आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी पण बंद करणार होतो पण चालू ठेवली. पॉवेल नी वात पेटवली खरी आणि मग बटलर सुटला. मान गये उस्ताद!
पिच स्लो झालं असणारच पण तरी बटलरलाच क्रेडिट आहे. सातत्याने फटके मैदानाबाहेर मारणे काही सोपं नाही. राणा, स्टार्क कोणालाच नाही सोडलं.
परागचाही हातभार होता. I just love his shots though! I hope he sizzles in the next match. It's a treat to watch.

जबरदस्त झाली मॅच. अशी फायनल व्हायला हवी. चुरस, उत्कंठा, शेवटपर्यंत टिकलेली अनिश्चितता - this is what you watch sports for.

पूर्वीच्या काळी भारतात मोठ्या युनि्हर्सिटी होत्या. परदेशातून लोकं यायची, शिकून आपापल्या देशात जायची आणि आपापल्या देशाची भरभराट करायची. त्याचप्रमाणे आता आयपीएल होते बाहेरचे खेळाडू येतात शिकून जातात आणि आपापल्या देशाला वर्ल्ड कप जिंकवतात. भारतीय खेळाडू फक्त फिल्डींग करायला असतात.

नरेनचे तर कौतुक आहेच पण काल रघुवंशी पण मस्त खेळला..... प्युअर क्रिकेटींग शॉट्स Happy
नरेन वर्ल्डकप खेळला पाहिजेल विंडीजकडून

बाय द वे; तो काल आवेशने घेतलेल्या कॅचनंतरचा किस्सा बघितला का?
मला पहील्यांदा कळलेच नाही की त्याचे काय हातवारे चाललेत पण नंतर लक्षात आले की त्याला मागच्या मॅचचा संदर्भ होता.
सॅमसनने त्याच्या हातात ग्लोव्हज दिला आणि त्याने ग्लोवहजमध्ये बॉल पकडून डगआउटकडे दाखवला..... फार भारी होते ते!!
मला वाटले मांजरेकर पोस्टमॅच प्रेझेंटेशनमध्ये त्याबद्दल विचारेल.... हर्षा असता तर नक्की विचारले असते Happy

बटलरने मॅच जिंकोन दिल्यावर पराग आणि कंपनीने त्याच्याभोवती कोंडाळे करुन त्याला झुकून नमस्कार केला तेही भारी होते Happy

These small little moments talks a lot about culture and environment within the team Happy

इंडिया प्लेअर टाळ्या वाजव, फिल्डिंग कर, दुसऱ्यांना नमस्कार कर, मॅच जिंकली की धावत जाऊन मिठी मार याच लेव्हल चे आहेत. पूर्वीच्या काळी सैन्यासोबत बाजारबुणगे जायचे तसलाच हा प्रकार आहे. चिअर लीडर मैदानाबाहेर आणि हे मैदानात. खरी प्रॅक्टिस परदेशी खेळाडू करतात.

“ These small little moments talks a lot about culture and environment within the team” +१

काल रघुवंशी पण मस्त खेळला..... प्युअर क्रिकेटींग शॉट्स >> रघुवंशी चे शॉट्स चाबकासारखे जातात व्रिस्टमूळे पण शॉप्ट्स मधे ताकद कमी आहे असे वाटले का ?

दोन बाउन्सर ची परवानगी मिळाल्यानंतर बॉलिंग वरचढ होईल (किमान समे लेव्हल ला येईल) असे वाटलेले तर
१. हायेस्ट स्कोर्स दोनदा झाले.
२. हायेस्ट चेस झाला
३. टॉप स्कोअरर हुक किंवा पुल चा फारसा वापर करत नाही तो आहे.
४. टॉप बॉलर्स स्पिनर्स आहेत.

“ These small little moments talks a lot about culture and environment within the team” >> त्यांछे फॅन्स पण तिरपागडे नाहित हे लक्षात घे Wink

“ दोन बाउन्सर ची परवानगी मिळाल्यानंतर बॉलिंग वरचढ होईल (किमान समे लेव्हल ला येईल) असे वाटलेले” - बाउन्सर्स हे अस्त्र आहे. ते कसं वापरायचं हे माहित हवं आणि ते वापरायची पात्रता (स्पीड, अ‍ॅक्युरसी ई.) अंगी असायला हवी नाहीतर वाईड / बाईज जातात.

