आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मागच्या पानावर कुठेतरी पोस्ट आली होती की अमुक तमुक खेळाडूंना वर्ल्डकपला नेऊ नये. ज्यात चहलचे सुद्धा नाव होते.
त्या पोस्टला अनुमोदन देताना अजून एक पोस्ट आली होती की तेच तेच चेहरे नेण्यापेक्षा नवीन चेहरे न्यावेत.
आज कुठेतरी वाचले (तेव्हा हे मलाही जाणवले) की चहल अजून एकही 20-20 वर्ल्डकप खेळला नाहीये. 33 वर्षाचा झाला आहे, 80 इंटरनॅशनल 20-20 सामने खेळला आहे. पण वर्ल्ड कप नशिबात नाही.

स्पेशली चेस करताना, नेमके टारगेट माहीत असताना, तो असा गरजेपेक्षा कमी स्ट्राईक रेटने खेळणार नाही. >> जनरली ह्या स्पर्ढेच्या ह्या एडीशन मधे दोनशे हा सफे स्कोअर धरला जातोय. बंगलोर मधे शाहबाझ ५-६ वर येतो. मॅक्सवेल बाहेर आहे. ग्रीन झगडतो आहे . दोनशेच्या आसपास पोहोचण्याची शक्यता राहण्यासाठी १२५ च्या खालचा रनरेट चालेल ? तो राहिला तर शेवटी एक्स्प्लोड होतो ही आजची गोष्ट नाहिये. इनिंङ कॅरी करू शकला तर तो डेंजरस आहे हे नवीन नाही. पण तो तसे रेग्युलरली करतोय का हा कळीचा मुद्दा आहे.

इंटरनॅशनलमध्ये 125 स्ट्राईक रेट नाही त्याचा.. 138 आहे..
आणि त्या सामन्यात सरासरी स्कोअर नक्कीच 200 नसेल.

कालच एक पोस्ट पडली होती आमच्या क्रिकेट ग्रूपवर..

Strike Rate of some Power Hitters in T20i Cricket

138.16 - Virat Kohli

137.61 - Jason Roy

137.58 - Johnny Bairstow

137.51 - Chris Gayle

136.38 - Yuvraj Singh

137.31 - Quinton De Kock

136.18 - Eoin Morgan

136.22 - Brendon McCullum

135.70 - Martin Guptill

135.17 - Ab De Villiers

135.03 - Kieron Pollard

134.69 - Nicholas Pooran

130.57 - Fakhar Zaman

माझ्यामते कोहलीला बसवणे यात हिंमत नसून तो मूर्खपणा ठरेल. असा फलंदाज आपल्याकडे आहे हे आपले भाग्य आहे. झाल्यास या बदलत्या काळात त्याला योग्य प्रकारे वापरणे यासाठी हिंमत लागेल.
जसे ओपनर चांगली सुरुवात देत आहेत तर वन डाऊन सूर्या पाठवा. चौथा आणखी कोणी. आता पॉवर हिटर आपले काम करतील म्हणत कोहलीला मागे ढकला.. हे बिनदिक्कत जमायला हवे. कारण अश्या एखाद्या सामन्यात तो कमी पडू शकतो. पण इतर कैक सिच्युएशन मध्ये आपला तारणहार ठरू शकतो. किंबहुना जे त्याने गेल्या कित्येक 20-20 विश्वचषकात केले आहे.

कोहली अजून एखादे वर्ष साधारण T20 क्रिकेट खेळत राहिला तरीही त्याचे आकडे फारसे खराब होणार नाहीत. २०२४ मध्ये फारसे आंतरराष्ट्रीय सामने झालेले नाहीत. २०२३ मध्ये तो एकही आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळलां नाही. २०२२ मध्ये तो चांगला खेळलेला आहे. अत्ता त्याच पुण्याईवर त्याला संघात घ्यायला पाहिजे का? सध्या त्याला strike rate ठेवता येत नाही. शर्मा आणि कोहली एकाच वेळी T20 संघात असणं धोकादायक आहे.तरी नशीब राहुल यायची शक्यता कमी आहे.

इंटरनॅशनलमध्ये 125 स्ट्राईक रेट नाही त्याचा.. 138 आहे.. >> पॉवर प्लेय च्या बाहेर मधल्या ओव्हर्स मधे त्या वेळचा स्ट्राईक रेट म्हणत होतो.

