आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या चॅलेंजर मध्ये जेमतेम तीन सामने आणि एक फायनल व्हायची. ज्यांच्या जागा पक्के आहेत असे सिनिअर प्लेअर फार सिरीयसली सुद्धा खेळायचे नाही. बहुदा जास्त खेळले तर डिक्लेअर सुद्धा करायचे. तेव्हा अति क्रिकेट नव्हते. बेंचवरच्या खेळाडूंना काहीतरी संधी आणि प्लॅटफॉर्म मिळायला ठीक होते. आता आयपीएल आहे आणि डोमेस्टिक सुद्धा जास्त स्पर्धात्मक झाले आहे. अति क्रिकेट ने इंटरनॅशनल मध्ये सुद्धा बरेच जणांना संधी मिळते. ए टीम चे दौरे होतात. आता त्याची गरज वाटत नाही.

आरसीबीने घालवली आजची मॅच Sad मधल्या त्या ४ विकेट्सनी घालवली मॅच. सुपर ओव्हरला जायला हवी होती ही मॅच.

गुजरातचा स्पिन अटॅक मॅच विनर आणि एक्स फॅक्टर असलेला आहे. राशीद, नूर अहमद आणि साई किशोर.. त्यांनी प्ले ऑफ पोहोचायला यांच्या भोवतीच सध्या प्लान बनवायला हवेत.

नुसत्या आयपीएलच्या फॉर्मवर टीम निवडणार नाहीत असं मला वाटतं. पण त्याचा डोमेस्टिकमधला परफॉर्मन्स पण चांगला आहे. पराग पहिल्या आणि शर्मा दुसर्या क्रमांकावर आहेत सैद मुश्ताक च्या स्कोअरिंग चार्टवर. >> बरोबर रे म्हणूनच म्हणालो जोतो कि त्याची जागा फिक्स्ड असायला हवी. तसही ४-६ मधे कोणी फिक्स्ड नाहिये रिंकु वगळता.

अंकीला कार्तिक बद्दल अनुमोदन ! त्याचे फार वेळा झाले आहे. पंटच करायचा असेल तर पंत वर केलेला बरा वाटेल. खर तर १-३ मधे जमले तर किशान किंवा संजू हे जास्त योग्य वाटतात. त्यामूळे खाली बरीछ फ्ग्लेक्सिबिलिटी मिळते. पण एकंदर सूर ऐकाअ पराग , मयांक वगैरेची पण वर्णी लागायची शक्यता कमीच वाटते. व्हेरी डिसपॉइंटिंग ! गम्मत म्हणाजे २००७ मधे आपण नेलेली टीम किती नवशिक्यांनी भरलेली होती ते आठवले कि गम्मत वाटते.

नव्हता का?
स्पिनर म्हणून मला त्याचेच नाव पहिले दिसत होते. >> रविंद्र जाडेजा ! तो पहिला स्पिनर म्हणून लिमिटेड ओव्हर्स मधे असतो(च) . दुसरा कोण ते बदलत असते. चहल फ्रंट रेस मधे होता. आपली शेपूट बघता अक्षर नि सुंदर पण होते. त्यामूळे कुलदीप असेल ह्याची मला खात्री नव्हती.

मला तरी दिसत होता कुलदीप वर्ल्डकप विमानात...
सुंदर रेस मध्ये मागे पडला.. जडेजा असताना अक्षर किंवा तत्सम गोलंदाज थेट आकारात येऊ शकतं नाही.. चक्रवर्ती बिश्नोई झाल्यास आश्विन हे सुद्धा मला स्पर्धेत आता वाटत नाहीत.. कोणीतरी अचाट कामगिरी केल्याशिवाय आपण कुठलाच स्पिनर आता अचानक उचलून नेत नाही हे नक्की.. त्यामुळे कुलदीप मला पंधरा सोळात नक्की वाटत होता. अकरा बाबत सध्या चहल आहे त्याच्या स्पर्धेला. कदाचित हे दोघे नेतील. पण जडेजा सोबत त्याच दिशेला चेंडू वळवणारा चहल न खेळवता कुलदीपला पहिली संधी मिळेल असे वाटते.
कुलदीप बाबत हे वाटणे आयपीएल सुरू होण्याआधीपासून होते. त्याने ते मत कायम राहावे अशीच कामगिरी आतापर्यंत केली आहे.

