चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे त्या विनोदी* पोस्टी इतक्या येतात की चित्रपटांचे रिव्ह्यू किंवा रेकोज सापडतच नाहीत! >>> +१

* - आणि त्यातला बर्‍याच पोस्टींवर हसूच येत नाही हा अजून एक प्रॉब्लेम.>>> +११
वाहत्या धाग्यांवर सिरियस चर्चा चालू असतात आणि हे धागे गप्पांचे झाले आहेत. Proud

खूप सारे लहान लहान प्रतिसाद दिसले, तर मी या धाग्यावरून बाहेर पडतो. फक्त मोठ्या प्रतिसादांवर नजर मारून वाचायचं की नाही , ते ठरवतो.

अमर भूपाळी वरून. चित्रपट कशा साठी आणि कसा पाहावा याबद्दलही काही आडाखे हवेत का? म्हणजे ७० वर्षांपूर्वीचा चित्रपट पाहायचा तर तेव्हाच्या पद्धती, सेन्सिबिलिटीज लक्षात ठेवून पाहायला हवा का? म्हणजे कोणत्याही चित्रपटाला निव्वळ नावं ठेवायच्या उद्देशाने - करमणुकीचा वेगळा प्रकार - हे मीही करतो - पाहायला काही हरकत नाही. पण जर गांभीर्याने बघत असू तर त्या दिग्दर्शकाला त्यात काय सांगायचंय आणि कसं सांगायचंय हे लक्षात घेऊन त्यात तो यशस्वी झालाय का असा विचार हवा का? मनमोहन देसाईचे पिक्चर बघताना लॉजिक शोधायचं नाही.
आशा काळे -अलका कुबलचे चित्रपट पाहताना त्यात बायकांना रडवायची ताकद आहे की नाही, हे बघायचं. अंगूर, इजाजत आणि माचिसवाला गूलजार एकच पण वेगवेगळा हे सुद्धा ध्यानात ठेवायचं.

त्यामुळे मला व्ही शांताराम यांचे चित्रपट खटकत नाहीत , संध्याचा नाच खटकत नाही. चित्रपट बघताना कधी कधी दिग्दर्शक इथे दिसतो (म्हणजे सुभाष घई स्वतः पडद्यावर दिसतो, तसं नाही) असं म्हणतात. व्ही शांताराम यांच्या चित्रपटात सगळीकडे फक्त दिग्दर्शकच दिसतो, असं वाटत राहतं. मग तो संध्याचा अभिनय असो, कारण चानीमध्ये रंजनानेही तेच केलंय ; की त्यांच्या चित्रपटांतलं संगीत असो. नवरंगमधल्या डोक्यावर नऊ मडकी घेऊन तोल सांभाळणंच त्यांना दाखवायचं होतं. किंवा स्वैपाक करतानाच्या नाचातली चमत्कृती. कारण तिथे कवी नवरा कल्पना करतो आहे. बायकोच्या जागी कुणा सुंदरीला पाहतो आहे.

माझा हा प्रतिसाद ट्रोलनीय असू शकेल याची कल्पना आहे.

सिकंदर का मुकद्दर - नीरज पान्डे चा आहे ( A Wednesday, Special 25, Baby वाला ) ठिक ठाक आहे. नीरज पान्डे वाचुन अपेक्शा वाढ्ल्या होत्या.>> +१

बाकी परागच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन .

त्या विनोदी* पोस्टी इतक्या येतात की चित्रपटांचे रिव्ह्यू किंवा रेकोज सापडतच नाहीत! >>> +१
* - आणि त्यातला बर्‍याच पोस्टींवर हसूच येत नाही हा अजून एक प्रॉब्लेम.>>> +११

+१ . मला वाटायचे की मलाच हा इश्यू आहे त्या पोस्ट मधला विनोद (?) न समजण्याच्या.

अमर भूपाळी खूप वर्षांपूर्वी पाहिलेला
आता नीट आठवत नाही
खूप जुन्या चित्रपटातील sound ट्रॅक कधी कधी फारच आवाज घुमतो असे असतात. त्याचा त्रास होतो.
इतक्या जुन्या चित्रापटात भाबडी माणसं दिसतात अंडी ते बघून छान वाटते.
असेल तर बघतो युट्युबवर

>>> इतक्या जुन्या चित्रापटात भाबडी माणसं दिसतात अंडी ते बघून छान वाटते.
टायपोच असणार, पण मी फुटले हे वाचून Rofl

The Substance बघितला. खरं हा सिनेमा अजून थिएटर्स मधे आहे. मी स्टार्टअप शोवर पाहिला.