आज सामनावीर चुम्माला दिले Happy
फलंदाजीत फक्त नाबाद 16 धावा तरीही...

कारण दोन झेल दोन स्टंपिंग..
आणि एक कप्तान म्हणून प्रतिस्पर्धी संघाला फक्त 89 धावात गुंडाळायची कामगिरी..

या आधी कुठल्या खेळाडूला फक्त 16 धावा करून सामनावीर मिळाले आहे का बघावे लागेल..

चटकन आठवत तरी नाही.. बघावे लागेल

दिल्लीचा संघ साधारण आहे. कदाचित यावर्षीचा सर्वात कमजोर. आज तर तीन परदेशी खेळाडू घेऊन खेळत होते. ते ही यथातथा असलेले. तरीही जीवघेण्या अपघातातून परत आलेला, हळूहळू आपला फिटनेस परत मिळवणारा कप्तान लढतोय! ग्रेट ..

कालची मॅच पाहिली नाही!!

एकूण स्कोअरबोर्ड बघता ते सामनावीर त्याच्या विकेटकिपींगबद्दल दिले असावे; त्याचा त्याच्या बॅटींगशी काही सबंध नसावा..... त्यामुळे १६ धावा काढून सामनावीर याला फारसा अर्थ नसावा तसे तर मग बॉलर्सना जे सामनावीर मिळते तेंव्हा शून्य धावा काढून सामनावीर म्हंटले पाहिजे Wink

त्यामुळे १६ धावा काढून सामनावीर याला फारसा अर्थ नसावा
>>>

हो, तोच मुद्दा आहे.
फक्त कीपिंग/ फील्डिंग आणि कप्तानी याबद्दल आधी आयपीएल मध्ये कोणाला सामनावीर मिळाले होते का..

मागच्या मॅचला एक हाय कॅच घ्यायला सॅमसन आणि आवेश (जो बॉलर होता) दोघेही धावले होते आणि एकमेकांना धडकून कॅच सुटला होता..... त्याच्या आधी बहुतेक कुलदीप सेन आणि सॅमसन पण धडकता धडकता वाचले होते पण तो कॅच सुदैवाने कुलदीपने पकडला होता.... त्यासंदर्भात पोस्ट मॅचमध्ये सॅमसन म्हणाला होता की "I need to tell my fast bowlers that it is easier to catch with gloves"
ते बहुतेक आवेशने मनावर घेतले आणि म्हणून तो जवळजवळ अशक्य कॅच घेतल्यावर त्याने सॅमसनकडे बघून "मैभी पकड सकता हूं" टाइप्स हावभाव केले. त्यावर सॅमसनने पण अतिशय खिलाडूपणे एक ग्लोव्ह काढून त्याच्या हातात दिला आणि त्याचे कौतुक केले Happy

हो हो स्वरुप. मी पाहिलं ते संभाषण. संजूनी हात करुन दाखवलं त्याला की माझ्याकडे ग्लव्स असतात बाबा, तरी तू का बरं कॉल केलास कॅच घ्यायला. Happy
आणि नंतर आवेष नी ती ग्लोव्सची खुण केली. भारी रिफ्लेक्स अ‍ॅक्शन कॅच घेतला आवेषनी.

"I need to tell my fast bowlers that it is easier to catch with gloves" >> हे ह्या लेव्हल वर सांगायला लागते हे दुर्दैवाचे आहे. हे अगदीच बेसिक आहे. कुलदिप सेन वाला प्रकार तर अशक्य होता. सॅमसन ने कॉल केल्यावरही कुलदीप ने कॉल केला हे झेपलेच नाही.

बाउन्सर्स हे अस्त्र आहे. ते कसं वापरायचं हे माहित हवं आणि ते वापरायची पात्रता (स्पीड, अ‍ॅक्युरसी ई.) अंगी असायला हवी नाहीतर वाईड / बाईज जातात. >> हो नी त्यानंतर पाटा विकेट्स बनव्णे हा अजून एक धमाल प्रकार आहे.