हा तेवातिया विकेटकीपर असता तर आज तो सुद्धा स्पर्धेत असता... तो असेपर्यंत सामना संपला नाही असा विश्वास राहतो.

यावेळी कुलदीप चहल जोडी न्यायला हवी वर्ल्डकपला.
फलंदाजीसाठी जडेजा येतो नेहमी.. पण बिनधास्त तीन स्पिनर खेळवायला हवेत.
पांड्या तसेही ओपनर बॉलर, डेथ बॉलर, सगळीकडे टाकतो.. मार खातो ते सोडा.
पण तो, बुमराह आणि अजून फक्त एकच वेगवान घ्यायचा.
बुमराह आणि कुलचा जोडी मॅच विनर ठरू शकते. हमखास 12 ओवर टाकू शकतात.

आज पांड्या स्वतःचीच सुपारी घेतल्यासारखे खेळत होता.

मारायचा प्रयत्न करणे पण दिवस खराब असणे, बॉल टाईम न होणे हे एक असते..
पण हा निवांत सिंगल घ्यायचेय असेच खेळत होता.
आणि निवांत फुलटॉसला एलबीडब्लू झाला. तो सुद्धा आवेश खानच्या..
एक फोर गेला तो ही इच्छा नसताना. सिंगल सुद्धा स्ट्राईक रोटेट करावे असे नव्हते. कारण सोळा ओवर नंतर आला पण सेट बॅट्समनला स्ट्राइक न देता,
13 बॉल च्या पार्टनरशिपमध्ये 10 बॉल स्वतः खेळून 10 करून गेला.
काहीतरी गेम असावा यामागे असा खेळला.

1-8 ओवर 56-4
पुढच्या 8 ओवर 95-0
लास्ट 4 ओवर 28-5
टारगेट 180

त्यामुळे कुलदीप मला पंधरा सोळात नक्की वाटत होता. + स्पिनर म्हणून मला त्याचेच नाव पहिले दिसत होते. >> ह्या दोन विधानांमधला फरक मला जाणवतो त्यामूळे I rest my arguments.

पांड्या आज डेव्हिड च्या आधी का आला असे आधी वाटाले पण डेव्हिड ने जे केले ते बघता 'कि फर्क पैदा' असे वाटले. एक हेड वगळता सगळॅ ऑसीज पाट्या टाकत आहेत. नेमके वर्ल्ड कप मधे सगळे धुमशान खेळातील Happy

वर्ल्ड कप साठी DK, अश्विन, चहल, भुवी, पंत , राहुल यांना अजिबात सिलेक्ट करू नये. >> पंत वगळता बाकीच्यांबद्दल अनुमोदन ! तेच तेच चेहरे नेऊन तोच तोच निकाल बघण्यापेक्षा नव्या रक्ताचे २-३ चेहरे घेऊन हरलेले(ही बघायला आवडेल.

भूवी कोण? भुवनेश्वर.. त्याचे नावही कोणाच्या डोक्यात नसेल.
आश्विनबाबत आता पुन्हा लाड करणार नाहीत.
डीके बाबत पुन्हा हावरटपणा करणार नाहीत.
राहुल मला तसेही फारसा आवडत नाही वर्ल्ड कप स्पर्धात. आणि यंदा आपल्याला कीपर टॉप ऑर्डर घेणारा नको. तिथे बरीच गर्दी आहे.
त्यामुळे वरच्या लिस्टमधील पंत एक मी घेऊन जाईनच.
आणि यंदा कोणी मिस्टरी स्पिनर उगवला नसल्याने कुलदीप सोबत चहल न्यावे असे वाटते. पण फलंदाजी अगदी शून्य आहे त्याची..

क ड क परफॉर्मन्स होता आज राजस्थान चा. यशस्वी चं फॉर्म मधे येणं हे फारच सुखावह आहे - रॉयल्ससाठी आणि त्याहीपेक्षा इंडियासाठी. संदीपने
मुंबईच्या इनिंगचा सुरूवात आणि शेवट भेदक केला. संजू कॅप्टन झाल्यापासून त्याच्या बॅटिंगमधे पडलेला फरक नोंद घेण्यासारखा आहे.

