चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी ठरवेन काय करायचे ते. >>>> म्हणजे ह्या धाग्याचं गप्पांच्या धाग्यात रुपांतर करण्याचं सगळं श्रेय तुलाच घ्यायचं आहे तर Proud

आता धाग्याच्या विषयाबद्दल.
परवा थँक्स गिव्हिंच्या ब्रेकमध्ये रणविर सिंगचा 'लुटेरा' पाहिला. बर्‍याच दिवसांपासून बघायचा होता. पूर्वाधातली बंगाली जमिनदारीची पार्श्वभुमी आणि उत्तरार्धातलं डलहौसी मधलं कथानक दोन्ही आवडलं! डलहौसीतलं घर मस्त आहे एकदम. उत्तरार्ध थोडा ताणल्यासारखा वाटलं तेच तेच सिन पुन्हा पुन्हा येत रहातात. ती खिडकीची काच पुसते, त्यातून बाहेर बघते, पान फडफडतं.. थोड्या वेळानी ती दार उघडायचा प्रयत्न करते, तो तिला आत ढकलतो आणि रिपीट. कामं सगळ्यांची आवडली. विक्रांत मेसी फारच लहान दिसतो. नावावरून हे असं कथानक असेल असं अजिबात वाटलं नव्हतं. एकंदरीत ठिकठाक वाटला.

लुटेरा the last leaf वर आधारीत आहे. गोष्ट वाचल्यावर ते सीन जस्टिफाय होतात असं मला वाटलं.

https://americanliterature.com/author/o-henry/short-story/the-last-leaf/
Oh Fantastic
ही कथा माझ्या मोठ्या भावाने मला सांगितलेली होती. आज स्वतः पुन्हा वाचली. जेव्हा भावाने ही गोष्ट सांगितली तेव्हा O Henry कोण हे पण माहित नव्हते. असे काही होऊ शकते ह्यावर विश्वासही नव्हता.
There are more things in heaven and earth, Horatio,
Than are dreamt of in your philosophy.

मला कशानेही पिव्हळायला होत नाही, >> Lol सिरीयसली. इग्नोअर करा आवडत नसेल तर. गप्पांच्या अगम्य पोस्ट्स पूर्ण वाचून "I have reviewed everything and it is truthful to the best of my knowledge..." टाइप लीगल चेकबॉक्स चेक केल्याशिवाय पुढची पोस्ट दिसत नाही असे असते तर गोष्ट वेगळी.

अमित व अस्मिताशी सहमत. इथे लिहीणारे आहेत म्हणून वाचणारे आहेत. मग ते लिहीणारे त्याच ओघांत कधीकधी थोडे भरकटले, तर काय झाले. वाचणार्‍यांना ८-१० पोस्टी ओलांडायचे कष्ट पडू नयेत म्हणून आम्ही कोणतेतरी अदृश्य नियम सोवळ्यासारखे पाळत बसायचे काय? ते ही अशा काळचे नियम जेव्हा माबो भरभरून वाहात होती. लिहीणारे प्रचंड संख्येने असत. खरे म्हणजे तेव्हाही धागे भरकटणे अगदी कॉमन होते. पण आता तर तितके लिहीणारेही राहिले नाहीत. आणि बहुतेक वेळा ८-१० पोस्ट्सनंतर लोक पुन्हा लाइनीवर येतातच. पूर्वीही होतच होते की.

वेमा काही म्हंटले तर बदलू. त्याव्यतिरिक्त इथे खटकण्याचा उल्लेख ज्यांनी केला आहे त्यात काही स्वतः लिहीणारे आहेत किंवा चर्चांमधे भाग घेणारे आहेत - त्यांच्या मताचा आदर आहेच. पण केवळ पिंका टाकत फिरणार्‍यांच्या मताबद्दल काही फिकीर नाही. त्यांनाही ती माझ्या मताबद्दल असण्याची अपेक्षा नाही. I gladly have total apathy.

हे नियम पूर्वीही काटेकोर पाळले गेले नाहीत. सहज चेक करावे म्हणून मी मागची इथलीच पाने नुसती वाचली नाहीत, तर चिकवाचे जुने बाफही चाळले. बर्‍याच वेळा चर्चा भरकटल्या आहेत, नंतर पुन्हा लाइनीवरही आल्या आहेत. गप्पांच्या पोस्ट्स लगेच कळतात. ओलांडायला काही अवघड नाहीत.

अनेक बाफवर चांगल्या चाललेल्या चर्चांमधे अनेक जण लिटरली दुर्गंधीवाल्या पिंका टाकतात त्यापेक्षा कधीही चांगले.

बधाई दो बद्दल आणखी लिहितोय. जे चित्रपट पाहणार आहेत, त्यांनी इतक्यात वाचू नका.