जर आय सीसी इंपॅक्ट रुल घेणार नसेल तर आय पील मधून उडावयाला हवा तो नियम. आधीच आपल्याकडे ऑल राऊंडर्स ची वानवा आहे . आहे त्यांना दुबे, तिलक वगैरे ला बॉलिंग साठी वापरले जात नाही. त्यावर इंपॅक्ट रुल म्हणजे हाईट होते. जगभारतली बोर्ड्स बर्न आऊट साठी प्लेयर्स ना आयपील मधून परत बोलवत आहेत. सूर्या सारख्या प्लेयर ला इंजरी रिस्क नको म्हणून बीसीसीआय इंपॅक्ट प्लेयर म्हणून वापरावा असे सुचवतेय. हेच थोडे वाढवून दुबे, तिलक, सुंदर सारख्या थोडीफर बॉलिंङ करू शकणार्‍यांना २-३ मॅच मधे एखाडी तरी ओव्हर दिली हावे असे "सुचवा" रे

त्या आवेश खानने एकदा जिंकल्यावर हेल्मेट काढून आपटले होते तो किस्सा सुद्धा फेमस आहे ना..
मला बिलकुल आवडले नव्हते ते.
राजस्थान मध्येच होता का तेव्हा तो..?

अग्री अबाऊट फटिग असामी. हेड पण मला वाटतं असाच आहे. १-२ मॅच ला नव्हता तो. आपण निश्चितच तसं करायला हवं नाहीतर तर आय पि एल मध्ये फटिग येऊन तिकडे इंटरनॅशनल मॅचेस मध्ये दाणादाण सुरु आहे. नॉट फेअर.

टेक अ बो आशुतोश शर्मा ! काय खेळलाय पोरगा ! मढवाल यॉर्क करणार हे डोक्यात ठेवून खेळलेला रीव्हर्स स्कूप काय होता ! पंजाब त्याला आठव्या क्रमांकावर का पाठवतेय ?

>>पंजाब त्याला आठव्या क्रमांकावर का पाठवतेय ?

तो आणि शशांक लोअर ऑर्डरमध्ये सातत्याने चांगले खेळतायत..... त्यांना फिनिशरचा रोल दिला गेला असावा त्यामुळे फलंदाजीत बढती मिळत नसावी!!
पण पंजाबची टॉप ऑर्डर अशीच फेल होत राहिली तर त्या दोघांनाही किमान मिडल ऑर्डर मध्ये खेळवून बघायला हरकत नाही.... न जाणो फिनिशरची गरजच नाही पडणार!!
काल आशुतोष होता तोपर्यंत मुंबईची हवा टाईट झालेली..... बुमराहची ओव्हर त्यांनी मस्त खेळून काढली..... हार्दिकने हरप्रीतची विकेट काढली तरी रबाडाने त्याला सिक्स मारुन मुंबईला परत टेंशन दिलेले.... रबाडाने ती नसलेली दुसरी रन काढायची रिस्क घेण्यापेक्षा स्ट्राईकवर राहुन पुढच्या बॉलवर उचलून मारायची रिस्क घेतली असती तरी परवडले असते!!

४-१४ वरुन गेम इतक्या डीप घेऊन जाणे हेच खुप क्रेडीटेबल आहे पंजाबसाठी Happy

“ आय पि एल मध्ये फटिग येऊन तिकडे इंटरनॅशनल मॅचेस मध्ये दाणादाण सुरु आहे. नॉट फेअर.” - आयपीएल नंतरच्या प्रत्येक आयसीसी इव्हेंटची दास्ताँ आहे ती बुवा. Sad

हौ ना फेफ. आय होप गंभीरपणे घेतील आपले मॅनेजमेंट वाले.

ह्यावेळी पंजाब आणि डि सी वाल्यांनी चमक दाखवून जरा काँपिटिशन शेक अप केली तर मजा येइल. त्याच त्याच टीम फायनलला गेल्या की बोअर होतं थोडं. हैद्राबाद ह्यावेळी पुढे आहेतच. टायटन्सचे काही समजत नाही. आय पि एल मध्ये बॉलिंग हा जरा प्रॉबलेमच वाटतो. म्हणजे गेम चेंजिंग असे बॉलर नाहीयेत किंवा पिचेस आणि रुल्स मुळे बॉलिंग गेम चेंजर ठरुच शकत नाही असंही वाटतं कधी कधी.

जरा आणखिन विकेट पाडा म्हणा चेन्नई वाल्यांच्या. धोनीला म्हणा ये जरा खेळत्या हवेत ७-८ ओवर खेळायला. सारखं काय मेलं विंगेत बसून केळी खात राहायची आणि शेवटचे चार बॉल खेळायला यायचं मॅनेजमेंट कोटा सारखं. Proud

Pages