आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धोनी एक बॉल साठी आला आणि फोर मारून गेला...
400 स्ट्राईक रेट.. आणि एव्हरेज इन्फिनिटी..
बॅट न घेता आला असता आणि नॉन स्ट्रायकर एंडचा स्टम्प उचलून खेळला असता तरी फोर मारला असता असे खेळत आहे सध्या Happy

गायकवाड आज पहिल्या वरचे टाइमिंग शॉट बघूनच वाटले होते की आज त्याची स्पेशल इनिंग यायचा दिवस आहे..

आणि दुबे बद्दल काय बोलावे.. याला न्या रे वर्ल्ड कपला.. हा फलंदाजीत आपला युवराज ठरणार आहे..

सहज आठवलं
पुणे सुपर जायंट्स चा पहिल्या वर्षी धोनी कप्तान होता तेंव्हा ते शेवटचे आले. पुढल्या सीझनला त्याच्या आधीच्या आयपीएल विजेतेपदांकडे दुर्लक्ष करून कर्णधार पदावरून डच्चू दिला आणि स्मिथला कप्तान केलं तर ऑलामोस्ट ट्रॉफी जिंकली (1 रन नी हरले होते)

1) तेव्हा जो कप्तान बदल केला तेव्हा मुंबई एकही आयपीएल जिंकली नव्हती..
आता जो कप्तान बदल झाला तेव्हा तुम्ही पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून दिलेला कप्तान बदलला..
>> ड्युड, तीन वर्षे ह्याच कप्तानाने एकही ट्रॉफी जिंकली नव्हती नि ज्याला केले त्याने एक जिंकली होती नि दुसरी जवळजवळ जिंकली होती हा सप्लिमेंटरी मुद्दा तू विसरतो आहेस. अगदी धोनी सुद्धा मूव्ह ऑन झालाच ना कप्तान पदावरून ? एकदा कप्तान झाला म्हणजे मरेपर्यंत राज्य मिळाले अशी तुझी समजूत आहे का आहे ? इंडीयन्स टिम अंबानीची आहे रोहितची नाही नि फॅन्स चीही नाही हे तुझ्या डोक्यात का शिरत नाही ?

तेव्हा जो कप्तान बदलला गेला तो एक परदेशी निवृत्त परदेशी खेळाडू होता. फक्त सहा सामने कप्तानी केली होती. तात्पुरता कप्तान केला असावा. दुसरा कुठला पर्याय सुद्धा नव्हता. >> असावा हा शब्द वापरावा लागला ह्यातच तूच काय ते समज. रोहित कुठलाही कप्तान नसाताना इंडियन्स नी त्याला कप्तान केले ह्यात त्यांचे क्रेडिट आहे नि त्यांनी तसाच प्रकार परत करायचा प्रकार केला हे साधे सरळ गणित आहे. ह्यात उगाच आदर वगैरे असंबंद्ध फापटपसारा फक्त एकांगी विचार करणार्‍या फॅन्स नाच दिसू शकतो.

बाय त वे, वरती तू आदर दाखवावा म्हणालेला आहेस, धोनी ने द्रविड नि लक्ष्मण च्या बाबती मधे काय केले होते हा इतिहास फार जुना नाही आहे. ( जुन्या खेळाडूंनी निघावे असे त्याचे म्हणणे फार चुकीचे होते असे नाही पण ज्या तर्‍हेने केले गेले ते फार चांगले असे म्हणणे धाडसाचे ठरेल.)

विजेतेपदांकडे दुर्लक्ष करून कर्णधार पदावरून डच्चू दिला आणि स्मिथला कप्तान केलं तर ऑलामोस्ट ट्रॉफी जिंकली >> तू अगदीच धोतराला हात घालतोस रे बाबा Lol

इंडीयन्स टिम अंबानीची आहे रोहितची नाही नि फॅन्स चीही नाही हे तुझ्या डोक्यात का शिरत नाही ?
>>>>>>>

ते मला माहित आहे.
त्या हिशोबाने सचिन तेंडुलकर सुद्धा आमचा पगारी नोकरच आहे म्हणत त्यांनी त्याला प्लेअर ना पाणी द्यायला पळवले तर त्याचेही समर्थन करणार का..