यशस्वी चं फॉर्म मधे येणं हे फारच सुखावह आहे - त्याहीपेक्षा इंडियासाठी. >> +१ एकंदर मुंबई चा बॉलिंग मधला उजेड बघता अगदी धोनी जरी कप्तान असता तरी फरक पडला नसता असे म्हणायला हरकत नसावी. एक एक बघितले तर बरेचजण चांगले /प्रॉमिसिंग आहेत पण ग्रूप म्हणून क्लिक होईनात असे दिसतेय.

अरे बघ ना - बुमरा चा प्रश्नच नाही. गोएत्झी वर्ल्ड कप मधे कसला बॉलिंग करत होता ? मढवाल गेल्या सीझनमधे भलताच प्रॉमिसिंग वाटला होता. हार्दिक टायटन्स कडून चांगली बॉलिंग करत होता. चावला टॉप ३ स्पिनर विकेट टेकर्स मधे अहे बहुधा. तो अंडर १९ मधला आफ्रिकन भावी अक्रम म्हणून कौतुक केलेला आहे. गोपाल नि नबी सर्विसेबल आहेत. पण एकत्र क्लिक होत नाहियेत हे उघड आहे. आता उगाच पांड्याच्या नावाने शिमगा करणारे असतील तर मयांक यादवच्या बॉलिंगचे श्रेय राहुल ला द्यायचे का ? Wink गेल्या दोन सीझनमधेही हीच बोंब होती तेंव्हा तर पांड्या पण नव्हता. आरचर होता तो पण यथातथाच. शेन बाँड कोचिंग मधून निघाल्याला तीन वर्षे झाली हा योगायोग असेल का ?

गेल्या सीजनला मुंबईची बॉलिंग फार म्हणजे फारच दयनीय होती. तरी शर्माने शेवट पर्यंत नेले होते. यंदा सुरुवातीचे सामने हरूनही मुंबई कमबॅक करणारा हा विश्वास अजूनही लोकांना आहे यालाही कारण शर्माचं आहे. कारण त्याने याआधी हे केले आहे. दहा मध्ये पाच आयपीएल ट्रॉफी ही अचाट कामगिरी आहे. त्याच्या आसपास चेन्नईच आहे. पण अर्थात, तिचा कर्णधार खुद्द धोनी आहे.

शर्मा आणि धोनी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर इतके यशस्वी कर्णधार आहेत. ते असताना कोणी पांड्या कर्णधार करणे हे मुंबईने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. भारतीय कर्णधार संघात असताना कर्णधार पदाची लालसा करणे हे पांड्याचे देखील चुकलेच म्हणा. पैसा घेऊन खुश राहिला असता, पण सोबत सत्ता हवी झाली. मुंबई मॅनेजमेंट आणि पांड्या आपल्या कर्माची फळे भोगत आहेत. संघ जिंकत नाहीये. ब्रँड व्हॅल्यू सुद्धा घसरली आहे.

इथे चेन्नई मॅनेजमेंट दाखवून देते की अश्या प्लेयर्सची कशी इज्जत करावी. त्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की धोनीची केवळ ब्रँड व्हॅल्यू कॅश करायला आता ते त्याला अजून पाच वर्षे सुद्धा खेलवू शकतात. ही त्यांची कमाई आहे.

मी तर याबाबतीत शाहरुखला सुद्धा मानतो. तो सुद्धा गंभीरला फ्रीहँड देतो. माझ्यापेक्षा जास्त क्रिकेट तुला कळते मी कोण तुला सांगणारा असे स्पष्ट बोलतो आणि ते दिसते.

कोहली एकही ट्रॉफी जिंकला नाही. पण तरीही आरसीबी त्याच्याशी अनादराने वागली नाही.

मुंबई मात्र जशी शर्मासोबत वागली त्याला कितीही व्यावसायिकतेचे लेबल लावले तरी ते चूकच आहे हे कळते. त्यामुळे मुंबईचा प्रत्येक पराभव आनंदच देऊन जातो. त्यात शर्मा स्वभावाने आणि मनाने राजा माणूस आहे. अश्या व्यक्तीला अशी वागणूक सर्वसामान्य लोकांना कधीच आवडणार नाही. मुंबई मॅनेजमेंटला हे साधे गणित कळू नये याचे आश्चर्य सुद्धा वाटते.