भूमी पेडणेकरने साकारलेलं पात्र सुमी सिंग. तिशी उलटली आहे. तरी तिचं लग्न होत नाही म्हणून आई तिच्यावर सतत करवादत असते. मुलगी म्हणून तिच्या शिक्षणाला प्राधान्य नाही. ती स्पोर्ट्समध्ये पुढे गेली असती तर तिचं इनकम वाढलं असतं, तिला घरापासून दूर स्वतंत्र राहता आलं असतं तेच तिचा भाऊ केपेबल नसूनही त्याच्या करियरसाठी - तेही स्पोर्ट्स म्हणजे हिच्याच फील्डमधल्या - हिच्याच पगारातून पैसे खर्चून त्याचं वय कागदोपत्री कमी केलं आहे (भारतात ही नवलाची गोष्ट नाही). . तिची मावशी तिला कसलीही कल्पना न देता तिच्या कामाच्या जागी तिला दाखवायचा कार्यक्रम करते. दाखवते म्हणजे लिटरली तिच्या जॅकेट / जर्किनची झिप खाली करून चेहरा काळवंडला असला तरी ती गोरीच आहे हो, हे दाखवते. याआधी एकदा ती लग्नाला = एका पुरुषाकडून रोज बलात्कार करून घ्यायला तयार झाली होती. तो अचानक मेल्याने सुटली.
आता शार्दुल ठाकुर कडे येऊ. हे दोघे जगाला , घरच्यांना दाखवायला लग्न करतात. त्यात त्यांची काही मैत्री बित्री नसते. लोकांसमोर तो नवरेगिरी
करतो. गे पुरुष स्त्रियांबद्दल सेन्सिटिव्ह असतात या तिच्या समजाला तडा जातो. मग मूल का होत नाही, तर हिच्यात दोष आहे असं तो घरी एकाला सांगतो. ते सगळ्यांना कळतं आणि तिची वरात तिला न सांगता डॉक्टरकडे नेली जाते आणि तिची तपासणी होते.
सुमीला आपल्या स्वत्वाची जाणीव आहे. स्त्रीपुरुष समानता इ. शार्दुलपर्यंत कधी न पोचलेल्या गोष्टी तिच्यात रुजल्या आहेत. तिला मूल हवंच आहे, पण शार्दूलसारख्या विचारांच्या पुरुषाचं चालणार नाही.
अशा मुलीने कायम चिडलेलं , आक्रमक का नसावं? पहा, पोचतंय का?

शार्दुल गे असला तरी त्याला स्वतःला मॅचो मॅन दाखवायचंय. या दोन्ही गोष्टींचा संबंध नाही, असंही असू शकतं. काही गे / बाय पुरुष समाजाला दाखवायला किंवा पूर्णतः आपखुषीने , समजून उमजून (स्त्रीशी) लग्न करतात आणि आपली समलैंगिक भूक भागवायचीही सोय पाहतात. त्याला काही वर्षांपूर्वी अशाच एका विवाहित पुरुषाने ' ठेवलेलं' असतं. याने लग्न केल्यावर त्याच्या बॉयफ्रेंड कबीरलाही तसंच वाटू शकतं. तो निघून गेल्यावर शार्दुलला आपला भूतकाळ आठवतो. शार्दुलही त्या आधीच्या पुरुषासारखा असता तर बहुधा हा विनोदी , हलकाफुलका चित्रपट झाला नसता.

पळवाटा शोधणारा शार्दुल पूर्ण जबाबदारी घेतो हा प्रवास हृद्य आहे. अनेक गोष्टी अगदी subtly दाखवल्यात. शार्दूल सुमी पूजेला बसलेले असताना सुमीच्या वडिलांनी रिमझिमला तू ही पुन्हा तिथे बस असं सांगणं, मग शार्दुलने गुरु नारायणला बोलवणे , समोर बसलेल्या त्याच्या वरिष्ठांची चुळबूळ, पण त्यांच्याच बायकोने त्यांना थांबवणं.
प्राइड मार्चमध्ये सुमी आणि रिमझिम सामील होतात. शार्दूल बंदोबस्ताच्या ड्युटीवर असतो. टिपिकल बॉलीवूड मुव्ही असती तर तोही तिथे जाऊन नाचला असता. पण इथे फक्त तो सप्तरंगी मास्क लावतो.

आणखीही बर्‍याच गोष्टी आहेत, पण सगळ्या उलगडून सांगाण्यात मजा निघून जाईल. अमांनी (बघा बघा, मी लघुरूप वापरलं :D) या चित्रपटाची पूर्ण पटकथाच एका वेगळ्या धाग्यावर लिहिली आहे. त्यांच्या नेहमीच्या शैलीत क्रिस्प लिहिलंय.