एकच शब्द " म हा भयंकर"

चिरतरूण राहाणं /दिसणं कोणाला आवडणार नाही and that too एकेकाळी हॉलिवूड मधे प्रसिद्ध असलेल्या एलिझाबेथ या अभिनेत्रीला. उतारवयामुळे तिच्या चालू असलेल्या एरोबिक शोमधून तिचा बॉस तिला अचानक काढून टाकतो कारण आता तिच्याजागी एका तिशीच्या आतली तरूणी त्याला हवी असते. प्रसिद्धीची हाव अशी कुठे सुटते पण. या खचलेल्या मनोवस्थेत तिला असं काही एक सबस्टन्स (योग्य मराठी शब्द आठवत नाही) सापडतं की जे तुमच्या शरीरामधे जनुकीय बदल घडवून तुमचंच तरूण वर्जन तुमच्या शरीरातून (क्लोनिंग) बनवतं. अट एकच की तरूण क्लोन तयार झाल्यावर दर ७ दिवसांनी जुन्या शरीराबरोबर स्विच करावं लागणार टू रिचार्ज. ते ७ दिवस आलटून पालटून जगायचं. या सगळ्यात तरूण एलिझाबेथला (तिचं नाव ती सु ठेवते) आता आयुष्य पुन्हा नव्याने जगावंसं वाटतं असतं, परत ते अटेंशन मिळतंय ते हवंसं वाटू लागतं मग स्पर्धा सुरू होते स्वत:च्या च म्हातार्‍या रुपाशी. काही काळ तिला विसरायला होतं हे दुसरं रुप आपणच आहोत. जणू २ मत्सरी बायका असाव्या अशा त्या वागायला लागतात. विखार इतका टोकाला पोचतो की तरूण एलिझाबेथ (सु) क्लोनिंगच्या वेळी दिलेल्या सगळ्या सुचना धुडकावत वाट्टेल तशी वागते. त्याचा परिणाम हळूहळू दिसायलाच लागतो आणि दोघींचा प्रवास एका भयानक वळणावर येऊन थांबतो.

शेवटी शेवटी बरेच ट्विस्टस आहेत. पण अजून नविन मुव्ही आहे त्यामुळे कोणी बघितला तर स्पॉयलर्स होतील म्हणून लिहित नाही. एक गोष्ट त्यातली कळली नाही ती पण नंतरच विचारेन कोणी बघितला तर Happy तो सबस्टन्स देणारा बिग बॉस कहना चाहते है कॅटेगरी वाटली .... आठवून फिस्स्कन हसूच आले.

बाकी हा सिनेमा बॉडी हॉरर प्रकाराखाली मोडणारा असल्याने किळसवाणे सीन्स, अभद्र, ओंगळ आणि बिभत्सपणा भरपूर आहे. ब्रेव्ह हार्टेड किंवा हा प्रकार आवडणारे असाल तर हा मुव्ही आवडेल Happy प्रचंड प्रमाणात न्युडीटी पण आहेच. डेमी मुर आणि मार्गारेट क्वालीने जबरदस्त काम केलंय.
बहुतेक बरेच अवॉर्ड्स पण मिळाले आहेत सिनेमाला.

खूप एडीटलं .. आता बास!

हम दो हमारे दो
राजकुमार राव, क्रिती सेनान बदाम बदाम बदाम, परेश रावल आणि रत्ना पाठक.. अशी तगडी स्टारकास्ट
पण त्यामुळे फार अपेक्षा न उंचावता लोजिकमध्ये न घुसता सिंड्रेलाची कथा समजून फिल घेत पाहिले तर दोन अडीच तास मजेत जातात. मला आवडला.

