जिंकला ते छान झालं.
सुरजचं अभिनंदन !
अभिजित ला ट्रॉफी न दिल्याचा
अभिजित ला ट्रॉफी न दिल्याचा जास्त आनंद आहे>>> अगदी हेच लिहायला आली होती मी...गेल्या आठवडय़ात तर अभिजीत अगदीच डोक्यात गेला...अंकिता गेल्यावर वाईट वाटलं...असं वाटलं जर अंकिता डिपीच्या आधी जाऊ शकते तर अभिजीतलाच winner बनवतील...पण सूरज जिंकला हे 8.30 लाच कळलं आणि खूप आनंद झाला...bigg boss मुळे भरभरून मिळालंय सूरजला...चक्क एक चित्रपट मिळाला तेही केदार शिंदेंचा.... खूप छान...पण आता त्याने शिकायला हवे खरंच....आणि मिळालेले यश डोक्यात जाऊ देऊ नये एवढेच वाटते
सूरज जिंकला. अभिजित इंडीयन
सूरज जिंकला. अभिजित इंडीयन आयडॉल जिंकला ते लोकांनी एका मराठी माणसाला मत द्या असा ट्रेण्ड सेट केला होता म्हणून. गाण्यात तो बाकी स्पर्धकांपेक्षा सो सो च होता. आता अमित सना सारखा दिसणारा स्पर्धक सूरज त्याचसोबत उभा करून त्याला जिंकवणे हा जवळपास वीस वर्षानंतर नियतीने केलेला काव्यात्मक न्याय आहे.
सूरजचे अभिनंदन.
सूरजचे अभिनंदन.
शेवटचा आठवडा एपिसोड बघितले नाही, फिनाले बघितला. प्रचंड बोर होता. अगदी ठरल्या क्रमाने लोक बाहेर आले. अभिजित विजेता वाटला होता पण सूरजने बाजी मारली. लोकांचे व्होटिंग भरपूर असावे. केदार शिंदेचा चित्रपट, तूनवालची ev दुचाकी, png चे 10 लाखाचे व्हाउचर, विजेता म्हणून 14 लाख 60 हजार. विजेत्याला साजेशी रक्कम मिळाली.
रितेश यांचं किती ते कौतुक>>>
भाई केव्हा तरी शो सोडणार तेव्हा भाऊ येणार. तसेही निक्की आणि राखी फायनलच्या बॅग टास्क वेळी शो मध्ये भाऊ होता.
सुरजला पहील्यापासूनच तुफान
सुरजला पहील्यापासूनच तुफान वोटींग होतं, मला आश्चर्य वाटायचं, मला आधी तो एवढा आवडलाही नव्हता, तो कोण हेही माहीती नव्हतं, टीकटॉक वगैरे प्रेमी मी नाही. जेव्हा तो पहील्यांदा म्हणाला ना की मी शेवटी आलोय आणि शेवटी ट्रॉफी घेऊन जाणार, तेव्हापासून मी लक्ष द्यायला लागले त्याच्याकडे, मग हळूहळू आवडत गेला, समजत गेला. टास्क छान खेळायचा आणि कोणाबद्दलच वाईट बोलायचा नाही हे प्लस पॉइंट. माणूस म्हणून चांगला वाटला. आता यशाने हुरळून वाया जाऊ नये, हे मात्र वाटतं.
सूरज व अभिजीत दोघेसी आवडते.
सूरज व अभिजीत दोघेसी आवडते. सूरज जिंकल्याचा मनापासून आनंद झाला. तो एकटाच म्हणायचा मी ट्रॉफी जिंकणार
सर्वात जास्त पैसे घेणारी
सर्वात जास्त पैसे घेणारी निक्की होती, विकली पावणेचार लाख आणि सर्वात कमी पैसे घेणारा सुरज होता, पंचवीस हजार.
सुरजच अभिनदन! हा सिझन मोस्टली
सुरजच अभिनदन! हा सिझन मोस्टली इथेच फॉलो केला, फारसे एपिसोड बघितले नाहित पण सुरजला अफाट सपोर्ट होता सोमिवर.
खुपच गुफ अप झाले या सिझनला, पुढचा जरा निट प्लॅन करुन काढा.
झाला एकदा सिझन.मला तर दोघही
झाला एकदा सिझन.मला तर दोघही टॉप 2पटले नाहीत.अंकिता खरतर टॉप तीन मध्ये हवी होती.
निक्की चा चेहरा पूर्ण पडला होता.सूरजला पिक्चर.ऑफर केला आहेपण तसा ममांनी पण शिवलाऑफर केला होता जो आजतागायत आला नाही.
असो.
केदार शिंदेने कालच्या म.टा मध्ये मुलाखतीत सांगितले आहे की या सिझनमध्ये ज्या त्रुटी राहिल्या त्या पुढच्या सिझनमध्ये भरून काढू.
म्हणजे बहुतेक आतापासूनच अभ्यास सुरू करावा लागेल.