>>एकंदर मुंबई चा बॉलिंग मधला उजेड बघता
आणि म्हणूनच या बॉलिंगसमोर शतक ठोकणाऱ्या बॅट्समनला मॅन ऑफ द मॅच देण्यापेक्षा पाच विकेट घेणाऱ्या बॉलरला दिले ते फार आवडले Happy

काल ती ओव्हरथ्रोची रन गेल्यावर संजू वैतागला होता.... त्याला पहील्यांदाच असे चिडलेले पाहिले अदरवाईज तो फारसा रिॲक्ट होत नाही

जयस्वालने पहील्या काही ओव्हर्समध्ये आडवेतिडवे शॉट्स मारण्याचा मोह टाळल्यामुळे आज तो टिकला आणि प्रॉपर क्रिकेटींग शॉट्स खेळून शतक करु शकला..... त्याचा असाच फॉर्म वर्ल्डकपमध्येही कायम राहो!!

पांड्याचा एकंदर वावरच फेक आणि अवघडलेला वाटतो.... आज काय बॅटींग केली त्याने; त्याचे त्यालाच माहित!! पहीली ओव्हर स्वताला आणि पहील्या चार ओव्हरमध्ये चार वेगळे बॉलर अणि फिल्डींगमध्येपण गचाळपणा केला.
रोहितचा सक्सेसर म्हणून सुर्याला ग्रूम करा आणि पांड्याला सुट्टी द्या पुढच्या सीझनमध्ये आणि अगदी पांड्या हवाच असेल तर बाकीची कोअर टीम बदला आणि पांड्याला त्याच्या मनाप्रमाणे खेळाडू निवडू द्या!!
हे टीम कॉंबीनेशन वर्क होत नाहिये

“ पण एकत्र क्लिक होत नाहियेत हे उघड आहे” - कोचिंगचा प्रश्न कदाचित नसावा. मलिंगा आहे त्यांच्याकडे. पण काहीतरी क्लिक होत नाहीये. जेव्हा बॉलिंग युनिट एकत्र क्लिक होतं तेव्हा मरकंडे, कृणाल पंड्या, तुषार देशपांडे वगैरे सुद्धा भेदक वाटतात.

“ त्याने रणजीमध्ये बरी बॉलिंग केली ना बहुतेक ?” - हो. पण यंदा दिसलाच नाहीये मुंबईच्या कँपमधे.

आता उगाच पांड्याच्या नावाने शिमगा करणारे असतील तर मयांक यादवच्या बॉलिंगचे श्रेय राहुल ला द्यायचे का ? Wink
>>
कुणीही प्लेअर चांगला खेळल्याचं श्रेय कॅप्टन ला मिळायला कॅप्टन धोनी किंवा शर्मा लागतो ना...

#कॅनऑफवर्म्स #आँबैलमुझेंमार

हो. पण यंदा दिसलाच नाहीये मुंबईच्या कँपमधे.
>>
जयपूर ला टीम आली तेंव्हा आधीच्या टीम मीटिंग ला लेट आल्याबद्दल पनिश्मेंट असलेला सुपरहिरो जम्प सूट घालून आला होता. किशन ला पण एकदा घालायला लागला होता.

रोहितचा सक्सेसर म्हणून सुर्याला ग्रूम करा
>>
सूर्या मुंबईचा रणजी कॅप्टन पण होता पूर्वी
पण आता त्याचं पण वय बघून निर्णय घ्यायला हवा.

ऑन पेपर पांड्या बरोबर चॉईस होता, पण एकूणच त्याची घर वापसी नीट हॅण्डल केली नाही त्याची फळं भोगताहेत.
कॅप्टन म्हणून अन् प्लेअर म्हणूनही तो गुजरात मधे बेटर परफॉर्म करत होता. आताच्या बॅटिंग फॉर्म ला बघता तो वर्ल्डकप मधे ही येईल का नाही ते सांगता येत नाही. अन् जर आला नाहीच, तर लोक त्याबाबत शर्मा ला जवाबदार ठरवतील हे मात्र नक्की.

नका देऊ धोनी आणि शर्माला कप्तानीचे श्रेय.
दोघात मिळून दहा ट्रॉफी हे आकडे बोलके आहेत.
इंटरनॅशनल मध्ये सुद्धा धोनी पश्चात आयासीसी ट्रॉफी जिंकणे अवघड झाले आहे. दोन्ही नसता तर कदाचित आपण 83 पासून उपाशी असतो. पण ठिक आहे. नका देऊ श्रेय.