शाहरूख नंतर मला राजकुमार राव मधील एक पोझिटीव्ह एनर्जी आवडते
त्यामुळे त्या दिवशी तो कपिल शर्मा शो मध्ये आपला आदर्श शाहरूख आहे, आणि त्यापासून आपण प्रेरणा घेतली हे सांगत होता तेव्हा कसला आनंद झाला Happy

दोघांना कधीतरी एकत्र बघायला फार आवडेल Happy

The Substance

>> फेसबुकवर व्हिडिओज सेक्शन मध्ये या सिनेमाचे खूप सारे तुकडे तुकडे बघून झाले आहेत. तिची मुलगी हॉस्पिटल मध्ये असताना ती तिला भेटायला जाते आणि तिथे मुलीचा बॉयफ्रेंड असतो.. त्याला सगळे माहित आहे हे कळल्यावर (आता लपवाछपवी करावी लागणार नाही म्हणून) तिच्या चेहेऱ्यावर आलेला रिलीफ खूप आयकॉनिक आहे. खरच ती तिच्या लेकीपेक्षाही लहान आणि सुंदर दिसत असते तेव्हा आपल्यालाही आश्चर्य आणि ' काय हा तरुण दिसण्याचा हव्यास ' असं वाटतं.

नेटफ्लिक्स - बधाई दो - लेखक दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी - राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर.
marriage of convenience गे आणि लेस्बियन यांनी घरच्यांची , समाजाची कटकट बंद करायला केलेलं दाखवायचं लग्न. शार्दुल ठाकुर - पोलिस इन्स्पेक्टर. पण गुंडांशी फाइट बिइट करणारा नाही. महिला ठाण्यात पोस्टिंग. तिथे खायला स्कोप नाही म्हणून कुरकुरणारा. सुमि सिंग - पी टी टीचर. यांची गाठ पडते. लग्न करायचं ठरवतात. करतात. लग्न झालं की मूल हवंच. त्यासाठी घरच्यांकडून प्रेशर. इथवरचा सगळा प्रवास विनोदी आहे. म्हणजे प्रत्येक सीनला हसवत नाहीत. पण जिथे हसवतात, तिथे हसू शब्दशः फुटतं.

हा चित्रपट बघताना मला दम लगाके हैशा, शुभमंगल ज्यादा सावधान (हा पूर्णच अचाट होता) , बधाई हो यासारखे चित्रपट आठवले. गुलजारचं छोटे छोटे शहरों से हे गीत ज्या बंटी और बबली साठी आहे, त्यात ही छोटी शहरं फार दिसल्याचं आठवत नाही. पण हे आणि यासारखे इतरही काही चित्रपट छोट्या शहरांत घडतात. त्यातल्या पात्रांचे व्यवसायही असेच छोटे छोटे असतात. पण नायक नायिकेपैकी किमान एकाचा गोतावळा मोठा असतो आणि त्यात कोणी ना कोणी विक्षिप्त असतं. संवाद चुरचुतीत असतात. या कुटुंबांतील संवादांत सेक्स हा विषय टॅबू नसतो. (कल्पना करा - चोप्रा, बडजात्या, जोहर यांनी असा विषय हाताळलाय. कपूर & सन्स मधलं फवाद खानचं पात्र गे आहे, हे उघडपणे / स्पष्टपणे सांगितलंय का? मला तो अख्खा चित्रपट अभारतीय वाटला. असो ) राजकुमार राव आणि काही क्षणांसाठी दिसणारा गुलशन देवैया यांनी पात्र उभं करायला बॉडी लँग्वेज घेतलीच आहे, पण यांचे चेहरेही बोलतात. हम लोग मधल्या बडकी आणि छुटकी यांना पाहून छान वाटलं. नितीश पांडेला ही बर्‍याच काळाने पाहिलं. भूमी एफिशियंट आहे. शार्दुलच्या कायम अर्धवटर झोपेत, स्वप्नात असल्यासारख्या वाटणार्‍या आईच्या भूमिकेत शीबा छड्डा. शार्दुल कायम पळवाटा शोधणारा, तर सुमी स्वतःला काय हवंय याबद्दल जागरुक. आपण आपल्या कुटुंबासमोर कधीतरी आउट होऊ आणि त्यांची प्रतिक्रिया काय असेल याची तिने मनातच अनेकदा उजळणी केलेली . तर शार्दुल कायम तो क्षण टाळू पाहणारा. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवणारा. हे लग्न ही त्याचीच कल्पना. पण तिला जसा समलिंगी जोडीदार हवा, तसं त्याचं नाही. त्याची भावना सुरुवातीला शारीर पातळीवरच असल्यासारखी.
चित्रपट कुठेही उपदेशात्मक होत नाही. जिथे तसा झाल्यासारखा वाटू शकेल, तिथे ते सहज आलं आहे . शेवटची दहा पंधरा मिनिटे रोलर कोस्टर, इमोशनल आणि गोड आहेत.