शर्मा आणि कोहली एकाच वेळी T20 संघात असणं धोकादायक आहे.तरी नशीब राहुल यायची शक्यता कमी आहे. >> +१

कोहली पूर्व पुण्याईवर टिकून आहे हे काही पटले नाही बुवा..
कोहलीचा या आयपीएल मधील स्ट्राइकरेट 146 आहे. आणि हा उत्तम स्ट्राईक रेट आहे. कारण हा एखाद्या इनिंगचा नसून सीजनचा आहे. सोबत 61 एवरेजसह डोक्यावर ऑरेंज कॅप आहे.

बेंगलोरचा सध्याचा फलंदाजी फॉर्म पाहता त्याला कदाचित आणखी सुटता येत नसेल असे म्हणू शकतो. कारण कितीही म्हटले तरी ते डोक्यात असतेच.
पण समजा हेच त्याला सांगितले की आता तू बेंगलोर कडून नाही भारताकडून खेळत आहे तर आपली भूमिका बदल. अजून रिस्क उचल ज्यात 60 चा एवरेज 35-40 झालेला चालेल पण 146 स्ट्राईक रेट 160+ कर तर त्याला जमणार नाही का?

चला त्याची क्षमताच नाहीये रिस्क घेऊन सुद्धा मारायची असे समजूया. पण यात थोडे उन्नीस बीस झाले तरी ओके. कारण इतर सिच्युएशन मध्ये त्याला जे जमते ते क्वचित कोणाला जमू शकते.

पॉवर प्लेय च्या बाहेर मधल्या ओव्हर्स मधे त्या वेळचा स्ट्राईक रेट म्हणत होतो.
>>>>>
म्हणून मी वर म्हटले ना की जिथे त्याची गरज वाटत नाही तिथे त्याचा फलंदाजी क्रम बदलायची हिंमत दाखवायला हवी. किंवा ते जमत नसेल तर क्लिअर करायला हवे की हा हाय स्कोरिंग पीच आहे. इथे अँकर रोल नकोय. या फॉरमॅटची डिमांड दोन्ही बाजूने मारणे आहे.

शर्मा आणि कोहली एकाच वेळी T20 संघात असणं धोकादायक आहे.तरी नशीब राहुल यायची शक्यता कमी आहे. >> +१
>>>>

शर्मा राहुल कोहली या त्रिकुटाची चर्चा गेल्या वेळी सुद्धा झाली होती. मी सुद्धा याच मताचा होतो की हे तिघे एकत्र नको. कारण तिघे सेट होऊन मग मारणारे एका छापाचे प्लेयर आहेत.

पण यावेळी सिच्युएशन वेगळी आहे. राहुल यावेळी नसेल आणि शर्माने आपला ॲप्रोच बदलला आहे. त्यामुळे एक कोहली चालू शकतो. किंबहुना एखादा कोहली असणे उत्तम.

शर्मा आणि कोहली ओपनर हा पर्याय सुद्धा थिंक टॅंकच्या डोक्यात असणार असे वाटते.

म्हणून मी वर म्हटले ना की जिथे त्याची गरज वाटत नाही तिथे त्याचा फलंदाजी क्रम बदलायची हिंमत दाखवायला हवी. >> हे बोलायला स्पे आहे. इंपॅक्ट प्लेयर असते तर चाललेही असते. पहिल्या पाचामधे सूर्या , रोहित, रिंकू , पांड्या/दुबे हे चार नक्की धरले (सहावा कीपर म्हणून सोडून दे) तर कोहली ओपनर सोडून कुठे बसेल ? म्हणजे थोडक्यात इतकी वर्षे जो रोल तो करत आला आहे तोच त्याला करावा लागणार. इतक्या वर्षांमधे स्पिनर्स च्या समोर तो स्लो डाऊन तेही बदललेले नाहि. अगदी ह्याच आयपील मधे हा तिसरा सामना आहे जिथे हे झालेले आहे (ह्याचा अर्थ तो स्पिन चांगला खेळत नाही असे नाही तर त्याच्या बॅटींङ चा एकंदर पिंडच तसा आहे. आज पटीदार जसा खेळून गेला तसा स्पिनर्स समोर खेळलेला कोहली २०१८ नंतर आठवतोय का ? ). दोन सामन्यांपूर्वी पिच वर बॉल थांबून येत असल्यामूळे स्लो झाला होता - विंडीज मधल्या विकेट्स सध्या तरी स्लो असतात. सो नेहमीचा स्ट्राईक रेट कमी होण्याचा प्रकार होण्याचे चान्सेस अधिक आहेत. ह्याचा अर्थ समोरच्यांना अधिक रिस्क घ्यावी लागणार हे ग्रूहित धरले जातेय. अँकर रोल नकोच असेल कोहली पेक्षा अधिक सरस पॉवर हिटर्स नेलेले चांगले नाही का ?

