आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बटलर आणि संजू दोघेच खेळत राहिले तर आरामात जिंकतील. दोघांचे अर्धशतक झाले. सध्या दोघे 175 स्ट्राईक रेट ने खेळत आहेत.
कोहलीचे शतक झाले. पण त्याचा स्ट्राईक रेट 156 होता. तसेच समोरून कोणी स्फोटक खेळी केली नाही. मॅक्सवेल चालत नाहीये आणि दिनेश कार्तिक का यांनी पाठवला नाही. विकेट हातात असून 200 मारता आले नाही तिथेच राजस्थान ला advantage गेला.

कोहलीचे आजचे शतक 67 बॉल मध्ये आले.
ही आयपीएल मधील slowest century आहे.
अर्थात या पेक्षा स्लो इनिंग असतीलच. फक्त त्या इतक्या स्लो असतील की त्यात शतकं झाले नसेल.

खेळला एकदाचा बटलर!! आणि खेळला ते पण काय शेवटच्या बॉलला सिक्स हाणून शतक!!
तो सिक्स बसल्यानंतरचे त्याचे भाव आणि नंतर डगआउटमध्ये टॉवेल घेऊन बसलेला असतानाची त्याची बॉडी लॅंग्वेज हेच सांगत होती की त्याला या खेळीची नितांत गरज होती..... आता पुढच्या काही मॅच तो याच गवसलेल्या फॉर्ममध्ये खेळावा.
मुख्य म्हणजे शेवटपर्यंत टिकला आणि मॅच फिनिश करुनच आला Happy

त्याची सेंच्युरी झाल्यावर हॅट्मायरच त्याच्यापेक्षा जास्त खुष दिसत होता आणि एकंदर डगआउटमधला माहोल बघता ही टीम पूर्ण एकजिनसी पणाने खेळत आहे.
क्रेडीट गोझ टू संगा आणि संजू!!

फाफने काल अतिशय साधारण कॅप्टंसी केली..... मॅक्सीला एखादी ओव्हर तरी देऊन बघायला हवी होती
फिलिंग बॅड फॉर कोहली...... त्याची एकाकी झुंज RCB ला जिंकवायला कमी पडतीय!!

मुबंई जिंकली तरी इथे एकही पोस्ट नाही?? Uhoh

रिषभ पंत आज काय फटका मारुन आऊट झाला त्याचे त्याला माहित!!

पंत आला तेव्हा 29 चेंडूत 90 हवे होते. त्यामुळे त्याच्या डोक्यात तेव्हा काहीच प्लान नव्हता असे वाटले.
संथ सलामी झाली आणि तरीही तिथे पोरेल पुढे पाठवला आणि तो जसा खेळला तिथेच सामना दूर गेला.

It's been 16 years since IPL started :

- Most IPL trophies - Rohit Sharma (6)

- Most MOTM Awards (Indian Player) - Rohit Sharma

- Most Winning runs - Rohit Sharma

- Most runs in IPL finals (won matches) - Rohit Sharma

But still Rohit Sharma is getting all the hate alone. The Unluckiest Ever !

सौजन्य व्हॉटसअप

आज पहिली मॅच पहायला जमलं नाही. पण मुंबई जिंकल्याचं बरं वाटलं.

गुजराथ वि. लखनौ चा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला. मागची दोन वर्ष गिल, पंड्या, मिलर चे बॅटिंग मधले, शामी पॉवरप्ले), रशीद (मिडल ओव्हर्स), मोहित (डेथ ओव्हर्स) ह्यांचे बॉलिंगमधले स्टेलर परफॉर्मन्सेस आणि त्याखालोखाल साहा, तेवातिया, सुदर्शन वगैरे मंडळींनी खेळलेल्या उपयुक्त इनिंग्जमुळे गुजराथ ‘अबोव्ह देअर वेट‘ पंच करत होते. यंदा पंड्या, शामी नसताना आणि मिलर आऊट ऑफ फॉर्म असताना त्यांना ते कितपत जमेल ही शंका होतीच. ती आज च्या मॅचमधे बर्यापैकी खरी ठरली. अर्थात एका मॅचवरून काही निश्कर्ष काढता येणार नाही. त्यांची बॉलिंग आजही चांगलीच झाली पण बॅटिंग फारच वीक होती.

हो.... शुभमन आणि विल्यमसन सोडले तर एकही मोठे नाव त्यांच्या बॅटींग लाईनअपमध्ये नाहिये
शमी ची कमी त्यांना हार्दिकपेक्षा जास्त जाणवत असणार!!