भरत
छान लिहिलंय. हा सिनेमा पाहिला आहे. आवडला.
दोघांचा अभिनय मस्त आहेत. काही प्रसंग तर अगदी विषयाला धरून पण हसवणारे आहेत.
अर्धवट झोपेत, स्वप्नात असल्यासारख्या वाटणार्‍या आईच्या भूमिकेत शीबा छड्डा>>>>>>अगदी अगदी
गे आणि लेसबियन यांची भारतीय मव वातावरणात होणारी घुसमट, प्रश्न छान दाखवले आहेत.

मला पण आवडलेला बधाई दो. मजेदार होता.

बाकी, मायबोलीवर थम्प्स अप करू शकत नाही, प्रतिसाद आवडला तरी ते सांगायला आणखी एक प्रतिसाद द्यावा लागतो, ट्री व्ह्यू नाही. त्यामुळे गप्पा चर्चा आणि माहिती हे सगळं हे असंच रानोमाळ होत रहाणार.
आणि परत, लिहिणारे लोक आहेत म्हणून मायबोली आहे. त्यामुळे पूर्वी जसे नियम सांगायला लोक/ प्रशासन यायचं तसं हल्ली येत नाही, येणार ही नाही असं वाटतं. कारण पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. जग बदललं आहे, आंतरजाल बदललं आहे.

कळलं Lol

नाच गाण्यांबद्दल लिहायचं राहिलं. गाणी चित्र पटात ऐकताना अर्थपूर्ण वाटतात, नंतर एकही लक्षात राहिलं नाही. हरकत नाही.
विवाहसमारंभातला नाच बघताना अंबानींच्या घरचं लग्न आठवलं; इतका तो कोरियोग्राफरला बोलवून न नाचणार्‍यांकडून बसवून घेतल्यासारखा झाला आहे. अ‍ॅप्ट.

हा रिलीज झाला त्याच सुमारास 'शुभ मंगल ज्यादा सावधान' पाहिला होता. त्यात सगळेच मस्त पण जितू कुमार विशेष आवडला होता. हे असे नव्या दिग्दर्शकांचे टॅबू विषयांवरचे चित्रपट कॉमिक तडका देऊनसुद्धा हळूच समाजमनावर चांगला परिणाम करतात. व्हेअर ऍज करण जोहरच्या पिक्चरमध्ये याच विषयांचे चित्रीकरण किती क्रिन्ज होते.

(लघुरूपं न वापरता लिहावं लागल्याने किती पंचाईत होतेय Wink )

अमित Lol
लिहिणारे लोक आहेत म्हणून माबो आहे.‌ >>> हेच सत्य बाकी मिथ्या. शिवाय वाचनमात्र लोकही या लिहिणाऱ्या लोकांमुळेच येतात. त्यामुळे पोस्टीला अनुमोदन.
मला कशानेही पिव्हळायला होत नाही, तीन दिवसांत माबोवरच्या प्रत्येक चर्चेतील ऋतूच बदलतो. आपण बदलत्या ऋतूचे स्वागत करावे नाहीतर इतरांच्या रंगपंचमीचा आनंद घ्यावा. आयुष्यात दुसऱ्या इतक्या आव्हानात्मक गोष्टी आहेत, माबो-पिव्ह अस्तित्वातच नाही. एनर्जी महाग असते, कशावरही खर्चायची नाही. Happy

माझेमन Happy

'बधाई दो' विशेष आवडला नव्हता. 'हम दो हमारे दो' सुद्धा कंटाळून बंद केला होता.

भूमी नेहमी किंचाळत, आरडाओरडा करत, त्वेषाने बोलत असते. सुंदरही वाटत नाही. त्यामुळे फक्त पहिल्या सिनेमात आवडली.