मी कोहलीचा चाहता असलो तरी सध्याच्या भारतीय टी २० मधे तो सगळ्या गरजा पूर्ण करतो असे मला वाटत नाही. तो संघात असला तर तो सरस खेळावा अशी माझी नेहमीच आशा असेल.

मी म्हणत आहे की अँकर रोल नकोच हे दर सामन्याला लागू होईल असे नाही.
बरे कोहली हा काही द्रविड लक्ष्मण नाही जे इतका मिसफिट आहे या फॉरमॅटसाठी.
याउलट रन मशीन म्हणून त्याची कन्सिस्टन्सी निव्वळ थक्क करणारी आहे. तर का नाही त्याचा योग्य प्रकारे वापर करावा.
वन डे मध्ये तुम्ही एखादा एक्स फॅक्टर प्लेअर संघात ठेवायला बघता जो त्याच्या दिवसाला फास्ट 40-50 धावा मारून सामना पलटायची हिंमत ठेवतो.
या फॉरमॅटमध्ये सगळेच असे प्लेअर घेऊन खेळताना का नाही उलट विचार करून एखादा कोहली संघात बाळगावा.

२०-२० संघात स्थान हवे की नाही अशी चर्चा स्मिथ, रूट, विल्यमसन यांच्या बाबत शोभते. कोहली वेगळ्या लीगचा प्लेअर आहे.

आणि क्रिकेट हा मजेशीर खेळ आहे. तुम्ही फॉर्म मधील पावर हीटर घेऊन सातत्याने 200 मारत आहात. आलटून पालटून कोणी ना कोणी क्लिक होत आहे. त्यामुळे 200 चे टारगेट चेस सुद्धा करायची क्षमता आहे.
पण एखाद्या सामन्यात तुमचे गोलंदाज चांगली कामगिरी करून चांगल्या खेळपट्टीवर देखील समोरच्याला 170 ला रोखतात.
पण असे टारगेट बरेचदा ट्रीकी ठरतात. शेवटी हा माईंड गेम सुद्धा आहे. तेव्हा एखादा कोहली आश्वासक विजय मिळवून देईल हे बरे पडते.

आज पंजाब जिंकेल का?
आयपीएल दुसऱ्या टप्प्यात तळाचे संघ जिंकायला सुरुवात होते.

आयपीएल फिल्डिंग अशीच असते..
पॉवर प्ले मध्ये फुलटॉस टाकत होते.
आज सुद्धा काहीतरी विक्रमी धावसंख्या रचली जातेय वाटते..

जितके सहज धावा बनत आहेत इथे ते पाहता पंजाब फेवरेट वाटत आहेत आता..
पॉवर हिटरचा गेम झाला आहे.
क्रिकेट कम बेसबॉल

आज पंजाब जिंकेल का?
आयपीएल दुसऱ्या टप्प्यात तळाचे संघ जिंकायला सुरुवात होते.
>>

खरे ठरले Lol

पोरगी सध्या आयपीएल सोबत बघते. तिला हेच खरे क्रिकेट वाटू नये म्हणून मी तिला काल सचिन दाखवला आणि विचारले याला ओळखतेस का? तर म्हणाली हो.. गॉड ऑफ क्रिकेट.. मी म्हटले गूड.. का म्हणतात ते जरा मोठी झालीस की सांगेन.. तोपर्यंत आयपीएल एन्जॉय कर Proud

* का म्हणतात ते जरा मोठी झालीस की सांगेन * - कृपया तिला आत्ताच सांगा; डिजेवर वाजतं तेंच संगीत अशी तिची समजूत होण्यापूर्वी बिस्मिल्लांची सनई ऐकवा तिला !! Wink

DC v MI, 43rd Match
DC 89-0 (5)
Abishek Porel*: 8 (7)
Jake Fraser-McGurk: 78 (24)
Mumbai Indians opt to bowl

जॅक फ्रेजर मॅकगर्क.. तूफान धुलाई मुंबईची
काय मस्त मारतोय. मॅक्सवेल आहे दुसरा.. क्लीन हीटिंग !