असो
आदाराची व्याख्या आवडीच्या नावडीच्या प्लेयर नुसार बदलते
द्रविड लक्ष्मण सोबत धोनी असा काय अनादराचे वागला तुम्हालाच माहीत..
पण शर्मा सोबत जे झाले ते त्याच्या चाहत्यांना आणि बहुतांश भारतीय क्रिकेट प्रेमींना अनादराचे आणि अन्यायकारक वाटले जे शर्माचे मुळात चाहते सुद्धा नव्हते.
आणि मुंबई इंडियन मॅनेजमेंट सुद्धा आता पस्तावत असेल.
लोकांसमोर हात पसरून विनंती करायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
त्यामुळे कितीही याला व्यवसायाचे लेबल लावले तरी चूक ते चूक हे बहुतांश जनतेला कळतेच.
जसे की गेल्या दोन वर्षात शर्माला विजेतेपद नाही आणि पांड्याला आहे तर हा निर्णय योग्य वगैरे... हे तकलादू युक्तीवाद आहेत.

पुणे आणि धोनी हा वेगळाच विषय होता
चेन्नई बँन नंतर पर्याय नसल्यासारखे धोनी पुण्यासोबत होता. आणि ते दोन वर्षांसाठीच होता. दोन्ही वर्षांच्या संघात सुद्धा फरक होता. धोनीला जणू इच्छा नव्हती त्या संघमालक सोबत काम करायची आणि. ते रिझल्ट मध्ये सुद्धा आले आणि मग कप्तान बदल देखील झाला. आणि त्या पुणे मालकाने आणखी धोनीला त्यानंतर ही डिवचले होते.. यावरून दोघात काय संबंध असावेत हे उघड होते. मला तर वाटते शेवटचा एक रन ने हरलेला सामना सुद्धा धोनी जिंकून देऊ शकत होता. पण बहुधा त्याला इच्छाच नसावी.. फ्रॅंचाईजी क्रिकेट आहे हे.. जसे दिसते तसे नसते.. आत बरेच भानगडी आणि राजकारण असतात.

जसे की गेल्या दोन वर्षात शर्माला विजेतेपद नाही आणि पांड्याला आहे तर हा निर्णय योग्य वगैरे... हे तकलादू युक्तीवाद आहेत. >> कसा काय तकलादू युक्तीवाद आहे ? पांड्या ने जिंकलेले नाहिये का ? शर्मा ने तीन वर्षांमधे जिंकेलेले आहे का ? (कप्तानाने जिंकणे हा तुझा शब्द प्रयोग आहे माझा नाही) बाकी सगळ्या आधीच्या वाक्यांबद्दल बरेचदा बोलून झालेले आहे. (धोनी बद्दल फेफ शी झालेला तुझा वाद आठव). रोहित बद्दल आधी अनादर होता - आता अन्याय अ‍ॅड झाले आहे. परत असेल वगैरे शब्द प्रयोग आले म्हणाजे हे सगळे खयाली पुलाव आहेत (जसा तेंडुलकरच्या १९४ बद्दल केले होतेस तसे)

बाकी सचिन नि रोहित एकाच मापाने मोजण्याची हिम्मत रोहित स्वतःही करणार नाही.

फ्रॅंचाईजी क्रिकेट आहे हे.. जसे दिसते तसे नसते.. आत बरेच भानगडी आणि राजकारण असतात. >> गम्मत आहे - हेच मुंबई इंडियन्स ला लागू होत नाही पण धोनी असेल तिथे लागू होते ? तसेच ". मला तर वाटते शेवटचा एक रन ने हरलेला सामना सुद्धा धोनी जिंकून देऊ शकत होता. पण बहुधा त्याला इच्छाच नसावी.. " ह्यात आपण धोनीच्या कमिटमेंट वर शंका घेता आहात हे लक्षात येते आहे का ? Lol

सौ बात की एक बात लिहितो !

पाच हा खूप मोठा आकडा आहे.
कोणीही एकदा जिंककेला कर्णधार मिळाला म्हणून लगेच पाच जिंकलेल्या कर्णधाराला बदलत नाही. तो देखील भारताचा कप्तान आणि प्रचंड मोठी ब्रँड व्हॅल्यू असलेला कर्णधार.

त्यामुळे या निर्णया मागे हा विचार नसून वेगळे राजकारण आहे हे उघड आहे.

तसेच हे जे काही झाले आहे ते रोहितला विश्वासात न घेता झाले आहे हे नंतरच्या घडामोडींवरून समजणे सुद्धा अवघड नाही.