नका देऊ धोनी आणि शर्माला कप्तानीचे श्रेय. >> अर मग टाअयटन्स ने पांड्या कप्तान असताना पहिल्याच वर्षी पहिली ट्रॉफी जिंकली (जे शर्मा नि धोनीलाही जमले नव्हते). दुसर्‍या वर्षी जाडेजा च्या एका आऊट ऑफ द वर्ल्ड इनिंग मूळे दुसरी जवळजवळ जिंकलेली ट्रॉफी हरले ह्याचे श्रेय पांड्याचे म्हणायचे ना ? Wink

पांड्याला देऊन , त्याचे वय , रोहितचे वय नि रोहित चा मागच्या तीन आयपील मधला एकंदर खेळ बघता मूव्ह ऑन केले ही व्यावसयिकता कशी चुकीची हे वाचताना गम्मत वाटते. त्यांचे दुर्दैव एव्हढेच कि नेमका त्या नंतर रोहित जबरदस्त खेळायला लागला. गम्मत म्हणाजे रोहित ला मिड सीझन मधे पाँटींग ला काढून कर्णधार केले गेले होते तेंव्हा ती सिमिलर मूव्ह योग्य होती . माह्या आठवणी प्रमाणे गेल्या टी २० वर्ल्ड कप नंतर रोहित टी २० चा कर्णधार नसून पांड्या नि सूर्या होते (फिट असताना) . रोहित संघामधेही नव्हता. त्याने टेस्ट च खेळावे इथपर्यंत मत झाले होते . तेंव्हा भारतीय संघ पण जवळजवळ मूव्ह ऑन झाला होता . नुसताच कांगावा कशाला ? इंडीयन्स नी ही मूव्ह रोहित ला विश्वासात घेऊन करायला हवी होती (ती केली कि नाही हे माहित असण्याएव्हढे माझे सोर्सेस नाहीत ) ह्यापलीकडे काहीही खरच होते का हे ज्याने त्याने स्वतःलाच विचारून पाहावे. बोल्ड केलेल्या भागावर लक्ष द्यावे

हे टीम कॉंबीनेशन वर्क होत नाहिये >> बिंगो स्वरुप हेच म्हणतोय मी केंव्हापासून !

रोहित ला मिड सीझन मधे पाँटींग ला काढून कर्णधार केले गेले होते तेंव्हा ती सिमिलर मूव्ह योग्य होती .
>>>>>>>

सिरीयसली ब्रो !!

1) तेव्हा जो कप्तान बदल केला तेव्हा मुंबई एकही आयपीएल जिंकली नव्हती..
आता जो कप्तान बदल झाला तेव्हा तुम्ही पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून दिलेला कप्तान बदलला..

2) तेव्हा जो कप्तान बदलला गेला तो एक परदेशी निवृत्त परदेशी खेळाडू होता. फक्त सहा सामने कप्तानी केली होती. तात्पुरता कप्तान केला असावा. दुसरा कुठला पर्याय सुद्धा नव्हता.
पण आता जो कप्तान बदलला तो ऑल फॉरमॅट भारतीय कप्तान होता.

दुसरा मुद्दा
----
गेल्या टी २० वर्ल्ड कप नंतर रोहित टी २० चा कर्णधार नसून पांड्या नि सूर्या होते (फिट असताना)
>>>>>>>

रोहितला कधीही ऑफिशियली कर्णधार पदावरून काढले नव्हते. तो सूर्या किंवा पांड्या यांच्या कप्तानीत कधीच खेळाडू म्हणून खेळला नाही. किंबहुना तो 20-20 खेळतच नव्हता. कारण येणारे वर्ष वन डे वर्ल्डकपचे होते. त्याचा वर्कलोड कमी करायला त्याला 20-20 न खेळावंता वन डे आणि कसोटी खेळवत होते. आणि आता 20-20 वर्ल्डकप वर्ष येताच तो आला परत.. ते कर्णधार म्हणूनच Happy

असो,
ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडीचा नावडीचा आदर आहे.
पण मुद्दे चुकीचे आहेत ते खोडावे लागणार Happy

Pages