इथे वाचून युट्यूबवर अमर भूपाळी सुरू केलेला. पण संवादात खरखर खूपच आहे.
आता पुन्हा चेक केलं तर व्हिडिओ अन अव्हेलेबल येतंय.

चांगली प्रिंट आहे का युट्यूबवर?
किंवा दुसर्‍या ओटीटी वर?

अशा मुलीने कायम चिडलेलं , आक्रमक का नसावं? पहा, पोचतंय का?
>>
अहो, ते कुठलाही रोल एकाच प्रकारे करण्याबद्दल होतं.
हा रोल करताना खपून गेलं.
जॉन अब्राहम नाही काही रोल मधे करारी वगैरे नावाखाली मक्खपणा खपवंत.. तसंच...

मी तिचे दम लगाके हैशा आणि बधाई दो हे दोनच चित्रपट पाहिलेत. त्यामुळे सगळीकडे ती तसाच अभिनय करते का हे माहीत नाही. टाइपकास्ट झाली की काय?

. टाइपकास्ट झाली की काय?

तिचे बहुतेक चित्रपट निमशहरी आणि नॉर्थ पट्ट्यातील पार्श्वभूमी असलेले आहेत

तिचे बहुतेक चित्रपट निमशहरी आणि नॉर्थ पट्ट्यातील पार्श्वभूमी असलेले आहेत >>>> हो आणि तिथल्या मान खाली घालून वावरणाऱ्या विवाहमधल्या अमृता राव टाईप्स भूमिकेच्या अपोझिट भूमिका दाखवायचा ट्रेंड आहे सध्या.
तनु वेड्स मनू मधली कंगना, त्यातली आणि रांझणामधली स्वरा, मग बरेली की बर्फी मधली क्रिती आणि अधेमध्ये भूमी पेडणेकर

भुलभुलैया ३ अज्जिबात बघणेबल वाटला नाही. किती सुमार दर्जाची अ‍ॅक्टींग (कार्तिक आर्यन), सुमार डायलॉग्ज. रादर काही दर्जाच नाही. दिमरी ताई पण तशाच. बाकीचे आता आधीच्या भुलभुलैया मधे आहेत म्हणून फक्त बहुतेक पाट्या टाकायला घेतले.
अगदीच झ कॅटेगरी सिनेमा.

स्टँड बाय मी - नेफि
सुंदर सिनेमा आहे. 'कमिंग ऑफ एज' ४ मुलांचा. खूप आवडला. त्यांच्या बालिश गमतीजमती, एकमेकातील नात्यांतील, पदर किती सुंदर गुंफण आहे.

जॉन कसॅक किती तरुण आहे त्यात.

अर्र्र्र्र जॉन अब्राहम अ‍ॅक्टींगकरता थोडी ना पहातात
>>>>
हाच विचार मनात आलेला.
पण तो अभिनयाबाबत फार अंडररेटेड आहे. त्याचा अभिनय मला नेहमीच सुसह्य वाटत आला आहे.
आणि त्याचे दिसणे सुद्धा नेहमी कूल असते. म्हणजे ऋतिक सारखे बघा मी किती भारी दिसतो असा एटीट्यूड कधी जाणवत नाही.

गेल्या महिन्यात जॉनचा मद्रास कॅफे पाहिला होता. कशावर आहे काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे आणखी भारी वाटला. कोणी पाहिला नसेल तर जरूर बघा. बराच इतिहास सुद्धा समजतो.

बाई दवे,
भूमी आणि तिच्या भूमिका पाहून मला आपली मुक्ता बर्वे आठवते. त्यांच्या अदाकारीत बरेच साम्य जाणवते.

मद्रास कॅफे >> छान पिक्चर आहे. अत्यंत गंभीर विषय तशाच गंभीरपणे हाताळला आहे. त्यामुळे अजूनच चांगला वाटतो.

भू भू ३ - फक्त बालन आणि माधुरी करता बघायचा होता. आता बघूच नये असे वाटते आहे. कार्तिक आर्यन ला उगीच डोक्यावर बसवून ठेवले आहे असे वाटते. दिमरीची पण इतकी हवा का झालिये ते कळत नाही

भूमी आणि तिच्या भूमिका पाहून मला आपली मुक्ता बर्वे आठवते. त्यांच्या अदाकारीत बरेच साम्य जाणवते.

>>
ये गडबड है बाबा...

मग बरोबर आहे...

मला मुक्ता बर्वे पण आवडत नाही
(कुणीही वकीलपत्र घेतल्यागत समशेरी परजत येऊ नका, पर्सनल चॉईस आहे, तुम्ही कितीही आपटलंत तरी बदलणार नाही...)