पण एकूणच हे सारे समजणे खरेच अवघड असेल तर थांबुया Happy

कारण एव्हाना याचे परिणाम दिसत आहेच. त्यामुळे हातच्या कंगनाला आरसा कशाला Happy

बाकी सचिन रोहित शर्मा पेक्षा मोठा आहे हे मला मान्य आहेच. मुद्दा स्पष्ट करायला म्हणून मुद्दामच सचिनचे नाव घेतले.

पण रोहीत शर्मा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे हे मान्य करणे अवघड जात आहे हे समजू शकतो Happy

त्यामुळे या निर्णया मागे हा विचार नसून वेगळे राजकारण आहे हे उघड आहे. ... पण एकूणच हे सारे समजणे खरेच अवघड असेल तर थांबुया >> आता राजकारण पण आले ह्यात ? इतके दिवस त्याचा उल्लेखही नव्हता. आज आदर, मग अन्याय नि आता राजकारण आले . तीन दोन पाच खेळतोय का ? एकदा नक्की ठरव कि काय आहे ते बरं नि मग समजाव. आय अ‍ॅम ऑल ईअर्स.

पण त्याच बरोबर तीन वर्षे जिंकणार्‍या कर्णधाराला एक नुकतेच जिंकलेल्याने रीप्लेस करण्यामधे तकलादू काय हे अजूनही उत्तर दिलेले नाही. आय अ‍ॅम ऑल ईअर्स.

पाच जिंकणे हे धोनी नि शर्माचे क्रेडीट तर पांड्याला तेच क्रेडीट का नाही ? आय अ‍ॅम ऑल ईअर्स.

रोहीत शर्मा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे हे मान्य करणे अवघड जात आहे हे समजू शकतो >> रोहित मोठा आहे कि नाही ह्याला नक्कीच माझ्या मताची गरज नाही बाबा. तुला तसे वाटत असेल तर तुझ्या बुद्धीचा दोष.

पाच जिंकणे हे धोनी नि शर्माचे क्रेडीट तर पांड्याला तेच क्रेडीट का नाही?
>>

दिले आहे की
एका ट्रॉफी चे क्रेडिट Happy

पाच पाच मिळवून ज्यांनी हे फ्लूक नाही हे सिद्ध केले आहे त्यांनाच देणे इथे अवघड जातेय Happy

पाच पाच मिळवून ज्यांनी हे फ्लूक नाही हे सिद्ध केले आहे त्यांनाच देणे इथे अवघड जातेय >> असंबंद्ध आर्ग्युमेंट आहे . मला नाहि वाटत कोणीही ते नाकारले आहे (फरक किती क्रेडीत द्यायचे त्याबद्दल हा आहे) . नि मूळ प्रश्न त्यापुढे काय केले किंवा काय करू शकतो भावी काळामधे ह्यातून आलेला निर्णय ह्याबद्दल आहे. हा बिजनेस आहे हे लक्षात घेतले कि असे निर्णय तडकाफडकी घेतले जाणे फार नवीन नाही हे लक्षात येते. सचिन इंजर्ड असताना किंवा जॉफ्रा इंजर्ड असताना २-३ वर्ष त्यांचा प्राईस टॅग कॅरी केलेला आहे. त्याचे कारण त्यांची व्यॅल्यू फ्रँचाईज ओव्नर्स ना हवीशी वाटली होती. पांड्याला रिटेन करताना हाच कठोरपणा होता. परत आणताना रोहितचा अनादर करायचा म्हणून करणे ह्या सगळ्याशी किती सुसंगत वाटते ?

राजकारण कधी समजावतो आहेस नक्की ?

काल कोण जिंकले?
कोण चांगले खेळले?
काय विश्लेषण आणि मत मतांतरे म्हणून वाचायला आलो.

मला वाटलं कायतरी जब्बर match झालीय म्हणून इतक्या पोस्ट्स

मला वाटलं कायतरी जब्बर match झालीय म्हणून इतक्या पोस्ट्स>>>

झकोबा, Lol

पण कालची मॅच छान झाली. यष्टीमागील (पडद्यामागचा) कर्णधार थोडा कमी पडला( कदाचित एकच चेंडू फलंदाजीला मिळाल्या मुळे असेल) Wink

आदाराची व्याख्या आवडीच्या नावडीच्या प्लेयर नुसार बदलते
द्रविड लक्ष्मण सोबत धोनी असा काय अनादराचे वागला तुम्हालाच माहीत..
>>
'माझी' हा शब्द राहिला वाटतं लिहायचा

