आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण पंजाबची टॉप ऑर्डर अशीच फेल होत राहिली तर त्या दोघांनाही किमान मिडल ऑर्डर मध्ये खेळवून बघायला हरकत नाही.... न जाणो फिनिशरची गरजच नाही पडणार!! >> म्हणूनच तर म्हणतोय कि सात नि आठ वर तुमचे फॉर्म्स मधे असलेले बॅटसमन खेळणे झेपत नाही. बरं वर येणारे फार कोणी तोफ आहेत नि त्यातही सातत्य आहे असे नाही ना.

हरप्रीत बराच अंडररेटेड आहे. कंसिस्टंत बॉलिंङ आहे. बॅटिंग पण बर्‍यापैकी करू लागलातर अक्षर ला काँपीटीशन ठरू शकेल.

माही मार रहा है....
9 बॉल 28
3 फोर 2 सिक्स
स्कोअर 176 पोहोचवल....

भाई ये बंदा नही आयपीएल का खुदा है..
सब से जुदा है...

हायला.. सामना लखनौला आहे...?
आता चर्चा ऐकतोय तर समजले.. नाहीतर सगळे स्टेडियम पिवळे बघून चेन्नईच वाटले मला Happy

मस्त धोनी!!
मधल्या काही आयपीएलपेक्षा यंदा धोनी खुप चांगला खेळतोय.... म्हणजे त्याने बहुतेक त्याचा बॅटींगमधला लिमिटेड रोल ठरवून घेतलाय आणि तो चोख बजावतोय!!
असाच खेळला तर अजुन दोने तीन सीझन पण खेळू शकतो Happy

“टायटन्सचे काही समजत नाही. आय पि एल मध्ये बॉलिंग हा जरा प्रॉबलेमच वाटतो.” - गुजराथचे इंपॅक्ट प्लेयर्स पंड्या, शामी, गिल, मिलर, रशिद होते (तेवातिया आणि रशिदची बॅटिंग बोनस आहेत, पे-चेक्स नाही). त्यातला पंड्या गेला, शामी इंज्युरीमुळे बाहेर आहे. मिलर फॉर्म आणि फिटनेसशी झगडतोय. रशिद फॉर्ममधे यायला लागलाय. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स गेल्या दोन आयपीएलपेक्षा कमकुवत वाटतोय.

अरे नेहराला विसरु नकोस Wink तो पण यंदा फॉर्मात नाही वाटत!! >> नेहरू नि पांड्या हे कॉम्बो वर्क होत होते. नवीन कॉम्बो ला वेळ लागला तर नवल नाहि. बकी फे फ ला अनुमोदन, तेवातिया आणि रशिदची ने सामने जिंकून देणे बोनस होते . साई पण फूल फ्लो मधे वाटात नाहीये. साहा पण झगडतोय त्यामूळे इंपॅक्ट कमी झालाय.

आम्ही प्रेमाने नेहराला नेहरू म्हणतो रे. त्यांना आपले म्हणा. सगळ्यांनीच माही, चुम्मा, वडा-पाव असे पॉप्युलर घोडे घेतले तर तळागाळातल्या बापड्यांनी काय करावे Lol

“तळागाळातल्या बापड्यांनी काय करावे” - Lol

राहूलने ऑफच्या बाहेर जात, मुस्तफिझूरच्या वाईड यॉर्कर्समधली हवाच काढून टाकली. वेल डन राहूल!

सगळ्यांनीच माही, चुम्मा, वडा-पाव असे पॉप्युलर घोडे घेतले तर
>>>>

पॉप्युलर घोडे! Happy

1) चुम्मा उर्फ पंत जेव्हा कोणीच नव्हता ना.. तेव्हापासून.. तो माझा लाडका आहे.
जेव्हा तो संघाबाहेर गेला आणि केवळ ट्रोल होत होता ना.. अगदी कोणीही त्याच्या पाठीशी नव्हते.. तेव्हा मी मायबोलीवर त्याला सपोर्ट द्यायला धागा काढला होता.. तिथेही काही जणांनी त्यावर टीकाच केली होती. ही त्याची लिंक.

लांबी रेस का घोडा - ऋषभ पंत
https://www.maayboli.com/node/71667

टीकाकार पुन्हा धाग्यावर फिरकले नाहीत. कारण त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली.. आणि गाबा इनिंग आली.. त्यांनतर त्याने मागे पलटून पाहिलेच नाही.

2) हेच हिटमेन शर्मा बाबत सुद्धा लागू (मी त्याला वडापाव म्हणत नाही. कारण वयाच्या तीस वर्षानंतर त्याच्यासारखा रेकॉर्ड जगात कोणाचा नाही)

तर तो सुद्धा जेव्हा कोणी नव्हता ना. तेव्हा मी त्यावर धागा काढला होता. 2014 साली. जेव्हा कोणी त्याला ओवर हाईप म्हणायचे तर कोणी म्हणायचे टॅलेंट आहे पण वापरता येत नाही. अगदी पंत सारखीच केस. ही त्या धाग्याची लिंक

एफर्टलेस मॅगी नूडल्स - रोहीत शर्मा
https://www.maayboli.com/node/46312

धाग्याचे नाव सुद्धा बघा.. एफर्टलेस मॅगी नूडल्स ठेवले होते. कारण तो दोन मिनिटात बाद होतो म्हणून त्याला तसेच चिडवायचे.