त्यासाठी शिंदेसाहेबांनी आताचा हिंदी सिझन पूर्ण बघावा आणि पहिले हे ठरवाव की हिंदीतल्या सदस्यांना आणायच की नाही.
शो चालू करण्याचा महिना पण ठरवावा.म्हणजे शंभर दिवसांचा पूर्ण शो करता येईल.
आणि इतक्या चांगल्या
आणि इतक्या चांगल्या contestants मध्ये ते 'गुलीगत' प्रकरण का आणलं ते त्या bigg bossलाच माहीत...>>>ही माझी प्रिमियरच्या वेळची comment....मला पण तो अजिबात माहित नव्हता...आणि अजूनही मी त्याचे reels बघत नाही...बघू शकेल असं वाटतही नाही...त्याचे एवढे fans का होते ? हा प्रश्नही पडतो...त्याचं ते सतत 'i love you ना बच्चा 'वगैरे म्हणणं आताही नव्हतं आवडत मला...पण एक माणूस म्हणून आवडला सूरज मला...आणि अनाथ असून त्याने स्वतःला जे grow केलंय ते प्रशंसनीयच आहे...घरातून बाहेर निघताना पण खूप भावूक झाला होता सूरज....शिवाय अभिजीतसारखा fake माणूस जिंकण्यापेक्षा सूरज जिंकला ते खूप छान झालं...
शिवाय अभिजीतसारखा fake माणूस
शिवाय अभिजीतसारखा fake माणूस जिंकण्यापेक्षा सूरज जिंकला ते खूप छान झालं...>>> +१
अभिजित जेव्हा आयडॉल जिन्कला तेव्हाही पटला नव्हता, फार अॅव्हरेज गायक आहे तो.
तेव्हा आम्ही वोटिंग केलेलं
तेव्हा आम्ही वोटिंग केलेलं त्याला. त्यावेळी राहुल वैद्य आवडलेला जास्त पण तो टॉप 2 नव्हता.
आज सूरज जिंकला याचा मनापासून
आज सूरज जिंकला याचा मनापासून आनंद आहे पण तो जिंकला असला तरी पॅडीदादा खरे किंगमेकर आहेत !
सूरजला वेळोवेळी दिलेला गायडन्स, कॉन्फिडन्स हे त्याला फक्तं ट्रॉफीच नाही तर भावी आयुष्यात खूप काही देऊन जाणार , त्याचे कायमचे पालकत्व घेण्याबद्दल पॅडीदादांनी सांगितले ही सूरजची खरी व्हिक्टरी आहे !
या सिझच्या आर्याला काढण्याच्या ब्लन्डर नंतर पॅडीला टॉप २ मधे /निदान फिनालेत न नेणे हे फार मोठे ब्लन्डर होते.
पॅडी बुद्धीमान, हजरजवाबी, एंटरटेनिंग होताच याशिवाय एकही अपशब्द न वापरता सार्कॅझमने समोरच्याला चीत करणे हे लाजवाब होते !
फिजिकल टास्क्स मधेही अर्ध्या वयाच्या बॉडी बिल्डर्सना दमवण्या इतके चपळ आणि चतुर होते पॅडीदादा !
असा सर्वगुणसंपन्न विनर करणे चॅनलच्या धोरणात बसत नसावे पण माझ्या साठी पॅडी आणि अंकिता हे टॉप ३ मधे तरी हवेच होते !
असो, संपला सिझन , पूर्ण वाट लागली आर्या गेल्यापासून!
पॅडीदादांचे अचूक वर्णन, ते
पॅडीदादांचे अचूक वर्णन, ते हवेच होते फायनलला. अन्याय केला त्यांच्यावर बिग बॉसने, वर्षाताई आणि जान्हवीसाठी. डीपीही त्यांच्या आधी जायला हवा होता. त्यांनी मन जिंकले. ते बाहेर पडल्यावर जाम वाईट वाटलं, नवऱ्यालाही वाटलं, खूप वर्षांपूर्वी ते bkc त नवरा होता त्या ऑफिसमध्ये होमलोन साठी आलेले, तेव्हा भेट झालेली, छान बोलले.
बाकी निक्की, अभिजीत top 3 mg घेऊन आलेले असणार, अभिजीतला थोडे votes तरी मिळायचे. निक्कीला votes मिळतही नव्हते, अंकिता पुढे होती त्यामुळे तिला निदान अंकिताच्या आधी तरी काढायचे होतं असं वाटलं.
हिंदी बिबॉ 18 चा धागा काढणारे
हिंदी बिबॉ 18 चा धागा काढणारे का, माबो वर सगळ्यांचे pov वाचायला छान वाटते!!!
काढा कोणीतरी हिन्दी बीबी १८
काढा कोणीतरी हिन्दी बीबी १८ धागा, एकदम ग्रॅन्ड बिग बजेट दिसतोय शो !
Pages