रच्याकने,

इंटरनॅशनल स्टेज ला अझर टीम मधे असताना सचिन कॅप्टन झाला,
सचिन असताना दादा झाला,
दादा, सचिन असताना द्रविड झाला,
हे तिघे असताना कुंबळे / धोनी झाले,
धोनी असताना कोहली झाला,
कोहली असताना रोहित झाला...
पण कुणाही जुन्या कॅप्टन नी नव्या कॅप्टन वर हावी होण्याचा प्रयत्न केला नाही...

आयपीएल मधे मात्र ऑन पेपर जडेजा कॅप्टन असो की ऋतुराज, धोनी सूत्र हलविताना / फील्ड सेट करताना दिसतो. हे कॅप्टन च्या रिक्वेस्ट नी न होता सवयीनी होताना दिसतं. आणि कमेंटेटर्स पासून फॅन्स पर्यंत कुणालाही यात वावगं वाटत नाही. मग नवा कॅप्टन कसा ट्रेन होणार?
हे फ्रांचाईजी च्या बॅकिंग शिवाय होणार नाही. (पुणे सुपर जायंट्स नी स्मिथ ला कॅप्टन केलं तेंव्हा हे होत नव्हतं). मग फ्रांचाइजी साठी तरी ऑन पेपर वेगळा कॅप्टन ठेवण्यात हशील काय???

रघुवंशी आणि नारायण
एकाच देवाचे अवतार खेळत आहेत.
नंतर व्यंकटेश, चक्रवर्ती, राम येतील..

रघुवंशी कसला प्रेक्षणीय खेळतो. डोळे सुखावतात एकदम शॉटस बघताना. एकदम व्हीव्हीएस नि रमेश ची आठवण येते.

हे फ्रांचाईजी च्या बॅकिंग शिवाय होणार नाही. (पुणे सुपर जायंट्स नी स्मिथ ला कॅप्टन केलं तेंव्हा हे होत नव्हतं). मग फ्रांचाइजी साठी तरी ऑन पेपर वेगळा कॅप्टन ठेवण्यात हशील काय??? >> काल ईशान किशन म्हणाला कि कीपर ला नीट अँगल दिसत असल्यामूळॅ फिल्ड मधली बारिक सारिक मॅन्यूव्हर कीपरने करणे जास्त योग्य ठरते.

आज एकदमच ढासळले राव कोलकातावाले. कोणीच फायर नाही झालं हे चिंताजनक आहे. मागच्या मॅचला कैच्या कै मारले नराईन आणि रघूवंशी नी. आधीच त्यांची बॉलिंग फार स्ट्राँग नाही त्यामुळे जिंकणे निव्वळ अवघड वाटत आहे.

“ रघुवंशी कसला प्रेक्षणीय खेळतो. डोळे सुखावतात एकदम शॉटस बघताना. ” - अंडर १९ चं फाईंड आहे. मस्त खेळतो. आज मात्र जडेजाला रिव्हर्स स्वीप चा निर्णय चुकला. परवाच्या हैद्राबादच्या मॅचच्या वेळचंच निरिक्षणः स्टंप टू स्टंप, बर्यापैकी वेगात बॉलिंग करणार्या, जडेजा, मोईन सारख्या बॉलर्सना रिव्हर्स मारण्यात रिस्क खूप आणि रिवॉर्ड अगदीच कमी आहे. तिथून केकेआरचा कोलॅप्स झाला.

मस्त बॉलिंग करत आहेत पंजाब वाले. एकदम ऑन द मनी! आत्ता त्रिपाठी गेला तेव्हा इथे मलाही आवाज एकू आला पण सरप्राईजिंगली कीपर जितेश शर्माला पण नाही आला. तिकडून सॅम करन अगदी धावत आला की अरे आवाज आला, असं काय करताय? Lol मग धवननी रिव्यु मागितला. अल्ट्रा एज मध्ये स्पाईक होता क्लियर.
फास्टर तर फास्टर पण ब्रार सुद्धा एकदम भारी बॉलिंग करतोय. रेअर वाटतं मला इतकं डोमिनेशन बॉलर लोकांनी.

10 ओवर 66-4 होते
फायनल स्कोर 182
गूड कमबॅक..
आज हैदराबादी फलंदाजांची दुसरी फळी खेळली.
मोमेंटम पाहता advantage हैदराबाद..

बरोबर आहे. नितिश कुमार येऊ पर्यंत वाटलं की फार नाही स्कोअर होणार. पण सातत्याने विकेट घेऊन सुद्धा स्कोअर चांगला झाला. भारीच खेळला नितिश.