माझी आदाराची व्याख्या आवडीच्या नावडीच्या प्लेयर नुसार बदलते
द्रविड लक्ष्मण सोबत धोनी असा काय अनादराचे वागला तुम्हालाच माहीत

असं तुला म्हणायचं असावं असं समजतो

स्टॉयनिसने एक नंबर खेचली कालची मॅच!!
पूरन आणि हुडा पण त्यांचे काम करुन गेले

शार्दूलच्या ओव्हरमध्ये मॅच फिरली..... बाउंड्रीवरच्या एकदोन मिसफिल्डही महागात पडल्या!!
पथिराना आणि फिझ्झ हे शेवटच्या ओव्हरमध्ये हमखास चालणारे गोलंदाजही काल फेल गेले

चुम्मा मार रहा है .... बदाम बदाम बदाम...

चुम्मा मार रहा है .... बदाम बदाम बदाम...

चुम्मा मार रहा है .... बदाम बदाम बदाम...

दिल्ली 7 ओवर 49-3
दिल्ली 20 ओवर 225 टारगेट

चुम्मा 43 बॉल 88
8 सिक्स
लास्ट ओवर 264666 = 30 चुम्मा रन

अरे हा नोरकीया..
बेकार मार खातो हा नेहमी..
गुजरातला सामन्यात आणला

स्टॉयनिसने एक नंबर खेचली कालची मॅच!! >> हो ! कोणी तरी विचारले हे सर्वात चांगली खेळी होती का हा आय पील ची ? सिरीयसली ? बटलरच्या एक खांबी तंबूपेक्षा अजून चांगली खेळी कशी असेल ? त्या मॅच मधे शेवटच्या ३-४ ओव्हर्स तो एकटा खेळलाय फक्त. हार्ड टू टॉप दॅट.

स्टब आता किती फिजिकली स्ट्राँग वाटतोय. दोन वर्षांपूर्वी मुंबई इंडुयन्स मधून खेळलेला तेंव्हा पाप्याचे पितर होता नुसता. पंतनी अतिइशय वेळेवर स्कोर टाकलाय, सिलेक्शन तोंडाशी आहेत.

आज कसल्या मस्त कॅच पकडल्या पंत ने...
चुम्मा फलंदाजी
चुम्मा किपिग
सर्व गुणसंपन्न ऋषभ पंत - असे मी नाही आकाश चोप्रा म्हणाला.

अपनी पारी के दौरान पंत ने एक टी20 मैच में एक गेंदबाज के खिलाफ एक बल्लेबाज द्वारा सर्वाधिक रन बनाने का एक बड़ा विश्व रिकॉर्ड बनाया।

26 वर्षीय पंत ने अनुभवी भारतीय तेज गेंदबाज मोहित शर्मा की 18 गेंदों में 62 रन बनाए,

आज दिल्लीने लास्ट ५ ओवर मध्ये ९७ धावा केल्या. हा आयपीएल मधील दुसऱ्या क्रमांकाचा रेकॉर्ड आहे.

आज दिल्लीने २२४ धावा केल्या. गुजरात विरुद्ध हा सर्वाधिक स्कोअर आहे.

आयपीएल के इतिहास मे सब से कम गेंदो मे 3000 रन बनाने वाले भारतीय

2028 ऋषभ पंत
2062 युसुफ पठाण
2130 सूर्यकुमार
2135 सुरेश रैना
2152 धोनी
2203 के एल राहुल
2225 संजू सॅमसन

RCB 206
कोहली पुन्हा निशाण्यावर येणार आज
43 बॉल 51
पॉवर प्ले मध्ये 18 बॉल 32 होता.
पुढच्या 25 बॉल मध्ये 19 रन काढले फक्त.
15 व्या ओवरला बाद झाला. पण पॉवर प्ले नंतर एकही बाऊंडरी नाही. आणि तेव्हा समोरून पाटीदार 19 चेंडूत अर्धशतक मारत होता.

वर्ल्डकपमध्ये आयपीएल सारखे प्रत्येक सामन्यात धावांची बरसात होईल असे नाही.
शर्माने आपला ॲप्रोच बदलला आहे. राहुल आणि गिल खेळवू नका. त्या केस मध्ये संघात एक कोहली असणे वाईट नाही. स्पेशली चेस करताना, नेमके टारगेट माहीत असताना, तो असा गरजेपेक्षा कमी स्ट्राईक रेटने खेळणार नाही.

Pages