पराग आणि भरत यांच्या पोस्ट्स युगप्रवर्तक नाही तरी दिवसप्रवर्तक नक्की म्हणाव्या लागतील मायबोलीच्या इतिहासात. आज या धाग्यावर कुठल्या सिनेमाची पिसे काढली गेली नाहीत आणि लोकांनी लघुरुपे टाळून पोस्टी टाकल्या.

पण आता चिकवा म्हणायची पंचाईत झाली ना Happy

मलाही 'बधाई दो' विशेष आवडला नव्हता.
फारसा जमला नव्हता.
आणि तो शुभमंगल ज्यादा सावधान वगैरे तर फारच उथळ वाटला होता.

काही चित्रपट ठीकठाक असतात पण रीलेट होतात, त्यामुळे जरा बरे वाटतात.. अशा चित्रपटांसोबत ते सुद्धा होत नाही फार. त्यामुळे नाही जमले तर नाही आवडत
.

त्यामानाने मला चंदीगड करे आशिकी बरा वाटला.. अजून चांगला बनवता आला असता, फार सहजपणे संपवला, पण किमान उथळ तरी नाही झाला.

राजकुमार राव आणि काही क्षणांसाठी दिसणारा गुलशन देवैया यांनी पात्र उभं करायला बॉडी लँग्वेज घेतलीच आहे, पण यांचे चेहरेही बोलतात. >>> +10000.
इतर चित्रपटात दाखवल्या जाणार्या समलिंगी पात्रांपेक्षा यातील चारही जण आवडली.
भूमी ची ती मैत्रीण पण छान आहे.
अटक गया है गाणं चांगले आहे.

भूमी नेहमी किंचाळत, आरडाओरडा करत, त्वेषाने बोलत असते. सुंदरही वाटत नाही. त्यामुळे फक्त पहिल्या सिनेमात आवडली.
>>
अगदी अगदी...
अग्रेशन म्हणजे ॲक्टिंग असा गैरसमज वाटतो तिचा...

भूमी वरून आठवले. तिचा थँक्यू फोर कमिंग कोणी पाहिला आहे का?
चांगला आहे की आचरट? इतके सांगितले तरी चालेल.

मला कशानेही पिव्हळायला होत नाही, तीन दिवसांत माबोवरच्या प्रत्येक चर्चेतील ऋतूच बदलतो. आपण बदलत्या ऋतूचे स्वागत करावे नाहीतर इतरांच्या रंगपंचमीचा आनंद घ्यावा. >>>> एखाद्या बाफावर चर्चा चालू असताना (कुठल्याही विषयाच्या), त्या चर्चेबद्दल 'गप्पा' मारायच्या असतील तर लोकं धावत्या बाफांवर जातात. हे वर्षानुवर्षे पार्ले, टीपापा, गड, बे एरीया, कट्टा वगैरेंवर पडीक असणारी मंडळी पाळत होती. नियम नव्हताच अर्थात पण एक बेस्ट प्रॅक्टीस म्हणून. चित्रपट कसा वाटला, वेबसिरीज, मी वाचलेले पुस्तक ह्या बाफांवर सगळे जण रोजच्या रोज लिहित नसले तरी हे धागे माहिती संकलानाच्या दृष्टीने मला फार महत्त्वाचे वाटतात. कित्येकदा ह्या धाग्यांवर वाचून अनेक चांगल्या गोष्टी सापडल्या आहेत. एखाद्या चित्रपटावर / गाण्यावर / पुस्तकावर गंभीर चर्चा सुरू झाली की "नवीन धागा काढा" अशी सुचवणी अनेकदा येतेच आणि धागे निघतातही. हल्लीचच उदाहरण द्यायचं तर गुलजारांच्या चित्रपटाबद्दल वेगळा धागा काढला आहेच की! तसं असताना पिसं काढण्यासाठी आणि विनोद करण्यासाठी वेगळा धागा काढला तर काय हरकत आहे ? आणि ह्या आधी तसे धागे निघालेलेही आहेत. असो.

मी ठरवेन काय करायचे ते. तुम्ही अशा सिच्युएशन मधे माझ्या मताला जितकी किंमत दिली असती तेवढीच मीही देतेय. मी इथे भरपूर 'सकस' पोस्टीही लिहीत असते, तेव्हा कदाचित पोच दिली असती तर आज मला ह्यामागचा हेतूही निखळ वाटला असता हेही खरे. त्यामुळे 'असो' ला अनुमोदन.

Pages