हो भाऊ, कबूल आहे. वेळीच सांगायला हवे. किंबहुना सांगण्यापेक्षा आता जेव्हा कसोटी सुरू होतील. पाच दिवस चालणारे सामने सुरू होतील जे मी स्वतः जास्त आवडीने बघतो, ते बघून तिलाही उत्सुकता जागृत होईल, ते मी तिला समजवेन, तिला समजेल, पटेल, तेव्हाच कुठेतरी सचिन द्रविड अश्यांबद्दल सांगण्यात अर्थ आहे. तरच काही समजेल असे वाटते.

हा पहिलाच सीजन आहे तिचा क्रिकेट रोज आवडीने न चुकता बघायचा. सुरुवात आयपीएल पासून झाली आहे. मजा करू दे.

वर्ल्डकप selection उद्या आहे का?

जर 16 न्यायचे असतील तर त्यात ही नावे असतील असे वाटत आहेत..

Rohit Sharma
Yashasvi Jaiswal
Virat Kohli
Suryakumar Yadav
Rinku Singh
Rishabh Pant
Sanju Samsonn किंवा KL Rahul
Hardik Pandya
Shivam Dube
Ravindra Jadeja
Kuldeep Yadav
Yuzvendra Chahal
Jasprit Bumrah

हे 13 झाले.
यांच्यानंतर 3 वेगवान कोण न्यायचे हा प्रश्न आहे.
तो मयंक यादव कुठे आहे? त्याला लपवला आहे का?

संजूची मॅच्युरिटी खूप वेगळ्या लेव्हलची आहे ह्या सीझनला. स्वतः मस्तच खेळला पण जुरेलला सुद्धा छान गाईड केलं. लखनौचे प्लॅन्स पूर्णतः फसले.

अर्थात बिश्णोईला वेस्ट-इंडियन जोडीसाठी राखून ठेवण्याची कल्पना जरी चांगली असली तरी १२ व्या ओव्हरनंतर त्याला आणायला हवं होतं. एका प्रमुख बॉलरला एकच ओव्हर देणं हे कुठल्याही परिस्थितीत अनाकलनीय आहे. ठाकूर/मोहसीन ची एखादी ओव्हर स्टॉयनिसला देता आली असती. राहूलच्या कॅप्टन्सीमधल्या त्रुटी पुन्हा जाणवल्या आज. दुसरीकडून संजू इतकी श्रूड कॅप्टन्सी करत असताना राहूलचं क्लूलेस असणं अगदीच विरोधाभासी होतं.

दुसरीकडून संजू इतकी श्रूड कॅप्टन्सी करत असताना राहूलचं क्लूलेस असणं अगदीच विरोधाभासी होतं.
>>
अगदी
राहुल ची कॅप्टन्सी बहुतेक खेपेला यथा तथाच असते.
प्लेअर्स बरे खेळल्याने टीम जिंकते अन् झाकली मूठ क्रेडिट घेऊन जाते.
त्याला डोमेस्टिक लेव्हल ला ही कॅप्टन्सी चा अनुभव नसताना डायरेक्ट टेस्ट मधे कॅप्टन करणं टोटली मूर्खपणाचं होतं...

ओपनिंगला शर्माच हवा..पण तो रोहित ऐवजी अभिषेक असेल तर संघाला जास्त फायदा होईल. सूर्याऐवजी परागला /शशांक न्यायला हरकत नाही. पांड्याचा फॉर्म बघता NCA मध्ये थोडा वेळ घालवायला हरकत नाही.
Head, Klassen आणि इतर परदेशी मंडळी पाहता यावर्षी पण वर्ल्डकप ची फेरी फुकट जाणार आहे.

पूर्ण नवीन संघ न्यावा.
एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला. सगळ्यांचा आवाज कमी होईल.

Pages