वेगवान गोलंदाजांना चांगल्या टप्प्यावर मदत आहे आणि भुवी, कमिन्स दोघे डिसिप्लिन बॉलर आहेत.. फायदा उचलत आहेत.

अरे कडक मारत आहे पराग! देखणे शॉट! फास्ट आणि स्पीन दोन्ही छान खेळतोय.
नूर तसा रशिदसारखाच डिसेप्टिव आहे आणि भल्या भल्यांची विकेट काढलीये त्यानी. परागचा शॉट आजिबात प्रिप्लॅन्ड नसतो आणि त्याच्या आर्सिनल मध्ये वेगवेगळे शॉट्स आहेत त्यामुळे बीट होण्याचे चान्सेस कमी होतात.

असं म्हणतात की चांगल्या बॅट्समनना एक अंदाज किंवा सिक्स्थ सेन्स टाईप असतो की बॉल कुठे वळणार आहे किंवा नाही वळणार ते. मला वाटतं त्यापेक्षाही लेट खेळणे, क्विक रियॅक्शन टाईम आणि वेगवेगळे शॉट खेळता येणे हे महत्वाचे आहे. बर्‍याच वेळ बॉलर लोकं बॅट्समनना क्रँप (कॉर्नर) करायला बघतात पण लेट शॉट आणि क्विक रियॅक्शन्मुळे ते चांगल्या पोजिशन मध्ये येऊन चांगला शॉट मारतात. कोहली मध्ये तसं जाणवतं आणि आता पराग मध्ये ते दिसून येतं. अजून खुप मुरला, मचुअर झाला तर जबरदस्त करियर होईल.

इतका रिमार्केबल चेंज झालेला बॅट्समन पहिल्यांदाच पाहिला मी तरी. मी स्वतः चेष्टा केलेली आहे त्याच्या फॉर्मची.

इतका रिमार्केबल चेंज झालेला बॅट्समन पहिल्यांदाच पाहिला मी तरी. मी स्वतः चेष्टा केलेली आहे त्याच्या फॉर्मची
>>>>>

त्याची नैसर्गिक शैली बघून जाणवायचे की तो चांगला फलंदाज आहे. मला त्याच्या वयाचा आणि ताकदीचा प्रॉब्लेम वाटायचा. सगळेच सचिन नसतात जे सोळा सतराव्या वर्षी या लेव्हलचे क्रिकेट खेळायला तयार व्हावेत. त्याचे मोठे फटके मी कधी पोहोचताना पाहिले नव्हते जे या फॉरमॅटची गरज आहे. त्यामुळे यावेळी त्याची पहिली इनिंग पहिल्या वीस तीस धावा बघून मी लिहिले देखील होते की यावेळी याच्या फटक्यात ताकद दिसत आहे. यावेळी हा फायनली चमकेल असे वाटतेय. पण सिरियसली अपेक्षेपेक्षा जास्तच चमकत आहे. जसे गिल आणि यशस्वीमध्ये आपण फ्युचर बघतो त्या लेव्हलचा वाटत आहे.

यशस्वी वरून आठवले. त्या बद्दल सुद्धा सेम मत होते. वयाने लहान आणि कडका होता. फटक्यात ताकद नव्हती. पण आता कसले एकेक सिक्स मारतो.. रोहीत सुद्धा मध्यंतरी त्याला म्हणाला की क्या खा के आया रे सालभर, बहोत लंबे लंबे छक्के मार रहा है..

तेवाटीयाच्या रन आऊट च्या वेळी अंपारयला वर रीफर का करावे लागले ? तेवाटीया फ्रेम मधे सुद्धा नव्हता. कि फक्त शॉर्‍ट रन चेच्क करायला केले नि म्हणून रन आऊट पण चेक केला ? तेवाटीया तर आधीच डग आउट मधे जाऊन बसला होता Happy

मयांक ची अ‍ॅक्षन बघितल्यावर कुलदीप सेन किती कष्ट करतो असे वाटते.

बॉल एवेजी हात वगैरे लागला का स्टंपला त्या करता असावा कारण बॉल खाली पडला.

इट वॉज रॉयल्स गेम टु लूज अ‍ॅण्ड दे डिड! शेवटी फारच ढिसाळ बॉलिंग टाकली.

कार्थिक Lol शोधून काढला त्यानी मार्ग वाईड ऑफ साईडला टाकलेल्या बॉल्सना. ३ शॉट बसले राव! वैतागले इंडियन्स! Lol

आ त्ता चौथा मारला! १९ रन मधवाल ला! जबरी!

Pages