तेव्हा मी त्याला क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर नंतर मुंबईचा वारसदार म्हटले होते. लोकांना ते तेव्हा हास्यास्पद वाटले असेल. पण आज तो लिजंड म्हणून ओळखला जातो. कित्येक पराक्रम त्याच्या नावावर आहेत आणि कायम राहतील !

थोडक्यात मी पॉप्युलर खेळाडू आणि उगवलेल्या सूर्याला नमस्कार करणारा नाही....
तर टॅलेंट हेरून फॅन होणारा आहे Happy

राहूलने ऑफच्या बाहेर जात, मुस्तफिझूरच्या वाईड यॉर्कर्समधली हवाच काढून टाकली. वेल डन राहूल! >> +१ राहुलला बर्‍याच दिवसांनी असे काहीतरी वेगळे करताना बघितले. किपिंग पण एकदम क्लास करतोय.

मोइन ला धोनी च्या वर पाठवायच कारण काय? बोलर-बॅट्स्मन पेक्षा बॅट्स्मन -बॅट्स्मन ने येउन जास्त रन्स काढायला हवेत ना. एनी वे, कालचा दिवस पण धोनी फॅन्स साठी ऑरगॅझम चा दिवस होता Happy

एनी वे, कालचा दिवस पण धोनी फॅन्स साठी ऑरगॅझम चा दिवस होता Happy
+786
धोनीची वाढती प्रसिद्धी सहन न होणाऱ्यांचे दिवसेंदिवस अवघड होत आहे Happy

त्या दिवशी तरी असे वाटले पांड्या ने पट्ट्यात मारायला दिले..
पण काल तर एक एक वेचून वेचून शॉट मारले त्याने.. खरेच कमाल आहे तो माणूस. हॅट्स ऑफ!!

मोइन ला धोनी च्या वर पाठवायच कारण काय?
>>>>>

धोनीने स्वतःला तो रोल आखून घेतला आहे. तो आता नंबर बघून नाही तर किती ओवर शिल्लक आहेत हे बघून येणार.
जसे दिनेश कार्तिक बाबत केले गेले तसेच...
आणि काल सुद्धा हे वर्क झाले.. सुरुवातीची फलंदाजीची खराब कामगिरीमुळे आणि समोरून के एल राहुलने चांगली फलंदाजी केल्यामुळे निकाल वेगळा लागला ते सोडा..

पण सध्या निकाल नाही तर धोनीला खेळताना एन्जॉय करा..
हेच शर्मा बाबत सुद्धा लागू.. माही माही.. आणि रोहीत रोहीत... पब्लिक असे ओरडत असताना स्टेडियमचा माहॉल काय असेल.. या विचारानेच अंगावर काटा येतो..

पुण्यात यंदा मॅचेस नाहियेत त्यामुळे स्टेडियमचा माहोल नक्कीच मिस करतोय.... नाहीतर पुण्यात मॅचेस आणि बघायला गेलो नाही असे शक्यतो झालेले नाही..... एका सीझनला तर तब्बल ३ मॅचेस स्टेडियममध्ये जाऊन बघितल्या होत्या Happy

पाच ओवर 103-0
रेकॉर्ड शतकी सलामी
आता 15 ओवर 200 अवघड नाही..
अब की बार.. 300 पार

Lol

You can ...
You can ....
But you can not .... Happy

ह्या इनिंगनंतर अभिषेक शर्माला वर्ल्ड कप साठी नेले नाहि तर आपण करंट असे म्हणायचे. तो पर्पल फॉर्‍म मधे आहे नि अतिशय क्लियर थिंकिंग आहे सध्या त्याचे. कुलदीप नि त्याची टसल जबरदस्त होती. कुलदीप ने आज आपला वर्ल्ड कप बर्थ बूक केला असे म्हणू का ?

कुलदीप ने आज आपला वर्ल्ड कप बर्थ बूक केला असे म्हणू का ?
>>>>
नव्हता का?
स्पिनर म्हणून मला त्याचेच नाव पहिले दिसत होते.

किंबहुना सध्या चहल सुद्धा जसा पुन्हा रंगात येतोय ते पाहता कुलचा जोडी जमावी असे वाटतेय. पण फलंदाजी गंडते त्यात..

“ ह्या इनिंगनंतर अभिषेक शर्माला वर्ल्ड कप साठी नेले नाहि तर आपण करंट असे म्हणायचे.” - नुसत्या आयपीएलच्या फॉर्मवर टीम निवडणार नाहीत असं मला वाटतं. पण त्याचा डोमेस्टिकमधला परफॉर्मन्स पण चांगला आहे. पराग पहिल्या आणि शर्मा दुसर्या क्रमांकावर आहेत सैद मुश्ताक च्या स्कोअरिंग चार्टवर. त्यापैकी एक किंवा दोघेही लवकर इंटरनॅशनल लेव्हल ला खेळतील अशी आशा आहे.