पुष्पा २ बघितला, येस ! कधि नव्हे ते इतक्या लवकर एखादा नविन मुव्हि बघायचा योग आला.पहिला भाग ज्याना आवडला असेल त्याना नक्कि आवडेल, गाणी फारशी आवडली नाही....पहिल्यातली कॅची आणी चान्गली होती..एरवी साउथ मुव्हिज कधि फारसे बघत नाही पण आत्ता आत्ता आले बाहबुली वैगरे,पुष्पा वैगरे अपवाद वगळता..
टिपिकल अचाट आणी अतर्क्य साउथ मसाला भरलेलाच आहे पण अल्लु अर्जुन ऑन फायर ! अशक्य आहे तो!!
सगळ्यात जास्त आवडलेला तो आपल्या श्रेयसचा आवाज, सॉलिड्ड!! हिन्दी ,मराठी सगळच!!

पुष्पा २ च्या कलेक्शनचे आकडे चक्रावून टाकणारे आहेत.
हिंदी ६७ कोटी, एकूण १७५ कोटी. ते ही पहिल्या दिवशी गुरुवार असताना. शक्य वाटत नाही.

गेल्या काही वर्षांत असे आकडे फुगवलेले वाटतात आणि असे मूव्हीज पण खूप काही ग्रेट आहेत असे वाटले नाहीत. पण आपलंच काही तरी चुकत असेल असं वाटतं. कारण एव्हढा धंदा झालाय तर पिक्चर चांगला असेलच असं वाटतं.

अजून पाहिला नाही पुष्पा २. ओटीटी वर आल्यावर पहावा का?

सल्लू भाईजानने आणलेली पद्धत आहे हि. ८०००, ९०००, १०००० स्क्रीन्स वर चित्रपट प्रदर्शित करायचा. पहिल्या दोन दिवसात भरपूर कमाई करायची. सोबतीला ऍडव्हान्स बुकिंग आहेच. लोकांनी आधीच तिकिटे काढलेली असतात त्यामुळे रिव्हू सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्या आधीच पैसे वसूल झालेले असतात.
पुष्पा २ मुळे इंटरस्टेल्लरला IMAX स्क्रीन्स मिळाल्या नाहीये.

शक्य वाटत नाही.

>>तिकडे साऊथ मध्ये पुष्पा 2 ला चेंगराचेंगरी होऊन एक बाई मेली. आहात कुठे?

सगळ्यात जास्त आवडलेला तो आपल्या श्रेयसचा आवाज, सॉलिड्ड!>>>>>>> अर्रे परत आहे का त्याचा आवाज?आवडेल केवळ त्यासाठी बघायला.

Submitted by AI on 6 December, 2024 - 14:16 >> थँक्स. माहिती नव्हतं हे.

तिकडे साऊथ मध्ये पुष्पा 2 ला चेंगराचेंगरी होऊन एक बाई मेली >> ती बातमी वाचली. अलू अर्जुनवर पण गुन्हा दाखल झाला म्हणे.
ती बाई अल्लू अर्जुन थिएटर मधे हजेरी लावायला आला तेव्हां झालेल्या चेंगराचेंगरीत मेली असं वाचलं.

पुष्पा -2 खतरनाक आहे.... असे बघितलेल्या ओळखीच्या लोकांनी सांगितले आहे.
अर्थात मी घरीच बघेन तंगड्या पसरून..

ते पिक्चर चालतात हे खरे आहे पण आकडे मलाही फुगवलेले वाटतात. इव्हन ते शो ऑफ करणारे फॅन्स असतात त्यातले अनेक पैसे देउन आणलेले असतात ***

*** माबोवरचे नाही. नाहीतर ऋन्मेषला वाटेल.... Wink

अर्रे परत आहे का त्याचा आवाज?आवडेल केवळ त्यासाठी बघायला>>> मी पण त्याच्यासाठीच पुर्ण बघितला, एरवी साउथ भाषेत फक्त सबटायटल्स वर मला तरी अपिल झाला नसता पण श्रेयस धमाल करतो, अधुन मधुन मराठी येत ते इतक गोड वाटत एकायला..
अल्लु अर्जुनने इतक समरसुन काम केलय की त्याचे सगळे अचाट अतर्क्य स्टट एरवी पटले नसते तेही आवडुन जातात..
त्याने काली मातेसमोर साडी नेसुन केलेल सगळ केवळ अफलातुन आहे..(फक्त ते गुटखा,पान कायतरी खाताना दाखवलय ते मात्र नाहिच पटत..)

प्रे अवे नेफिवर काय सुंदर डॉक्युसरी आहे. अ मस्ट वॉच. होमोफोबिया वरती आहे. धर्माची लालूच, धर्माचा बडगा दाखवुन, लोकांना गेइझम पासून परावृत्त करणं किती डेंजरस असू शकतं. गेइझम, ट्रान्स्जेंडर हा रोग नाही, आजार नाही. हा कल आहे. अगदी आपण जसे राईट किंवा लेफ्ट हँडेड असतो तसा.

Pages