मागच्या आयपीएलच्या वेळी आपण उम्रान मलिकविषयी/तेवातियाविषयी पण अशीच चर्चा केलेली मला आठवते Happy

कुलदीपविषयी सहमत. पीचवर बसून रडण्यापासून ते ऐन भरातल्या हेड, शर्माच्या विकेट्स काढण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अफलातून आहे.

बाकी काहीही करा, पण आयपीएल फॉर्म वर फसून डीके ला घेऊ नका...
दर वेळी आयपीएल मधे चमकतो अन् वर्ल्डकप ला गचकतो...

आपला नेहमीचा संभाव्य संघ आणि आयपीएलमध्ये आणि डोमॅस्टीकमध्ये चमकलेले नवीन सितारे यांच्यात ५ सामन्यांची एक मालिका घेऊन त्यातून संघ निवडावा

(अर्थात तेव्हढी विंडो, फटीग वगैरे अनेक प्रॅक्टिकल कारणे या कल्पनेच्या आड येतील याची कल्पना असून पण असला प्रस्ताव मांडावासा वाटतो म्हणजे यात काहितरी पोटेंशिअल असावे Wink )

आंतरराष्ट्रीय अनुभवाशिवाय कोणालाही नेणे रिस्कीच.
कार्तिकच नाही तर हर्षल पटेल आणि वरूण चक्रवर्ती यांनाही आपण ट्राय करून फसून झाले आहे. रायडूला सोडून विजय शंकरला घेऊन जाणे असले प्रकार केले आहेत. दिनेश मोंगिया नावाच्या खेळाडूने लोकांच्या वारेमाप शिव्या खाल्ल्या आहेत.

इंटरनॅशनल खेळणे एक वेगळेच प्रेशर असते. काहींना ते मानवते तर काहीना नाही.
त्यात वर्ल्डकप म्हटलं की आणखी वेगळी लेव्हल. काही जण तेव्हा आपली लेव्हल उंचावतात तर काही नेमके गडबडतात.
त्यात वर्ल्डकप नॉकआऊटचे आणि फायनलचे प्रेशर त्याहून वेगळे. तिथे भले भले सुद्धा कच खाऊ शकतात.
बरे वर्ल्ड कप ज्या देशात असतो त्या देशात खेळायचा अनुभव आणि क्षमता हे आणखी एक वेगळे झाले.
त्यामुळे नुसते डोमेस्टिक किंवा आयपीएल खेळला म्हणून उचलला इतके साधे गणित सिलेक्टरच्या डोक्यात नसावे..
पण तरी कोणीतरी ट्रम्प कार्ड निघेल या आशेवर एखाद्याला नेले जातेच.

संभाव्य संघ आणि आयपीएलमध्ये आणि डोमॅस्टीकमध्ये चमकलेले नवीन सितारे यांच्यात ५ सामन्यांची एक मालिका घेऊन ...
>>>>

चक दे आठवला.. एक मॅच हो जाये.. आपकी टीम और हमारी टीम.. जो जितेगा वो जायेगा Happy

आपला नेहमीचा संभाव्य संघ आणि आयपीएलमध्ये आणि डोमॅस्टीकमध्ये चमकलेले नवीन सितारे यांच्यात ५ सामन्यांची एक मालिका घेऊन त्यातून संघ निवडावा
>>
चॅलेंजर ट्रॉफी ची कन्सेप्ट हीच होती, इंडिया सीनिअर x इंडिया ए x इंडिया बी (याचं नंतर मिक्स अँड मॅच करून ब्लू x रेड x ग्रीन केलं होतं) पण का कुणास ठाऊक ती बंद केली

१९९९ वर्ल्डकप च्या आधी संभाव्य टीम x नवी टीम अशी मॅच झाली होती.ज्यात नव्या टीम मधल्या सेहवाग, खुरासिया, वगैरेंनी दे मार बॅटिंग करून संभाव्य टीम ला हरवलं होतं. याचं जोरावर त्या दोघांना वर्ल्डकप पूर्वी एक दोन सिरीज खेळायला चान्स मिळाला. शोएब अख्तर नी सेहवागचं दांडकं उडवल्यानी तो वर्ल्डकप ला सिलेक्ट नाही झाला, पण खुरासिया नी एक फिफ्टी मारून आपली सीट पक्की केली होती...

“चॅलेंजर ट्रॉफी ची कन्सेप्ट हीच होती” - मला वाटतं अंडर १९ आणि बायकांसाठी अजूनही चालू आहे. पण पुरुषांच्या (सिनियर) टीम्ससाठी बंद झाली. ती स्पर्धा छान होती. सिनियर टीममधल्या तिघांना कॅप्टन करायचे.

Pages